इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला टवणे सरांची पोस्ट पटलेली. पण इथले खालील प्रतिसाद वाचून मत बदललं.

म्हणजे inclusivity चांगली आहेच- पण ती नसणं हे बाय डिफॉल्ट वाईट नाही. इन्कल्युसिव्हिटी साठी मॅक्रो लेव्हल वर प्रयत्न करायला हवेत. मायक्रो लेव्हलवर टीका करू नये.

स्वाती, पुन्हा एकदा अनुमोदन. मलाही काल सैराटची आठवण झाली होती. अजय अतुल हे ब्राह्मण नाहीत हे ह्या बाफाच्या निमित्ताने समजलं. ते आहेत असा माझा समज नव्हता कारण
इतके दिवस त्यांची मराठी हिंदी गाणी ऐकताना त्यांची जात जाणून घ्यायची कधीही इचछा आणि गरज दोन्ही वाटली नव्हती. (त्यांचं आडनाव काय हे मला आत्ताही गुगल केक्याशिवाय सांगता येणार नाही. )

उलट 'ही नावं ब्राह्मणेतर आहेत' अशी यापूर्वी कधीही न झालेली दुर्दैवी जाणीव या चर्चेच्या निमित्ताने झाली याचं मला व्यक्तिश: दु:ख वाटतंय. >>> +१००

काल मी किमान मनातल्या मनात अहो गेली अनेक वर्षे वसंत पवार, वसंत प्रभू, पी सावळाराम, राम कदम, शांता शेळके, दादा कोंडके, महेश कोठारे, सूर्यकांत/चंद्रकांत वगैरे नावे आठवत होतो. यातले बरेचसे फेवरिट्स आहेत. पण त्यांच्या जातीचा विचार कधी आला नव्हता डोक्यात (गदिमा तर जातीने कोण होते हे मला अजूनही माहीत नाही. राजा गोसावी, अरूण सरनाईक सुद्धा). तेव्हा दलित इतके नसतील मुख्य नावांत , पण गेल्या काही वर्षांत फॅण्ड्रीला "क्रिटिक" लोकांच्याकडून मिळालेली पावती व सैराटला तर क्रिटिक आणि पब्लिक दोन्हींकडून मिळालेले यश - हे सगळे आठवले. आता याचा अर्थ सर्व काही परफेक्ट आहे असे नाही पण बदल बरोबर दिशेने आहे. ज्यांना प्रस्थापित सिस्टीममधून डावलले जाते, त्यांना टॅलेण्ट शोज सारखा पर्याय आहे.

तेव्हा मुळात विविधता नाही हे ठरवायला आधी काहीतरी विदा हवा. एखाद्या रॅण्डम कार्यक्रमावरून कोणीतरी उठतो, शेरे मारतो आणि पब्लिक इतके सिरीयसली घेते हे विनोदी आहे. ईर्शाद वर राळ उठली तेव्हा चर्चेचा सगळा फोकस हे आरोप अर्धवट माहितीवर करणे कसे चुकीचे आहे यावर होता. इथे ४-५ पोस्ट्स नंतर सगळा फोकस एकाच कार्यक्रमात इतके ब्राह्मण कसे यावर आला आहे, ते आरोप कसे अर्धवट माहितीवर, चुकीचे आहेत यावर नाही.

बहिणाबाईंचं उदाहरण हा अपवाद आहे, नियम नाहि. बहिणाबाईंना कुठल्याहि (चूभूदेघे) प्रकारचं व्यासपिठ मिळालं नाहि, तरिहि त्यांची प्रतिभा बहरली. असं सगळ्या उपेक्षित कवी/कलाकारांच्या बाबतीत होतं का?

याउलट खरेंसारखे टुकार कवी, मूळात टॅलंट नसताना त्यांचा उदो-उदो केला जातो. हा विरोधाभास आहे. वर हीरा यांनी लिहिल्या प्रमाणे पोषक वातावरणाची (सराव, मार्गदर्शन, संधी) कित्येकदा टॅलंटेड कवी/कलाकार यांना आत्यंतिक गरज असते. ते त्यांना मिळत नाहि. मुद्दा हा आहे.

हीरा यांचं वाक्य पुन्हा कोट करतो, बघा आतातरी आकलनात येतंय का...

>>... हे सर्व १०० % अंत:स्फूर्ती आणि अंत: प्रेरणेवरच अवलंबून असतं का? त्यासाठी पोषक वातावरण, (घर, पालक, शाळा,मित्रमंडळी,समाज, exposure, उत्तेजन इत्यादि) पोषक घटकांची गरज अजिबात नसते का?<<

बाय्दवे, फेरफटका - हीरा यांचा मुद्दा आणि त्याला मी दिलेलं समर्थन रिएंफजाय्ज करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद... Wink

खरे हे टुकार कवी आहेत हे वैयक्तिक मत की कसं? त्यांचा उदोउदो केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून होतो हे वैयक्तिक मत की कसं? त्याला काही सपोर्टिंग एव्हिडन्स?
सध्याचे मराठीतले किती कवी/गीतकार तुम्हाला माहीत आहेत, राज? त्यांपैकी तुमच्या मते टुकार नसूनही केवळ सवर्ण नसल्यामुळे उपेक्षित राहिलेले अशी काही नावं सांगता येतील का?

