सौंदर्यस्पर्धा : सौंदर्यामधे मायबोलीकर या अभिनेत्रींमधे कुणाला विजेती ठरवतील ?

Submitted by शांत प्राणी on 30 December, 2021 - 03:19

खालील पैकी कोणती अभिनेत्री सर्वात सुंदर वाटते ? मायबोलीकर कसा क्रम लावतील ?

१. माधुरी दीक्षित
2-22.jpg5ff957b079bae69b99b29d90d779c270.jpg२. रेखा
4000b55eabd742efe43e548896b851f2--late-birthday-vintage-bollywood.jpg
अ सोबत ती सुंदर दिसते असे तिचेच म्हणणे असल्याने हा फोटो घेतला आहे.
rekha-amitabh.jpg270028544_1742170939311329_6340167875742047285_n.jpg३. ऐश्वर्या राय
1.jpeg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3.jpg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3_0.jpggorgeous-pictures-of-aishwarya-rai-from-the-movie-taal-11-1468217707.jpgunnamed.jpg४. हेमा मालिनी
1c7be4b52d99587d3412bd608565bf06.jpg1ca368ed9a033ba1f10490f4309bf594.jpg५. वहिदा रेहमान
8c205c7e06e060671920143da00694cb.jpg६. मधुबाला
_8d0644c0-3015-11e9-967b-5cdb4de5a68c.jpgMadhubala5.JPGp2-35.jpg७. शर्मिला टागोर
1_kYfXnG3oH_lLVUiNloA7Ig.jpeg61979670.jpgd45o9nf-537fcf9e-86f6-4b8e-8113-0d1a345d7abb.png1418018975sharmila-tagore6.jpg८. जयाप्रदा
1977fdb5215e6ee73c1493245e7c62f7.jpga8aa7cbd1ad3360620cb82fb3e495995.jpg९. श्रीदेवी
3b261909bcd15a4394f40c451cfa06fb.jpgffa9db2292a832dd89fef9f6d46817f4.jpg1404299.jpg१०. सोनाली बेंद्रे
images.jpgsonali-bendre-wallpaper-2-normal5-1546255466.jpg

या सर्वांच्या सौंदर्याला न्याय कसा दिला हा प्रश्न पडला असेल. पण विनम्रतेने या प्रश्नाचे उत्तर इतकेच देऊ इच्छितो कि कोणत्याही प्रकारचे सौंदर्य हे आमच्या नजरेला सुंदरच वाटत असल्याने डावे उजवे करण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या अभिनेत्रीचा एखादा विशिष्ट फोटो अपलोड करायचा असल्यास प्रतिसादात सुचवू शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिसायला सुंदर पण acting नावाने बोंब
1. हेमा
2. कतरीना
3. सोनम(90स मधली)
4.माधुरी
5.जॅकलिन

वरच्या माधुरी, जयाप्रदा, हेमामालीनी,वहिदा ह्या सुंदर म्हणता येतील. सोनाली बेंद्रे impressive personality.

रेखा सुंदर नव्हती खरंतर, तिचे नवीन असतानाचे पिक्चर बघितलेत तर समजेल, आम्ही लहान असताना टीव्हीवर बघितले आहेत. नंतर ती स्मार्ट दिसायला लागली, अभिनय पण उत्तम करु लागली. श्रीदेवी पण अगदी सुरुवातीला काही साऊथ पिक्चरमध्ये अजिबात चांगली दिसत नव्हती.

पुर्वीची जया भादुरी पण दिसायला आणि अभिनयात आवडायची मला, आधी तिचं हास्य नॅचरल वाटायचं, नंतर कृत्रिम वाटू लागलं. जेष्ठ अभिनेत्री म्हणून भूमिका करू लागली तेव्हा कृत्रिम वाटलं, तोच तोच पणा वाटायला लागली. तरीही ती माझी आवडती अभिनेत्री आहे.

सौदर्याच्या मापदंडात अजून अनेक जणी आहेत ज्या या यादीत नाहीत.

