Absurdle व Dordle ! वर्डलच्या २ पाउले पुढे...

Submitted by कुमार१ on 24 January, 2022 - 11:26

इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !

नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/

Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.

३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्‍यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

Absurdal screen.jpg

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.

सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.

वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !

पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!

तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! Happy
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह, rarer?
असे शब्द असतील तर मजा नाही येत.

आतापर्यंत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार !
भरत
पाच प्रयत्नात ही खूप छान प्रगती आहे.

निर्मात्यांच्या दाव्यानुसार यातील एखाद्या खेळाचे उत्तर कमीत कमी चौथ्या पायरीवरच येऊ शकते. जर कोणी ते तिसऱ्या पायरीवरच बरोबर आणून दाखवले तर ती अभूतपूर्व घटना असेल !
अर्थात हा मुद्दा स्पष्ट व्हायला अजून काही महिने जावे लागतील.

आता ४ मध्ये कोण आणून दाखवणार ? Happy

जुनेपाने शब्द वापरून चार पायऱ्यांमध्ये जालावर जाहीर झालेले उत्तर असे आहे:

a..y..r..i..e
c..a..n..s..t
p..o..l..k..a
q..u..a..l..m

आणखी एक पाचScreenshot_2022-01-27-15-42-33-488_com.android.chrome_0.jpg

त्या चारातले शेवटचे दोनच ऐकलेत

लबाड गेम आहे. Essay नाकारून assay घेतला. हा शब्द मला माहीतीही नाही
आणखी तीन पाच फेऱ्यांत सुटले

मस्त ! करून टाका ४ मध्ये Happy

लबाड गेम आहे. Essay नाकारून assay घेतला>>>>

मलाही त्याच्या लबाडपणाचा अनुभव येतोय !
पाचव्या पायरीवर आपण Fence करायला जावे तर त्याच्या मनात Henceअसते. की मग झाली सहावी पायरी .

Assay >>> रसायनविज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात हा शब्द अगदी नेहमीचा आहे

जाई, होय .
सवय झाली की आवडते.
...
रच्याकने,
मुळात हा खेळ Josh Wardle या अमेरिकेतील अभियंत्याने तयार केला असून त्याला कारणीभूत ठरली आहे ती जोश व कु. शाह यांची प्रेमकथा ! Happy

इथे वाचू शकता : https://www.nytimes.com/2022/01/03/technology/wordle-word-game-creator.html

You have reached the limit of free articles
असं असेल तर सबस्क्रिप्शन घेतल्या शिवाय वाचता येत नाही.

काही ट्रिक असेल (cache / कुठली फाईल डिलीट करणे वगैरे) तर सांगा कुणी.

>>>जोश व कु. शाह यांची प्रेमकथा ! Happy>> रोचक.
६ मध्ये जमतंय पण ५ मध्ये चकवते आहे अजून

हा खेळ जगभरातील शब्दप्रेमींचे मस्त रंजन करीत आहे. त्या खेळात गढून गेल्याने बऱ्याच जणांच्या वैयक्तिक आयुष्यातही काही फरक पडले आहेत. ते दाखवणारी काही सुरेख व्यंगचित्रे इथे आहेत :
https://www.reddit.com/r/wordle/comments/s431jx/absurdle_an_adversarial_...

अंकप्रेमींसाठी याच धर्तीवरील अंकांचा खेळ Primel या नावाने निघालेला असून तो इथे पाहता येईल : https://converged.yt/primel/
त्यात पाच अंकी मूळ संख्या तयार करायची असते.

या लोकप्रिय खेळाच्या निमित्ताने भाषेसंबंधी काही रंजक वाचन झाले. त्यातील विशेष काही नोंदवतो.

१. काही अभ्यासकांनी यासाठी सुमारे ६०,००० शब्दांचा विशेष अभ्यास केला. त्यातून असे लक्षात आले की 46 टक्के शब्दांमध्ये e हे अक्षर असते.
२. याचे कारण सोळाव्या शतकातील भाषा सुधारणेला जाते. तेव्हा बऱ्याच शब्दांच्या शेवटी सायलेंट e जोडण्यात आला (उदाहरणार्थ tone).

३. e च्या खालोखाल a, r व o यांचे क्रमांक येतात.
४. शेरलॉक होम्सच्या एका कथेमध्ये एका सांकेतिक चित्राचा रहस्यभेद करायचा असतो. (चित्र पाहा):

sherlock h.png

तो करताना सर्वाधिक असणारे चित्र म्हणजे e अक्षर असले पाहिजे अशी कल्पना केलेली आहे.

५. e अक्षराची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी फ्रेंच भाषेत A Void या नावाची एक कादंबरी लिहिली गेली, जिच्यात e अक्षरच नाही.

(चित्र जालावरुन साभार)

<<५. e अक्षराची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी फ्रेंच भाषेत A Void या नावाची एक कादंबरी लिहिली गेली, जिच्यात e अक्षरच नाही.<< रोचक कहाण्या घटना आहेत या!

>>>रोचक किस्से आहेत.>>+९९
>>>शेरलॉक होम्सच्या एका कथेमध्ये >>
वाचली आहे. त्या कथेचे नाव The Adventure of the Dancing Men आहे.

धन्यवाद !
या प्रकारच्या खेळांमध्ये आपण यथावकाश मुरतो. मग अशी स्थिती येते जेव्हा दैनंदिन Wordle चुटकीसरशी सुटते; absurdle पळवून पळवून दमवते आणि नकोसे वाटते. तेव्हा पुढचे आकर्षण म्हणून Dordle हा खेळ बघा : https://zaratustra.itch.io/dordle

dordlatest31 (2).jpg

हे जुळे Wordle म्हणता येईल. चित्रात दाखवल्याप्रमाणे याला दोन समान भाग आहेत. आपण अक्षरे त्यात घालू लागलो की तीच अक्षरे दोन्ही बाजूंना उमटतात. रंगांचे अर्थ पूर्वीप्रमाणेच. फक्त त्यात एखादे अक्षर एका बाजूला चालणारे असते तर दुसऱ्या बाजूला नसते. असे करत करत कुठल्यातरी एका बाजूला आधी अंतिम उत्तर येते.

Pages