Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
I am very sorry. युट्युब लिंक
https://m.republicworld.com/india-news/general-news/milkshake-ad-parodyi...
Citing it as a violation of India's Information Technology Act, Twitter on Thursday sent a notice to user Abhijit Iyer-Mitra for sharing a commercial on his Twitter handle that mocked Congress leader Rahul Gandhi.
Iyer-Mitra, a defense analyst, known for his critical views on both the ruling Bharatiya Janata Party and the Congress on Thursday removed his tweet stating that he has received a notice from Twitter for posting an advertisement that mimicked Rahul Gandhi.
In the notice, Twitter stated that they had recently received a complaint from a Mumbai Police's Social media Lab alleging that the video shared by Mitra had violated the IT act.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=jmj8Hq14bkI
राहुल गांधींची खिल्ली उडवणारे असे अनेक व्हिडिओज आहेत.
बिचाऱ्या संदीप खरे सरांचं
बिचाऱ्या संदीप खरे सरांचं ट्रोलिंग काही संपेना.
आता त्यांच्या कार्यक्रमात ते, सलील कुलकर्णी आणि इतर ब्राह्मण कलाकार आहेत या मुद्द्यावरून ट्रोल होत आहेत. यावेळी पलीकडच्या साईडने ट्रोल होत असल्यामुळे इर्शादच्या वेळी कळवळा आलेले पुरोगामी गप्प आहेत किंवा ट्रोलिंगमध्ये सामील आहेत.
>>>
मी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहीन. महाराष्ट्रात ब्राह्मणांची संख्या ५-६% समजू (१०च्या आत हे नक्की). हा काव्यवाचन + संगीत असा कार्यक्रम आहे. संगीत कला ही सर्व समाजात इक्वली डिस्ट्रिब्युटेड आहे हे गृहीत धरण्यास हरकत नसावी. या कलाकारांनी हे जातीय समीकरण डोक्यात ठेवून (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे) हे केले नसावे असे धरून चालू. असे असताना एका कार्यक्रमात सर्व कलाकार हे एकाच जातीचे असणे हे कशाचे लक्षण असावे? हे अजुनही आपला समाज सामाजिक दृष्ट्या एकसंध नसल्याचे लक्षण आहे असे मला वाटते. इथे येणार्या उच्चवर्णीयांनी* जर आत डोकावू पाहिले तर तुमच्या अगदी जवळच्या मित्र परिवारात, नातेवाइकात तुम्हाला तुमच्या जातीबाहेरचे किती लोक आहेत. यात मी तुमचे फॅमिली फ्रेन्ड्स (म्हणजे ज्यांच्याशी तुमचा कुटुंब ते कुटुंब असा संबंध आहे) बघायला सांगत आहे. शाळेपासून सुरुवात करून, पुढे कॉलेज, नोकरी, लग्न, नातेवाईक अश्या आपल्या मित्रपरिवारात सजातीय संबंधीत किती आणि इतर जातीय किती हे तपासले तर उच्चवर्णीयांच्यात सजातीय जास्त दिसतील असा कयास आहे. आर्थिक सुस्थितीतील दलित्/ओबीसींमध्ये मात्र हे प्रमाण कदाचित वेगळे असेल. कारण आर्थिक उतरंडीत सांस्कृतिक भांडवलामुळे उच्चवर्णीय अधिक आहेत आणि सुस्थितील दलित/ओबीसींचा यांच्याशी संबंध जास्त येणार. याचीच दुसरी बाजू पाहिलीत तर झोपडपट्टी, निम्न आर्थिक स्तरातील कुटुंबे राहतात त्या भागात व आर्थिक सुस्थितील कुटुंबे राहतात या भागात तुम्हाला अशीच जातवार विभाजन दिसेल. ते लोकसंख्येच्या तुलनेत जातीच्या टक्केवारीनुसार नसेल. झोपडपट्टीत दलित/ओबीसींचे प्रमाण पहा व ब्राह्मण/क्षत्रिय/बनियांचे प्रमाण पहा.
