Absurdle व Dordle ! वर्डलच्या २ पाउले पुढे...

Submitted by कुमार१ on 24 January, 2022 - 11:26

इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !

नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/

Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.

३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्‍यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

Absurdal screen.jpg

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.

सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.

वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !

पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!

तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! Happy
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१३००० किमी पश्चिमेला म्हणजे किती देश सरकायचे याचा काही अंदाजच
>>>
बरोबर. विशेषतः जर आपला देश आणि अपेक्षित देश यांच्या दरम्यान महासागर असेल तर मग अंदाज बांधणे अवघड होते.

ते अंतरही त्या देशाचा मध्य आणि दुसर्‍या देशाचा मध्य असं मोजायचं आहे. मोठा देश असेल तर गुगल करून दोन देशांतलं अंतर बरोबर मिळणार नाही.
इतके दिवस माझं बाणाकडे लक्षच नव्हतं. इथे वाचून तो लक्षात आला. मी आज दक्षिण अमेरिकेतल्या देशापासून सुरुवात केली. तिथून वायव्य आफ्रिका, युरोप असा मजल दरमजल क रत चौथ्या फेरीत देश ओळखता आला. जगाचा नकाशाही समोर ठेवला होता.

मी सुद्धा पहिला देश अर्जेंटिना घेतला होता Happy
केवळ एक आवडते नाव म्हणून !

छान.
माझे : #Worldle #32 5/6 (100%)

आफ्रिकेतून सुरुवात केली. मग छान पैकी दिशा उलट्या पालट्या करत पोचलो .
मोबाईलचा इतिहास आठवला Happy

उजवीकडचा शब्द अनकॉमन आहे. याचा पेपर असतो असे आठवते. डावीकडचा सुध्दा त्याच्या खर्‍या अर्थाने आपण किती वेळा वापरतो? पण वेगळ्याच ठिकाणी वापरल्या गेल्याने आता सगळ्यांना माहित आहे Happy
dordle_16.jpgworldle.jpg

१. पण वेगळ्याच ठिकाणी वापरल्या गेल्याने >>>
मी सुद्धा म्हटले की बांधकामात ला शब्द संगणकात कसा काय आला बुवा Happy उत्सुकता आहे.

२. याचे स्पेलिंग वैशिष्ट्यपूर्ण. वरून पावडर फासली कि झालं......

इथे बघा नावांमागच्या इन्टरेस्टिण्ग गोष्टी आहेत -
https://www.businessinsider.com/how-google-microsoft-lotus-adobe-yahoo-a...

पण अर्टिकल लिहिणार्यांनीच इकडुन तिकडून गोळा केल्यात त्यामुळे गोष्टींची authenticity माहित नाही Happy

छान. दोन प्रतिमांचा संयोग सुरेख केला आहेत !
डी ३० :
आत शिरल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच घटना का बरे घडतात ?
.....

#Worldle #33 5/6 (100%)
देशाचा शोध घेता घेता म्हटलं, चला जरा रणभूमी तरी पाहून घेऊ आसपासची Happy

आत शिरल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच घटना का बरे घडतात ? >>>> बरोबर Lol

जगाच्या या भागातल्या देशांच्या पाचवीला युध्द यादवी पुजले आहे. आजचा वर्ल्डलचा देश गेल्या १२० वर्षात किती वेळा जोडला फुटला बघा. ताज्यात तजा म्हणजे २००८ साली एका प्रांताने स्वातंत्र्य डिक्लेअर केले. मूळ देशाला मान्य नसले तरी फुटलेल्या प्रांताला अनेक देश आणि वर्ल्ड बॅन्क आणि IMF स्वतंत्र देश मानतात. आजच्या वर्ल्डल देशामधुन २००८ मधे फुटलेल्या प्रांताला स्वतंत्र देश मानले तर हा नवा फुटीर देश आणि युरोप मधलाच आणखी एक देश असे जगातले दोनच देश होतात जे एक युनिक वैशिष्ट्य शेअर करतात. कोणता दुसरा देश आणि कुठले वैशिष्ट्य?

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आधीच्या अनंत शब्दखूुळाच्या जोडीला आणतो आहोत ‘दैनिक शब्दखूुळ’ - रोज एक नवा तीन अक्षरी शब्द ओळखायचा. रोज खेळा आणि सोशल मिडियावर दवंडी पिटत इतरांना सहभागी करत आनंद द्विगुणीत करा.

https://tinyurl.com/dailyshabdakhoool

worldleहा खेळ सोडवण्यासाठी मी दुकानातून एक मोठ्या आकाराचा छापील जगाचा नकाशा घेऊन आलो आहे. त्यात बघून सोडवायला सोपे जाते.

