Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी बरोबर, अमा..............
अगदी बरोबर, अमा................!!
ठेवा तो लाडू खाली, तूझं डोकं
ठेवा तो लाडू खाली, तूझं डोकं रिकामं आहे वगैरे पाहुण्यांसमोर कोण बोलतं. यशलाही संजनाचं बोलणं तोडून स्वतः चं घोडं दामटण्याची काही गरज नव्हती. याने संजना नाही पण तो आगाऊ वाटतो जो तो आहेच.
आजी अगदीच भोचक पणे बोलत
आजी अगदीच भोचक पणे बोलत होत्या..... घरी कोण कोण असतं...लग्न का नाही झालं...? काही प्रॉब्लेम आहे का...? आमच्या अरुंधतीला 'ए', 'अगं'...बोलणं बरं दिसत नाही.... बगैरे वगैरे..............!!!
तो आशु काहीच पॉलीश्ड वाटत नाही.... !!!
ब्ला ब्ला ओके वी गेट इट.....
ब्ला ब्ला ओके वी गेट इट.....

नितीनच्या भूमिकेतील अभिनेता
नितीनच्या भूमिकेतील अभिनेता कोण आहे?
आवाज लावणं, संवादफेक एकदम नाटकातली आहे.
भाग ५१३:
भाग ५१३:
मागील पाना वरून पुढे अरूचे कौतूक चालू आहे. तिला कोणाचीच खरे तर गरज नाही आहे. त्यांना संधीचीच गरज असते. नित्या आशूच्या डोळ्यात आरु बद्दल प्रेम दिसत आहे ते ही लपव. नितीन हे पात्र संस्कृत नाटकात जिवलग मित्राचे पात्र अस्तो त्या बर हुकुम बेतला आहे.
संजना अन्या: नव्या बिझनेस आयडिया संजना तर्फे: ग्रुमिन्ग इन्स्टिट्युट उघडा यची मुला मुलींना. आणि आशुतो स केळकर कडून पैसे घ्यायचे आहेत ह्या कल्पने साठी. हिला श्रिमंत लोक्स कसे असतात माहीत नाही वाटते. आपला फायदा बघते आहे म्हणे. ती त्याला लंच ला बोलावणार आहे इन जनरल तो महत्वाचा आहे व पैशाचा सोर्स असल्याने ही त्याला बढावा देत आहे व अन्या वैतागतो आहे. इन जनरल गळे पडू बाई.
अन्या संजनाला म्हन तो मी वयस्कर दिसतो का? व आरश्यात बघत आहे चेक करत आहे. इथे फनी म्युझिक आहे. खंग्री मॅन विदुषकाची टोपी घालून नाच करत आहे असे वाट्ते.
यश रात्री झोपायला आला आहे कारण अरु एकटी आहे. गौरी बिझी आहे फार काही बोल णे झाले नाही. ती माहेरी जाउन आली आहे. निहारने मोठ्या सायक लची मागणी केली आहे. त्याने दारोदार फराळ विकला आहे. ती भावाने एक लाख दिलेत ते सांगते. एक रकमी व्यवहार केलेला बरा तो केदारच्या लोनची चौकशी करत आहे. आता हे एक एक लाख करत पैशाची जुळणी करत आहेत.
लगेच आई वाले बासरी संगीत वाजते अरू उसासत रडत आहे. एकदम आज तुला काही झाले अस्ते तर करून अश्रुपात चालू. म्हणजे एकक्षणी पैशाचा हिशेब व लगेच रडा रड.
तो परत तिला आशूच्या गाण्याच्या संधीचा विचार कर म्हणतो. आता ही खिचडी टाकते आहे.
कट टू नेक्स्ट डे आजी आबा खुर्ची सीन. पोस्ट दिवाळी म्युझिन्ग्ज. अवि आला नाही म्हणून आजी कुरकुरत आहे. अरु व यश येतात व अरूने उपमा आणला आहे तो ती किचन मध्ये ठेवते. अग्दी उभी बारकी पिशवी आहे. आजी तिला डिसमिस करते. केदारचे पैसे कसे देणार म्हणते.