तर अश्या पार्श्वभुमीवर जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुद्दाम झाले नसले तरी केवळ उच्चवर्णीयच कलाकार असतील तर त्याविरुद्ध असा सूर निघणे मला अयोग्य वाटत नाही. दुसर्या बाजुचा विचार करताना स्वतःला दलित/ओबीसींच्या जागी ठेवून याचा विचार करणे गरजेचे आहे. आणि तसा विचार केला तर प्रत्येकच कार्यक्रम, उपक्रम आयोजित करताना सर्व समाजाचे प्रतिनिधित्व होते आहे की नाही हे तपासून पाहणे आपसूक होइल. त्याचा दूरगामी परिणाम नक्कीच कल्याणकारी असेल.
* ज्यात ब्राह्मण, वैश्य, आणि "मराठा" समाज मी धरतो. मराठा ज्ञाती बांधवांनी महाराष्ट्रात स्वतःला जातीवादाचे शिकार ठरवून दलित / बहुजन चळवळ हॅक केली आहे असे माझे मत आहे. यात कुणबी मराठा वि मोठे जमीनदार/पाटिलकी/कुळी असा पोटभेद आहे व ते मान्य आहे.
<< नीच पातळी >>
<< नीच पातळी >>
----- भरत- दोन्ही बातम्या वाचल्या... धक्कादायक आहे. वाईटही वाटले. दुफळी माजवण्याचे आपण किती कसोसीने प्रयत्न करत आहोत. यांना द्वेष पसरविण्या व्यतिरीक्त दुसरा काहीच उद्योग नाही का?
२०२० मधे कोरोनाच्या सुरवातीच्या काळांतही खोट्या बातम्यांचा प्रसार केला होता. (अ) तबलीगी लोक तोंडातून हॅ हॅ करुन हवेत विषाणू पसरवत आहेत, जेणेकरुन इतरांनाही संसर्ग व्हावा. , (ब) अमक्या टमक्या ठिकाणी दवाखान्यांत/ रुग्णालयांत/इस्पितळांत हे लोक (दिवसरात्र ज्यांचा द्वेष करतो तेच ते) डॉक्टरांवर/ नर्सेस वर थुंकत आहेत, मारहाण करत आहेत, दगडफेक करत आहेत.
सामुहिक रितीने अनेक लोक एकत्र येतात, तोंडावाटे विषाणू बाहेर काढत आहेत अशी कल्पनाही करवत नाही. बातमी खोटी होती, कुठल्या इतर धार्मिक कार्यक्रमाचा फोटो / व्हिडीओ ( द्वेषच पसरवायचा आहे ना ? मग कोरोनाच्या आधीचा पण व्हिडीओ / फोटो चालतो) व्हिडीओ आयटी सेल कडून तोडफोड करुन आपल्या द्वेषी विचारांच्या प्रसारासाठी वापरला होता.
एका मोठ्या समूहाला खड्यासारखे बाजूला सारण्याच्या उद्देशाने त्या समाजाबद्दल सतत द्वेष पसरवणार्या बातम्यां आयटी सेल मार्फत तयार करायच्या. काही दिवसानंतर बातम्या खोट्या आहेत हे लक्षात येते, पण तो पर्यंत २४००० fwd / share झालेले असते. उद्देश सफल होतो. खाली दोन बातम्यांही लिंक आहे.
https://www.newindianexpress.com/nation/2020/apr/06/raipur-aiims-denies-...
