आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्रु ची केमिस्ट्री अजिबातच नाही जुळत......
कैच्या कैच!
आणि ती किती रुक्ष पणे बोलते त्याच्याशी...
तिला त्याची intentions समजत नसतील का...? इतकी भोळसट आहे का ही?

समय समय पे भोळसट आणि टफ.
अगदी पवित्र सोल हिरोयनी असतात.
कुणाचं इंटेनशनल बोलणं पण कळत नाही.
रेशीमगाठवाली नेहा पण तशीच.

एक, दोन तासाचे स्पेशल भाग असतात जेव्हा कुठल्याही सिरियलचे तेव्हा शेवटी पाच मिनिटं बघावे. त्यात सर्व समजतं नाहीतर पीडतात. शेवटी पाच मिनिटं बघून दुसऱ्या दिवशीचा भाग बघावा.

पनवेलहून ट्रेन लवकर पोहचेल की चारचाकी. तरी ही भोळी बाई आधी केळकर बाईसोबत आणि आता बुवा सोबत गाडीतून येते आणि उशीर होतोय म्हणत राहते. त्या बिचाऱ्या कृष्णाला सांगते की आपण बरोबर जाऊ पण गाडीत तर तो दिसत नाहीये. मागच्या वेळेस तर त्याला म्हणाली की मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येईन, आपण बरोबर जाऊ पण तेव्हाही त्याला टांग दिली.
उद्या झापेल बहुतेक आशूला. तो अजून तिच्या प्रेमात पडेल.

आज अर्धा वेळ यश गौरी कोकिल कूजन प्रेमाचे भांडण वगैरे.

मग पनवेल मधून रात्रीचे परत येणे. कृ श्स्ना कटला तरी पण ही मागेच बसून राहते. तो काय सोफर आहे कि कॉय?

आणि तोच सूट घालू हा इथे थिते फिरतो आहे. पनवेलात जाउन उगीचच कामे काढली. मग कार मधून परत इतकेच.

आता चाळीशी पुढच्या बाईला सासू संशय घेउन उशीरा का आली विचारते. हद्द झाली.

Ashutosh is stalking Arundhati.
Sanjana is stalking Ashutosh.

अभिषेकला सुद्धा आईला मित्र असणं खटकतंय . अनघाने अजूनही विचार करावा. हे स्थळ काही बरोबर नाही.

तो सुट फुल वापरून घेतला..पुन्हा नाही दाखविता येणार ना!
दुसरा कुठला प्लेन कॉमन कलर असता तर चाणाक्ष प्रेक्षकांना इतकं लक्षात आलं नसतं..पुन्हा घातला आठ पंधरा दिवसांनी तरी....!! Happy

अरु अर्ध घर आहे म्हणून तिथे रहात असेल तर चुक आहे, मुलं राहूदेत आणि घेऊदेत आजीआजोबांची काळजी. ये बायो तू डोंबिवलीत, पनवेल इथून जवळ आहे, हवं तर तुला फार ट्रॅफिक नसलेला रस्ता दाखवते, बोरिवली किती लांब आहे. आईची काळजी घे तुझ्या आणि पनवेलला जाऊन येऊन कर.

बाय द वे हिंदीतला काल एक प्रोमो बघितला, सर्व घर तिथलया संजनाच्या नावावर झालंय. तिचं नाव नाही आठवत मला. इथेही पुढे असच होणार.

त्या आशूचा एकूण चेहरा बघा. कधी खस खसून धुत ला पण नसेल. अंघोळ सोडाच. केस विंचरलेले नाहीत. त्यात तो इल फिटिन्ग व विचित्र सूट आणि चसमा. परत बोअर पर्सनालिटी. तो फार लवकर फार जवळ यायचे प्रयत्न करून राह्यला आहे. इतके काय डेस्परेशन?! गोवा जाके आओ सेठ.

