गोवा प्रवास - काही प्रश्न

Submitted by mansmi18 on 26 September, 2013 - 05:06

नमस्कार,

गोव्याला जाण्याचे ठरत आहे, त्यात काही प्रश्न आहेत. आपल्या मत्/माहितीचे स्वागत.

2 Adults + 2 Kids
http://www.selecthotels.co.in/index.php
वरील रेझॉर्ट साउथ गोव्यात - "अरासीम" बीच ला लागुन आहे.
३ रात्र + ४ दिवसाचे Breakfast + lunch + dinner included package - रु. ३१,५०० सांगितलेय.

पुणे - गोवा - पुणे प्रवास + तिथले साईट सीईंग - सगळे मिळुन Toyota Innova गाडीचे - १९००० आणि टाटा इंडिगो गाडीचे १५,००० सांगितले आहेत. (ड्रायव्हरचा राहण्याचा जेवणाचा इ. खर्च यात इन्क्लुड आहे). पुणे - गोवा प्रवास साधारण ८ तासात होइल असे सांगितले आहे.

विमानाचे भाडे पाहिले.. चार जणांचा मुंबई-गोवा-मुंबई खर्च २८००० येत आहे. + त्यात मुंबई-पुणे०मुंबई भाडे ५०००
एकंदरीत ३३-३५०००.

प्रश्नः
१. वरील खर्च रिझनेबल वाटतोय का? (विमान, गाडीचा)
२. पुणे गोवा प्रवासाचा वेळ ८ तास बरोबर वाटतोय का? मुलांसाठी त्रासदायक होउ शकतो का?
विमानाने १ तासात पोहोचता येइल पण मग प्रवासाची मजा येणार नाही असे मला वाटते ते कितपत बरोबर आहे.
३. वरील रेझॉर्टचा कोणाला अनुभव आहे का? अरासीम बीच चांगला आहे का?

आधी एक गोवा प्रवासाचा बाफ पाहिल्यासारखे आठवतेय. कोणाला लिंक माहिती असल्यास द्या.
जाणकारानी कृपया वरील माहितीबद्दल आपले मत सांगावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विमानाचा खर्च - बरोबर.
इनोव्हा - बरोबर.
हॉटेल - तुम्ही कोणत्या सीझनमध्ये जाणार आहात त्याप्रमाणे किंमती बदलू शकतात. डिसेंबरमध्ये गोवा सगळ्यात महाग असतं. विमानखर्चही त्यावेळी वाढतो. गोव्यात सगळ्यांच्या खिशाला परवडतील अशी हॉटेल्स आहेत. आपल्याला जे योग्य वाटेल ते बुक करावे. फारतर बुक करण्याआधी त्या हॉटेलचे रिव्हू वाचायला मिळाले तर बघा.

एक फुकटचा पण प्रॅक्टिकल सल्ला : गोव्याला तुम्ही दिवसभर जर बाहेर साईटसिईंग करणार असाल तर मध्येच लंचला अथवा डिनरलाही हॉटेलात आधीच पैसे भरू नयेत. त्यांना सांगा की तुम्ही फक्त ब्रेकफास्ट हॉटेलात घ्याल. त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस बाहेर काढला तरी चालेल. आणि जेवण (लंच, डिनर) आपल्या सोईनं, ज्या ठिकाणी जाऊ तिथे घेता येतं. अशा प्रकारे तुमचे हॉटेलचे पैसे कमी होतील. ते नाही म्हणाले तर त्या बजेटचं दुसरं हॉटेलही सहज मिळेल. सहसा तयार होतात.

मनस्मी, हाही धागा पहा: http://www.maayboli.com/node/44606

माझे मत गाडीला, जर मुलं सांभाळून जाता येत असेल तरच. मुलं लहान असतील तर विमानप्रवास बरा. पैश्यांबद्दल काही सांगू शकत नाही पण गाडीचा प्रवास नेत्रसूख देइल आणि फॅमीलीसोबत एंजॉय करू शकाल.

चिन्नु,

धन्यवाद. . माझेही गाडीने जावे हेच मत आहे.
मुलांची वये ८ आणि ५. बहुतेक प्रवासाला कंटाळतील असे वाटतेय.

ट्रेनने जा.. गोवा एक्सप्रेसने गेलात तर second Ac १००० रु. तिकीट आहे.. 2 Adults + 2 Kids म्हणजे ६००० मध्ये जावुन याल.. ट्रेन लेट झाली तर (चे.ए. फेम) दुधसागर व्यवस्थित बघायला मिळेल.. गोव्यात पोहोचल्यावर एखादी कार घेऊन स्वतः drive करत तुम्हाला हवे तसे भटका.. गाडिने जाणार असाल तर आंबोलीतुन सावंतवाडिला उतरा.. हॉटेल बाबतीत मामींना अनुमोदन..