>>>>रेखा सुंदर नव्हती
शी वॉज अ‍ॅन अग्ली डकलिंग. ज्या पिल्लाला एकदा कळते तो तर राजहंस आहे. खूप ट्रान्स्फॉर्मेशन झाले तिचे.

जया भादुरी कृत्रिम हास्त. करेक्ट!!

केवळ सौंदर्य या निकषावर माझ्यामते -
मधुबाला ही सगळ्यात वर. There is nobody else in her league. त्या नंतर नंबर गेम सुरू होऊ शकतो. त्यात मग वहिदा रेहमान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय या तिघी आहेत. They together occupy the first 3 positions.
बाकी फोटोंत नसलेल्या मध्ये नुतन, स्मिता पाटील या दोघी फार छान!
नवीन मुलींमध्ये गौतमी वैदेही परशुरामी खरंच छान आहे दिसायला.
धन्यवाद अस्मिता! नावातली चूक सुधारली आहे.

रेखाचा वर दिलेला लाल साडीतला फोटो केवळ अप्रतिम आहे. (हे फक्त फोटो कसा आलाय त्याबद्दलच आहे. दिसायच्या स्पर्धेबद्दल नाही).
माधुरी दिक्षित व जॅकलिन एका माळेत गोवल्यात? बापरे!

रेखा सुंदर नव्हती >> धिस सौंड्स लाईक सचिन चांगली बॅटिंग करत नव्हता. >>> तिचे पहिले काही पिक्चर बघून लिहिलं आहे, ती खूप जाड होती (हरकत नाही, जाड असून चेहेरा सुंदर असलेल्या पण आहेत) आणि चेहऱ्यानेही सुंदर मला तरी वाटली नव्हती. नवीन निश्चल बरोबर पहिला पिक्चर होता. अमिताभबरोबर आलापमध्येही एवढी सुंदर वगैरे वाटली नव्हती. नंतर खूप फरक पडला, सुंदर दिसू लागली पण जात्या सुंदर माझ्यामते तरी नाही.

वरच्यात मी मधुबालालाच विजेती मानेन.

हेमा मालिनी खरोखर ड्रीम गर्ल आहे. पण फक्त सौंदर्यावर जास्त काळ तग धरता येत नाही असं माझं मत. जोडीला अभिनय, बोलका चेहरा असेल तर ते व्यक्तीमत्व दीर्घकाळ लक्षात राहतं. मधुबाला अजूनही लोकांच्या लक्षात आहे त्याचं कारण हे असेल.
विम्मी नावाची एक नटी पण खूपच सुंदर होती. कुणाच्या लक्षातही नसेल. सायरा बानूही सुंदरच.

वहिदा रेहमान , साधना या जुन्या जमान्यातल्या (ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट_) रेखीव चेह-यासाठी आवडतात.
शर्मिला, मौशुमी बंगाली सौंदर्यासाठी आवडतात. सुचित्रा सेन पण आवडतात. लीना चंदावरकर मला बंगाली वाटते.

मूळ मराठी पण हिंदी पडद्यावरच्या सुलोचना, रत्नमाला, दुर्गा खोटे या अभिनेत्री पण सुंदर आहेत.
नूतन, स्मिता पाटील या मला बुद्धीमान वाटतात. त्यांचे चेहरे आखीव रेखीव प्रमाणबद्धतेच्या अभ्यासक्रमाप्रमाणे वाटतात.

नर्गिसचे डोळे.
डिंपलचं एकूण व्यक्तीमत्व ग्लॅमरस आहे. मॉडर्न, वेस्टर्न लुकची अभिनेत्री म्हणून आवडते.
श्रुती हसन , सारिका, सोनाली बेंद्रे, श्रद्धा कपूर या सुद्धा खूप आवडतात.

अनुष्का शेट्टी मात्र पहिल्या पाचात असायला हवी होती. ती हेमा मालिनी आणि जयाप्रदाचे मिश्रण वाटते.
जयाप्रदाबद्दल सत्यजित रे च बोलून गेलत.
बास की इतके Lol

सुचित्रा सेन भारी एकदम, दिसणं आणि अभिनय सुंदर मिलाफ. मूनमून सेन दिसायला चांगली पण नाही आवडत.