भाग ५१७:

हा पुढे व ती मागे अश्या ओळख गप्पा चालू आहेत. ही मागेच बसून आहे. मग एक सुरेख गाणे लावू का विचारतो तो तर ही खडूस पणे तुमची गाडी आहे म्हण ते. ती गाण्याची ओळ छानच आहे दुसर्ञा सुरेख आवाजात आहे. पण हा आरसा हलवून तिच्यावर फोकस करतो कारण ती चिंचेच्या गोळ्ञा खात आहे. हे फार क्रीपी आहे.

अन्या संजाना कार मधून येत आहेत तर आशू अरू कार मधून येउन पुढे जाउन थांबतात. गो क्युट चालू अहे. तर अन्या भडकतो व संजना टोचत आहे. तुम्ही अरु चे मित्र या कॉफी प्यायला. पण तो नाकारतो. यश गौरी येतात आशू तुमची बट्टी झाली का विचारतो. तर संजना अजून बोटे घालून फाड्ते. तो यश ला हपिसात बोलवतो.
आशूचा बॅक व्यु एकदमच फनी आहे. इल फिटिन्ग सूट. व पेंट. अरु घरात नाहीशी होईपरेन्त बघत राहतो. अरू औषधांची पिर्पिर करत आहे. म्हातारी विसरते वगैरे कौतूक चालू आहे.

अप्पाची उद्या ब्लड टेस्ट आहे. ती फार गडबडीत आहे.

पण अन्या आशुतो श बद्दल विचारतो. हे मुंबईत कोणी उशीर होणार असेल तर आणायला घरचे कोणी आले असते ना. विचारते आजी ही मुंबईतच राह्ते नां अन्या फुल ऑन पझेसिव्ह होत आहे. अभी पण ते केळकर एकदम घुसलेत घरात म्हणतो.
जुन्या मैत्री बद्दल डिस्कशन चालू आहे. व संजना हे स्बंध शो ऑफ कर त रहा सांगते. आजोबा अरू ला घरी पाठिवतात.

आशू घरी येउन सूट बदलून बहुतेक शावर घेउन सारेगामा कारवान वर एक गाणे लावतो. हा बिचा रा खरेच प्रेमात आहे. व त्या फेजेस मधून जात आहे. पण ते पाकीट आतून किती बदलले आहे ते त्याला अजून कळलेले नाही. हे गाणे पण छान व योग्य वापरले आहे. ती प्फारच बुजरी आहे. असे स्वगत आहे. तेव्हा बोललो असतो function at() { [native code] }अरा आज आपण दोघे एकत्र असतो.

माझी कसलीच अपेक्षा नाही. फक्त गाणे ऐकाअय्चे आहे व चेहरा बघायचा आहे. एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो ला बघत ह्याचे प्रेमळ स्वगत आहे.
आता हा अल्ब म येउन हिट होउन लवकर जाउदे. तोपरेन्त हा प्रेमळ एकतर्फी गाळ ऐक त बसावे लागेल.

कट टु हाउस अन्या चहा मागतो. तर विमल नाही. थर्मॉस मध्ये चहा ठेवला आहे. ब्लड साम्पल देताना म्हातारा घाबरलेला. आजी लगेच स्त्री कशी बा ळंत पण कर तात वगिअरे पीडा चालू आहे. अन्या संजना बाहेर चालले आहेत. यश पण बाहेर चालला आहे. केळकर बरोबर डील होत नाही. म्हणून इतर बिल्डर ला भेटायला चालू आहे.

अप्पा अन्याला काय इरेला पेटला आहेस म्हणतो. यश आला आहे. व अरू . घराचे कागद सोडवून आणले आहेत. आजी अप्पा आनंदित होतात
आणि अन्या संजना टेन्शन मध्ये होतात. आजी एकदम मंदिर मठ भेट अन्न दान. घर सुटले म्हणून एकदम ओव्हर जॉइड. अरु उसासे न टाकता
आजी अबांना सॉरी म्हणते.

इथे भाग संपला.
प्रोमो: आशू सारखा आलेला बरा दिसत नाही. आजी म्हणा तो. अभी पण आइचा मित्र आलेला बरा दिसत नाही म्हणतो तेव्हा त्याला ती फटकारते.