येथे फिरोजाबादच्या पोलिसांचेच ट्विट आहे,
https://twitter.com/firozabadpolice/status/1247031313925681152?s=20
कोरोनाकाळांत काही ठिकाणी डॉक्टरांवर/ परिचारिकांवर शाब्दिक/ शारीरिक हल्ले झाले असतील आणि आहेत, पण ते करणारे "सर्वच" धर्मातले आहेत - त्याला अपवाद नाही. जवळच्या व्यक्तीला बेड नाही, ऑक्सीजन नाही, व्हेंटिलेटर उपलब्द नाही, साधे औषध नाही, रुग्णला भेटू देत नाही, मृतदेह देतांना बिलाचे पैसे मागतात.... "कोव्हिड नाही आहे असे आधी सांगितले होते आणि आता.... तुमच्याच हलगर्जीपणा मुळे आमचे ** गेले" , "कोव्हिड बरा झाला आहे असे सांगून घरी पाठविले आणि दोन दिवसात ** गेले... दिले असते अजून पैसे पण " कारणांची मोठी यादी बनेल, अशावेळी पेशंटच्या जवळची मंडळी निराश होणे समजतो आणि ते भावनेच्या आवेषात चूका करतात. हल्ले होणे चूकीचेच आहे, पण अशा प्रकारचा मुर्खपणा करण्यांत कुणाएका धर्माची मक्तेदारी नाही आहे, त्यामुळे एकाच धर्माला टार्गेट करु नका.
कोरोनाकाळांत काही ठिकाणी
कोरोनाकाळांत काही ठिकाणी डॉक्टरांवर/ परिचारिकांवर शाब्दिक/ शारीरिक हल्ले झाले असतील आणि आहेत, पण ते करणारे "सर्वच" धर्मातले आहेत
Submitted by उदय on 2 December, 2021 - 06:21
हो का??? बरे बाबा!
आता जम्मू - काश्मीर मध्ये सैन्यावर दगडफेक करणाऱ्यांबाबत आपले 'अमूल्य' मत जाणून घ्यायला आवडेल.
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcS9-9x-YENP2u2Jh3_c...
https://www.newindianexpress.com/nation/2019/oct/11/jammu-and-kashmir-se...
https://timesofindia.indiatimes.com/india/almost-90-of-stone-pelting-inc...
विक्षिप्त मुलगा, मी आणि उदय
विक्षिप्त मुलगा, मी आणि उदय यांनी नोंदवलेल्या प्रकारांबद्दलचे तुमचे मत नोंदवणार का आधी?
३००० तब्लीघी लोक एकत्र
३००० तब्लीघी लोक एकत्र जमल्यावर इतका बॅकलॅश.
तटस्थ निरीक्षकाला वाटले असते, या देशातली लोकं आणि सरकार संसर्ग न पसरण्याबाबत फारच जागरूक आहेत.
नंतर तेच सरकार आणि तीच लोकं ३५ लाख लोकांना एकत्र येऊ देतात, एकाच पाण्यात बुडी मारण्यासाठी- तेव्हा त्या तटस्थ निरीक्षकाचा काय गोंधळ उडेल नाही ?
तब्लीघी जमात म्हणजे आयटी सेल च्या अनेक straw man पैकी एक आहे. खोटा बागुलबोवा तयार करणे.
>>एका कार्यक्रमात सर्व कलाकार
>>एका कार्यक्रमात सर्व कलाकार हे एकाच जातीचे असणे हे कशाचे लक्षण असावे?
कलाकारांची (किंबहुना कुणाचीही) जात बघणे यालाच तीव्र आक्षेप आहे!!
सिनेमा निर्माता-दिग्दर्शक-कलाकारांची जात बघून जर कुणी सिनेमाला जायचे न जायचे किंवा त्याचा दर्जा ठरवत असेल किंवा परफॉर्मिंग आर्टसारख्या सृजनात्मक व्यवसायात जर कुणाला ओढूनताणून सर्वसमावेशकता आणायची असेल तर अश्या लोकांची कीव करण्यापलिकडे जास्त काही करु शकत नाही!!
एकत्र एखादा कार्यक्रम करण्यामध्ये विचारांची नाळ जुळणे, अभिरुचिच्या दृष्टीने एकाच पातळीवर असणे, कंफर्ट झोन, व्यावसायिक गणिते, राहण्याची ठिकाणे अश्या अनेक बाबी असतात..... छोट्या मोठ्या प्रमाणावर जरी कुणी असले कार्यक्रम आयोजित प्रायोजित अथवा व्यवस्थापन केले असेल त्यांना अर्थातच कल्पना असेल..... अश्या गोष्टींकडे जातीचे (वरकरणी सर्वसमावेशकतेचे) चश्मे लावून बघणाऱ्यांबद्दल काय बोलावे? असो!
