Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
ऑस्ट्रेलियात पाहिलं येतं
ऑस्ट्रेलियात पाहिलं येतं समजल्यावर लगेच तिकडे गेलो , कोडं सोडवलं आणि लगेच मिरजेत पण आलो.

मग आता मिरजेत १२ वाजल्यावर
मग आता मिरजेत १२ वाजल्यावर काय करणार? तेच कोडे नव्याने नाही सोडवता येत.
(No subject)
अॅब्सर्डल मुळे शब्द वाया
अॅब्सर्डल मुळे शब्द वाया घालवायची सवय लागते.
(No subject)
कठीण होता आजचा.
कठीण होता आजचा.
आज माझंही Absurdle झालं.
आज माझंही Absurdle झालं. बिनधास्त शब्द देत सुटलो, नाही सुटलं.

- - - पि -
माझी आजची रांगोळी
- - - पि -
- - - पि -
- हि - - पि
- हि - पि हि
- हि हि हि हि
हि हि हि हि हि
223 - 5
223 - 5
(No subject)
आज सहाव्या प्रयत्नात एक अक्षर
आज सहाव्या प्रयत्नात एक अक्षर वेगळे होते.त्या अक्षारा सकट शब्द वर झळकला.
आजच सोपे होते
आजच सोपे होते

दुसऱ्या प्रयत्नात सुटलं
पहिला शब्दच भारी वापरला
पहिला शब्दच भारी वापरला तुम्ही.
मिळाले का ते कंपनीतून आजच?
(No subject)
मार्चवर नजर ठेवून असल्याने
मार्चवर नजर ठेवून असल्याने डोक्यात तेच चालू आहे
म्हणून तोच शब्द वापरला
ज्यांच्या शब्दात फक्त पाचवे
ज्यांच्या शब्दात फक्त चवथे अक्शर चुकले पण बाकीचे बरोबर आले त्यांच्यासाठी एक प्रश्न (out of curiosity) - तुम्ही चवथे अक्शर वापरुन जो शब्द केला त्याचा अर्थ विकृत असा होतो का?
आजच्या शब्दात चवथ्या अक्शराच्या जागी टाकायला अगदी limited options असतील अस वाटतय ते कन्फर्म करतोय
जाई तुमचा पहिलाच शब्द लै
जाई तुमचा पहिलाच शब्द
लै भारी!
नाबुआबुनमा
नाबुआबुनमा

जिदंगी का अंतिम सच है वो
केला त्याचा अर्थ विकृत असा
केला त्याचा अर्थ विकृत असा होतो का?....नाही.
अस काही मराठीत शब्दकोडं आहे
अस काही मराठीत शब्दकोडं आहे का?
पहिला शब्दच भारी वापरला
पहिला शब्दच भारी वापरला तुम्ही...,..... हे कसं ओळखता तुम्ही लोक?
देवकी फक्त जाईचा ओळखला. सो
देवकी फक्त जाईचा ओळखला. सो ऑब्व्हियस.
(No subject)
पहिला शब्दच भारी वापरला
पहिला शब्दच भारी वापरला तुम्ही...,..... हे कसं ओळखता तुम्ही लोक?
+1
मला पण नाही गेस करता येत जाईंचा शब्द
दुसऱ्या शब्दातले पहिले चार
पहिल्या शब्दात दुसऱ्या शब्दातले पहिले चार अक्षर तेच आणि त्याच क्रमाने (चारही हिरवे चौकोन) फक्त पाचवं अक्षर वेगळं.
Eldrow - म्हणजे रिव्हर्स
Eldrow - म्हणजे रिव्हर्स wordle - असा एक खेळ मी काढणार आहे. ह्यात रांगोळी बघून तुम्ही लोकांचे पहिले शब्द ओळखायचे.
ह पा,
ह पा,
मिळाले का ते कंपनीतून आजच? ...... ओहो कळला तो शब्द!
>> नाबुआबुनमा - माझापण एक
>> नाबुआबुनमा - माझापण एक प्रयत्न 'चौथे अक्षर चूक बाकीचे बरोबर' असा होता. तेंव्हा मी तुम्ही सूचित करत असलेलाच शब्द वापरला होता. शॉर्टफॉर्म असावा कदाचित!!!
तुम्ही चवथे अक्शर वापरुन जो
तुम्ही चवथे अक्शर वापरुन जो शब्द केला त्याचा अर्थ विकृत असा होतो का
>>
चौथे अक्षर p असेल तर लाक्षणिक अर्थाने विकृत होऊ शकतो. गुन्हेगार वगैरे.
(No subject)
Pages