Absurdle व Dordle ! वर्डलच्या २ पाउले पुढे...

Submitted by कुमार१ on 24 January, 2022 - 11:26

इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !

नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/

Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.

३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्‍यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

Absurdal screen.jpg

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.

सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.

वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !

पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!

तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! Happy
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दैनंदिन Dordle सुद्धा सोडल्यावर असे दाखवता येते.

dord1febjpeg.jpg

सोपे आहे. बघा खेळून

रोचक! ह्यात पांढऱ्या आणि काळ्या दोन्ही चौकटी दिसताहेत. ब्राउझर बदलून केलं तर रंगांची अदलाबदल होईल का ते बघायला हवं.

ह पा, जरूर करून बघा.

यांचे शब्द नेहमीच्या वापरातले निघतात.
इथे एका वेळेस दोन खेळ चालू असल्याने वर्डलचा आनंद द्विगुणित होतो.
या खेळामध्येही दैनंदिन आणि अमर्याद अशा दोन्ही सोयी एकाच पानावर उपलब्ध आहेत

पाहिलं करून. सोडवायला मजा आली. क्रोम आणि श्यामसंग असे दोन ब्राउझर वापरून पाहिले, पण दोन्हीत रंग सारखेच दिसतात. गंमत म्हणजे माझे दोन्ही प्रयत्नात दुसऱ्या कॉलममधले शब्द आधी ओळखले गेले.

छान !
दुसऱ्या कॉलममधले शब्द आधी ओळखले गेले.
>>> वा !
खेळ जसा पुढे सरकतो तसे आपण अक्षरानुसार कुठल्या भागाकडे आधी लक्ष द्यायचे ते ठरवू शकतो.

छान.
आजचं सुटलं >>> मला पण. ४/६ & ५/६

आज ७/७ आणि ५/७ - ह्यात ७ प्रयत्न करता येतात. आजही माझा दुसरा शब्द आधी सुटला.

ह पा
६ व ७ >>> बरोबर.
कारण एका वेळी एकाचेच अंतिम उत्तर येते. त्यामुळे दुसऱ्यासाठी एक प्रयत्न जास्त लागणारच

या अमर्याद खेळाची अजून एक गम्मत लक्षात आली.
जर का आपल्याला एका बाजूचा शब्द ओळखायलाच सात प्रयत्न लागले तर मग दुसऱ्या बाजूची संधी संपते. त्यांच्याकडूनच एकदम उत्तर जाहीर होते.

dordle.jpg

आता dordle खेळायला जास्त मजा येते आहे. Wordle आता ओके वाटतो.

आता dordle खेळायला जास्त मजा येते आहे. >>> अ - ग - दी .
स्वागत !!

दोन्ही बाजू सांभाळणे ही एक छान कसरत आहे Happy

dordle # १२
४/७ व ५/७.

शब्द वेगळे पण उच्चार सारखाच Happy

12
Screenshot_20220205-124752_Chrome.jpg

dordle_0.jpg

आरश्यातले प्रतिबिंब almost

म्हणजे एकावेळी एक अक्षर टंकून बघायचे आणि अक्षराची चौकट हिरवी झाली तर उत्तर बरोबर, असेच ना ?
म्हणजे हा एक अक्षरी मटका आहे का ? Happy

T R U N K
A D O P T
W H I L E
B L A M E
F A L S E
V A L V E

डॉर्डल १४ : ५ व ६ /७

पहिल्या शब्दाने बांधायला जाऊ तर दुसरा उडून जाईल Happy

+१
dord7Feb.jpg

Pages