नाहीतर मग फेरफटका यांचा 'तुम्हाला विषयाचं आकलन झालेलं नाही' हा मुद्दा रीएम्फसाइज, सॉरी रिएंफजाय्ज केल्याबद्दल मी तुमचे आभार मानते.

प्रत्येकाने आपल्या आवडत्या कलाकारांची जातीपाती आठवून काहीच फायदा नाही. व्यवस्थित विदा गोळा करणे हे एक काम केल्यावरच खरी परिस्थिती काय आहे याची कल्पना येईल.
भारताला अॉलिंपिक्स मध्ये पदके का मिळत नाहीत? भारतात चांगल्या क्रिडापटूंची वानवा आहे म्हणून का? याच धर्तीवर हा विचार व्हावा.

या चर्चेचा सूर सभ्य राखल्याबद्दल सर्वांचे आभार.

एकदा सविस्तर पोस्ट केल्यावर पुन्हा त्याला उलगडत बसण्यात काही अर्थ नसतो, त्यातून काही साध्य होत नाही. काही अधिक मुद्दे मांडतो ज्याने माझे म्हणणे स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. ते पटणे न पटणे हे अर्थात प्रत्येकाच्या भुमिकेवर, अनुभवांवर अवलंबून आहे.

१. मी पोस्टच्या सुरुवातीलाच टक्केवारी दिली होती. त्याचे कारण लोकसंख्येचा प्रमाणाचा विचार करता एकाच कार्यक्रमात एकाच जातीचे लोक असण्याची प्रोबॅबिलिटी किती कमी आहे हे बेसिक गणित येणार्‍या कोणाच्याही लक्षात येईल. असे असताना हे घडले आहे, असे अनेकदा घडते सांस्कृतिक्/शैक्षणिक व्यासपीठांवर. तसे का होते त्यामागे जाण्याचा माझा प्रयत्न होता. या कार्यक्रमात काम करणारे लोक जातीयवादी/कंपूवादी आहेत किंवा नाहीत हा रोख नव्हता. ते नसतीलच अशी माझी आशा आहे. तर प्रोबॅबिलिटी इतकी कमी असताना देखील असे का होते?
२. काव्यवाचन कार्यक्रमात इतर जातीय कवी आहेत, कार्यक्रमात इतर जातीय कलाकार आहेत, संमेलनात बाकी सर्व कार्यक्रम मिश्रजातीय आहेत. असे असताना याच कार्यक्रमावर झोड का असा प्रश्न विचारला गेला. एका बहुजन/दलित वाचकाच्या/प्रेक्षकाच्या भुमिकेत जाऊन पाहू. संमेलनातील इतर कुठलाही कार्यक्रम मुख्यत्वे एकाच जातीच्या लोकांना घेउन होतो आहे का? तुम्ही तुलना कार्यक्रम १ ज्यात एका जातीचे लोक ९०% आहेत आणि इतर सर्व कार्यक्रम ज्यात एका कोठल्या जातीचे रिप्रेझेंटेशन अधिक नाही यांची करत आहात. यातला फरक कळतोय का? एखादा कार्यक्रम ९०% चांभार जातीतल्या लोकांना घेऊन केला आहे असे झाले आहे का?
३. इतर कार्यक्रमात ब्राह्मणेतर (वा उच्चवर्णीय सोडून) लोक किती आहेत बघा असे म्हणताना ब्राह्मण/उच्चवर्णीय हा एक मोठा ब्लॉक आणि इतर सर्व एक ब्लॉक असे आपण सहजतेने म्हणतो. एका दलिताच्या दृष्टीने ७०% समाजाला एकदम एका तागडीत टाकले. ५ ते १५% समाजाचे या कार्यक्रमांमधून ओवर रिप्रेझेंटेशन वारंवार होते आणि बहुसंख्य समाज मात्र 'इतर जातीचे पण लोक असतात की' असे म्हणून जस्टिफाय होते.
४. पुढे जाऊन मी म्हणेन की बाकी कार्यक्रमात कुठल्या जातीचे किती लोक आहेत हे इथल्या बहुसंख्य उच्चवर्णीयांना उमजणार ही नाही कारण त्यांची आडनावे व जाती यांची फारशी माहितीही नसेल. असे म्हणू नका की आम्ही जात बघत नाही. ब्राह्मण असाल तुम्हाला किमान ५० ब्राह्मण आडनावे व त्यांच्या पोटजाती सांगता येतील. मराठा माणसाला मराठा तसेच ब्राह्मण जातींची आडनावे चांगली माहिती असतील. पण १० चांभार आडनावे, किंवा १० लोहार, १० परीट, १० मांग आडनावे आठवा असे म्हटले तर किती जणांना सांगता येइल इथे. इथे पुन्हा उतरंडीचे गणित दिसेल. खालच्या जातीतल्या माणसाला वरच्या जातीतल्या आडनावांची , भेदांची माहिती असते. ती अपवर्ड मोबिलिटी तसेच समाजात जगताना कसे वागावे हे आपोआप होणार्‍या कंडिशनिंग मधून आलेली असते. जर तुम्हाला भारतीय समाजाच्या पटलावरच्या लेखकांची जात माहिती नसेल तर तुम्ही त्या साहित्याला समजून घेताना कमी पडाल इतकेच मी म्हणेन कारण त्या लेखकाच्या व पात्रांच्या जातीची पार्श्वभुमी त्या नॅरेटिव्ह पासून सुटी काढणे अशक्य आहे.
५. धंद्याचे गणित, गुणवत्ता, आजवर हे धंदे ओव्हर रिप्रेझेंटेशन असून सफळ होत आहेत हे आर्ग्युमेंटः बाजारात उपलब्ध मालच विकला जाणार. दलित साहित्य नव्हते तेव्हाही पुस्तके खपत होतीच. तेव्हा धंदे चालत आहेत म्हणून ही व्यवस्था न्याय्य आहे वा मेरिटवर आहे वा सर्वोच्च दर्जाची आहे हे आर्ग्युमेंट खोटे आहे. हॉलिवूड मध्ये कृष्णवर्णीय स्टिरिओटाइप होत होते, समलैंगिक/ट्रान्स स्टिरिओटाइप होत होते तेव्हाही धंदा जोरात चालतच होता. प्रयत्नांनी कृष्णवर्णीय, समलैंगिक/ट्रान्स पात्रे, कलाकार, कथा आणल्यानंतरही धंदा चालतोच आहे पण त्याचबरोबरीने आशयाच्या दृष्टीने अधिक व्यापकही झालेला आहे.