आता संजना आली आहे. अन्या म्हण तो मी एकरकमी पैसे देतो. घर विकून टावर बांधायचे. अन्या कायद्याची भाशा बोलत आहे. ते अ के च्या ऑफिसात जात आहेत दोघे. संजना अरु ला बरोबर बोलवते निगोशिएट करायला. ओळखीचा फायदा करून घ्यायचा आहे संजनाला.
गबाळी आलीस तरी काही प्रॉब्लेम नाही. पण अरू नाही म्हणते.
अरू आई अप्पाचे घर आहे. कश्याला असे डिसिजन घेता. मी तुम्हाला मदत नाही करणार. मी बांधिल नाही. एकदम संजना विरुद्ध अरू असा सामना घेउन संजना घर विकायच्या इरेला पेटलेली आहे. जसे काही ते तिचेच आहे.
बिल्डर टायट ल क्लीअर नाही असे सांगतात. मीटिन्ग मध्ये ही माहिती डिक्लेअर होते. पेपर क्लीअर नाहीत. संजना मदत मागते. ते पेपर मागतात आपल्या वाटणीचे एफ एस आय विकू शकतो का असे अन्या विचारतो. अन्या संजना आपले बिझनेस प्लान्स त्यांना सांगतात व तिथेच भांडत आहेत की नकी काय स्टार्टप करायचे ते. आशू काय प्लान आहे तो नक्की फिक्स करा म्हण तो व मग या म्हणतो.
इथे भाग संपवला
प्रोमो मध्ये अरू दार उघडून येते. आशू तिला उठून वेलकम करतो. व एक गुड न्युज द्यायची आहे म्हण तो. त्याचा सूट अगदीच प्रेक्षणीय आहे.
अविनाशने जमीन विकून ८ लाख,
अविनाशने जमीन विकून ८ लाख, केदारने जमीन विकून ७ लाख, यशाचे ५ लाख, अरुंधती घ्या भावाचे १ लाख असे २१ लाख झालेत.
उरलेले ४ लाख देविका, केदारचं लोन यातून सहज उभे राहतील. त्यात आता अरुंधतीला गाण्याची ऑफर मिळालीय.
हे लोक पेपर सोडवून आणायला शेवटच्या दिवसाची वाट पाहतील.
म्हणजे टॉवर बारगळेल आणि रोज चिंताग्रस्त राहता येईल.
अनुपमा मध्ये भयंकरच ड्रामा
अनुपमा मध्ये भयंकरच ड्रामा चालू आहे. अनुज व अनुपमा च्या लग्नाचा आग्रह धरला आहे. व लगेच सासूच्या सुन पणाची लक्तरे बाहेर पडतात. भयंकरच बलिदान केले आहेत तिने. सासू सासर्यांचे इशूज बाहेर येतात व फायनली सासरा बोलणे सहन न होउन आजारी टा ईप होतो. सासूच्या अंगात आले आहे. सिरीअस दिवाली ड्रामा. एकदम भगवान राम. मर्यादा . कोण लिहीत असावे हे संवाद. एकदम हाय पिच आहे.
सासू सासर्याला एकदम कचर्यातच काढते. सासरा एकदम आजारीच पडतो. हे अनुज च्या घरी त्याला घेउन येतात. क्या सुपर ड्रामा.
हो अमा...
हो अमा...
मला तर धडधडायला लागले तो ड्रामा पाहून! किती आक्रस्ताळेपणा....!!! पण तिच्या मनातले सगळे विष बाहेर काढलेन! असू शकतात असे ग्रजेस..!! फक्त सगळे बोलून दाखवत नाहीत.
सगळ्यांचे काम छान...!!!!!!!
आई कुठे काय करते मधे......सेम सेम चालले आहे.......... म्हणजे आशुच्या कडे मिटींग, आधी अनुपमा ने नाही म्हणणे, मग जाणे....तिच्याच प्रेझेंटेशन ची वाहवा होणे.... तिला पार्टनर्शीप ऑफर करणे................
या लायनीवर चालले तर आजीला मोठा स्कोप आहे पुढे....लय फूटेज म्हातारीला.......!! आपा ला खाली मान घालून ऐकायला लागेल....
काल कांचन आशुतोष साठी
काल कांचन आशुतोष साठी स्थळांची चर्चा करत होती, तेव्हा तिला माहीतच नव्हतं की त्याला हवं ते स्थळ तुझ्याच घरात आहे.
