
इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !
नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/
Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.
३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.
सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.
वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !
पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!
तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! 
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle
पहिल्या शब्दाने बांधायला जाऊ
पहिल्या शब्दाने बांधायला जाऊ तर दुसरा उडून जाईल >>>>>>>>
कर्रेक्ट
आजचा लवकर जमला
आजचा लवकर जमला
३/७ आणि ४/७
शिवाय आज पहिल्यांदाच पहिला शब्द पहिल्यांदा सुटला. यू नो व्हॉट आय मीन
(No subject)
आजचे Dor माझे ६ व ७ .
आजचे Dor माझे ६ व ७ .
(No subject)
छान.
छान.
गेले महिनाभर आपण सर्वजण Wo, Abs, Dor हे खेळ मोठ्या आवडीने खेळत आहोत. ते नियमित सोडविणाऱ्याना आता कदाचित ते चुटकीसरशी सुटत असतील.
जर का याचा कंटाळा आला तर अक्षरपालटासंबंधित अन्य एक खेळ सुचवतो, तो म्हणजे नऊ अक्षरांचे anagrams तयार करणे.
यासंबंधी माहिती आणि माझे अनुभव इथे आहेत:
https://www.maayboli.com/node/72788
(No subject)
छान, आजचे शब्द वरती रचून
छान, आजचे शब्द वरती रचून ठेवायचे !

(No subject)
आजचे शब्द वरती रचून ठेवायचे ! >>>>>
येस!!
छान !
छान !
आजचा शब्द सवंग असला तरी धक्का बसायचे कारण नाही
(No subject)
वा !
वा !
आजचे शब्द गुंडाळून ठेवल्यावर तरंगतात !
मला आपलं फिर लहराया लाल
(No subject)
झरथुष्ट्र यांना वंदन करून हा
झरथुष्ट्र यांना वंदन करून हा खेळ लवकर सुटतो का पाहतो.
डॉर्डलची लिंक मूळ लेखात देता
डॉर्डलची लिंक मूळ लेखात देता येईल का?
भरत
मूळ लेखात दुवा दिला आहे
धन्यवाद
अर्र.
धन्यवाद!
ह पा
ह पा

झाले का नाही झरतृष्ट प्रसन्न ?
मराठीसाठी मी बनवलेले शब्दखूुळ
मराठीसाठी मी बनवलेले शब्दखूुळ
शब्दखूुळ
शब्दखूुळवर मायबोलीवर लिहिलेला लेख
81065
झाले का नाही झरतृष्ट प्रसन्न
झाले का नाही झरतृष्ट प्रसन्न ? >> आज ७/७ आणि २/७ लागले. शेवटच्या नामस्मरणाला वाटलं की प्रसन्न होतात की नाही! झाले बुवा _/\_
छान
छान
आजचे सोपे आहेत. ५ व ३/७
पुन्हा सुस्त व्हायला हरकत नाही !
आज इतके guesses लागायला नको
आज इतके guesses लागायला नको होते खरे तर!
दुसरा शब्द सोडवताना सुस्त
दुसरा शब्द सोडवताना सुस्त झालात की काय ?

अगदी इतका की पाचव्या गेसला
अगदी
इतका की पाचव्या गेसला पार ठार!
आज मजा आली. उजवीकडचा तर
आज मजा आली. उजवीकडचा तर अगदी recent वर्डल मुळे डोक्यात ताजा होता. पाचव्या गेसनंतर डावीकडच्या शब्दाची शेवटची ४ लेटर्स अणि त्यांचा सिक्वेन्स लक्षात आला. पण शेवटी ते ४ लेटर्स असताना पहिल्या लेटर साठी ९ ऑप्शन्स येतात. Learnt this the hard way in Wordle
त्या ९ पैकी ६ ऑप्शन आधीच्या गेसेस मधे एलिमिनेट झाले होते. मग ६ व्या गेस मधे ऊरलेल्या ३ ऑप्शन्स मधून २ वापरले.
बरोबर !
बरोबर !
डावीकडे त्या अनेक पर्यायांशीलढत द्यावी लागते ....
भूगोल प्रेमींसाठी या खेळाचे
भूगोल प्रेमींसाठी या खेळाचे नवे प्रारूप : Worldle
https://www.hawkdive.com/worldle-a-unique-map-wordle-for-geography-lovers/
इथे फक्त देशाचे नाव लिहायचे आहे. नेहमीप्रमाणे सहा प्रयत्न.
प्रत्येक प्रयत्नात आपले उत्तर चुकीचे असेल तर ते आपल्याला अपेक्षित उत्तराचा देश आपण सांगितलेल्या देशापेक्षा किती किलोमीटर लांब आहे आणि कुठल्या दिशेला आहे ते दाखवते.
छान वाटले.
आज उजवीकडे पाचवा गेस बरोबर
आज उजवीकडे पाचवा गेस बरोबर असता तर पाताळलोकच!
(No subject)
Pages