पण हा आरसा हलवून तिच्यावर फोकस करतो कारण ती चिंचेच्या गोळ्ञा खात आहेंं. >>>>>>>> इथे पुन्हा आउट ऑफ द कॅरेक्टर वागलीये अरु. एरवी आशूशी परक्यासारखी वागणारी त्याच्यासमोरच चिंचेच्या गोळया खातेय.

आशू घरी येउन सूट बदलून बहुतेक शावर घेउन सारेगामा कारवान वर एक गाणे लावतो. >>>>>>>> इथे बर्यापैकी हॅण्डसम दिसलाय. फ्रेमसुद्दा ओके वाटली.

भा ग ५१८:
सकाळ ची वेळ कालचे आर्गुमेंट चालू आहे. अरु अश्रुपात करत पेपर देते अप्पा ते सुरेक्षित ठेवतो. व कोणत्याही परिस्थितीत घर विकायचे नाही व पेपर वरचे नावही बदलणार नाही म्हनतो.

ही जायच्या आधी दही दूध पोहे म्हातार्‍यास दे णार आहे. ते पोहे भिजवायला जाते व यश आशूला भेटायला तयार व्हायला जातो.

आशूचे घर. : मित्र बेल वाजवून त्रास देउन बायकोने बनवलेले सामोसे आणून खादंति. व जनरल बकबक करंती.
आशू तिला मी सोडायला गेलेलो ते तिच्या नवृयाला आ वडलेले नाही तर तिला अवॉइड कर म्हणतो. म्युझिक स्कूल साठी गुरुकूल टाइप जागा हावी आहे.

कट टू आबा आजी: ही अजून ऑफिसला गेलेली नाही. अभीच्या लग्नाची चर्चा चालू आहे. डेट फिक्सिंग वगैरे.

इथे यश येतो व अभी यश मध्ये आर्गुमेंट होते. व सडनली ते आशू अरूला जास्त भाव देतो आहे व त्याची नजर खराब आहे. व तिच्या चारित्र्यावर संश ये घेतात. संजना व अन्या हिला नॉन एंटिटी म्हणून जबरी अपमान करतात. रोज रोज हे बकवास कोन ऐकून घेइल. ? मित्र बिल्डर आहे. एक फ्लॅट रेंट वर घेउन तिथे आई बरोबर राहता येइल. पण ही तसे करणार नाही?!

इथे अरु छानच आर्गुमेंट पेश करते जरूर ऐका. आशू बरोबर काम करायला अन्याचा मेन विरोध आहे. तो गलीज पणॅ व्यक्त होतो.
अन्याची गलिच्छ मानसिकता व्यक्त होते. हे सर्व मुळातुनच ऐका. मी पन आज रात्री परत बघणार आहे. व्हेरी वेल रिटन. अनेक घरातून बायका दुजोरा देतील असेच संवाद व अरूची उत्तरे आहेत.

संजना चा म्यांगो कलर ड्रेस एकदम डिझास्टर आहे. अगदी ठेवलेली बाई टाइपच दिसते गळ्ञा त मंगळसुत्र असलेfunction at() { [native code] }तरी. अन्याच्या पात्राकरवी सर्व गलिच्च्छ मतभेद व्यक्त केले आहेत.

प्रोमो: आता तर मी नक्कीच गाईन असा निर्धार अरू व्यक्त करते.

मी ही मालिका सुरुवातीपासून पाहिलेली नाही. अनिरुद्धला अपघात होऊन तो घरी परत आला तिथपासून पाहायला सुरुवात केली. त्यामुळे अनिरुद्ध संजनाचे प्रकरण कसे झाले हे माहीत नाही. पण आता अनिरुद्ध आशुतोषबद्दल बोलताना पुरुषांची परस्त्रीकडे पाहायची नजर इ. बोलत असेल तर ते त्यालाच लागू होते का ते अरुंधतीने ऐकवायला हवे. तिने एक्स सासूला ऐकवलेले आवडले.
आपला मुलगा एका विवाहित स्त्रीसोबत राहतोय , घटस्फोट झालेली सून आणि मुलाची दुसरी बायको एकाच घरात राहतात त्यावेळी कांचनला लोक काय म्हणतील हे प्रश्न पडले नव्हते का?