६. अमुक माणसाला महार म्हणून त्रास होत असेल तर तमूक माणसाला ब्राह्मण म्हणून त्रास होतो हे आर्ग्युमेंट खरे असले तरी लटके आहे. जश्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फिनिटी असतात तश्या या मानहानींचा स्तर वेगवेगळा असते. एखाद्या भटजींना नमस्कार करणार्‍या लोकांच्या बॉडी लँग्वेज पहा. तो देवाचा कन्ड्युइट आहे हे स्पष्ट दिसते. हा कन्ड्युइट जन्माधारीत आहे व तो मला मिळणार नाही हे इतर सर्व जातीच्या लोकांच्यात सप्ष्ट दिसेल. भडजीच्या जागी गावचा पाटिल घातलात तरी चालेल. जन्माला आल्यापासून उतरंडीतील खालच्या जातीत ही जाणीव तीव्र असते. ती वरच्या जातींमध्ये आम्ही नाही त्यातले म्हणून झटकता येणार नाही. अमेरिकेतील कृष्णवर्णीय, वा समलैंगिक. ट्रान्स माणसाचे लहानपणापासून होणारे सामाजिक दमन याबद्दल आपण सेन्सेटिव्ह झालो आहोत मात्र आपल्याच समाजातल्या मोठ्या घटकाच्या होणार्‍या कंडिशनिंग बद्दल आपण 'आम्ही जात पाळत नाही, आम्ही जात बघत नाही' असे म्हणून वेगळे का होऊ पाहतो? कास्ट मॅटर्स लिहिणारा सुरज येंगडेच्या मनावर जेव्हा त्याने त्याची आजी काम करणार्‍या मारवाड्याच्या घरातल्या संडासात लघवी केली म्हणून त्याच्या आजीला पडलेल्या शाद्बिक माराचा ओरखडा 'काय बामन' या ओरखड्यापेक्षा खूप तीव्र असतो. मायबोलीवरच्याच एका यशस्वी उच्चविद्याविभुषित स्त्रीने तिला लहानपणे देऊळ झाडणार्‍या भाविणीने देवळात पाय ठेवलास तर पाय मोडीन अशी धमकी दिल्याची आठवण सांगितली आहे. ही स्त्री आता यशस्वी झाल्याने त्या घटनेकडे तटस्थतेने पाहील पण इतर सर्व पाहू शकणार नाही. या झखमा, ओरखडे कायम ठसठसत राहतात. त्या अनुभवाने साकारलेल्या परिप्रेक्ष्यातून हा समाज सर्व घटनांकडे पाहतो हे आपण समजून घेऊ शकत नाही का?
६. कर्वेनगर पॉश कॉलनी असते, आंबेडकर नगर ही ९९% वेळा झोपडपट्टी असते. हे सटल डिस्क्रिमिनेशन वेगवेगळ्या रुपाने होत असते. मांस मचछी खाण्याला एक साफ/स्वच्छ नसण्याची जोड असते. या सगळ्यातून उच्चवर्णीय नसणार्‍यांचा चष्मा तयार होत असतो. भिन्नलैंगिक समाज त्यांना वेगळ्या सर्वनामाने संबोधण्याची अपेक्षा का करतो? कारण त्यांना आयडेंटिफाय न होणार्‍या संबोधनाने सतत मानसिक आघात होतो. मी
समलैंगिक नाही म्हणून जा बोंबलत, मी माझी भाषा बदलणार नाही. काय मूर्खपणा आहे हे दे/देम चा असे म्हणत नाही कारण त्या भिन्नलैंगिक माणसाच्या परिप्रेक्ष्यातून पाहून त्याची भुमिका व दु:ख समजण्याची सभ्यता अंगी आली आहे म्हणून. मग प्रोबॅबिलिटी कमी असताना सुद्धा एका जातीच्या माणसे असणारा कार्यक्रमाकडे त्या जातीबाहेर असलेल्यांची काय रिअ‍ॅक्शन असेल हे आपल्याला समजून घेता येणार नाही का?
७. आज सिनेमा, साहित्यात अल्पसंख्य, तसेच राजकीय/सामाजिक दृष्ट्या मागे असलेल्या समाजाचा सहभाग विविध मार्गे करण्याचा प्रयत्न होतो. त्यात अश्या समाजावरील कथा, या समूहातील लोकांचा पडद्यापुढे, मागे, तंत्रज्ञानात सहभाग, अँटि डिस्क्रिमेनेशन वगैरे. अ‍ॅमेझॉनच्या मॉडर्न लव्ह स्टॉरी मध्ये गे लवर्सवरची कथा नसती तर इतर कथा कमी पडल्या अस्त्या का? नाही. पण ती असल्याने त्या कार्यक्रमाच्या सर्वसमावेशकतेत भर पडलीच तसेच प्रेक्षकांपर्यंतही विविधता पोचली. त्याचप्रमाणे इतरही कुठल्या सादरीकरणात विविध समाजाचे सहभाग असल्यास त्या प्रयोगाच्या सादरीकरणात भर पडणार नाही का? एखादा दलित एखाद्या कवितेतली अशी भुमिका उलगडवून दाखवेल जी एखाद्या सवर्णाच्या लक्षात येणार नाही.
८. इर्शाद शीर्षकाविरोधात निषेध करणे आणि या कविता वाचनाच्या कार्यकमाच्या विरोधात आलेल्या रिअ‍ॅक्शनचा विरोध न करणे हे दोन्ही लॉजिकल आहे. दोन्हीचा समभावनेने विरोध करणे उलट लिबरल असण्याच्या भुमिकेच्या विरोधात असेल.
९. समजा जगात ८५% हेटेरोसेक्शुअल व १५% होमो/ट्रान्स/नॉन बायनरी लोक आहेत. पण या १५% टक्क्यांची कोणे एके काळी सर्वंकष सत्ता होती. आता इन्क्लुझिविटी आहे पण तरी एका कार्यक्रमात ९०% कलकार हे होमोसेक्शुअल आहेत. आणि त्यावर टिका झाल्यास हे आपोआप झाले, यात काय इन्क्लुझिविटी, बाकी कार्यक्रमात बघा थोडेफार हेटेरोसेक्शुअल लोक/साहित्य आहे असे झाले तर बहुसंख्य हेटेरोसेक्शुअल्सची काय रिअ‍ॅक्शन असेल.