कलाकारांची (किंबहुना कुणाचीही
कलाकारांची (किंबहुना कुणाचीही) जात बघणे यालाच तीव्र आक्षेप आहे!!
Wonderland मध्ये जगणे ह्यालाच म्हणतात. मराठी चित्रपट आणि रंगभूमीशी निगडीत व्यवसायात असल्या मुळे काही गोष्टी सांगू इच्छितो. मायबोलीवर जसे कंपू आहेत तसेच मराठी चित्रपट व्यवसायात पण कंपू आहेत आणि ते बऱ्याच वेळेला जातीच्या आधारावर आहेत. अजय अतुल यांना ह्याचा बराच वाईट अनुभव आला आहे. लिंक मिळाली की देतो.
प्रशासनातपण दलित-सवर्ण असा
प्रशासनातपण दलित-सवर्ण असा छुपा संघर्ष असतो. उत्तर भारतीय, पंजाबी, दाक्षिणात्य, अग्रवाल अशा लॉबीज आहेत. यात वरवर कोणी भेदभाव नाही दाखवत पण बऱ्याचदा सट्ल आणि कधीतरी उघडपणे यांचे रंग बघायला मिळतात. आपापल्या माणसांना फेवर केले जाते बदल्यांच्या वेळेस. झोलझपाट्यात सापडल्यास एकमेकांना सांभाळून घेतात. मराठी माणसांची अशी लॉबी नाही अजूनतरी( निदान आमच्या सर्व्हिसमध्ये)
>>Wonderland मध्ये जगणे
>>Wonderland मध्ये जगणे ह्यालाच म्हणतात.
असेल कदाचित..... जसे ज्याचे अनुभव तशी त्याची मते बनत असतील!!
चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतापासून करावी (एखाद्याला हा भाबडेपणाही वाटू शकतो) पण बऱ्याचदा दोष आपल्या दृष्टीकोनातच असतो!!
खचित काही वाईट उदाहरणे असतीलही आणि लगोलग इकडे त्याच्या लिंकाही चिकटवल्या जातील पण चांगली उदाहरणे त्याच्या कैकपट अधिक असतील..... धंद्याची गणिते आणि कलागुण बाजुला ठेऊन जातीपाती कुरवाळत बसले असते तर मराठी कलाविश्व काय किंवा बॉलिवूड काय एव्हढे बहरले नसते!!
Inclusivity चा आग्रह करण्यात
Inclusivity चा आग्रह करण्यात काहीच वाईट नाही.
मुनव्वरचा सेन्स ऑफ ह्युमर ठीक
मुनव्वरचा सेन्स ऑफ ह्युमर ठीक आहे, बरेच व्हिडीओ पाहिलेत. गोध्रा जोक फेबू व्हिडीओमधे ऐकला होता आणि आवडला नव्हता. मग ज्यांचे नातेवाईक मृत झाले असतील त्यांना तो नक्कीच खटकेल. बरं सुरूवातीला त्याला तो असंवेदनशील वाटला नसेल पण नंतर बॅकलॅश उठल्यावर पण त्याबद्दल काही वाटू नये?
त्यामुळे आक्षेपार्ह कटेंटबद्दल कायदेशीर कारवाई जरूर करावी. झुंडशाही करून प्रोग्राम बंद पाडू नयेत. लॉ ऑर्डर सिच्युएशन बाबतीत पोलिसांनी त्यांच्या हातात असलेल्या माहितीनुसार निर्णय घेणे अपेक्षित. पण हे निर्णय बहूधा पॉलिटिकली मोटिवेटेड असतात. पोलिसांवर राजकीय दबाव आणला जातो.
{एका कार्यक्रमात सर्व कलाकार
{एका कार्यक्रमात सर्व कलाकार हे एकाच जातीचे असणे हे कशाचे लक्षण असावे? हे अजुनही आपला समाज सामाजिक दृष्ट्या एकसंध नसल्याचे लक्षण आहे }
हे समजणं इतकं कठीण असेल असं वाटलं नव्हतं.
