दक्षिण कोकण-गोवा भटकंतीसाठी माहीती हवी आहे

Submitted by आशुचँप on 24 August, 2011 - 08:17

मित्रांनो, मला थोडी माहीती हवी आहे....
सिंधुदुर्ग, कुडाळ, मालवण आणि गोव्यात राहणारे मायबोलीकर कृपया मदत करावी....

गेल्या वर्षी मी आणि माझ्या मामेभावाने बाईकवरून कोकण ट्रीप केली. (अलीबाग ते गुहागर)
आता याचा पुढचा टप्पा म्हणजे रत्नागिरी ते गोवा असा ठरवला आहे. किमान सात-आठ दिवस लागतील असा अंदाज आहे...
आता मला माहीती अशी हवी आहे की
१. आधीच्या प्लॅनप्रमाणे बाईक चालवत रत्नागिरी गाठण्याचे ठरले होते. पण इथे चौकशी केल्यानंतर असे कळले की ट्रान्सपोर्टवाले ५०० रुपयात बाईक नेतात. माझा प्रश्न असा आहे की अशी बाईक कुणी नेली आहे का. गाडीला काही इजा झाली तर तिकडे भयंकर पंचाईत होईल.
२. दुसरे असे की आधीच्या ट्रीपमध्ये हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च बराच झाला होता. घरगुती ठिकाणी म्हणले तरी आजकाल तिथेही बरीच रक्कम घेतात. त्यामुळे यावेळी आम्ही टेन्ट घेऊन जाण्याचा बेत करत आहोत. मला असे कळले होते की मुरुड-जंजिरा तसेच श्रीवर्धनच्या इथे तस्करीला प्रतिबंध म्हणून कोणालाही समुद्रकिनारी राहू दिले जात नाही. (तंबू ठोकून)
मालवण, सिंधुदुर्गलाही असेच नियम आहेत का...आम्हाला रात्रीपुरता मुक्काम करता येतील अशी ठिकाणे कुणी कळवू शकेल काय...
(आम्ही दारू, सिगरेट, पान-तंबाखू किंवा अन्य कुठल्याही प्रकारची व्यसने करत नसून सभ्य आहोत याची हमी लेखीस्वरुपात देऊ शकतो Happy :))
तिच बाब गोव्याबाबत...
गोव्याच्या समुद्रकिनारी तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम करणे हा फार अद्भुत अनुभव असेल. पण याची परवानगी असेल याची मुळीच खात्री नाही. त्याबाबत मार्गदर्शन करावे.
भक्तनिवास चालू शकतील पण त्याला आधी बुकींग करावे लागते. त्यामुळे रत्नागिरी ते गोवा या मार्गावरील भक्तनिवास आणि त्यांचे फोन नंबर कुणी कळवू शकल्यास आभारी आहे...
आमच्याकडे बाईक असल्याने ५-१० किमी इकडे तिकडे झाले तरी चालणार आहे. आम्हाला फक्त रात्री पाठ टेकण्यापुरती जागा हवी आहे. कुठल्याही सोयी-सुविधा नसल्यातरी चालणार आहे. आम्हाला मुक्कामाला देवळाची ओसरी, पडवी काय वाट्टेल ते चालते. फक्त पाऊस, कुत्री आणि चोरट्यांपासुन सुरक्षित राहता येईल असे काहीही Happy
अजूनही प्लॅन प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे नक्की कुठे कुठे मुक्काम करणार हे ठरलेले नाहीये. पण खात्रीलायक माहीती कळली तर त्याप्रमाणे वेळापत्रक आखणे सोयीचे जाईल...
३. उत्तर कोकणाचा एक उत्तम नकाशा मला मिळाला होता. त्यात छोटी छोटी गावे आणि त्यांच्यातले अंतर अगदी अचूक दाखवले होते. त्याचा आम्हाला खूप म्हणजे खूपच उपयोग झाला. या मार्गाचाही तसा नकाशा कुणाकडे असल्यास कृपया संपर्कातून पाठवावा.
४. गोव्यातून परत येतानाही बाईक्स ट्रान्सपोर्ट करण्याचा विचार आहे. याबाबतीत गोव्यात राहणार्या माबोकरांनी कृपया मदत करावी. अशी एखादी ट्रान्सपोर्ट सेवा कुठे मिळेल आणि त्यांचा नंबर वगैरे मिळाला तर चांगले होईल.
(अथवा कोल्हापूरला एक दिवस मुक्काम करून बाईक चालवत येणे जास्त सोयीस्कर ठरेल का) या दुसर्या पर्यायाबाबत मी स्वताच जरा साशंक आहे.
५. सर्वात महत्वाचे....या प्रवासात माबोकरांची भेट घेण्यास खूप उत्सुक आहे. मला कोण कोण भेटू शकतील...
आणि या प्रवासात आमच्याबरोबर येण्यास उत्सुक असाल तरीही तसे कळवा.....सर्वांचे स्वागत आहे....