लीना चंदावरकर फार गोड, तिच्या चेहेऱ्यावरचा गोडवा भावतो. ती कारवारची आहे, चंदावर नावाचे गांव आहे तिथे. आपले संगीतकार भास्कर चंदावरकर पण तिथले. अशीच गोड मला गीता बाली वाटते. निरागसता आणि गोडवा यांचा मिलाफ म्हणजे या दोघी.

विम्मीबद्दल इथे असेल बऱ्याच जणांना माहिती, तिचा दारुण शेवट, तिची कहाणी माबोवरच वाचली आहे.

डिंपलचं एकूण व्यक्तीमत्व ग्लॅमरस आहे. मॉडर्न, वेस्टर्न लुकची अभिनेत्री म्हणून आवडते. >>> खरं आहे.

मराठीत अनुपमाही सुंदर होती.

तसेच शोभना समर्थ, नूतन, तनुजा या मला सुंदर वाटतात.

स्मिता पाटील स्मार्ट आणि ग्रेसफुल वाटते.

रेखा सुंदर नव्हती >> धिस सौंड्स लाईक सचिन चांगली बॅटिंग करत नव्हता. >>> हे बहुतेक सामो यांना विचारलेलं असावं पण मीही वेगळ्याप्रकारे रेखा सुंदर नव्हती अशा आशयाचे लिहिलेलं म्हणून मला वाटलं मी लिहिलं त्यावर म्हटलं आहे म्हणून मी रीप्लाय दिला.

माझ्यासाठी,
माबोवरील सगळ्या तै, बै, आक्का ह्या सगळ्याच सौंदर्यवती आहेत. माझ्या खाजगी आयुष्यात माझ्या आज्या, आई, बायको, लेक ह्याही सौंदर्यवतीच.

पिच्चरातलं बोल्याच तर......मुमताज, जुही आणी दिया मिर्झा.

साई पल्लवी
सध्या तिची गाणी पाहतेय

मराठी -
1. मृणाल कुलकर्णी
2. पल्लवी सुभाष( कातिल लुक्स).
3.अश्विनी भावे
4. निवेदिता जोशी.
5.????

मला वाटतं मॄणालचं सौंदर्य स्त्रियांना आवडेल असे आहे.
तुम्ही विचाराल की स्त्रियांना दिसायला आवडणार्‍या स्त्रिया आणि पुरुषांना दिसावयास आवडणार्‍या स्त्रिया यांत फरक असतो का? तर हो. माझे तरी असेच नीरिक्षण आहे. पुरुषांना आव्हानात्मक असा अपील आवडतो की काय कोणास ठाउक पण त्यांची स्टाइल वेगळी असते.

मृणालपेक्षा तिची बहीण मधुरा मला जास्त आवडायची पण तिने हे क्षेत्र सोडलं, तिने फार कमी काम केलं. ती अभिनयातपण मृणालपेक्षाही उजवी आणि सहज, अस माझं वैयक्तिक मत. मृणाल दिसण्यात उजवी पण मधुराचे स्माईल आणि गोडवा जास्त आवडायचा मला. मृणाल अभिनयपण छान करते, मधुरा अजून उत्तम करायची.

मधुरा माझ्या वर्गात होती Happy
एका शालेय संमेलनात, मी गणपती झाले होते व ती उंदीर. आमच्या पुढे प्रत्येक राज्यातून पारंपारीक पोशाख केलेली एकेक जोडी, त्या त्या भाषेतील कडव्यावर नाचत जाते असा कार्यक्रम होता.
मधुरा गोड आहे. करेक्ट. तिचे नक्षत्राचे देणे मधील वाचन मस्त आहे. कुसुमाग्रजांची 'पृथ्वीचे प्रेमगीत' तसेच अन्य काही कविता तिने वाचल्या आहेत.

Pages