पुन्हा एकदा लिहितो: कार्यक्रम आयोजन करणारे, सहभागी कलाकार हे नक्कीच जातीयवादी नाहीत, हे मुद्दामून केलेले नाही. पण जे झाले ते स्टॅटिस्टिकली लो प्रोबेबल असून देखील :
१. ते समर्थन करण्या योग्य आहे.
२. त्याविरोधात येणार्‍या रिअ‍ॅक्शन या निशेधार्हच आहेत.
३. असे अनवधानाने होत असेल तर त्याचा कॉग्निझन्स घेउन तसे घडू नये म्हणून अपेक्षा करणे हे अयोग्य आहे व अश्या अपेक्षेचा विरोध केला पाहिजे

या भुमिकेशी मला सांगड घालता येत नाही.

"असं सगळ्या उपेक्षित कवी/कलाकारांच्या बाबतीत होतं का?" - ह्या वाक्यातच विरोधाभास नाही का? व्यासपीठ मिळालं असतं तर उपेक्षित राहिलेच नसते. आणि बहिणाबाईंचं उदाहरण अपवाद नाहीये. समाजातल्या विविध स्तरांमधून येऊन यशस्वी झालेल्या कित्येकांना सुरूवातीच्या काळात व्यासपीठ मिळालंच नव्हतं. अगदी गदिमा वगैरे लोकंही ह्यात आहेत. बहिणाबाईंच्या कवितासुद्धा जेव्हा सोपानदेव चौधरींनी प्रसिद्ध केल्या आणि त्यांचा दर्जा श्रोत्यांना भावला तेव्हा त्या प्रसिद्ध झाल्या.

नैसर्गिक गुणवत्ता ह्या शब्दप्रयोगातच ती गुणवत्ता 'नैसर्गिक' असण्याचा उल्लेख आहे. आणि अनुभवविश्व हे आपण ठरवून अस्तित्वात आणू नाही शकत. आजूबाजूला घडणार्या घटनांचे प्रतिसाद मनःपटलावर उमटतच असतात. त्यांना एखाद्या सूत्रात बांधण्याची क्षमता - नैसर्गिक गुणवत्ता ही सुद्धा एखाद्याकडे उपजत असते किंवा नसते. शब्दांचा उगम होण्याआधी सुद्धा ही प्रतिभा मानवाकडे होती.