पुढे मस्त मोठा धक्का बसेल तिला
पुढे मस्त मोठा धक्का बसेल >>
पुढे मस्त मोठा धक्का बसेल >> मग ते घिसेपि टे दळ ण. बाई व बाप्याची दोसती असो शकत नाही का? समाजाला समजत नाही का
अनुपमा तर दर वाक्यात कान्हाजी आणते. सरळ पणे हा बाप्या तुमच्या यप्पड पोरापेक्षा बेटर आहे. मी त्याला सिलेक्ट केले आहे व तो माझ्या गरजा भागिव तो. काय म्हणणे आहे म्हातारे? असे का नाही ह्या बाया बोलत चा ळीशी पारच्या स्वतंत्र आहेत ना?! नुसते भावनिक दळण निव्वळ
बेटर यंगर रिचर असा अनुयायी मिळवायचे स्वातंत्र्य असते . हा हा.
'अनुपमा' मधे सासुने स्वतःच्या
'अनुपमा' मधे सासुने स्वतःच्या मुलाच्यावेळी केला नाही त्याच्या तिप्पट drama चालवलाय सुनेला मित्र आहे म्हंटल्यावर.
मला तर इथे अरूंधतीच जास्त
मला तर इथे अरूंधतीच जास्त ड्रामा करेल असे वाटते. नवरा सुटला, त्याची नवी बायको सतत तिला जायला सांगत असते, सासऱ्यांनी अर्धे घर देऊन थांबवून ठेवले आहे, जरा काही झाले कि सासू फुगून बसते, मुलेही तिच्यावर अवलंबून नाहीत तरीही तिला सासर सोडवत नाही. यात जर आशूने मागणी घातली तर ती भाषण पे भाषण देईल त्याला.
हो अगदी... वरुन त्यालाच
हो अगदी... वरुन त्यालाच सुनावेल..... स्त्री ला घर किती प्रिय असतं... तिच्या निष्ठा कशा घराशी सांधलेल्या असतात .... याव नी त्याव......
त्याने घालूच नये मागणी शाहाणा असेल तर.............................!!!
त्याचा मित्र खूपच कृत्रिम वाटतो..... खरंच...संस्कृत नाट्कात अ सते तसे पात्र आहे...नायकाच्या मित्राचे....!!!!!!!!!
भाग ५१४:
भाग ५१४:
कालचीच मीटिन्ग परत चालू आहे. अन्या संजना कडे काँक्रिट प्रपोजल नाही त्यामुळॅ नि व आ त्यांना फंडिंग कसे देणार हवेत? हे समजावून सांगतात.
अरू दार उघडून आत येते तर अ सं वैतागतात व शॉक होतात थोडे. विचित्र मोठी फ्रेम व पीच वर व्हाइट चौकडी असलेला सूट!!!!! आय तो विल रिजेक्ट हिम फॉर धिस फनी ड्रेस राइट देअर विथ टू स्पँकिन्ग्स ऑन हिज बिग बट( पुणेरी भा शेत पोकल बांबूने फटके दिले पाहिजेत असला सूट घातल्या बद्दल) हा साहेब उठून अरूचे स्वागत करतो.
अन्या संजना तरी चिकट पणे बसून राहतात. मग नित्या मनावर घेउन त्यांना हाकलतो. तरी अन्या तुझे काम झाले असेल तर मी सोडतो. मीटिन्ग व्हायची असेल तर थांबतो म्हण तो तर आशू त्याला बढवतो. न बोलता ऐसे अपमान का बहुत स्वाद आता है नं. तरी तो दाराबाहेर उभाच राह्तो व काय बोलणे होईल ते ऐकत असतो. लुब्रा मेला. पण ओफीस चा प्ञूण येउन कप घेउन जातो व माघारी दार लोटुन घेतो. मर मेल्या. (अन्या)
मग सु अरू व आशूत कामाची बोलणी होतात. ही उसासत मी उत्तान गाणी गाणार नाही. रात्री उशीरा थांबणार नाही. रिहर्सल येत नाही रेकॉर्डिन्ग येत नाही वगैरे भर्पूर अटी ठेवते. पण समोरची पार्टी पार बनियान परेन्त पटलेली असल्याने लगेच हो म्हणून अॅडवान्स चेक हातात ठेवते. काँत्रे क्ट वगैरे तर हिला माहीतच नाही. मग पपी आइज करून एकदाचा चेक हातात घेते. आशु हुष करतो व तिचे डबे परत करतो परत तुम्हा बायकांना हे आहेच. मॉड र्न पॅट्रार्की. म्हणजे अरू जुन्या पद्धतीच्या पॅट्रा र्की मधून नव्या रुपातल्या पुरुषी सं र क्ष णात जाणार. एकट्या मध्यमवयीत्न स्त्रीस बाहेर ची परिस्थिती किती भयानक असू शकते. तिला लगेच लुबाड ले जाउ शकते हे दाखवत सुद्धा नाहीत.