{धंद्याची गणिते आणि कलागुण बाजुला ठेऊन जातीपाती कुरवाळत}
गुणवत्ता, कलागुण, विकली जाणारी कला विशिष्ट जातीकडेच असते का? इतर जातींत ती नसते असं म्हणायचंय?
की कलेची व्याख्याही आपण तशीच करतोय? प्रमाण भाषेसारखी?
टवणेसर, पोस्ट आवडली. हे केवळ तुम्हीच लिहू शकता.
टवणे, बरोबर.
टवणे, बरोबर.
गुणवत्ता, कलागुण, विकली
गुणवत्ता, कलागुण, विकली जाणारी कला विशिष्ट जातीकडेच असते का? इतर जातींत ती नसते असं म्हणायचंय? >>>> असं कोण आणि कुठे म्हणालं ?
त्या वाक्या आधीचा कंस आणि
त्या वाक्या आधीचा कंस आणि कंसातलं वाक्य असलेली पोस्ट जिला उत्तर म्हणून लिहिलीय, ती टवणेसरा़ंची पोस्ट वाचा.
भरत,
भरत,
मुद्दा पोहचला नाही बहुतेक..... पूर्ण वाक्य परत वाचा "जातीपाती कुरवाळत बसले असते तर मराठी कलाविश्व काय किंवा बॉलिवूड काय एव्हढे बहरले नसते!!"
संत्रे सोलतो: जातीपाती न बघता कलागुणांना प्राधान्य दिल्यामुळे व्यवसाय टिकला, वाढला!!
आता यात तुम्हाला लागलाय तसा अर्थ कुठे निघतो?
"बऱ्याचदा दोष आपल्या दृष्टीकोनातच असतो!!" असे म्हणालो ते म्हणूनच!!
जातीपाती कुरवाळत बसले असते तर
जातीपाती कुरवाळत बसले असते तर मराठी कलाविश्व काय किंवा बॉलिवूड काय एव्हढे बहरले नसते
मराठी कलाविश्व फार बहरलं आहे असे आपल्याला का वाटत आहे? जातीपाती कुरवाळत बसले आहेत म्हणून तर म्हणावी तशी प्रगती झाली नाही.
त्या वाक्या आधीचा कंस आणि
त्या वाक्या आधीचा कंस आणि कंसातलं वाक्य असलेली पोस्ट जिला उत्तर म्हणून लिहिलीय, ती टवणेसरा़ंची पोस्ट वाचा. >>>> वाचली होती. दोन्ही पोस्टीनमध्ये "गुणवत्ता, कलागुण, विकली जाणारी कला विशिष्ट जातीकडेच असते आणि इतर जातींकडे नसते" असं म्हंटल्याचं दिसलं नाही.
स्वरूप , स्वतः:चंच वाक्य
स्वरूप , स्वतः:चंच वाक्य देताना "धंद्याची गणिते आणि कलागुण बाजूला ठेवून हे" मी quote केलेले तुमचेच शब्द वगळलेत की हो तुम्ही. आणि म्हणताय पूर्ण वाक्य वाचा.
तो अर्थ लागला कारण चर्चेची सुरुवात साहित्य संमेलनातल्या त्या कार्यक्रमापासून झालीय.
ते वगळल्याने अर्थात फारसा
ते वगळल्याने अर्थात फारसा काही फरक पडू नये!!
हे घ्या पूर्ण वाक्य:
"धंद्याची गणिते आणि कलागुण बाजुला ठेऊन जातीपाती कुरवाळत बसले असते तर मराठी कलाविश्व काय किंवा बॉलिवूड काय एव्हढे बहरले नसते!!"
कुठे लागतोय तुम्ही म्हणताय तसा अर्थ?
टवणे सरांची पोस्ट पर्फेक्ट व
टवणे सरांची पोस्ट पर्फेक्ट व निरीक्षण अचूक आहे.
