मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162
सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....
हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/
ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year
मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.
८/४०
८/४०
संध्याकाळच्यावेळी दोघी मैत्रीणी गावाबाहेर नदीच्या पाण्यात पाय टाकून गप्पा करत होत्या.
"काय गं विद्या, एरवी डोक्यावर पदर घेऊन फिरतेस पाटलाची पोरगी म्हणून पण काल आमराईत डोक्यावरचा पदर विसरून कोणाशी हसत खिदळत होतीस? अंधार पडला होता म्हणून कळलं नाही नक्की कोण होता. सांग की. तुझ्याबरोबर काल आपल्या गावातल्या ग्रोसरी शॉपचा तरूण मालक अनिल होता की तो तुझ्यापाठी गोंडा घोळणारा माने होता? कोणाशी गुलुगुलु गप्पा करत होतीस?"
विद्या लाजली अन मग सूचकपणे एका गाण्यातून तिनं आपलं गुपित आपल्या सखीला सांगितलं .....
दिल दिवाना बिन सजना के माने
दिल दिवाना बिन सजना के माने ना?
बलमा माने ना ??
बलमा माने ना ??
नाही वावे आणि झिलमिल.
नाही वावे आणि झिलमिल.
क्ल्यु १: वावे आणि झिलमिल नं सुचवलेल्या गाण्यातलं आडनाव आहेच पण दुसरं नावही सूचकपणे येतं त्या गाण्यात - त्या नावाच्या व्यक्तीच्या प्रोफेशनसकट.
क्ल्यु २ : हे वर लिहिलंय ते वावेच्या गाण्यात साधारण आलं आहे. त्या वाटेनं जरा पुढे जा की सापडेल.
पवन दीवानी न माने उडाए मोरा
पवन दीवानी न माने उडाए मोरा घुंघटा
विद्या डॉक्टर होती ना?
वावे, बरोबर वाटतय...
वावे, बरोबर वाटतय...
परफेक्ट वावे.
परफेक्ट वावे.
८/४०
संध्याकाळच्यावेळी दोघी मैत्रीणी गावाबाहेर नदीच्या पाण्यात पाय टाकून गप्पा करत होत्या.
"काय गं विद्या, एरवी डोक्यावर पदर घेऊन फिरतेस पाटलाची पोरगी म्हणून पण काल आमराईत डोक्यावरचा पदर विसरून कोणाशी हसत खिदळत होतीस? अंधार पडला होता म्हणून कळलं नाही नक्की कोण होता. सांग की. तुझ्याबरोबर काल आपल्या गावातल्या ग्रोसरी शॉपचा तरूण मालक अनिल होता की तो तुझ्यापाठी गोंडा घोळणारा माने होता? कोणाशी गुलुगुलु गप्पा करत होतीस?"
विद्या लाजली अन मग सूचकपणे एका गाण्यातून तिनं आपलं गुपित आपल्या सखीला सांगितलं .....
उत्तर : (वावे)
पवन (अनिल)-the( उच्चार दि)- वाणी/नी (ग्रोसरी शॉपचा मालक अनिल = पवन the वाणी/नी)
ना माने (माने नाही)
उडाये मोरा घुंघटा
आणि मला इथे काही येत नाही
सेम हिअर सी.
सेम हिअर सी..मी पण नेहमी येते हिथं,चुकून माकून एखादं उत्तर देता येईल या आशेने.

पण उत्तराची उकल बघून माझी पण हिच अवस्था होते.
सी, मृणाली ... बुद्धीच्या
सी, मृणाली ... बुद्धीच्या कॅमेरात सातत्याचा रोल भरून प्रयत्नांचे बटण दाबल्यास यशाचे चित्र दूर नाही.
८/४१
८/४१
गडगंज श्रीमंत असलेले आबासाहेब आता मृत्युशय्येवर होते. आपण यातून काही वाचत नाही याची त्यांना खात्री होती. आयुष्यभर चिकार संपत्ती गोळा केली होती त्यांनी. त्यांचा मुलगाही आधीच वारल्यामुळे केवळ त्याची बायको आणि त्याचा लहानगा पोरगा हेच आबासाहेबांचे नातेवाईक उरले होते. सर्व संपत्ती त्यांनाच मिळणार होती. या संपत्तीचा एक मोठा हिस्सा त्यांनी दुसर्या देशातील एका शहरात ठेवला होता. आबासाहेबांना वयापरत्वे याचे विस्मरण झाले होते.
त्यांची सून आबासाहेबांना आवडणार्या फळाचा रस त्यांच्यासाठी घेऊन आली आणि अचानक आबासाहेबांना या संपत्तीची आठवण झाली. त्यांनी गाणं म्हणून तिला त्याबद्दल इन्स्ट्रक्शन्स दिल्या .....
८/४१ -
८/४१ -
त्यांचं आवडतं फळ पेरू असणार. पेरूची राजधानी लिमा.. सुने, लिमा शहरात जा. (संपत्ती ताब्यात घ्यायला.)
सून सुन सुन जा लिमा..