एकतर मला गायला येत अस्ते व कर्ज डोक्यावर असते तर मी कोरस मध्ये रिलिज्स आरत्या नवरात्राची गुज राती गाणी क्लब मध्ये रात्री गाणी काहीही सुरात गाउन पहिले आर्थिक बाजू पक्की केली असते. कॅश डाउन. पण हिला हातात मिळतो तो एड वा न्सही ज ड होतो आहे. सम पीपल ज्स्ट डाँट नो देअर प्रिविलेजेस. चेक घेताना उसासत थँहॅन्क ह यू हू. असे.
तो अरे तुरे कर म्हणतो तर ती नाही म्हण ते. हा हिरो अगदीच पारोसा दिसतो बुवा.
मग हा तिच्या आव्डीच्या चिंचेच्या गोळ्या देउन तिचे मन जिंकितो. ( तिला शारीरिक अर्जेस नाहीच आहेत पवित्र असल्याने) हस्ते एकदाची. आता नित्या टीपी करत आहे. आता हे दोघे एका वेळी आटोत व हपिसात एकेक चिंचेची गोळी खाउन रमतात.
कट कट चालू आहे. ए क लाखाचा चेक मिळाला आहे. हि पण गप्प बसत नाही प्रत्येक अर्निन्ग अप्पाच्या पायाशी का बरे ठेवावा लागतो.
आता कर्ज फेडायला अन्याच्या पैशाची गरज नाही. अन्या जाम तिला टाकून बोलतो. व संजना वाइट अर्थ काढते. अन्या गेटिन्ग पझेसिव अबाउट ओल्ड कार.
अन्या स्म्जना घरी येउन वैतागतात. बोलणी मनासारखी झालेली नाहीत.
आजी- मित्र सारखं येणं बरं
आजी- मित्र सारखं येणं बरं दिसत नाही
सुरू- ह्यांची मैत्रीण यायची ते चालायचं
डॉक अभि- पण आई चा मित्र..??????????????
23 तारखे पर्यंत हा प्रोमो सतत पहावा लागणार
एकतर मला गायला येत अस्ते व
एकतर मला गायला येत अस्ते व कर्ज डोक्यावर असते तर मी कोरस मध्ये रिलिज्स आरत्या नवरात्राची गुज राती गाणी क्लब मध्ये रात्री गाणी काहीही सुरात गाउन पहिले आर्थिक बाजू पक्की केली असते. कॅश डाउन.
>>>>
अगदी…अगदी…
एकतर मला गायला येत अस्ते व
डुप्लीकेट प्रतिसाद
अरुला गायनाचा चान्स मिळतोय
अरुला गायनाचा चान्स मिळतोय यात कुणालाही आनद नाही स्वतः अरु लाही नाही, काही लोकाना समहाउ दु:ख,गरिबी,हालअपेश्टा याच सतत भान्डवल करुन सिम्पथी घेण्यातच पॉइण्ट असतो, भले अरु आशुला तेवढि ओळखत नसेलही पण आपल्याला बर गाता येतय आणि कुणी त्यासाठि आपल्याला सन्धि देतय एवढ पुरेसे आहे की परवाच्याच एपिसोड मधे ठणकावलस ना अन्याला मी करेल पैसे परत सगळ्याचे ,कसे विचारले तर शिकेल म्हणे सगळ मग मिळाली आहे की आता सन्धी.
एकतर मला गायला येत अस्ते व
एकतर मला गायला येत अस्ते व कर्ज डोक्यावर असते तर मी कोरस मध्ये रिलिज्स आरत्या नवरात्राची गुज राती गाणी क्लब मध्ये रात्री गाणी काहीही सुरात गाउन पहिले आर्थिक बाजू पक्की केली असते. कॅश डाउन.
