उत्तर गोवा कि दक्षिण गोवा

Submitted by बन्या on 24 February, 2015 - 03:37

चार दिवस गोव्यात जायचा विचार सुरु आहे
यापूर्वी कधीही गोव्याला गेलेलो नाहीये
नेट वरची येवढी माहिती बघूनच घाम फुटलाय

गोवा बरंच मोठं आहे, त्याचे हे दोन भाग पडतायेत एवढ कळलंय

मायबोलीकर कोणी माहिती देऊ शकेल काय, कि यातले चार दिवसात काय करता येईल
समजा उत्तर गोवा फायनल केलं तर बघण्यासारखे काय काय आहे , सेम विथ दक्षिण गोवा

- आगाऊ धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा, अशा सरकारी सहली आहेत.

किंवा कमी माणसे असतील तर स्वतः टॅक्सी करा, तो सगळी ठिकाणे दाखवेल.

( मंगेशी, शांतादुर्गा, बालाजी अशी सगळी एका रांगेत आहेत, त्यातच फोंड्याचे स्पाईस गार्डन बघा.. दुसर्‍या दिवशी सप्तकोटीश्वर, सांखळी, ब्रम्हकरमळी बघा, म्हापस्याचा बाजार बघा. )

एक दिवस दूधसागर धबधबा आणि तामडी सुर्ला ला द्या ( त्याचीही सरकारी सहल असते. ) एक दिवस सुशेगात आराम करा !

सगळी मित्र मंडळी असल्याने देवदर्शन कितपत होईल ते देवच जाणे

प्रवासात जास्त वेळ ण दवडता एखादे असे ठिकाण राहायला हवे आहे कि ते सोयीस्कर पडेल

वरील दोन्ही सहलीत बीचेस असतात. आता उन्हाळा सुरु झाला असेल, दिवसा बीचवर जाण्यात अर्थ नाही.
आडवाटेचा बीच हवा असेल तर काणकोणला जा.

बहुतेक सहली पणजीतूनच निघतात. तिथे राहणे सोयीचे होईल.

मल्ल्यासाहेबांचाच बिझिनेस वाढवायचा असेल, तर कुठेही रहा, तेच दर आणि तेच पाण्चट पेय मिळेल.

माझी आई, पुतणी आणि मी, आम्ही तिघे मागच्यावर वर्षी गोव्याला जाऊन आलो. मी तुम्हाला खालील गोष्टी सुचवेनः

१) जर एकाच ठिकाणी राहून चार दिवस काढायचे असतील तर मग म्हापशाला रहा. तेथून इतर ठिकाणे बघता येईल.
२) जर चांगला बीच हवा असेल तर माझ्यामते वागातुर की काय बीच आहे तिथे राहता येईल.
३) संपूर्ण एक दिवस दुध सागर बघायला लागतोच लागतो. परत येताना वर दिनेशजींनी जी मंदीरांची नावे दिली आहेत त्यातील काही मंदीर तुम्हाला परत येताना दिसतील. तिथे जाऊन जेवण करता येईल. मंदीराच्या आता सुंदर कॅन्टीण आहे. आणि बाहेर पानावर फळे कापून देतात ती फ़ळ अवश्य खावा.
४) म्हापशाला सुंदर बाजार आहे. तिथे संध्याकाळा भेट द्या.
५) एक दिवस पण रविवार नको पणजीला भेट द्या पण त्यांची बोट घेऊन नका. काही मजा नाही बोट टुर करण्यात.
६) पणजीला काजूची बरफी मिळते ती जास्त छान असते. ती घ्या.
७) वास्को ला जाऊन या. ते अगदी द्वेगळ्या दिशेला येते पण छान आहे वास्को.
८) ओल्ड गोव्याला एक प्रसिद्ध चर्च आहे आणि त्या समोर एक मुझिअम आहे. चरपेक्षा मुझिअम जास्त छान आहे.
९)गोव्याल ४ दिवस लय झाले.

मजा करा आणि फोटो डकवा.

उत्तर गोवा: चिकार गर्दी, दारु, मासे, धिंगाणा, बोटींग-वेगवेगळ्या राइड्स, थोडीशी महागडी होटेल्स..
दक्षिण गोवा: थोडी कमी गर्दी, दारु, मासे, निवांत, शांत, उत्तर गोव्याशी तुलना करता स्वस्त होटेल्स..राइडस इथेही आहेत पण कमी प्रमाणात..अगोंडा बीच वर हट मस्त आहेत. कॅबोदीरामा फोर्ट पण ओके आहे,चर्चेस छान आहेत.

माझा सल्ला मस्त पैकी उत्तर गोव्यातल्या बीच रिसोर्ट वर रहा. मजा करा बीचेस फिरा वेगवेगळ्या राईड एंजोय करा. जुने गोवा, चर्चेस बघा. spice plantation पण छान आहे. पणजीत राहु नका. बोअर आहे. देव देव करण्यात जास्त वेळ घालवु नका. Happy
Mayem lake ला जा. लेक बंडल आहे. पण त्याला जायचा रस्ता मस्त आहे.