त्यातून हा विषय जातीवरून डिस्क्रिमिनेट करण्याविषयी चालला होता. त्यात economic distress मुळे जे less privileged आहेत त्यांना आणून हा विषय वेगळ्याच दिशेनं गेला. असो.. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेले असता श्रोते गाणं कसं होतंय, सूर बरोबर लागतायत की नाही हे बघतात. गाणार्याची जात, पात, धर्म, देश ई. नाही. तिथे गाण्याचेच निकष लागतात. समजा गाणं चांगलं होत नसेल तर गायक/गायिकेविषयी कितीही प्रेम, कळवळा वगैरे असेल तरी उपयोग नाही. त्याउलट गाणं चांगलं असेल तर बाकीच्या गोष्टींनी फरक पडत नाही.

आता खर्यांकडे टॅलेंट नाही, ते टुकार आहेत ही तुमची वैय्यक्तिक मतं आहेत आणि इतकी टोकाची मतं असणार्याने इतरांची कीव करावी म्हणजे 'शेंबूड आपल्या नाकाला आणि आपण हसे दुसर्याला' अशी गत झाली म्हणून मी त्याला हास्यास्पद म्हटलो - ते तुम्ही "रिएंफजाय्ज" केलंत हे ही बरंच झालं. Happy

WHOA!

टवणे सर, आप कहाँ से कहॉ पहुँच गये! इथे दलितांना "समाजात" जी ट्रीटमेण्ट मिळते ती व तुलनेने ब्राह्मणांची जी काय हेटाळणी होत असेल ती याची तुलना कोणी केलेली नाही. इथे ते लिहीले आहे ते केवळ फक्त या एका रॅण्डम कार्यक्रमावर आलेल्या प्रतिक्रियेबद्दल आहे. या वरच्या पोस्टमधे "सहसा कोणालाही मान्य व्हावीत" अशी विधाने आहेत. ती जातीव्यवस्थेच्या एकूण संदर्भाने बरोबरच आहेत पण ती इथे अस्थानी आहेत.

टवण्यांनी कितीतरी वडांच्या साली खर्‍यांच्या पिंपळाला लावलेल्या दिसत आहेत. असो.

माझे मुद्दे वरती मांडून झाले आहेत, तेव्हा आता तेच उगाळण्यापलीकडे बहुधा मला या चर्चेत काही भर घालता येणार नाही.
तेव्हा तशी काही भर घालण्याची शक्यता दिसेपर्यंत माझा विराम.

या वरच्या पोस्टमधे "सहसा कोणालाही मान्य व्हावीत" अशी विधाने आहेत. ती जातीव्यवस्थेच्या एकूण संदर्भाने बरोबरच आहेत पण ती इथे अस्थानी आहेत.
>>>

मी जे काही लिहिले आहे ते बीएस आहे असे म्हणू शकतोस, चूक आहे असे म्हणू शकतोस. पण ते इथे अस्थानी आहे असे म्हणण्याला मी ऑफेन्स घेईन. मी लिहिलेला प्रत्येक मुद्दा हा या आधी आलेल्या पोस्ट्सच्या संदर्भाने आहे. मी फक्त त्या प्रत्येक पोस्ट 'कोट्स' करून टाकल्या नाहीत इतकेच. त्या पोस्ट्स आल्या म्हणूनच मी ही पोस्ट लिहिली आहे ज्यायोगे माझी भुमिका स्पष्ट होईल. यातला एकही मुद्दा हा आधी आलेल्या पोस्टशी असंबंधित नाही.

जोक ऑफ द डे माझ्या घरामध्ये माझ्या चुलत काकाने एका ब्राम्हण मुलीबरोबर लग्न केले. त्या मुलीबरोबर कोणीही बोलत नाही. तिला कशाला हात लाऊन देत नाहीत. त्यामुळे जात असे काही नसते हे तुमच्या मानसिकतेवर असते.

माफ करा मला असे काही कोणाला दुखवायचे नाही. असे कि जात वैगेरे काही महत्वाचे नसते असेच म्हणायचे आहे.

>>सध्याचे मराठीतले किती कवी/गीतकार तुम्हाला माहीत आहेत, राज? <<
सिरियस्ली? सद्ध्याची नांवे देतोच, पण पुर्विची सुद्धा देइन तुमच्या माहितीत भर घालायला. प्रज्ञा पवार, सलील वाघ, अशोक बागवे हि चटकन डोळ्यासमोर आलेली काहि नांवं. गतकाळचे ढसाळ, सूर्वे तुम्हि वाचलेले/ऐकलेले वाटत नाहि, माझा प्रतिसाद काउंटर केलाय म्हणजे. असो.

पण मी खर्‍यांची उत्तम कविता कोणती, हा प्रश्न तुम्हाला विचारुन अडचणीत टाकणार नाहि... Wink

टवण्यांनी कितीतरी वडांच्या साली खर्‍यांच्या पिंपळाला लावलेल्या दिसत आहेत. >> +१ टण्या तू लिहिले आहेस तो फक्त लिटरली युटोपिया आहे बाकी काही नाही.