अमा, खुप हसले.
>>>> आईग!
अगदीच पटलाय तो प्रतिसाद.
सु अरु आता काय करते, कुठे
सु अरु आता काय करते, कुठे जाते, गाणे कोणाकडे गाणार हे विचारायचा किंवा ठरवायचा अधिकार अन्याला नाही, हा कोण दीडशहाणा . एक प्रोमो बघितला त्यात तो विचारत असतो, ती मस्त उत्तर देते.
प्रत्येक अर्निन्ग अप्पाच्या
प्रत्येक अर्निन्ग अप्पाच्या पायाशी का बरे ठेवावा लागतो.>>> संस्कारी बहू
कोणत्या ॲाफिसमधे एक मिटींग चालू असताना दुसऱ्याला आत पाठवतात?
आता संजना सासूला आशूच्या विषयावरून अरू विरूद्ध भडकवते. सासू आता ती करत असलेल्या सेवेची जराही जाण न ठेवता थयथयाट करेल आणि अरू अतिशय लाचारपणे गयावया करून सांगेल ती कुठेही चूकत नाही ते. आपल्याला या विषयावरून बोलायचा सासूला काही अधिकार नाही हे तिच्या मनातही येणार नाही.
ही जर आता सेम अनुपमाच्या
ही जर आता सेम अनुपमाच्या वळणावर चालली असेल तर खरंच भिकार होत चाललीये मग. कांचन आधीच डोक्यात जाते त्यात आता थयथयाट करणार असेल तर मग कठीण आहे.
आपल्याला या विषयावरून बोलायचा सासूला काही अधिकार नाही हे तिच्या मनातही येणार नाही.>>> नाही तर काय, as usual , आई अप्पा आई अप्पा करत बसणारे कायम, ही बया सोडून का जात नाही ते घर
, तिथे न थांबताही घराचे पैसे गोळा करु शकली असती की.
अरुला गायनाचा चान्स मिळतोय यात कुणालाही आनद नाही स्वतः अरु लाही नाही, काही लोकाना समहाउ दु:ख,गरिबी,हालअपेश्टा याच सतत भान्डवल करुन सिम्पथी घेण्यातच पॉइण्ट असतो, भले अरु आशुला तेवढि ओळखत नसेलही पण आपल्याला बर गाता येतय आणि कुणी त्यासाठि आपल्याला सन्धि देतय एवढ पुरेसे आहे की >>> अगदी , चांगली संधी मिळतेय तरी चेहऱ्यावर कसला आनंद नाही, घरी येऊन त्या अन्याला सुनवायचे सोडून तोच तिला सुनावत बसलाय आणि यश तिच्या बाजूने बोलतोय. ही आपली ढिम्म
अरूंधती कितीतरी वेळा मी गाणं
अरूंधती कितीतरी वेळा मी गाणं म्हणणार आहे असे बोलली. खटकले ते. गाणं गाणार असे म्हणायला हवे ना.
ती स्वत: गायिका असून तिला ही चूक कळली नाही का?
सूट भयानक आहे.
सूट भयानक आहे.
गाणं म्हणणार ही ठीके की...
गाणं म्हणणार ही ठीके की....आम्ही तरी असेच म्हणतो.
सुट मात्र खरोखरीच भयानक होता...टोटल टर्न ऑफ!!! कोण करतं सिलेक्ट असले आऊटफिट?
अमा..:haha:
गाणं म्हणणार ही ठीके की...
गाणं म्हणणार ही ठीके की....आम्ही तरी असेच म्हणतो.
सुट मात्र खरोखरीच भयानक होता...टोटल टर्न ऑफ!!! कोण करतं सिलेक्ट असले आऊटफिट?
अमा.. :haha:
आशु चा सुट, शूज आणि लॅपटॉप..
आशु चा सुट, शूज आणि लॅपटॉप....तिन्ही भयानक आहेत...
लॅपटॉप पहा...लहान मुलांच्या पाटी सारखा आहे...भडक केशरी.......
हॉरिबल ड्रेस सेन्स!
आशु + अरु = अश्रु
आशु + अरु = अश्रु
उद्या दोन तासांचा भाग आहे.
उद्या दोन तासांचा भाग आहे.
Pages