मला वाटते की प्रवचने आणी भजने
मला वाटते की प्रवचने आणी भजने यातुनच सगळे समाज घटक एकत्र येत असावेत. माझ्या वडलांना शास्त्रोक्त संगीत, भावगीते व भजने खूप आवडायाची. वर्षातुन ४- ५ गुरुवारी आमच्या घरी रात्री १० पासुन भजनी सिनीयर्स व बाकी तरुण दादा मंडळी यायची. रात्री १ ते २ दरम्यान कार्यक्रम संपायचा. भजने झाली की भावगीते रंगायची. गेले ते दिन गेले. बरेच लोक म्हणतात की गावा मध्ये जात पात आहे, पण निदान नसिक मध्ये असतांना मला तरी ते दिसले नाही.
टवणे सरांनी व्यवस्थित लिहिलं
टवणे सरांनी व्यवस्थित लिहिलं आहे. तेच तुम्हांला पटत नाही तर राहू द्या.
मी लिहिण्याने आणखी फाटे फुटतील.
समावेशकता किती ग्रॅन्युलर
समावेशकता किती ग्रॅन्युलर अपेक्षित आहे? संमेलनातल्या प्रत्येक कार्यक्रमातल्या प्रत्येक विभागात (गायक/वादक/कवी/संयोजक/निवेदक इ.इ.इ.) सगळ्या जातीजमातीतले लोक असले पाहिजेत असं काही आहे का? कारण सदर कार्यक्रमात (मी आधीच लिहिल्यानुसार) ब्राह्मणेतर कलाकारही आहेत आणि ते ज्या पूर्वसुरींच्या रचना सादर करणार आहेत त्यांतही ब्राह्मणेतर नावं आहेत.
शिवाय जसा इर्शाद फक्त दिवाळी पहाटेचा कार्यक्रम नव्हता तसाच हाही केवळ संमेलनासाठी जुळवून आणलेला कार्यक्रम नाही - हा शुभारंभाचा प्रयोग संमेलनात सादर होणार आहे. अर्थातच जातीपलीकडे कलाकारांची उपलब्धता, मानधन, ट्यूनिंग, इ. बरेच पॅरामीटर्स चमू जमवण्यामागे असणार आहेत.
गोळीबार किंवा उपदेश करण्याआधी संमेलनाची आणि या प्रयोगाचीही कार्यक्रमपत्रिका पाहावी असं मी सुचवेन.
>>> कलाकारांची (किंबहुना
>>> कलाकारांची (किंबहुना कुणाचीही) जात बघणे यालाच तीव्र आक्षेप आहे!!
स्वरूप यांच्या या वाक्याने सुरू होणार्या पोस्टला अनुमोदन.
अजय-अतुल यांना वाईट अनुभव आले असतील यात मला शंका नाही, पण तसेच अनुभव खरे-जोशांनाही 'ती बामनं' म्हणून येतात - जात सर्वांच्याच किती रक्तात भिनली आहे यापलीकडे काहीही सिद्ध होत नाही त्याने.
माझ्या मित्रपरिवारात मुलगा महार मुलीशी लग्न करतो म्हणाला म्हणून खवळलेल्या चांभार कुटुंबाचं उदाहरण आहे.
तेव्हा हा प्रॉब्लेम ब्राह्मण-ब्राह्मणेतर किंवा सवर्ण-सवर्णेतर इतकाच मर्यादित नाही, जात डोक्यातून जात नाही - कोणाच्याच! - असा आहे.
माझ्या मित्रपरिवारात मुलगा
माझ्या मित्रपरिवारात मुलगा महार मुलीशी लग्न करतो म्हणाला म्हणून खवळलेल्या चांभार कुटुंबाचं उदाहरण आहे.>>>>>
हे कितीही खरे असले तरी बामन / भटांनीच जातियवाद निर्माण केला असे म्हणणार्या सेक्युलर्स ला ते कधीच मान्य होणार नाही. 
आम्ही अदिवासी आहोत, आमचे पण काही रिती रिवाज आहे असे म्हणत आमच्या कामवाली ने स्वतःच्या मुलीला एका बौद्ध मुलाशी लाग्न करायला रोखले होते. सोनीची आई चार दिवस न सांगता कामावर का आली नाही हे बघायला मी जेव्हा तिच्या घरी गेले तेव्हा तिच्या भावाने मला सांगीतले. या मोठ्या भावाच्या रिस्पेशनला आम्ही तीन कुटुंबे गेलो होतो. ही मुलगी शेवटी पळुन गेली आणी मग लग्न लावुनच घरी आली.