फेफ तुझ्या पोस्ट्स आवडल्या.

> टवण्यांनी कितीतरी वडांच्या साली खर्‍यांच्या पिंपळाला लावलेल्या दिसत आहेत.
टवण्यांनी कितीतरी वडांच्या साली पिंपळाला लावलेल्या दिसत आहेत असे म्हणणे फार तर ठीक आहे. पण त्यांनी खर्‍यांवर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष काहीही टीका केलेली नसताना त्यांचा ( खर्‍यांचा) उल्लेख खटकला.

अवधूत गुप्ते का नाही पुढे आले देव जाणे. किंवा आलेही असतील, जस्ट आय अ‍ॅम नॉट इन टच विथ करन्ट म्युझिक. सिकेपी आहेत त्यामुळे मला जास्त ममत्व. असो. Wink

काही राहिलेले मुद्दे:

जिद्दुने लिहिले आहे की सर्वांनी पैसे कमावले तर प्रश्न सुटेल. अगदी योग्य. पण पैसे कमवायच्या (शिक्षण, नेटवर्क) संधी समान आहेत का? तुम्ही प्रशासनात आहात, उत्तर तुम्हाला माहितीच असेल.

सामो म्हणाल्या इतर जातीतली लोकं कंपूगिरी का करत नाहीत. ती केल्यावर तिला ब्रिगेडी किंवा ब्लॅक पँथर म्हटले जाते Happy विनोदाचा भाग बाजूला, अशी कंपूगिरी करावी असे तुमचे मत आहे का? आणि जे आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या कमजोर असतात त्यांची कंपुगिरी प्रभावी ठरत नाही.

सैराटचा उल्लेख आला की मंजुळेचे कौतुक आणि खरेंना जोडे का: पुन्हा प्रश्न विचारतो. सैराट मध्ये एकाच जातीचे लोक आहेत का? मंजुळेने एकाच जातीला घेऊन सिनेमा काढलाय का? आपल्याला ब्राह्मणांच्या वा उच्चवर्णीयांच्या ओवर साइझ्ड रिप्रेझेंटेशनची इतकी सवय आहे की तसे नसेल तर ते वेगळे वाटावे. आणि मी वर लिहिल्याप्रमाणे इतर सर्वांना जे ५०% अधिक आहेत त्यांना एका बकेट मध्ये टाकायचे आणि म्हणायचे बघा ते पण आहेत की. तुलना चुकीची आहे. सैराटचे कास्ट बघा, क्र्यु बघा. त्यात सर्व जातींचे जमातींचे रिप्रेझेंटेशन आहे.

मी पुन्हा थेट प्रश्न विचारतो. जी जात ५-६% आहे त्याचे ९०% रिप्रेझेंटेशन असणारा कार्यक्रम जो स्टॅटिस्टिकली लो प्रोबेबिलिटी आहे काय दर्शवितो? हा एक निव्वळ योगायोग समजायचा आणि म्हणायचे की यातले कुणीही जातीयवादी नाही म्हणून याविरुद्ध बोलणे चुकीचे. की हे असे का होते व या जातीत नसलेल्या लोकांस ते का खटकते याचा विचार करायचा?

"मी पुन्हा थेट प्रश्न विचारतो. जी जात ५-६% आहे त्याचे ९०% रिप्रेझेंटेशन असणारा कार्यक्रम जो स्टॅटिस्टिकली लो प्रोबेबिलिटी आहे काय दर्शवितो? " - थेट उत्तर देतो - हेच दर्शवतो की तुमचा कलाक्षेत्राकडे बघायचा अँगल चुकतोय. कार्यक्रमात सादर केल्या गेलेल्या कलेचा दर्जा प्रेक्षकांसाठी / श्रोत्यांसाठी महत्वाचा आहे. कलाकारांची जात हा मुद्दाच गैरलागू आहे. चांगली गझल ऐकली तर ती बेगम अख्तर ची असो, गुलाम अली ची असो, मेहदी हसन ची असो नाहीतर जगजितसिंग ची असो - ती जगातल्या अमुक टक्के लोकसंख्या असलेल्या धर्मातल्या लोकांची असल्याने काय सिद्ध होतं ह्या प्रश्नाचं उत्तर, 'काहीही नाही' असंच येतं. उगाच तीन पाय कापल्यावर बेडकाला 'उडी मार' म्हटलं आणि त्याने उडी मारली नाही म्हणून तीन पाय कापल्यावर बेडकाला ऐकू येत नाही असला निश्कर्ष काढण्यासारखं आहे. your inference is significant, but not relevant.

>>हा एक निव्वळ योगायोग समजायचा आणि म्हणायचे की यातले कुणीही जातीयवादी नाही म्हणून याविरुद्ध बोलणे चुकीचे. की हे असे का होते व या जातीत नसलेल्या लोकांस ते का खटकते याचा विचार करायचा?<<
हा विचार करण्याकरता वरच्या लेवलची मचुरिटि अंगभुत असावी लागते. असो...