पाटकर बाईंची डायलॉग डिलिव्हरी भयंकर डोक्यात जाते.

संजनाला आशुतोष अरुंधती जवळ येण्याबद्दल काय वाटतं? आधी तिनेच कांचनचे कान फुंकले आणि दुसरीकडे आशुतोषकडून काम करून घ्यायचंय म्हणून जवळीक झाली तर हवीच आहे.

मी सुद्धा सु अरु घटस्फोट घेते तेव्हापासुन बघत्ये.

आजचे संवाद आवडले. अन्या चक्क मालकी हक्क असल्या सारखा वागतो अरु बरोबर. तो मोठा मुलगा पण तसलाच, आईचा मित्र नाही असू शकत म्हणे.

आज माझी टीनेज कन्यका म्हणे, संजनाने एवढ्या म्हातार्याशी लग्न कसं केलं :ड

संजनाने एवढ्या म्हातार्याशी लग्न कसं केलं :ड>> टोटली. मला कायम त्याच्या जवळ देशी तंबाखूचा वास येत असेल असेच वाट्ते. तो ही रुबाबदार नाही व आशू पण नाही.

चांगले सुनावते अरू.
पण सगळा वाद मी चांगली, निरपराधी, संस्कारी, निर्मळ मनाची, घरातल्यांशी एकनिष्ठ होते-आहे-राहणार हे पटवून देण्यासाठी वाटला.
आता तसे काही नाही आणि पुढे कधी तसे वाटले तरी मला बोलायचा अधिकार कोणाला नाही हे तिला सुचलेही नाही. नवरा सोडला तरी सासू-सासऱ्यांशी ती सूनेसारखीच वागते. त्यामुळे सासू तिला कायम तालावर नाचवणार.

अरू फक्त म्हणतेय 'मला माझं आयुष्य जगायचंय वगैैरे' पण प्रत्यक्षात आई-आप्पांचा नाष्ता, औषधं, चहा, जेवण यापलीकडे गाडी जातच नाही तिची. सतत त्या घरात पडीक कशाला रहायचं. संजना कधीकधी बोलते ते बरोबरच आहे. हिने सगळ्यांना स्वत:ची सवय लावून स्व त:वर अवलंबून रहायलाा भाग पाडलंय. दे की सोडून, जाऊदे ऊडत.
अनघाने खरंच पुन्हा विचार करावा. असला कोत्या मनाचा नवरा पदरी घेण्यापेक्षा एखादं कुत्र्याचं पिल्लू विकत घ्यावं. लॉयल असेल ते. स्वत: एका पोरीला मांडवात सोडून दुसरीशी लग्न करून येणारा हा ढब्या आईला मर्यादा शिकवणार.? अगदी अन्याचा पोर शोभतो.
इशा दिसत नाही कुठे, सोडली की काय सिरियल.?

थँक्स प्राजक्ता... तो रंग सध्या इन थिंग्स मध्ये आहे... पण अमा म्हणतात तसा ईल फिट असल्याने आणि आशु च्या रंगावर शोभून न दिसल्याने बरोबर वाटत नाहीये.....

आणि मी यु ट्युबर चं बोलणं ही ऐकलं...hahaha... भिशोन शुंदोर

अभिने आज परत एकदा, आई तू परत भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नकोस , अशी सुरुवात केली.
त्याला हे लोक त्याच्या औट घटकेच्या लग्नाची आठवण का करून देत नाही.

अनिरुद्धने पुरुषांची मोडस ऑपरा़ंडी सांगितल्यावर अरुंधतीने त्याला बरोबर पकडलं. पण पुरुषाचा तो हक्क असून स्त्रीनेच स्वतः:ला वाचवायचं असतं असं त्यांचं ठाम मत असावं.