पुणे गोवा प्रवासाचा वेळ ८ तास बरोबर वाटतोय का?
>>
मुंबई ते रत्नागिरी हा बसने १० तासांचा प्रवास आहे, तेव्हा पुणे ते गोवा ८ तास म्हणजे अगदी बुंगाट प्रवास असणार.

are punyahun kolhapurla halt gheta yeto ki. nako asle tar bungat/ jhingat kasehi phira.

१. वरील खर्च रिझनेबल वाटतोय का? (विमान, गाडीचा) <<
विमानाची डिल्स वेगवेगळी मिळत असू शकतात. नेटवर सर्च करत असालच. विमान खर्च + गोव्यातला गाडी खर्च असे गणित मांडून बघा. गोव्यात नुसती इकडून तिकडे जायला गाडी केली तर खूप महाग आहे. चारपाच दिवस किंवा जे काय असतील तेवढे दिवस केलीत तर स्वस्त पडेल. गोव्यात कुठल्या भागात फिरणार त्यावर ड्रायव्हर बाहेरचा चालेल की गोव्यातलाच बरा ते ठरेल. वेस्टर्न, कोस्टल आणि रेग्युलर टुरिस्टी गोवा फिरायचं तर गोव्याबाहेरचा ड्रायव्हर आणि तुमच्या हातात मॅप हे जमू शकेल. बाकीचे गोवा फिरायचे तर लोकल ड्रायव्हर हवा.
गाडीचे किती दिवस आहेत? प्रतिकिमि काय घेतायत? दिवसाचा रेट काय (डेली १०००/१५०० रूपये आणि त्यात दिडशे/दोनशे किमि अश्या हिशोबाने)?
सावंतवाडीमधे १२००-१५०० परडे (१५० किमिसाठी. वरच्या प्रतिकिमिसाठी १० रूपये. डिझेल इन्क्लुडेड) अशी टवेरा मिळू शकते. गोव्यातही.
इंडिगोमधे आखडायला होतं फार. पुणे ते पुणे अशी वापरणार असाल तर मुलाबाळांसकट आणि सामानासकट टवेरा/ इनोव्हा/ मोठी गाडी कंफर्टेबल होईल.

२. पुणे गोवा प्रवासाचा वेळ ८ तास बरोबर वाटतोय का? मुलांसाठी त्रासदायक होउ शकतो का? << कुठल्या मार्गाने येणार त्यावर आहे. ८-९ तास लागतील एक स्टॉप धरून. कोल्हापूर-निपाणी-उत्तूर-आंबोली-सावंतवाडी-गोवा किंवा कोल्हापूर-बेळगाव-चोर्लाघाट-गोवा असे जाता येईल. वाटेत मुलांना आवडेल असे टिपिकल स्टॉप्स कमी आहेत. पण दोन्ही मार्ग निसर्गसौंदर्यांची खाण आहेत. कोल्हापूर-वैभववाडी-कणकवली-एन एच १७ ने गोवा असेही आहे पण कणकवली नंतर कंटाळा येतो. Happy

विमानाने १ तासात पोहोचता येइल पण मग प्रवासाची मजा येणार नाही असे मला वाटते ते कितपत बरोबर आहे. <<<
हे पूर्णपणे तुमच्या, पत्नीच्या आणि मुलांच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे.

मामी, सतिश, राहुल धन्यवाद.
अजुन कुठलेच बुकिंग केले नाही. माहिती जमवतोय.
नोव्हेंबर्मधे जायचेय. रेल्वेचे मिळाले तर उत्तम पण कठीण वाटतेय.

गोव्याला तुम्ही दिवसभर जर बाहेर साईटसिईंग करणार असाल तर मध्येच लंचला अथवा डिनरलाही हॉटेलात आधीच पैसे भरू नयेत. त्यांना सांगा की तुम्ही फक्त ब्रेकफास्ट हॉटेलात घ्याल. त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस बाहेर काढला तरी चालेल. आणि जेवण (लंच, डिनर) आपल्या सोईनं, ज्या ठिकाणी जाऊ तिथे घेता येतं. अशा प्रकारे तुमचे हॉटेलचे पैसे कमी होतील. ते नाही म्हणाले तर त्या बजेटचं दुसरं हॉटेलही सहज मिळेल. सहसा तयार होतात. <<<
१००%

नोव्हेंबर म्हणताय. जर नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा असेल तर हॉटेल, गाडी वगैरे बुकिंग्ज लवकरात लवकर करा.
साधारण २४ नोव्हेंबर ते २/३ डिसेंबर IFFI असतो त्यामुळे पणजी आणि तिथून तासभर अंतरापर्यंतची बरीचशी हॉटेल्स बुक्ड असतात.