टवणे सर यांनी मोठे चित्र दाखविले आहे. छान विचार मांडले आहेत.

<<"मी पुन्हा थेट प्रश्न विचारतो. जी जात ५-६% आहे त्याचे ९०% रिप्रेझेंटेशन असणारा कार्यक्रम जो स्टॅटिस्टिकली लो प्रोबेबिलिटी आहे काय दर्शवितो? " - थेट उत्तर देतो - हेच दर्शवतो की तुमचा कलाक्षेत्राकडे बघायचा अँगल चुकतोय. >>
----- त्यांनी विचारलेला प्रश्न अगदी योग्य वाटतो. आजच्या कलाकारांबद्दल, आणि त्यांच्या कलेबद्दल येथे सर्वांनाच आदर आहे.

<< कार्यक्रमात सादर केल्या गेलेल्या कलेचा दर्जा प्रेक्षकांसाठी / श्रोत्यांसाठी महत्वाचा आहे. कलाकारांची जात हा मुद्दाच गैरलागू आहे. चांगली गझल ऐकली तर ती बेगम अख्तर ची असो, गुलाम अली ची असो, मेहदी हसन ची असो नाहीतर जगजितसिंग ची असो - ती जगातल्या अमुक टक्के लोकसंख्या असलेल्या धर्मातल्या लोकांची असल्याने काय सिद्ध होतं ह्या प्रश्नाचं उत्तर, 'काहीही नाही' असंच येतं. उगाच तीन पाय कापल्यावर बेडकाला 'उडी मार' म्हटलं आणि त्याने उडी मारली नाही म्हणून तीन पाय कापल्यावर बेडकाला ऐकू येत नाही असला निश्कर्ष काढण्यासारखं आहे. your inference is significant, but not relevant. >>

------- बेडकाला उडी मार म्हटल्यावरही बेडूक उडी मारत नसेल तर उडी का मारत नाही हा प्रश्न येणार.... थोडा अभ्यास केल्यावर आणि दृष्टी असेल तर बेडकाला तीन पाय नाही आहेत हे कळेल... मग तीन पाय का नाही आहेत हा पुढचा प्रश्न येतो. (समाजाने ) काय करायला हवे जेणेकरुन या नसलेल्या तीन पायांची कमी भरुन काढता येणे शक्य होईल आणि बेडूक इतरांप्रमाणेच उड्या मारेल.

हिरा यांचा प्रतिसाद पुन्हा वाचा हे वर राज यांनी सांगितले आहेच.

<< गुणवत्ता - टॅलेंट -ही नैसर्गिक देणगी आहे. त्या टेलेंट ला पैलू पाडणं, त्यासाठी लागणारी नियमितता, सातत्य, सराव ह्या गोष्टी बाह्य आहेत.
तेंडुलकरकडे क्रिकेट चं टेलेंट होतं. त्याला त्याने सरावाची, मेहनतीची जोड दिली. ह्यासाठी पोषक वातावरणाची गरज असणं समजू शकतो, पण नैसर्गिक गुणवत्ता ही असते किंवा नसते. >>

------- टॅलेंट हे नैसर्गिक " देणगी " वगैरे नसते. जन्मजात कुणी टॅलेंट सोबत आणत नाही. सर्व काही इथल्याच वातावरणांत विकसीत होत असते.
सचिन ( किंवा कपिल आणि सुनिल.... रिचर्ड हॅडली, इम्रान खान, व्हिव रिचर्डस, गॅरी सोबर्स, डोनॉल्ड ब्रॅडमन...) जो काही आहे त्याचे सर्व श्रेय त्याच्या स्वत: च्या मेहनतीला, आसपासच्या पोषक वातावरणाला आणि त्याला मिळालेल्या अमाप संधीला द्यायचे. नैसर्गिक देणगी असे म्हणून आपण कलेचा/ क्रिडेचा आणि कलाकार Happy सचिनच्या मेहनतीचा अनावधानाने अपमान करत आहोत , आपला उद्देश तसा नसेलही.

टॅलेंट हे नैसर्गिक " देणगी " वगैरे नसते. जन्मजात कुणी टॅलेंट सोबत आणत नाही. सर्व काही इथल्याच वातावरणांत विकसीत होत असते.>>> रियली??? या तुमच्या वाक्याला छेद देणारी सर्वमान्य अशी पटकन आत्ता सुचलेली ठळक उदाहरण म्हणजे भारतरत्न लता मगेशकर आणी किशोर कुमार .याना निसर्गदत्त उत्तम गळा होताच त्याला त्याच्या रियाझ,शिक्षण,सराव याची जोड त्यानी दिली कला,क्रिडा किवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायला भरपुर मेहनत लागतेच
हिमेश रेशमिया याच्यात गाण्याच कुठलही टॅलेन्ट नाही ते त्यानी कितिही मेहनत घेतली अगदी नाकातुन सुद्धा आवाज काढुन बघितला तरी शक्य नाही.

