मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162
सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....
हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/
ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year
मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.
कुछ है जुनून सा
कुछ है जुनून सा
कुछ पागलपन है
सौ बाते करता ये बुद्धू सामन ( सा मन) है।
वॉव मानव बरोबर वाटतंय. हे
वॉव मानव बरोबर वाटतंय. हे गाणं मला माहित नव्हतं.
मानव, आक्षी बरुबर!
मानव, आक्षी बरुबर!
8/33
हातीमताई निघाला होता कामगिरीवर तिसरा की चौथा प्रश्न सोडवण्याच्या. सात पर्वत, सात अरण्यं, सात दऱ्या त्यानं पार केल्या आणि तो त्या किरमिजी पाणी असलेल्या तळ्याकाठी येऊन पोचला. तिथं एकच केऑस होता नुसता. खूप लोक गडबडा वाळूत लोळत, छाती पिटुन घेत 'एक बार देखा है, फिरसे देखने की तमन्ना है' असं म्हणत होते. काही लोक सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसले होते. हातीम तहान लागली म्हणून तळ्यापाशी गेला तर एक मासा त्याच्या चाहुलीने बाहेर येउन मनुष्यवाणीने म्हणाला 'कोण बाबा तू? सुरक्षित राहायचं असेल तर सूर्यास्त होण्याआधी इथून निघून जा कसा...' हातीमला नवल वाटलं. त्याने त्या जागेची हकीकत त्याला विचारली. मासा सांगू लागला. या तळ्यात एक जादूगार राजकुमारी राहते. तिचं आमच्या राजकुमारावर प्रेम बसलं पण राजकुमाराने तिला नाकारलं. त्याला पाण्यात राहणाऱ्या बाईशी लग्न करायचं नव्हतं, त्याला आवडत नसे ओलं व्हायला. त्यामुळे चिडून तिने आमच्या राज्याला शाप दिला की सगळं राज्य एक मोठं तळं बनेल आणि सगळे प्रजाजन मासे. 'ज्या पाण्यात राहायला तुला आवडत नव्हतं त्याच पाण्याशिवाय तुला जगता येणार नाही' असं ती राजकुमाराला म्हटली. तसंच झालं. शिवाय या तळ्यापाशी जे प्रवासी येतात त्यांनाही ती भुलवते, तिच्या जलमहालात घेऊन जाते आणि नंतर त्यांना ते काहीच पुन्हा दिसत नाही. ते वेडे होतात आणि इथेच बसून राहतात. रोज संध्याकाळी तिचा फेरा असतो बाबा तळ्याकाठी....' मासा बोलतच सुटला होता. खूप दिवसांनी त्याला कुणीतरी मनुष्य बोलायला मिळाला होता. तेवढ्यात तळ्याच्या पृष्ठभागावर हालचाल झाली आणि तेजस्वी प्रकाश दिसू लागला. ही तीच राजकुमारी हे हतीमने ओळखलं आणि तो पटकन लपायला जागा शोधू लागला. मासा मात्र बोलतच सुटला होता. थांबायचं नावच घेत नव्हता. 'अरे वेड्या गप की! तिला इथे कुणीतरी नवीन माणूस आल्याचा सुगावा लागेल ना!' अशी हतीमने त्याला परोपरीने विनंती केली पण माशाने बोलणं थांबवायचं चिन्ह दिसत नव्हतं. हातीम तेव्हा काय गाणं म्हणेल?
(एवढ्याश्या गाण्यासाठी केवढी ती स्टोरी! घ्या वाचून आता काय!)
उत्तर -
कुछ है जुनून सा
कुछ पागलपन है
सौ बाते करता ये बुद्धू सामन ( सा मन) है।
(मानव पृथ्वीकर)
सामन मासा ओळखल्याबद्दल मामीला खास बक्षीस - स्मोकड सामन.
मामी, तसं नवीन आहे गाणं. कपूर
मामी, तसं नवीन आहे गाणं. कपूर अँड सन्स मधलं.