मुंबई ते रत्नागिरी हा बसने १० तासांचा प्रवास आहे, तेव्हा पुणे ते गोवा ८ तास म्हणजे अगदी बुंगाट प्रवास असणार.>> मुंबई रत्नागिरी एन एच १७ ने सहा ते सात तास. बसानेदेखील. (बसचे थांबेच जास्त वेळ असतात).

पुणे गोवा कारने गेलात तर वाटेमध्ये बरीचशी इतर ठिकाणे बघत जाउ शकाल.त्यानुसार प्लानिंग करता येईल. पुणे चिपळूण मार्गे एन एच १७ पकडून गोवा गाठता येईल- हा मार्ग अधिक निसर्गरम्य वगैरे.. अथवा पुणे बेळगांव कित्तूर मार्गे गोवा (इथे एक्स्प्रेस हायवे मिळतो त्यामुळे तो सुसाट प्रवासाला बेस्ट). तिसरा कोल्हापूर निपाणी आंबोली असादेखील एक रस्ता आहे.

पुण्यावरून गोव्याला जाण्यासाठी ट्रेनचा देखील विचार करू शकता, गोवा एक्स्प्रेस तर आहेच शिवाय पनवेल वरून ट्रेन घेतली तर कोकण रेल्वेचे निसर्ग बघत बघत चांगला प्रवास होतो, अथवा कोकणकन्या घेतली तर रात्रभर ट्रेनमध्ये झोपून पहाटे गोव्याला जाता येईल.

दिवालीनंतर गोव्याचा टूरिस्ट सीझन चालू होतो, त्यामुळे होटलचे रेट्स वाढलेले असतील. त्यामुळे पूर्ण बुकिंग करायलाच हवे, राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे, तुम्ही जर दिवसभर फिरून रात्री फक्त झोपण्यासाठी होटलात येणार असाल तर साधे कामत-शानभाग टाईप लॉजेस उत्तम. रूम्स स्वच्च असतात आणि इतर सोयीदेखील उत्तम असतात. रीझोरटमधील सुविधांचा (पूल वगैरे जे काय असेल ते) तर तिथे राहणे उत्तम.

गोव्यामध्ये पाहण्यासारखे पुष्कळ आहे, त्यामुळे आधी काय काय बघायचे आहे ते नक्की ठरवून घ्या, नंतर वेळ मिळाल्यास इतर ठिकाणे फिरता येतील.

नीधप धन्यवाद.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जायचा प्लॅन आहे. या किंवा पुढच्या आठवड्यात फायनलाईझ करणार आहे.

पुणे चिपळूण मार्गे एन एच १७ पकडून गोवा गाठता येईल- हा मार्ग अधिक निसर्गरम्य वगैरे <<
ओकरी मुलं असतील बरोबर तर टाळा. सलग दोन मिनिटं सरळ जात नाही रस्ता. पार लांज्यापर्यंत हे असंच. Happy

नुकतीच गोव्याला जाऊन आले. त्यावेळी आम्ही अर्ध्या दिवसाकरता (८ तास किंवा ८० किमी.) इनोव्हा केली होती. त्याकरता रु. ४०००/-घेतले. गोव्यात किलोमीटर आणि तास या कोम्बोनुसार किंवा मग काही ठिकाणांच्या कॉम्बोनुसार पैसे घेतात. उदा. ओल्ड गोवा + मंगेशी + शांतादुर्गा + पणजी = रु. अमुकतमुक.

जाताना कसेही जा. पण येताना ट्रेन नाहीतर विमानानं या. जाम पकायला होतं. नवर्‍याशी /बायकोशी भांडण होतं. Proud

मनस्मी, ट्रेनने मुले कंटाळणार नाहीत. गाडीच्या मानाने ट्रेन बरी.
जर तुम्ही पुण्याहून थेट गोव्याचाच विचार करत असाल तर ट्रेन घ्या. इतर ठिकाणी स्टॉप-ओव्हर करणार असाल तर मॅप, गाडीचे रेट्स, मुलांची करमणूक, साईटसीईंग, थकवा आणि वेदर यांचा विचार करून पहा.
सर्वांनी चांगले टिप्स दिले आहेत.

नंतर का रे मिलिंदा? आधी का नाही?

ओकरी मुलं असतील बरोबर तर टाळा.>> Lol मुलंच कशाला... मोठी माणसं पण ओकरी असतात Wink

सलग दोन मिनिटं सरळ जात नाही रस्ता. पार लांज्यापर्यंत हे असंच>> व्हय व्हय. ते लिहायचं राहिलच. फुल्टू घाट रस्ता आहे तो.