तुम्ही ( जनरल सर्व ) बामन म्हणा, भट म्हणा, महार म्हणा, सोनार म्हणा, कोणालाही आपल्या जाती खेरीज दुसर्या जातीतल्या सुना/ जावई चालत / आवडत नाहीत हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
ब्राह्मणांना टार्गेट
ब्राह्मणांना टार्गेट करण्याविरुद्ध आहे मी. आमच्या घरी आम्ही ३ जातींचे लोक आहोत. त्यामुळे बाजू कोणाचीच घेउ इच्छित नाही.
फक्त एक नमूद करते - जी उदाहरणे द्याल ती वैयक्तिक देउ नका कारण वैयक्तिक उदाहरणांची खात्री , सत्यासत्यता पडाताळता येणे कठीण असते. मी आज चांभार-महार उदाहरण देइन मग उद्या दुसरा कोब्रा-मराठा उदाहरण त्यावर देइल. तिसरा सोनार-कासार वगैरे वगैरे. शहानिशा कशी करणार.
मला स्वतःला जातीपातीचे अनुभव आहेत. पण इथे ते देणार नाही कारण त्यांना आधार नाही, पुरावा नाही. सांगोवांगी नुसती.
असो.अजुन एक - अन्य जातीच्या लोकांना कंपूबाजी करण्यापासून कोणी अडविले आहे का? ते का नाही आपला गट बनवून 'सो कॉल्ड आपल्या आपल्या' लोकांना संधी देत?
<< माझ्या मित्रपरिवारात मुलगा
<< माझ्या मित्रपरिवारात मुलगा महार मुलीशी लग्न करतो म्हणाला म्हणून खवळलेल्या चांभार कुटुंबाचं उदाहरण आहे.
तेव्हा हा प्रॉब्लेम ब्राह्मण-ब्राह्मणेतर किंवा सवर्ण-सवर्णेतर इतकाच मर्यादित नाही, जात डोक्यातून जात नाही - कोणाच्याच! - असा आहे >>
------- पर जातीमधे विवाह केला म्हणून सरसकट मुलीची/ तिच्या नवर्याची हत्या करण्याचे ( तिथेही " ऑनर "
) अनेक प्रकार एकले आहे. स्वत: च्याच मुलीची हत्या करण्यांत ऑनर शोधणार्यांच्या मनात जात किती " घट्ट " चिकटवलेली आहे याची जाणिव होते.
प्रत्येक जणच म्हणतो - आम्ही तर जात पाळत नाही. आपण कुठे आहोत हे तपासण्यासाठी काही लिटमस टेस्ट आहे का?
जाती /धर्म यावरुन भेद भाव, वेगळ्या प्रकारच्या वागणूकीचे प्रकार कधी सुरु झाले, कुणी सुरु केले हे मला माहित नाही पण आपण ते तसेच सुरु ठेवायचे नाही, आणि हेच मी करु शकतो.
प्रत्येक ठिकाणी, कलाकारांची जात/ धर्म बघण्याची अवशक्ता नाही. तसे करणे त्यांच्यावर, त्यांच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येवर अन्याय आहे. पण एखाद्या कला क्षेत्रात एकाच जातीचे लोक असतील तर ते तसे का आहेत आणि हे असे समिकरण योग्य आहे का अशी चर्चा होणे गरजेचे आहे. कोणत्याही जातीबद्दल आकस न बाळगता अशी साधक- बाधक चर्चा होणे (काही दोष असतील तर त्यांना नाहिसे करण्याचे उपाय योजणे) हे सामाजिक सलोख्यासाठी आवश्यक आहे.
कलाक्षेत्रात विविधता असेल तर त्याने कलेच्या विकासात नक्कीच सकारात्मक योगदान ठरेल हे अनेकांनी वर सांगितले आहेच आणि मला तोच विचार योग्य वाटतो.
Pages