कारवी
कारवी
मामीचं पण नाव लिहा, सामन
मामीचं पण नाव लिहा, सामन ओळखल्यामुळे आलं, नाही तर नसतं आलं.
सामन मासा ओळखल्याबद्दल मामीला
सामन मासा ओळखल्याबद्दल मामीला खास बक्षीस - स्मोकड सामन. >>> Thank you Shraddha. I LOVE smoked salmon.
८/३४
८/३४
कोणत्याही टीनएजर मुलामुलींच्या घोळक्यात जसं ख्या ख्या ख्खी ख्खी सुरू असतं तसंच या घोळक्यातही सुरू होतं. हो! उवा असल्या म्हणून काय झालं त्यांना का मन नाही ? त्यांना का भावना नाहीत? आताही एकजण खुसपुसत आपल्या मित्रमैत्रीणींना मनीचं गूज सांगत होती .... " अरे ऐका ना, काल आपल्या डोक्याची मालकीण शाळेत गेली तेव्हा बहुतेक तो उडून आला आपल्या कॉलनीत आणि काय सांगू .. त्याची आणि माझी नजरानजर झाली आणि बस! जो होना था वो हो गया... मेरा दिल खो गया. काय सांगू कित्ती हँडसम आहे तो. वेगळाच आहे इतरांपेक्षा. आपल्यासारखे खुरटे पंख नाहीत त्याचे. असे भले मोठ्ठे सोनेरी पंख आहेत. एकदम रॉयल दिसतो तो."
"अच्छा! त्या तुझ्या हँडसम पंखांच्या हँडसम हंकला माहित आहे का की इधर कोई घायल हो गयी है?" एका मैत्रीणीनं विचारलं.
" मला तरी वाटतंय त्याला कळलंय नक्कीच पण दाखवत नाहीये कळल्याचं." किंचित निराशेनं ती म्हणाली.
"म्हणजे हे असं आहे तर...." असं म्हणून एका मित्रानं एक गाणं सुरू केलं..........
( गाण्याची दुसरी ओळ, जी प्रत्येक कडव्यानंतर येते)
मला या कोड्याबाबत देजावु
मला या कोड्याबाबत देजावु फीलिंग का येतंय?
जुस्तजू जिसकी थी, उसको न पाया
जुस्तजू जिसकी थी, उसको तो न पाया हमने?
नाही हपा. तसंही तुम्ही
उनसे मिली नजर के मेरे होश उड
उनसे मिली नजर के मेरे होश उड गये?
नाही मेघना.
नाही मेघना.
उ लाला उ लाला तू है मेरी
उ लाला उ लाला तू है मेरी फॅन्टसी?
नाही.
नाही.
क्लु 1: 95% उत्तराचं भाषांतर कोड्यातील एका संवादात आलं आहे.
क्लु 2: हे भाषांतर आणि त्या हँडसम हंकचं वैशिष्ट्य असं दोन्ही एकत्र केलं की लगेच उत्तर मिळेल.
कल्यु 3: त्या गाण्याची आठवण काढायची तर हीच ओळ बोलली जाते. हीच ओळ जास्त फेमस आहे.
जानेमन सिनेमातलं गाणं का?
जानेमन सिनेमातलं गाणं का?
जाने के जाने ना
माने के माने ना..
जाने जमाना 'पर' पिया ही जाने ना..
(त्याचे वैशिष्ट्य - पर)
नाही श्र. पण तू वैशिष्ट्य
नाही श्र. पण तू वैशिष्ट्य 'पर'फेक्ट शोधलं आहेस.
अजून एक क्ल्यु देऊन एकदम
अजून एक क्ल्यु देऊन एकदम सोप्पं करते.
क्ल्यु ४ : आ + आगगाडी + कृष्णधवल + र + लेकी बोले सुने लागे
हाय हाय... हे तर ऑटाफे गाणं..
