Absurdle व Dordle ! वर्डलच्या २ पाउले पुढे...

Submitted by कुमार१ on 24 January, 2022 - 11:26

इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !

नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/

Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.

३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्‍यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

Absurdal screen.jpg

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.

सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.

वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !

पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!

तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! Happy
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Interesting.
Screenshot_20220124-222810_Chrome.jpg

ABSURDLE
by qntm
⚙️
?
T O D A Y
S U P E R
W I N C E
K N I F E
H E I G H
B E I N G

हाहा अस पेस्ट होतय पण कलर शिवाय मज्जा नाही...

आदिती, छान.
तेही जमेल. शुभेच्छा !
.....
हा नवा खेळ 10 जानेवारी 2022 रोजी अस्तित्वात आलेला आहे. वर्डल आणि हा खेळ यांच्याबद्दल काही रंजक माहिती:
१. या दोन्ही खेळांची शब्दबँक एकच आहे.

२. त्या बँकेमध्ये 2315 अपेक्षित उत्तरांचे शब्द आहेत. याव्यतिरिक्त 10657 राखीव गूढ शब्द म्हणून असतात. परंतु ते अपेक्षित उत्तर नसतात; अंदाजांत त्यांचा वापर होतो.

३. Absमध्ये नवप्रज्ञेच्या तंत्राचा सुरेख वापर केलेला आहे.

सर्वांना धन्यवाद !
हा खेळ खेळण्यासाठी सर्वांचे स्वागत आहे.
अनुभव जरूर लिहा

मला वाटतं कोड्यात ल्या शब्द निर्मात्यांचा आवाका अधिकाधिक कमी करून, त्याला कॉर्नर करून शब्द बनवायला लावायचे

भरत छान.
बरोबर
आज मी जे सोडवले होते त्यात fuzzy हा शब्द मध्ये आला होता पण
शेवटी उत्तर हे आले puppy.

हा खेळ interesting करण्यासाठी Y अक्षर सुरुवातीच्या guesses मधे वापरुन टाका. नाहीतर सगळे शब्द
Consonant-vowel-repeat consonants-Y असे होतात.

छान सूचना !
पण प्रत्येक वेळेस तसे होताना दिसत नाही.
वरीलपैकी माझा नमुना खेळ आणि अन्य एका खेळात असे झालेले नाही.
....
वरील सर्वजण छान खेळत आहेत

मानव
होय, मी पण एकदा अकरा पायऱ्यापर्यंत पर्यंत गेलो होतो.

त्या कॉंबिनेशनचे सगळे शब्द ओळखल्याशिवाय सुटलं म्हणत नाही.
तुम्ही hatch आधी लिहिलं असतं तरी पुढे खेळायला लावलं असतं.

खेळून झाल्यानंतर एखाद्या डावाची अशीही प्रतिमा देता येतेय. चित्रात वर इन्फिनिटीचे चिन्ह आहे.
म्हणजे खेळात अनंत प्रकारचे शब्दसंयोग होऊ शकतील की काय ?

abssymbol.jpg

HUNKY >>> असे बोलीभाषेतले अपरिचित शब्द बरेच भेटतात इथे.

स्क्रीनशॉट घेऊन प्रयत्न करा

खेळून पाहिला, पण एक दोन शब्द ओळखल्यानंतर कंटाळा आला. नको असलेली अक्षरं खूप सहज एलिमिनेट करता येतात. कितीही शब्द टाका.

प्रत्येकाचे अनुभव समजत आहेत.
दोन्ही खेळांची मजा वेगवेगळी आहे
वर्डल मध्ये "ओळखा पाहू शब्द" हा भाग आहे तर
या नव्या खेळात "करा बघू जास्तीत जास्त शब्द" अशी गंमत आहे Happy

Pages