Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
(No subject)
२२५ ५/६
२२५ ५/६
पण काळ वापरून जरा meh झालं.
आज दुसऱ्या पायरीत पहिले अक्षर
आज दुसऱ्या पायरीत पहिले अक्षर सोडून इतर अक्षरे योग्य क्रमात आली तरी पुढे किमान आठ शक्यता तरी दिसल्या. Hard Mode ऑन केला असता तर पंचाईत झाली असती. अल्फाबेटीकली जाऊन पाचव्या पायरीत आलं असतं बरोबर, पण ते हा शब्द असल्याने लक म्हणावे लागले असते.
आज दुसऱ्या प्रयत्नात शब्द
आज दुसऱ्या प्रयत्नात शब्द मनात उमटला,तो एक अक्षर वगळून बरोबर आला.मग ते पहिले अक्षर पालटून कोडे सुटले.
आजचं कोडं मस्त सुटलं.
आजचं कोडं मस्त सुटलं.
(No subject)
२२६ - ३/६
२२६ - ३/६
रांगोळी टंकायचा आज कंटाळा आला.
(No subject)
फक्त ३ अंदाज लागले
सुटले. फक्त ३ अंदाज लागले
आजच कोडे मटका आहे .
आजच कोडे मटका आहे .
. २२६ - ५
. २२६ - ५
आज बुद्धीचा म्हणावा तेवढा
आज बुद्धीचा म्हणावा तेवढा उजेड पडला नाही !!
आज बुद्धीचा म्हणावा तेवढा
आज बुद्धीचा म्हणावा तेवढा उजेड पडला नाही !! >>
जास्त गंभीर न होता हलक्यात घेतलं असतं तरी चाललं असतं
जुन्या मायबोलीकराला शोनाहो. (हलके घ्या)
(No subject)
आजच व्हायचं होतं हे https://imgur.com/a/wPfxbvI
T_T
मटका!!!
मटका!!!

आजचा शब्दही चटकन सुटला
आजचा शब्दही चटकन सुटला

इंग्रजीत सगळ्यांत अधिक वापरल्या जाणार्या चार व्यंजनांतील तीन पहिल्या शब्दात आणि उरलेलं दुसर्या शब्दात वापरायचा माझा प्रयत्न असतो.
227 .... 6/6
227 .... 6/6
आज जीव काढला या शब्दानं
आज जीव काढला या शब्दानं
सकाळी संडासात सर्वनाम सापडले
सकाळी सकाळी सर्वनाम सापडले
मोबाइलवरुन तिसर्या प्रयत्नात सापडले. मग पीसीवरुन पहिल्याच प्रयत्नात हिरवे झाले
(No subject)
227 -4
227 -4
आबा तुमचा चौथा शब्द कोणता गेस
आबा तुमचा पाचवा शब्द कोणता गेस करत होतो. जमत नाहीये . उद्या सांगा .:)
आबांचा तो शब्द मी आधी ऐकलेला
आबांचा तो शब्द मी आधी ऐकलेला नाही. डिक्शनरीत पाहिला. पण सोपा शब्द असताना कठीण शब्द आधी का आणि कसा घेतला?
मला आज दुसर्या शब्दावरच
मला आज दुसर्या शब्दावरच ओळखता यायला हवं होतं
भरत तुमचे पहिले दोन शब्द मी
भरत तुमचे पहिले दोन शब्द मी ओळखले आहेत .
इतर अनेक असू शकतात . पण पहिला बहुतेक सामानाची व्यवस्था व दुसरा अनेक वचनी आहेच .
227 2/6
227 2/6
पहिल्यांदाच दोन प्रयत्नात जमलं
(No subject)
सुटलं, इथे क्लु मिळाला म्हणून
सुटलं, इथे क्लु मिळाला म्हणून लगेच सुटलं.
आबांचा शब्द मी ही शोधला... एकदम रेअर.
शब्द लक्षात आल्यावर रसपू
शब्द लक्षात आल्यावर रस्पुतीन गाण्यातलं शेवटलं वाक्य घुमलं डोक्यात--शेवटला शब्द वर्डलर्स !! करून.
Pages