परवा त्यांनी Diego Garcia यासारखे भूभाग सुद्धा ओळखायला सांगितले होते. ते संगणकावरील मर्यादित जागेत शोधणे खूप अवघड जाते. पसरून ठेवायचा मोठा छापील नकाशा आणल्याने पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा आनंद मिळत आहे. Happy

हो मजा येते. शाळेत असताना आम्ही जगासाठी अ‍ॅटलास आणि भिंतीवरच्या भारताच्या नकाशात ठिकाण ओळखायचा खेळ खेळायचो.
कालचे ४ मार्चचे मिळाले तुम्हाला छापील नकाशात?
मी नैऋत्य -- ईशान्य फिरून फिरून शोधतेय..... सापडेचना. पाणी दिसले फक्त. खूप मोठे करून पहावे लागले.

आता बेटे, खंडाच्या किनार्‍याचे देश आणि भूभागातील देश कळायला लागले.
आता Hide country image / Randomly rotate country image पहायचेय.

Submitted by नाबुआबुनमा on 23 February >>>
कोसोवो शोधले होते. पण वैशिष्ट्य आणि युरोपातील देश नाही मिळाले. नंतर आलेच नाही इथे.
आमची धाव गुगलच्या बोटाला धरून ..... क्ल्यू देणार का?
demography / environment / economics किंवा काय दिशेने वैशिष्ट्य लक्षात घ्यावे ?

कारवी
Diego Garcia >>> छोटे छोटे निळे ठिपके दिसत आहेत छापील नकाशात !
.....................
घरातील एका खोलीतील पूर्ण भिंतीवर जगाचा नकाशा शाळेतल्या प्रमाणे रंगवून घ्यावा असे स्वप्न आहे खरे. परंतु अशा उद्योगांना कौटुंबिक मान्यता मिळणार नाही Happy Happy

https://geology.com/world/world-map.shtml
हा नकाशा चांगला आहे. याच संकेतस्थळावर वेगवेगळ्या खंडांचे नकाशे आहेत.

काल हिंदी महासागरातले एक बेट होते. आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावरचा देश आणि मग श्रीलंका असे देश देऊन मग त्यांच्या मध्ये ते बेट आहे हे कळले. नकाशात त्याचा आकारही दिसत नव्हता. तेव्हा हिंदी महासागरातली बेटे गुगलवर शोधावी लागली.

हो, तोच. आकार जुळवून बघण्याइतका दिसतच नव्हता.
पण दिशा आणि किमी मधील अंतरे हिंदी महासागरातच नेत होती पुन्हा पुन्हा.

काल मी सोडवलं नव्हतं.
आता त्या दिशांच्या खुणा आणि अंतर पाहून योग्य देशात पोचणं जमायला लागलंय.

मुलांना सुरुवातीच्या इयत्तांत राज्याचा, देशाचा भूगोल अभ्यासायचा असतो. तिथे असं कोडं असेल, तर शिक्षण हसतखेळत होईल. शब्दसंपदा वाढवायला वर्डलही उपयुक्त आहे.

या आठवड्यात भूगोलाच्या खेळात दोनदा कधीही न ऐकलेल्या दोन बेटांचा समावेश होता.
सर्वसाधारण नकाशात त्यांची नावे सुद्धा लिहिलेली नसतात. आजचेही त्यातलेच आहे
त्यामुळे शोधता आली नाहीत

छापील नकाशात दिसत नसावीत कदाचित, कारण खूपच पिटुकली आहेत.
पण गुगल नकाशा सुविधेत मोठे करून पहाता येते हे बरे आहे.

मी या आठवड्यात नेमके Hide country / rotate country करून पाहिले.
rotate country ला तीनदा बेटेच आली.
टप्प्याट्प्प्याने त्याने दुष्टासारखे समुद्रातच आणून सोडले जिथे ठिपकाही दिसत नव्हता. मग शोधली नेटाने.
पहिले नौरू आणि मग ही दोन.
नौरूची माहिती पाहिली. २० चौ किमी फक्त. विमानतळावरून पायी चालत मुक्कामाला जाता येते.
किती छोटे देश आहेत. एकेकटे अथांग सागरात. कसे जगत असतील आहेत त्या सोयीसुविधेत....

Pages