बरोबर श्र. माचुपिचु हा
बरोबर श्र. माचुपिचु हा तुझ्या अत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय असल्यानं हे उत्तर तुला येणारच याची खात्री होतीच. आज हिरवं वस्त्र नेसून हरणाच्या मांसाचा नैवेद्य दाखव माचुपिचुच्या देवाला.
८/४१
गडगंज श्रीमंत असलेले आबासाहेब आता मृत्युशय्येवर होते. आपण यातून काही वाचत नाही याची त्यांना खात्री होती. आयुष्यभर चिकार संपत्ती गोळा केली होती त्यांनी. त्यांचा मुलगाही आधीच वारल्यामुळे केवळ त्याची बायको आणि त्याचा लहानगा पोरगा हेच आबासाहेबांचे नातेवाईक उरले होते. सर्व संपत्ती त्यांनाच मिळणार होती. या संपत्तीचा एक मोठा हिस्सा त्यांनी दुसर्या देशातील एका शहरात ठेवला होता. आबासाहेबांना वयापरत्वे याचे विस्मरण झाले होते.
त्यांची सून आबासाहेबांना आवडणार्या फळाचा रस त्यांच्यासाठी घेऊन आली आणि अचानक आबासाहेबांना या संपत्तीची आठवण झाली. त्यांनी गाणं म्हणून तिला त्याबद्दल इन्स्ट्रक्शन्स दिल्या .....
उत्तर : ( श्रद्धा)
सून सुन सुन जा लिमा
आबासाहेबांचं आवडतं फळ पेरू. पेरूची राजधानी लिमा.. सुने, लिमा शहरात जा. (संपत्ती ताब्यात घ्यायला.)
हायला .. धागा वर आणला मी...
हायला .. धागा वर आणला मी... सोर्री मामी नेक्स्ट टाईम उत्तर फॉरमॅट मध्ये लिहेन...
मामी, भन्नाट कोडी!
मामी, भन्नाट कोडी!
आया है, पवन दीवानी ना माने,
आया है, पवन दीवानी ना माने, जा लिमा तिन्ही भारी
८/४२ -
८/४२ -
चंद्रकांता मालिका माहीत असेल सगळ्यांना. त्यात एकदा कुंवर वीरेंद्र विक्रम सिंगला चंद्रकांताच्या राज्याच्या सैनिकांनी कैद केलं. तो चंद्रकांताला भेटायचं म्हणून काहीही सैन्य, कुमक न घेता एकटाच लपूनछपून गेला होता. पण कसं कोण जाणे, त्यांच्या या गुप्त भेटीची माहिती कळलीच शत्रुसैन्याला. फारच धोकादायक परिस्थिती. पण नशिबाने कुंवर वीरेंद्रसोबत त्याचा जांबाज नावाचा विश्वासू मित्र होता. त्याने स्वतःला अवगत असलेली रूप बदलण्याची कला वापरली, इतर काही जादू केली, तो लीलया शंभर सैनिकांशी एकटा लढला, काहीतरी चूर्ण हवेत फेकून त्याने धूर निर्माण केला आणि शेवटी कुंवर वीरेंद्रला घेऊन तिथून सहीसलामत निसटला. कुंवरला आपल्या मित्राबद्दल अतिशय अभिमान वाटला आणि त्याच्या मैत्रीची महती त्याला पुन्हा एकदा ठळकपणे जाणवली. वीरेंद्रने जांबाजला उद्देशून कोणते गाणे म्हटले?
किंतु परंतु?
किंतु परंतु?
ते 'छोड के सारे किंतु परंतु'
ते 'छोड के सारे किंतु परंतु' गाणं? ते नाही बरोबर उत्तर.
हो तेच म्हणायचं होतं मला,
हो तेच म्हणायचं होतं मला, त्यात मै अल्लादिन, तू मेरा जीन वगैरे आहे.. पण अर्थात एवढं सोपं नसेल.
उलट अगदीच सोपं आहे.
उलट अगदीच सोपं आहे. चंद्रकांतामधली टर्मिनॉलॉजी माहीत असेल तर.
नाही बघितली.
नाही बघितली.
चंद्रकांता मालिका पाहिलेली
चंद्रकांता मालिका पाहिलेली नाही.
मालिका पाहिलेली नसेल तरी
मालिका पाहिलेली नसेल तरी चालेल. ऑनलाइन सापडेल माहिती. गाण्यात एका शब्दावर शब्दच्छल आहे पण मूळ शब्द वापरला तरी गाणं फिट्ट बसतं कोड्यातल्या सिच्युएशनला.
ओके.
ओके.
याकू आहे का काही????
याकू आहे का काही????
नाही सीमंतिनी.
नाही सीमंतिनी.
मूळ गाणं एका स्त्रीला
मूळ गाणं एका स्त्रीला उद्देशून आहे का?
मैने पूछा चांद (चंद्रकांता)
मैने पूछा चांद (चंद्रकांता) से के देखा है कही
मेरे यार 'साहसी' ???
हे नसेल पण तुक्का मारलाय.
चंद्रकांता - एयार - गुप्तहेर
चंद्रकांता - एयार - गुप्तहेर
हर किसी को नही मिलता, यहा प (ए) यार जिंदगी मैं?
चित्रपट - janbaz
Pages