गोवा सहल

Submitted by राज1 on 5 October, 2021 - 06:01

या दिवाळीत आम्ही गोव्याला जाणार आहोत. नॉर्थ गोवा व साऊथ ची सर्व बीचेस व दूधसागर धबधबा पहाण्याचे प्लॅन करत आहोत , आजून काही बघण्यासाठीची ठिकाणं असल्यास कृपया सांगा.
गोव्यात कार ने ट्रिप अरेंज होत असेल आणि कोणी कार ने ट्रिप अरेंज करत असेल तर सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किती दिवस गोव्यात आहात त्यावरून काय काय बघायचे हे ठरवा. फॅमिलीतील मुलांच्या वयोगटानुसार काही अ‍ॅक्टिव्हिटी करता अथवा वगळता येतील.

जास्त दिवसांसाठी जाणार असाल तर एकाच ठिकाणी न राहता दोन-तीन जागा बदलून राहता येते जेणेकरून आजूबाजूची ठिकाणं सहज बघता येतात.

हॉटेलात राहणार की एअरबीएन्बी ते ही बघा. हॉटेलात राहणार तर ब्रेकफास्ट मिळत असेल असे पॅकेज घ्या. सकाळी भक्कम ब्रेकफास्ट करून फिरायला बाहेर पडता येते.

गोव्यात हॉटेलच्या जवळ उभे असलेले टॅक्सीवाले बरेचदा जास्त भाव सांगतात. त्यापेक्षा एखाद्या साईटवरून टॅक्सी बुक करता येईल. हॉटेलवालेही अनेकदा चांगली टॅक्सी गाठून देतात. रेल्वेस्टेशन किंवा एअरपोर्ट पासून टॅक्सीने पिकअप आणि ड्रॉपची सेवाही हॉटेलवाले अनेकदा देतात.

गोव्यात एक हटके असं बुडबुड तळं नावाचं ठिकाण आहे. जरा लांब आहे पण मस्त आहे. https://www.youtube.com/watch?v=slBtW4q7auE

तुमचे माहिती काढण्याचे धागे अगदी २०१३ पासूनचे पाहिल्यावर लक्षात येते की त्यानंतर कशी सहल केली,कुठे आनंद,कुठे फसलो हेसुद्धा लिहून इतरांच्यासाठी लिहिणे कर्तव्य नाही का?
एखादा 'ट्रिपबद्दल माहितीद्या' धागा कुणी कधी तरी काढणे समजू शकतो. पण सतत हेच करायचं. पुढे काय केलं सांगायचं नाही हे पटलेलं नाही.
थोडे स्पष्टच लिहिलं आहे.

सोशल मिडिया, युट्युबवर पाहा कसे लोक आपले अनुभव उघड करतात. आपलेही सांगा.

Srd
मी माहिती काढण्याचे धागे बऱ्याच वर्ष्या पासून काढत आहे, पण बऱ्याच वेळा घरघुती नाहीतर ऑफिस च्या कारणा मुळे ट्रिप साठी जाण जमत नाही. ऐन वेळी ट्रिप कॅन्सल कराव्या लागल्या
दोन ट्रिप आत्ता पर्यंत केल्या Hyderabad व इंदोर. Hyderabad ची माहिती मी लिहिली आहे. इंदोर ची माहिती लिहिली नाही. यानंतरच्या ट्रिप बद्दल नक्की लिहीन .
ट्रिप बद्दल चांगले, वाईट अनुभव लिहील्यावर इतरांच्यासाठी नक्कीच फायदा होईल.
मायबोलीच्या मित्र, मैत्रिणी च्या सल्ल्याचा व मदतीचा आम्हाला ट्रिप मध्ये खूप उपयोग झाला.

मामी,
आम्ही ४-५ दिवसांसाठी गोव्याला जाणार आहोत. गोव्याला आम्ही दोन वेळा दोन - तीन दिवसांसाठी गेलो होतो, पण कार ठरवून एक-दोन बीच आणि काही ठिकाणं फक्त बघता आहि. या वेळेला ४-५ दिवसांसाठी जात आहोत, त्यामुळे या दिवसांत जमतील ती ठिकाणं व बीचेस बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी ट्रिप Arrange करणारे (गोव्यातील) टॅक्सी वाले किंवा कोणत्या हॉटेल चं नावं माहिती असल्यास कृपया सांगा.

नेहमी प्रमाणे दिवाळीतल्या सुट्टीच्या प्रॉब्लेम मुळे या वर्षी तरी ट्रिपला जाता येते कि नाही हे समजत नव्हते, ट्रेन सुटायच्या १ तास आधी ट्रिप कन्फर्म झाली. बॅग आधिच भरून ठेवल्या होत्या व गोवा एक्सप्रेस चे तिकीट आधीच बुक करून ठेवले होते.
ट्रेन ने आम्ही गोव्यात वास्को स्टेशन ला उतरलो. गोवा Tourism चे वास्को रेसिडेन्सी हॉटेल रेल्वे स्टेशन पासून वॉकिंग Distance (१०० मीटर) वर आहे. गोवा Tourism च्या ट्रिप्स वास्को रेसिडेन्सी वरून सुटतात म्हणून आम्ही त्या हॉटेल वर राहिलो होतो. हॉटेल चांगले आहे.
Covid च्या प्रॉब्लेम मुळे त्यांच्या गोवा Tourism च्या ट्रिप बंद आहेत व त्यांचे जेवणा साठी पण हॉटेल बंद आहे. वास्को मध्ये Restaurant खूप कमी आहेत, आम्ही राहिलो होतो तेथे तरी.
ट्रिप कन्फर्म नव्हती म्हणून ट्रेन मध्ये बसल्यावर तिथे फिरण्या साठी टॅक्सी चे बुकिंग केले. ऑनलाईन टॅक्सी Driver चा नंबर मिळाला होता. आधी तो Driver २३०० रुपये एक दिवस फिरण्या साठी कन्फर्म झाला पण तेथे गेल्यावर २८०० रुपये एक दिवस फिरण्या साठी मागितले. दुसरी टॅक्सी मिळणार नव्हती व तो दिवस वाया गेला असता म्हणून आम्ही तयार झालो.
नॉर्थ गोवा व साऊथ गोवा फिरण्या साठी गोव्यात कोणत्या ठिकाणी रहाणे जास्त सोईस्कर होईल ते कृपया सांगा.
जो टॅक्सी ड्राइवर sea shore व पिकनिक स्पॉट दाखवणारा असेल तो स्थानिक असला पाहिजे व त्याला sea shore व पिकनिक स्पॉट व त्या साठी चे Road माहिती असले पाहिजे.
पहिल्या दिवशी नॉर्थ गोवा ला Agoda फोर्ट, डॉल्फिन ride, kalungat बीच, vagothar बीच, Baga बीच बघून झाली
दुसऱ्या दिवशी South गोवा मिरामर बीच, चर्च व त्यासमोरील museum, शांता दुर्गा मंदिर, मंगेशी मंदिर व spice फार्म बघितले. Dona Paula बीच construction साठी बंद होते.

माहितीसाठी धन्यवाद राज1
पाहिलेली स्थळे - ९०टक्के पाहून झाले आहे. बाकी गोव्यात ( किंवा इतर पर्यटक स्थळांवर) जाऊन चार दिवस रेंगाळणे हेच असते.