आज यशने जाहीर केले की मी आ के ला भेटायला जातोय. नंतर अभिबरोबर वाद झाल्यावर परत आ केचं पूर्ण नाव घेऊन जाहिरात की मी त्यांना भेटायला जातोय. संवाद वाढावेत व अभिलाही त्याचे मौल्यवान विचार मांडायची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच. अनघा तर किती लोकांबरोबर काम करते, असे विचार असतील तर काही खरं नाही तिचं.
अरुंधतीने सांगायला हवे होते, माझा हात आता मोकळाच आहे, धरला कोणी येऊन आणि माझी हरकत नसेल तर तुम्हाला काय करायचंय. पण या बाईने ते सगळे दरवाजे बंदच करून टाकलेत.
रच्याकने, हिंदीमधील अनुपमाची आई म्हणजे माधवी गोगटे खरंच वारली का. मी काल ही बातमी वाचली.

भाग ५१९: कालचेच आर्गुमेंट परत पुढे चालू आहे. तिचा मोनोलॉग खतम करून मग संजना काहीतरी बोट दाखवून बोलायला बघते पण अरु हात पुढे करून तिला गप्प करते. हात म्ह न जे काँग्रेस आय वाला हात.

अन्या संजना चिड चिड करत आहेत. अरु विरुद्ध. अन्या एकदम फुल ऑन जेलस व पझेसिव. बरोबरीन आशू देविकाचे एकं दरीत अरू तिचे गाणे ह्याचे सिक परत परत विश्लेषण चालू आहे. देविका फुकट जास्त बोलत आहे. अरु ने आता पुढे गेलं पाहिजे. ह्या ध्येयाने हा माणूस पेटलेला दिसतो.

हे सर्व घराचे दार उघ्डे ठेवुन चालू आहे. किंवा पेंट हाउस असेल. देविका त्याला तिची सिचुएशन समजावुन सांगत आहे.

आता हेच परत परत यश व अप्पा डिस्क्शन. आई ग्रेट. आशु ग्रेट आई चांगली गाते. मदत केली तर काय बिघडले.

भाउ तोरसे कर कसे काहीही मुद्दा नसला तरी एका व्हिडीओत पंधरा वीस वेळा पंप्र चे नाव घेतात. त्यामुळे ब्रँडिन्ग घट्ट होते तसे यश व लेखक
सारखे आशु केळकर चे नाव घेउन खुंटा बळकट करत आहे. अप्पा उशीरा शिकला आहे. व यश वैताग व्यक्त करत आहे पण तो गौरीला
कसे वागव तो ते बघितले पाहिजे

अन्या व आई प्रेम ळ सीन. हा आईचे पाय चेपत अरु विरुद्ध कान भरत आहे.

प्रोमो मध्ये: अभीच्या लग्नाची तयारी पण अरू ला विचारून करा असे अन्या उपहासाने म्हणत आहे. तिला वेळ नसेल कदाचित. तर अरु आलेलीच आहे. आणी कमाfunction at() { [native code] } वते पण कसल्या पच्चार साड्या नेसते. निदान प्रिंटेड सिल्क!!!

तर तुम्हीच करा सगळी तया री म्हणते बाई. अन्या शॉक्ड

यश आशुतोषचं संगीतातलं काम पाहून इम्प्रेस्ड आहे. त्याने आपल्याला बोलवावं याचा त्याला आनंद होणं साहजिक आहे. त्याच्यात आणि अभिषेकमध्ये ठिणगी पाडायला तो संवाद हवा होता. पण एकदाच घेतला असता तरी चाललं असतं.

अभिषेकच्या आईने माझ्याकडे मदत का नाही मागितलीचं उत्तर - तू तुझ्या बापासारखाच बेभरवशी आहेस ; मदत करायला कुठून झेपणार होतं असं सुनवायला हवं होतं.

अभिषेक भूलतज्ज्ञ आहे . म्हणजे जिथे ऑपरेशन असेल तिथे याची गरज असेल. मग तो फ्रीलान्स असायला हवा. लहानशा गायनॅक क्लिनिकमध्ये अशी कितीशी ऑपरेशन्स रोज होणार?

<पण या बाईने ते सगळे दरवाजे बंदच करून टाकलेत.>
बरोबर आहे तिचं. तिने काल सांगितले ना की २५ वर्षांच्या संसारात एवढी मोठी फसवणूक झाल्यावर पुन्हा लग्नाचा विचार कसा करेल. शिवाय घटस्फोट अजून फार जुना झालेला नाही आणि आशुतोषशी तीनचारच भेटी झाल्यात.

