सौंदर्यस्पर्धा : सौंदर्यामधे मायबोलीकर या अभिनेत्रींमधे कुणाला विजेती ठरवतील ?

Submitted by शांत प्राणी on 30 December, 2021 - 03:19

खालील पैकी कोणती अभिनेत्री सर्वात सुंदर वाटते ? मायबोलीकर कसा क्रम लावतील ?

१. माधुरी दीक्षित
2-22.jpg5ff957b079bae69b99b29d90d779c270.jpg२. रेखा
4000b55eabd742efe43e548896b851f2--late-birthday-vintage-bollywood.jpg
अ सोबत ती सुंदर दिसते असे तिचेच म्हणणे असल्याने हा फोटो घेतला आहे.
rekha-amitabh.jpg270028544_1742170939311329_6340167875742047285_n.jpg३. ऐश्वर्या राय
1.jpeg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3.jpg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3_0.jpggorgeous-pictures-of-aishwarya-rai-from-the-movie-taal-11-1468217707.jpgunnamed.jpg४. हेमा मालिनी
1c7be4b52d99587d3412bd608565bf06.jpg1ca368ed9a033ba1f10490f4309bf594.jpg५. वहिदा रेहमान
8c205c7e06e060671920143da00694cb.jpg६. मधुबाला
_8d0644c0-3015-11e9-967b-5cdb4de5a68c.jpgMadhubala5.JPGp2-35.jpg७. शर्मिला टागोर
1_kYfXnG3oH_lLVUiNloA7Ig.jpeg61979670.jpgd45o9nf-537fcf9e-86f6-4b8e-8113-0d1a345d7abb.png1418018975sharmila-tagore6.jpg८. जयाप्रदा
1977fdb5215e6ee73c1493245e7c62f7.jpga8aa7cbd1ad3360620cb82fb3e495995.jpg९. श्रीदेवी
3b261909bcd15a4394f40c451cfa06fb.jpgffa9db2292a832dd89fef9f6d46817f4.jpg1404299.jpg१०. सोनाली बेंद्रे
images.jpgsonali-bendre-wallpaper-2-normal5-1546255466.jpg

या सर्वांच्या सौंदर्याला न्याय कसा दिला हा प्रश्न पडला असेल. पण विनम्रतेने या प्रश्नाचे उत्तर इतकेच देऊ इच्छितो कि कोणत्याही प्रकारचे सौंदर्य हे आमच्या नजरेला सुंदरच वाटत असल्याने डावे उजवे करण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या अभिनेत्रीचा एखादा विशिष्ट फोटो अपलोड करायचा असल्यास प्रतिसादात सुचवू शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी कधी एकाच वेळी दोन दिसायला सुंदर अशा आपल्या समोर येतात. त्यातली एक मनात बसते
>>>>
या बाबतीत पुरुषांचे मन मोठे असते Happy

कधी कधी एकाच वेळी दोन दिसायला सुंदर अशा आपल्या समोर येतात. त्यातली एक मनात बसते
>>>>
या बाबतीत पुरुषांचे मन मोठे असते Happy

हल्लीच्या नायिकांना फक्त रंगरंगोटी करून चालत नाही. कॅटरिना कैफचा हा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे
https://www.youtube.com/watch?v=Eg8yXn3kTsM

एकदा एका हॉटेलच्या जिममधे टाईमपास साठी गेलो होतो. तिथे त्या वेळची एक खूप प्रसिद्ध मॉडेल आली होती. बोलावं म्हटलं तर चेहरा माहितीचा पण नाव आठवत नाही असे झाले होते. ती आल्यामुळे जबरदस्ती व्यायाम करावा लागला. पण ती साडेतीन तास घामाघूम होईपर्यंत व्यायाम करत होती. एव्हढ्या वेळात मी स्विमिंगपूल (मधे न जाता) च्या बाजूच्या कॅफे टेरिआ त कॉफी घेऊन आलो. तेव्हांच आपल्याला देवाने हिरो बनवले नाही याचे धन्यवाद मानले. नाहीतर काय काय करावं लागलं असतं.
( खरं तर जुन्या हिरोत धर्मेंद्र, विनोद खन्ना सोडले तर कुणी व्यायाम करत असतील याची सुतराम शक्यता नाही).

मधुबाला. बास्स. अद्यापि तत्तुल्य अभिनेत्र्या: ( सुंदऱ्या:) अभावात् अनामिका सार्थवती बभूव.
बाकी बोटे मोडायचीच तर ऐश्वर्या आणि माधुरी. विश्वसुंदरी स्पर्धेत भाग घेताना दात, नाक इत्यादि सेट करूंन घेतात किंवा घ्यावे लागते म्हणतात. माधुरीचा पडद्यावरील वावर सहज वाटतो. तिचे हिंदी बोलणेही सहज आहे. ह्या ॲडिशनल क्वालिफिकेशन्समुळे माधुरीचा पत्ता भारी.
साधना आणि गीताबालीचे गोबरे गाल छान होते. पण पुन्हा साधना कृत्रिम तर गीताबाली सहज आणि मुक्त. वहिदा काळीसावळी तरीही अत्यंत बोलके डोळे, तरतरीत नाक, पातळ चेहरा, देहबोली. नृत्यमुद्रांमध्ये हाताची लांबसडक बोटे जादू करायची. शर्मिला, राखी दिसायला सुंदर पण त्यातल्या राखीने स्वतः: ला राखले नाही. आधीच ती मोठ्या वयात हिंदी पडद्यावर आली आणि लगेच बोजड, थोराड दिसू लागली. सुरुवातीच्या जीवन मृत्यूमध्ये फार सुंदर दिसली होती. पण दोघींचेही हिंदी डिकशन भयंकरच. पूनम धिललाँ, मनीषा कोयराला ह्याही उल्लेखनीय. १९४०- ५५ ह्या दरम्यान नाजूक चणीच्या, कमी उंचीच्या नायिकांची सद्दी होती. तेव्हा नलिनी जयवंत, अनिता गुहा, स्नेहप्रभा प्रधान ह्या चमकून गेल्या. मीनाकुमारीचा चेहरा फारच सुंदर आणि रेखीव होता.
एक झेबा म्हणून होती. छान दिसायची.
अगदी जुन्यांमध्ये निगार सुलताना, नसीम, वीणा, मेहताब, शोभना समर्थ ह्या दिसायला चांगल्या होत्या. सुलोचनाबाई सुद्धा खूप सुंदर दिसायच्या.
आणि शेवटी, हेलनला कसे वगळणार? ती नायिका नव्हती पण तिला मिळालेल्या vamp भूमिकांचे तिने सोने केले. अतिशय कमनीय आणि सुंदर.