मित्रच आहात तर बाईक्स भाड्याने घ्या आणि वाट्टेल तसं गोवा फिरा. आम्ही हेच करतो
गोव्यातल्या कोणत्याही बुक्सबुथवर goa tourism चे पुस्तक नकाशासोबत मिळते

सिदादे दे गोवा म्हणून रिसॉर्ट आहे. खा प्या आणी हिंडा. सर्व पॅकेजेस तिथेच आहेत. कार मिळते.
बोट टूर करतात. पंजिमच्या जवळच आहे. कोलवा बीच छान आहे. मार्टीण्स कॉर्नर आहे तिथे जरूर जेवा.
सचिन तेंडुलकरचे फेव रेस्टोरट आहे. सिदादे बीचवरच आहे. सर्व बीच फन व स्विमिन्ग करता येइल.
पूल मध्ये बार पण आहे. जबरी जेवण मिळते.

मल्ल्यासाहेबांचाच बिझिनेस वाढवायचा असेल, तर कुठेही रहा, तेच दर आणि तेच पाण्चट पेय मिळेल.>> फॉस्टर्स किंवा हेनिकेन घ्या.

देव देव करण्यात जास्त वेळ घालवु नका. Happy

अजून एक सल्ला, ट्रिप-अ‍ॅडवायजर वरचे सल्ले अवश्य वाचा. खूप हटके सल्ले मिळतात तिथे. मी तर नेहमी ट्रिपअ‍ॅडवायजर फॉलो करतो.

टिपिकल टूरिस्टी गोष्टी करायच्या नसतील तर म्हादेई किंवा नेत्रावती जंगल ट्रेक्स करा.

मिड मार्चनंतर जाणार असाल तर मल्ल्या आणि त्याच्या इतर भाईबंदांना बाजूला ठेवा. गोव्याची ताजी हुर्राक (तानचा लिंबू फ्लेवर घालून) प्या. मजा करा...

मंडळी, राहण्याची ठिकाणे पण सुचवा, उदा. चांगले हॉटेल (पंचतारांकित नको) आणि वाडी वगैरे माहिती असेल तर...

Lemon Tree Beach Resort - Candolim - 5000 to 7000 per day - Nice hotel I stayed there.

बापरे इतके महागडे मंदार!!!

आम्ही डिसेंबरच्या शेवटी गेलो होतो. मस्त थंडी होती आणि गोव्याला जाण्यासाठी उत्तम काळ होता. आम्ही जिथे राहिलो तिथे १२०० रुपये एका दिवसाचे. तेही अगदी वागातुर बीचच्या अगदी जवळ. माझ्यामते आपण बाहेरच फिरस्तीला असतो. रुम वर येऊन फक्त झोपतो. स्नान करतो. मग त्यासाठी इतके पैसे कशायला मोजायचे? मी तर नेहमी स्वतात स्वस्त फक्त स्वच्छ रुम निवडतो.

रुम कुठली घ्यावी हे ट्रिपअ‍ॅडवायजर वरुन लवकर कळते.

बजेट राहण्याचे हजार -ते पंधराशे आहे , बस जास्त नाही

उगा जास्त काम्फार्त नकोय, अंघोळ आणि झोपायची सोय झाली तरी खूप, अक्खा दिवस तसाही बाहेरच भटकायचं आहे

5000 to 7000 per day>>>हे तारांकित रेट नाहीत पण तरीही महागच आहे... कधीतरी ठिक पण गोव्यात चार दिवसांचे २८ हजार पर पर्सन फक्त रहाण्याचे जास्त वाटतात , २००० पर्यंत मानवेल असे रेट असावेत

गोव्यात एक दिवस रहायचे होते. म्हणून विमानतळावर चौकशी करायचे ठरवले.. काऊंटर वरचा माणूस हरवला होता. म्हणून तिथल्या सिक्युरिटीवाल्याकडे चौकशी केली.. तो म्हणाला 'अहो ते एका रात्रीचे पाच पाच हजार घेतात.. तुम्हाला परवडणार नाही.. त्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन शहरात चौकशी करा. तुम्हाला स्वस्त पडेल....' त्याची आठवण झाली.

विमानतळ नेहमी माझ्या पासुन १ तासावर असतो. Happy
मी गोव्याला गेलो की म्हापश्याला असतो.
मी अजुन हुर्राक प्यायलो नाही. ह्यावेळी ट्राय करणार. कोणाला करायची आहे का ट्राय? Happy

वाचा की.
दाबोळि विमानतळ.
तिथून म्हापसा दीड तास असा अंदाज होता माझा

१) मडगांव चे 'हॉटेल पंचशील' राह्ण्यासाठी चांगले आहे. तेथून १ तासांच्या अंत रा व र कोलवा बीच आहे !...
२) कोलवा बीच व रील ' चिकन कुर्मा' चा एक स्टॉल असतो .. छान च !... ज रू र आस्वाद घ्या..
३) 'बीग फूट' म्युझियम ब रे आहे. जाय ला ह र क त नाही !...
४) बाईक भाड्याने घेताना जरा चालवून पहा !... अनेकांनी त्यावर हात धुवून घेतला असल्याने जरा पाहून च !!..
५) अनेक वेळा " 'म सा ज.... 'म सा ज.... " म्हणत आपल्याला भंडावून सोडणा-यांना लांबच ठेवा