अरुला हे सगळ एकायला लागतय कारण घटस्फोट घेवुनही तिच्या आयुष्यात तिने काडिचाही बदल केलेला नाहिये, पहिले तर तिने तिथे कुठल्याही कारणाने राहण हेच चुक आहे, तिनही मुल काही कुक्कले बाळ नाहित ते त्याचि काळजी व्यवस्थित घेवु शकतात,साबा-साबुची जबाबदारी अन्या-विशाखा-अविची जास्त आहे आणी अगदी काहि बेडरिडिन नाहियेत,चान्गले हिन्डतायत फिरतायत. घटस्फोट घेताना पोटगीही मागायला हवि होती.
म्हणजे अन्याला कळल असत.

हो. पण हे असं नसतं तरी प्रश्न आलेच असते. तिथे असल्यामुळे डायरेक्ट आले.
तिने लांब जायला हवं हे अगदीच लॉजिकल आहे. पण मग लेखक मंडळींना कौटुंबिक जिव्हाळा आणि वादांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. एवढा ताण त्यांच्या मेंदूला झेपायचा नाही. प्रेक्षक धरून ठेवायलाही हेच लागत असेल.

आई कुठे काय करते याचं उत्तर कुटुंबातल्या सगळ्यांचं सगळं करते हे ठरूनच मालिका बेतली आहे.

महत्वाचे म्हणजे लग्न संपले घटस्फोट झाला. आता जा असे ऐकून पण झाले. ह्या नंतर जे काही दिवस रिकामे मोकळे जायला हवेत. सहा महिने function at() { [native code] } काम केले पगार जमा झाला. थोडा सेव्ह केला रोज दमुन घरी येउन झोपले असे झालेच नाही. पहिला मॅन जायच्या आधीच दुसरी चांगली ऑप्शन लगेच उभी आहे. व अवेळी वेळी जायचे कामासाठी तर यश बरोबरच असणार आहे. म्हणजे एकटे जगण्ञा तली भीती/ रिते पण दु:ख पार्ट नर नसण्यातला एकटे पणा ह्यातुन अनेक एकट्या स्त्रिया जात असतात. पगारी व्यवस्थित असले तरी इतर बरेच प्रश्न अस्तात. तब्येत खाली जाउ शकते. शेजारी त्रास देतात. महिला कलीग पण भयानक त्रास देउ शकतात. गॉसिप पण फैलावू शकतात जी पूर्ण खोटी असते. नाव चारित्र्य खराब होउ शकते. हे त्रास ह्या बायकांनी अरु अनुपमा ह्यांनी सहन केलेच नाही.त . एकटे राहण्यत प्रचंड सूख पण आहे पण तिथे पोचायला आधी बर्‍याच दु:खद अनुभवांतून जावे लागते.

तिथे अनुपमा मध्ये पण जाम विनोदी झाले. सासरा तिच्या डोक्यात घालतो की अनुज बरोबर रोमांटिक फीलिन्ग डोक्यात आण. तू राधा तर तो कान्हा आहे . तिच्या डोक्यात ट्युब लाइट पेटेपरेन्त लगेच एक राधा क्रिश नाचे मोबाईल गाडी मंदीर रस्त्यात येते. हा सीन फार क्यु ट गाडी बनवली आहे. व्गैरे व लगेच तिला दिल तो पागल है मधले गाणे मागे लागते. अरे एक रिलेशन शिप तुटायच्या आधीच ह्यांचे स्त्रीत्व दुसर्‍या बाप्याच्या गळ्ञा त बांधायचे हा काय function at() { [native code] } अट्टहास?! यु कॅन चेक एंड सी व्हॉट इज अवेलेबल. व्हेदर यु वाँट अ मँन ऑर नॉट. एक दोन कॅजुअल रिलेशन शिप हे ते आपण करू शकतो हे तर अशक्यच.

पण असे दाखवले तर बघणार्‍या काकवांना चक्कर येइल.

Pages