अद्यापि तत्तुल्य अभिनेत्र्या: ( सुंदऱ्या:) अभावात् अनामिका सार्थवती बभूव >> Lol
पुरा सुंदरीणाम् गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठिता मधुबाला

आता हा संपूर्ण श्लोक व्हॉटसअप विद्यापीठात गेल्यास पुढे 'पुराणात हा श्लोक आधीपासूनच होता' असा काहीतरी दावा केला जाण्याची शक्यता आहे.

हीरांचा प्रतिसाद मस्त आहे.

पुढे 'पुराणात हा श्लोक आधीपासूनच होता' असा काहीतरी दावा केला जाण्याची शक्यता आहे..........काहीही नवे येऊ द्या.आमच्या पूर्वजांना हे माहीत होते.मग बाकीचे सुरू होतात,आपले पूर्वज कित्ती कित्ती थोर म्हणून. हल्ली खरंच व्हा. वि.चा कंटाळा आलाय.

काहीही नवे येऊ द्या.आमच्या पूर्वजांना हे माहीत होते.मग बाकीचे सुरू होतात,आपले पूर्वज कित्ती कित्ती थोर म्हणून. हल्ली खरंच व्हा. वि.चा कंटाळा आलाय. >> लोल टोटली.

यामुळे हे एक लक्षात आले, की आपल्याला प्रत्यक्षात फारसे कर्तृत्व गाजवण्याची काहीही गरज नाही, आराम करून लाइफ एन्जॉय करावे. ४-५ पिढ्यांनंतर आपल्याला आत्ताच सगळे माहीत होते हे तेव्हाच्या सोशल नेटवर्क्सवर फिरत राहणारच आहे Wink

१९४०- ५५ ह्या दरम्यान नाजूक चणीच्या, कमी उंचीच्या नायिकांची सद्दी होती >>> That explains it! मानव - तुम्ही माझ्या आधीच्या पोस्टला गीताबालीचे ते गाणे (तदबीरसे बिगडी हुई) लिहीले होते - त्यावर पोस्ट टाकायची राहिली होती. ती नक्कीच थोराड दिसत नाही. पण माझ्या डोक्यात साधारण ६० चे दशक, वैजयंतीमाला, पद्मिनी, नर्गिस, माला सिन्हा वगैरे होत्या - त्या ही ६०-६५ च्या चित्रपटांमधल्या, जेव्हा त्यांचा काळ हळुहळू उतरणीला लागला होता Happy

पूर्वी दूरदर्शनवर अल्कोहोलच्या जाहिराती दाखवायला बंदी होती. तेव्हा अल्कोहोलचे फेमस ब्रॅण्ड्स जाहिरात करायचेच पण त्यांच्या सोड्याची किंवा तत्सम अल्कोहोलविरहित पेयांची. पण ज्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचायचे आहे त्यांना बरोबर समजायचे ही कसली जाहिरात आहे. त्या लॉजिकने हे हिरॉइन्सच्या फक्त चेहर्‍याचे फोटो बघून ठरवावे Wink

राजधर्म - बरोबर आहे आक्षेप तुमचा. हे फोटो प्रतिकात्मक आहेत. म्हणजे ही जुही चावला, ही मधुबाला. तुम्हाला गुन द्यायचे असल्यास इंटरनेटचा महासागर उपलब्ध आहे. हवे ते आणि हवे तसे फोटो तपासून मग गुण देऊ शकता. इथे मायबोलीवर सूज्ञांना सगळे फोटो देणे अडचणीचे वाटते. सखोल तपासणीसाठी प्रत्यक्ष भेटीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. Happy

फक्त सेलेब्रिटीजच नाही तर सर्व स्त्री जाती साठी इतके चपखल गीत. रफीचा स्वर्गीय आवाज आणि तितकेच सुंदर शब्द.
https://www.youtube.com/watch?v=uKGeCRhnuP0

आज नवर्‍याला म्हटलं - "काय बकवास आहे ती बेझोज ची नवी गर्ल्फ्रेन्ड. चेटकीण दिसते" तर नवरा म्हणतो 'बेझोज ने तिच्याबरोबर रहाता यावं म्हणुन, पहील्या बायकोला ५२ का कितीतरी मिलिअन डॉलर दिले. न्यु गर्ल्फ्रेन्ड इज गॉर्जिअस"

अरेच्या मला काय चश्मा लागला की काय. मला ती खरच चेटकीण वाटते.

कोणीतरी न्यायनिवाडा करा ब्वॉ.

>कोणीतरी न्यायनिवाडा करा ब्वॉ.<<
ब्युव्टि इज इन द आय ऑफ द बिहोल्डर. मोरओवर, आय कॅनॉट स्पीक फॉर बेझोस, बट हि माय्ट हॅव फाउंड ए सोलमेट इन लॉरन सँचेज...

Pages