हाय हाय... हे तर ऑटाफे गाणं.. लग्गेच कळलं. लिहू का?
पण ते गाणं पहिल्या ओळीनेच ओळखलं जातं ना गं मामी?
जाऊ द्या तसाही उशीर झालाय.
जाऊ द्या तसाही उशीर झालाय. लिहूनच टाकते.
(अपनी तो हर आह एक तूफान है)
'उ परवाला' जान के अंजान है..
बरोबर श्र.
बरोबर श्र.
८/३४
कोणत्याही टीनएजर मुलामुलींच्या घोळक्यात जसं ख्या ख्या ख्खी ख्खी सुरू असतं तसंच या घोळक्यातही सुरू होतं. हो! उवा असल्या म्हणून काय झालं त्यांना का मन नाही ? त्यांना का भावना नाहीत? आताही एकजण खुसपुसत आपल्या मित्रमैत्रीणींना मनीचं गूज सांगत होती .... " अरे ऐका ना, काल आपल्या डोक्याची मालकीण शाळेत गेली तेव्हा बहुतेक तो उडून आला आपल्या कॉलनीत आणि काय सांगू .. त्याची आणि माझी नजरानजर झाली आणि बस! जो होना था वो हो गया... मेरा दिल खो गया. काय सांगू कित्ती हँडसम आहे तो. वेगळाच आहे इतरांपेक्षा. आपल्यासारखे खुरटे पंख नाहीत त्याचे. असे भले मोठ्ठे सोनेरी पंख आहेत. एकदम रॉयल दिसतो तो."
"अच्छा! त्या तुझ्या हँडसम पंखांच्या हँडसम हंकला माहित आहे का की इधर कोई घायल हो गयी है?" एका मैत्रीणीनं विचारलं.
" मला तरी वाटतंय त्याला कळलंय नक्कीच पण दाखवत नाहीये कळल्याचं." किंचित निराशेनं ती म्हणाली.
"म्हणजे हे असं आहे तर...." असं म्हणून एका मित्रानं एक गाणं सुरू केलं..........
( गाण्याची दुसरी ओळ, जी प्रत्येक कडव्यानंतर येते)
उत्तर (श्रद्धा)
ऊ परवाला (पंखवाला ऊ) जानकर अंजान है
अरे बाप रे! भारीच
अरे बाप रे! भारीच
मध्येच तिच्या आईचं लक्ष वहिदा
मध्येच वहिदा रेहमानच्या आईचं लक्ष तिच्याकडे गेल्यावर ती हाताने 'मी नव्हे, तो उपरवाला' अशी खूण करते तेव्हा किती गोड दिसते. आणि ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातला देव आनंद! :TotalLou:
८/३५ (धोक्याची सूचना - कमजोर
८/३५ (धोक्याची सूचना - कमजोर दिल वाले क्रीप्या ना पढे)
एकदा आलोक (नाथ?) आणि नयन (मोंगिया?) त्यांच्या इमारतीच्या खाली अंगणात खेळत असतात. तेवढ्यात शॉर्टसर्किटमुळे तळमजल्यावरचे दिवे जातात. आलोक अचानक त्याचा डोळा बाहेर काढून हातात घेतो आणि कॅच-कॅच खेळायला लागतो. नयन म्हणतो की अरे हे काय चालवलं आहेस? तर आलोक म्हणतो की काही नाही, वरच्या मजल्यावर दिवे आहेत का बघतोय.
तेवढ्याने होत नाही. मग आलोक त्याचा डोळा हातात घेऊन कणकेप्रमाणे मळतो आणि त्याला दंडाकृती आकार देतो. त्यानंतर त्या दंडाच्या दोन्ही बाजू निमुळत्या करून तो दंड मध्ये वाकवून त्याला बूमरँगचा आकार देतो, आणि म्हणतो की आता हा मला आणखी उंच फेकता येईल आणि छत्तीसाव्या मजल्यावर दिवे आहेत की गेलेत हे पाहता येईल.