उदय, तुम्ही तर बेडकाच्या एका प्रसिद्ध विनोदाची पार वाट लावून दाखवलीत. ह्या न्यायानं तर काहीही सिद्ध(?) करता येईल. नाटकात काम करताना, गाण्याचा कार्यक्रम करताना अभिनय/गाणं येतं का इतकाच निकष असतो. त्या कलाकाराची जात, धर्म वगैरे बघून निवड होत नाही.

राज, तुमचं चालू द्या. ते कीव करणं, टुकार, टॅलेंट नसलेले कवी वगैरे प्रतिक्रियांमधून तुम्ही बरीच ‘वरच्या लेवलची मचुरिटि’ ऑलरेडी ‘रिएंफजाय्ज’ केलेलीच आहे. Happy

“ जन्मजात कुणी टॅलेंट सोबत आणत नाही.” - असं नसतं. एक वेगळं उदाहरण देतो, बघा पटतंय का. नाहीतर हा विषय इथेच सोडू. भास्करबुवांनी मा. कृष्णराव आणि बालगंधर्व, ह्या दोघांनाही गाणं शिकवलं. पण एक गवई झाला आणि एक गायक-नट झाला. हे नैसर्गिक टॅलेंट होतं. गुलाबाच्या फुलाचं गुलाबपण हे तो फुलायच्या आधीपासूनच असतं. आजूबाजूच्या परिस्थितीतून कदाचित ते फूल फुलेल किंवा नाही हे ठरू शकतं. पण परिस्थिती बदलली म्हणून गुलाबाच्या रोपट्याला आंबे नाही लगडू शकत.

Screen Shot 2021-12-03 at 10.48.56 PM.png

------- वर जे सचिन च्या बाबत तेच इथे पण लागू होते. त्यांच्या दैदिप्यमान यशाचे सर्व श्रेय त्यांच्या स्वत: च्या मेहनतीला, आसपासच्या पोषक वातावरणाला आणि मिळालेल्या अमाप संधीला देणार. नैसर्गिक देणगी (जन्मजात टॅलेन्ट) असते असे म्हणून कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीला कमी लेखणार नाही.

टण्या तुझ्या प्रश्नाबद्दलः

१. ते समर्थन करण्या योग्य आहे.
२. त्याविरोधात येणार्‍या रिअ‍ॅक्शन या निशेधार्हच आहेत.
३. असे अनवधानाने होत असेल तर त्याचा कॉग्निझन्स घेउन तसे घडू नये म्हणून अपेक्षा करणे हे अयोग्य आहे व अश्या अपेक्षेचा विरोध केला पाहिजे

>>> १. त्याचे समर्थन करायची गरज नाही. तो एक रॅण्डम डेटा आहे इतकेच. ज्या क्षेत्राशी संबंधित तो कार्यक्रम आहे त्या (काव्य, गायन, संगीत) क्षेत्रात या पेक्षा वेगळी बरीच उदाहरणे आहेत.
२. "विरोध" निषेधार्ह नाही. तो विरोध कसा केला आहे ते निषेधार्ह आहे. ईर्शादच्या विरोधाला जे लागू होते तेच. त्या प्रतिक्रिया ज्यांनी वाचल्या असतील त्यांना हे पटेल. आणि न पटण्यासारखे आहे ते इतक्या उथळ विरोधाचे पॅण्डरिंग
३. हा पॉइंट मला मुळातच समजला नाही. अनावधानाने व्हायला ती काही चूक वगैरे आहे का? जात हा मुख्य निकष नसेल, तर का करू नये एखाद्याने असा ग्रूप? जोपर्यंत आपल्या सर्कलमधल्या लोकांचे ग्रूप करून कार्यक्रम करायला इतर कोणाला कोणी रोखलेले नाही तोपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? अशा एखाद्या दुसर्‍या जातीचे बहुसंख्य लोक असलेल्या लोकांचा ग्रूप उद्या अगदी असे कविता/गायन करेल किंवा दुसर्‍या कोणत्या प्रकारचा कार्यक्रम कसेल - नाटक बसवेल, विनोदी स्किट करेल - किंवा आणखी लावणी बसवेल. यात् तू म्हणशील की यात सगळे अगदी एकाच जातीचे असण्याची शक्यता कमी आहे. तसे असले तरी मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. काही वेळा एकाच जातीचे जास्त लोक असतील, कधी मिक्स ग्रूप असेल. निवडीचा निकष "जात" नसला म्हणजे झाले.

एखाद्या अ-ब्राह्मण व्यक्तीला ही जाहिरात खटकेल. तसेच एखाद्या धार्मिक हिंदू व्यक्तीला सुतकी चेहरे व हिरवे कपडे नेसलेल्या लोकांची "जश्ने-रिवाज" लिहीलेली दिवाळीची जाहिरात खटकेल. ते खटकणे स्वाभाविक आहे दोन्ही बाबतीत. पण त्यांना माहिती करून द्यायची का असल्या खटकण्यातून सोशल नेटवर्क वर लिहीलेल्या अर्वाच्य पोस्ट्सना भाव देउन लगेच सामाजिक अभ्यास करायाला बसायचे!

Pages