इनोव्हा मधुनच प्रवास करा........एक तर ती ऐसपैस आहे.....वर कुणाला आराम कराय्चे असल्यास ..अडथळा होत नाही कसला ही

गोव्याला बीच... बीच आणि बीच एवढेच आहेत... बीच के बीच मे गोवा है.......

मोरजीम बीच अतिशय शांत सुखद आहे..तशी वर्दळ ही बरीच कमी असते तिथे.. अंजुना बीच देखील चांगला आहे

वर्दळ असणार्या बीच मधे ... कलिंगुड बीच.. बागा बीच... यांसारखी बीचेस आहेत...

आम्ही ......... नॅनो घेतलेली....:) १००० मधे दिवस......कुठेही फिरवा........रात्री आणुन द्या......

... कलिंगुड बीच ???? - Biggrin स्वारी हां. पण ते कलंगुट आहे. एक जण त्याला कालाटुंगी म्हणतानाही पाहिलंय. Happy

>> कसेही जा. ....................नवर्‍याशी /बायकोशी भांडण होतं. फिदीफिदी
मामी Happy

गोव्यात बीचेस सोडूनही बरंच काही आहे बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं.
स्वच्छ देवळे (जी महाराष्ट्रात कोकणपट्टा सोडला तर अभावानेच दिसतात), जुने पोर्तुगीज धर्तीचे आर्किटेक्चर, ओल्ड गोवा, व्हाइट वॉटर राफ्टिंग (वाळपईमधे पिकप पॉइंट आहे, उस्ते येथे नदीत सोडतात आणि तुम्ही सोनाळपर्यंत जाता), प्रचंड सुंदर निसर्ग व जंगले... आणि खूप काही.

आत्ताच गेल्या आठवड्यात जाऊन आलो. सहा आणि दहा वयोगटाची दोन मुलं घेऊन इनोव्हातून.

पुणे गोवा प्रवासाचा वेळ ८ तास बरोबर वाटतोय का? >>> नाही. आम्ही बरोब्बर नवाला हॉटेल सोडले. पुण्यात पोचायला संध्याकाळचे साडे- सात वाजले. पुण्यात शिरताना खूप ट्रॅफिक लागला म्हणून नाहीतर सातला पोचलो असतो. एकदा पेट्रोल भरायला, सावंतवाडीत नाश्त्याला अर्धा तास आणि लंचला कोल्हापूरजवळ मॅकडोनल्डमध्ये पाऊण तास असे स्टॉप्स घेतले.
गाडी चालवणारा नव्वद-शंभरच्या स्पीडने चालवत होता ( जिथे संधी मिळेल तिथे ). कधीकधी तर एकशेदहाही. ऐंशीच्या स्पीडने येणार्‍या नातेवाईकांनी स्टॉप्स घेऊन बारा तास लागतात असा रिपोर्ट दिला आहे.

कोल्हापूर-बेळगाव-चोर्ला-गोवा हा रस्ता खूप मस्त आहे. निपाणी-कोल्हापूरनंतर ट्रॅफिक एकदम कमी होतो. बेळगाव-चोर्ल्याला पण एखादी एखादी गाडी दिसायची अधूनमधून. पण डायरेक्ट गेल्यास बहुतेक लाँगकट आहे हा. आम्ही बेळगावात राहून पुढे गोव्याला गेलो म्हणून हा रस्ता घेतला.

मुलांना गाडी लागत नसेल तर प्रवास करायला हरकत नाही. रस्ते चांगले आहेत. गाडीत झोपणारी मुलं असतील तर अति उत्तम Wink आमचं एक मिनिटही झोपत नाही पण ताई बरोबर असल्याने बरा झाला प्रवास. तो एकटाच असेल तर आम्ही हिंमत नाही करणार गाडीने जायची. फार लांब आहे.

चोर्ला-गोवा असे केल्यास चोर्ला घाट उतरताना हणजुणे धरण लागते. ते घाटात वरून बघणे निव्वळ सुंदर.
उन्हाळ्यात चोर्ला घाट उतरल्या उतरल्या रस्त्यातच एका स्पॉटला एकदम अस्सल आणि करेक्ट चवीची हुर्राक मिळते.
चोर्ला घाटातच विल्डरनेस्ट म्हणून रिसॉर्ट आहे. सुंदर आहे. फॉरेस्ट वॉक वगैरे अ‍ॅक्टिव्हिटीजही आहेत त्यांच्या. टिपिकल टुरिस्टी गोव्यापेक्षा वेगळं हवं असेल तर बेस्ट ऑप्शन. मात्र तिथे जात असाल तर गाडी करून जाऊ नका.

Pages