नयन आपल्या डोळ्यावर, आपलं ते, डोक्यावर हात मारून घेतो आणि म्हणतो की, 'अरे मूर्खा, तुझा डोळा ह्या अंधारात इकडे तिकडे हरवेल ना! त्यापेक्षा मी स्वतः वरती जातो आणि कुठे दिवे आहेत का ते पाहतो.'
तर त्यावर आलोक त्याला एका गाण्यात उत्तर देतो. ते गाणं ओळखा.
माझी उत्तर नेहमी चुकतात तरी
माझी उत्तर नेहमी चुकतात
तरी पण
जाईये आप कहा जायेंगे, ये नझर लौट के फिर आयेगी
और ये लगा सिक्सर! बरोबर उत्तर
और ये लगा सिक्सर! बरोबर उत्तर ए_श्रद्धा
और ये लगा सिक्सर! बरोबर उत्तर
८/३५ (धोक्याची सूचना - कमजोर दिल वाले क्रीप्या ना पढे)
एकदा आलोक (नाथ?) आणि नयन (मोंगिया?) त्यांच्या इमारतीच्या खाली अंगणात खेळत असतात. तेवढ्यात शॉर्टसर्किटमुळे तळमजल्यावरचे दिवे जातात. आलोक अचानक त्याचा डोळा बाहेर काढून हातात घेतो आणि कॅच-कॅच खेळायला लागतो. नयन म्हणतो की अरे हे काय चालवलं आहेस? तर आलोक म्हणतो की काही नाही, वरच्या मजल्यावर दिवे आहेत का बघतोय.
तेवढ्याने होत नाही. मग आलोक त्याचा डोळा हातात घेऊन कणकेप्रमाणे मळतो आणि त्याला दंडाकृती आकार देतो. त्यानंतर त्या दंडाच्या दोन्ही बाजू निमुळत्या करून तो दंड मध्ये वाकवून त्याला बूमरँगचा आकार देतो, आणि म्हणतो की आता हा मला आणखी उंच फेकता येईल आणि छत्तीसाव्या मजल्यावर दिवे आहेत की गेलेत हे पाहता येईल.
नयन आपल्या डोळ्यावर, आपलं ते, डोक्यावर हात मारून घेतो आणि म्हणतो की, 'अरे मूर्खा, तुझा डोळा ह्या अंधारात इकडे तिकडे हरवेल ना! त्यापेक्षा मी स्वतः वरती जातो आणि कुठे दिवे आहेत का ते पाहतो.'
तर त्यावर आलोक त्याला एका गाण्यात उत्तर देतो. ते गाणं ओळखा.
बरोबर उत्तर (ए_श्रद्धा)
जाइये आप कहा जाएंगे,
ये नजर लौट के फिर आएगी
८/३६
८/३६
जगातल्या विविध देशांतील माशांची स्पर्धा भरलेली असते - Fishes' Got Talent. अनेक फेर्या पार पडतात आणि होता होता शेवटच्या फायनलला दोन जपानी मासे समोरासमोर येतात. एक नदीत राहणारा आणि एक समुद्रात. राहणारा इतकाच काय तो फरक. दोघेही आपापली कला सादर करतात. आता ज्याची कला प्रेक्षकांना आणि जजेसना जास्त entertaining वाटेल तो मासा जिंकणार!
जजेस मार्कं देतात आणि मुख्य जज नदीतल्या जपानी माशाला विजेता म्हणून घोषित करतात. पत्रकार त्यांना जेव्हा प्रश्न विचारतात की "असं काय कारण की समुद्रातल्या माशाला स्पर्धा जिंकता आली नाही?" तेव्हा ते जज म्हणतात " त्याचं कारण असं की ....... " कोणतं गाणं म्हणून त्यांनी हे कारण सांगितलं असेल.
समंदर मे नहाके और भी नमकीन हो
समंदर मे नहाके और भी नमकीन हो गई हो (खारट झाली)
नाही.
नाही.
Pages