..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करेक्ट झिलमिल.

८/३६
जगातल्या विविध देशांतील माशांची स्पर्धा भरलेली असते - Fishes' Got Talent. अनेक फेर्‍या पार पडतात आणि होता होता शेवटच्या फायनलला दोन जपानी मासे समोरासमोर येतात. एक नदीत राहणारा आणि एक समुद्रात. राहणारा इतकाच काय तो फरक. दोघेही आपापली कला सादर करतात. आता ज्याची कला प्रेक्षकांना आणि जजेसना जास्त entertaining वाटेल तो मासा जिंकणार!

जजेस मार्कं देतात आणि मुख्य जज नदीतल्या जपानी माशाला विजेता म्हणून घोषित करतात. पत्रकार त्यांना जेव्हा प्रश्न विचारतात की "असं काय कारण की समुद्रातल्या माशाला स्पर्धा जिंकता आली नाही?" तेव्हा ते जज म्हणतात " त्याचं कारण असं की ....... " कोणतं गाणं म्हणून त्यांनी हे कारण सांगितलं असेल.

उत्तर (झिलमिल)

कोयी सागर ( समुद्रातला जपानी मासा) दिल को बहलाता नही

एक सोपं.
८/३७
एका शहरात एक मध्यवर्ती मार्केट होतं. मार्केट जरी असलं, तरी तिथे आजूबाजूला घरंही होतीच. सकाळच्या वेळी दुकानं उघडण्यापूर्वी रस्त्यावर वर्दळ नसायची. त्यामुळे तिथे कचऱ्याची मोठी गाडी उभी करायचे आणि सगळीकडून येणाऱ्या लहान लहान घंटागाड्यांमधला कचरा एकत्र करायचे. हे सगळं होईपर्यंत तिथे कचऱ्याचा वास भरून रहायचा. तिथले रहिवासी नेहमी याबद्दल नगरपालिकेकडे तक्रार करायचे. हे सगळ्यांना सवयीचं झालं होतं. अशाच एका सकाळी एका रहिवाशाने पालिकेला फोन केला आणि चेंज म्हणून हे गाणं म्हटलं!

बंगलोरचं तिप्पसंद्रा मार्केट डोळ्यांसमोर उभंच राहिलं. सकाळी सकाळी ती कचर्‍याची गाडी येणार म्हणून लोक चक्क रस्त्यावर सगळा कचरा ओतून ठेवतात. ती गाडी येण्यापूर्वी गाई-गुरं, कुत्री त्या कचर्‍यात शिरून त्याचं डिसेक्शन करत सगळ्या रस्त्यावर तो पसरवतात. त्यातच सकाळी उघडणारे चहा आणि ज्यूसचे ठेले एकेक पेला पेय त्या रस्त्यावर शकुन म्हणून ओततात. मी एकदा चिडून बृ बें महानगरपालिकेत फोन करून हे गाणं म्हणणार होतो - 'कचरे के डिब्बे मे तुझको बिठाकर, ऊपरसे प्लास्टिक का ढक्कन ....' (सगळ्यांना माहिती असेलच). असो. वरच्या कोड्याचं उत्तर हे नाही, ठाऊक आहे. विचार करून सांगतो.

वावे -
नाली मे फेंकोगे कचरा तो देखोगे
नाली हो गयी है जाम बंद हुआ सारा काम
फैली है दुर्गंध बदबू से नाक बंद
मच्छर भी पनपेंगे फिर हमको काटेंगे
और फिर मलेरिया घर घर बाटेंगे
गाडीवाला आया घर से कचरा निकाल...

मी कचर्‍याशी किंवा वासाशी संबंधित गाणी आठवत होतो पण अवघड दिसते Happy

"ये पहले प्यार की खुशबू, मेरी साँसोसे शायद आ रहीं है..." वगैरे एखदा चँडलरी सरकॅजम असू शकेल पण शक्यता कमी वाटते.

तेरे बिन वगैरे काही आहे का त्यात? डस्ट बिन नसल्यामुळे कचरा/लगदा गोळा करायला मोठा (ढोल) गाडा आणा:

तेरे बिन नही लगदा दिल मेरा ढोल आणा

नाही Happy
थेट तक्रार आहे. कुठून बोलतोय तेही सांगतोय तो फोनवर.
हा आता मोठा क्ल्यू झाला.

हम लुट गए एवी आके तेरे मोहल्ले
किंवा
सारे मोहल्ले मे हल्ला हो गया

अस काही आहे का?

नाही.
मूळ गाण्यातल्या एका हिंदी शब्दाचा मी इंग्रजीत अर्थ घेतलाय.

चेंज शब्द आहे का तो?
एकदम
'बदल जाये अगर माली, (कचरे का) चमन होता नही खाली
बहारे फिर भी आयेगी... हे गाणं आठवल! Proud

नाही.
हिंदी शब्दाचा इंग्रजीतला अर्थ म्हणजे उदाहरणार्थ मराठी शब्द 'बट' म्हणजे केसांची बट. पण इंग्रजीत बट म्हणजे 'पण'. तसा हिंदी शब्दाचा इंग्रजीतला अर्थ.

तेरे बिना जिया जाये ना
बिन तेरे तेरे बिन
सांस मे सांस आए ना? (वासामुळे)
यात कुठून बोलतोय नाही कळत आहे पण... हेही नाहीये

नाही!
मी सोपं समजून दिलं आणि कठीण निघालं की कोडं. पण चांगलं फेमस गाणं आहे हे. विशिष्ट विषयावर लिहिण्यासाठी मायबोलीवर वापरलं गेलेलं आहे. Happy

प्रेरणादायी गाणं आहे. पण आत्ता कोड्यात असलेल्या पहिल्या दोन ओळींमध्ये तसा काही (प्रेरणादायी) अर्थ नाहीये. पुढच्या दोन ओळी फिलॉसॉफिकल आहेत.

कर्रेक्ट झिलमिल!!

(कचरा) गाडी 'बु' ला रही है
'सिटी बजार' (नेहमीचीच जागा) ही है

८/३७
एका शहरात एक मध्यवर्ती मार्केट होतं. मार्केट जरी असलं, तरी तिथे आजूबाजूला घरंही होतीच. सकाळच्या वेळी दुकानं उघडण्यापूर्वी रस्त्यावर वर्दळ नसायची. त्यामुळे तिथे कचऱ्याची मोठी गाडी उभी करायचे आणि सगळीकडून येणाऱ्या लहान लहान घंटागाड्यांमधला कचरा एकत्र करायचे. हे सगळं होईपर्यंत तिथे कचऱ्याचा वास भरून रहायचा. तिथले रहिवासी नेहमी याबद्दल नगरपालिकेकडे तक्रार करायचे. हे सगळ्यांना सवयीचं झालं होतं. अशाच एका सकाळी एका रहिवाशाने पालिकेला फोन केला आणि चेंज म्हणून हे गाणं म्हटलं!

उत्तर (झिलमिल)
गाड़ी बुला रही है, सीटी( शहर) बजा रही (बजार) है
चलना ही ज़िंदगी है, चलती ही जा रही है

Pages