अॅडमिन - सगळे माबोकर भटकंती विभागात नसल्याने मी इथे ललीत विभागात टाकले आहे...तरीही आपल्याला योग्य वाटेल अशा ठिकाणी हा धागा हलविल्यास हरकत नाही.
धन्यवाद

गुलमोहर: 

मालवण-तारकर्ली येथे एम टि डी सी चे टेन्टस आहेत.
१-२ दिवसात तुम्हाला आनंद डिचोलकर यांचा नंबर पाठवते. ते ओरोस येथे असतात. त्यांना सिंधुदुर्ग फार व्यवस्थित माहीतीये. तुमच्या बर्‍याचश्या प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकतील.
डिचोलकरांचा सिंधुदुर्गाचा नकाशा पण एकदम करेक्ट आहे.
त्यांचेही लॉज आहे हायवेला लागून एकेकाळी तरी तिथे रिझनेबल किमती असत. सध्याचे बघावे लागेल.
रहाण्याच्या स्वस्त सोयी या किनार्‍यालगतच/ लगतच्या गावांमधे हव्या आहेत की कसे?
कुडाळमधे बापू नाइकांच्या दुर्वांकुरमधे अतिशय योग्य पैशात उत्तम सोय आहे. तेही हायवेला लागूनच आहे.
निवतीच्या बीचवरही रहायची सोय आता झाली असावी. नक्की माहित नाही पण.
गोव्यातले काही ट्रेकर्स/ जंगल फिरणारे असे काही लोक ओळखीचे आहेत हवे असल्यास त्यांचा संपर्क देऊ शकेन.

वाडी, वेंगुर्ला, मालवण आणि तत्सम ठिकाणी टूरिझम भरपूर असल्याने तिथे स्वस्त सोय मिळणं अवघड आहे पण जरा आसपासच्या गावात बघितलंत तर मिळू शकेल. नेरूरचा फाटा ते कलेश्वराचे मंदीर या परिसरात एक दोन ठिकाणी रहाण्या-जेवण्याची सोय आहे. नेरूर बाजारातल्या शाळेसमोर एक अन्नपूर्णा म्हणून रूम्स आणि खानावळ असे आहे. हे इतर ठिकाणांपेक्षा थोडे स्वस्त असू शकते.

गणपतिपुळ्याला पण टेन्ट्स आहेत. पण किनार्‍यावर रहायचा हट्ट नको. जर सरकारने काहि नियम केले असतील तर त्याचा मान राखलाच पाहिजे.

गोव्यातून परत येताना बहुतेक रेल्वेमधून बाईक आणायची व्यवस्था आहे. पावलो वगैरेंच्या व्होल्वो मधे बरीच जागा असते. गिरिराजने एकदा बरेच सामान (कॉम्प्यूटर वगैरे ) तसे आणले होते, पण त्यांना बुकिंग करतानाच कल्पना द्यावी लागते.

या भागात मोठी देवळे नाहीत त्यामूळे भक्त निवास वगैरे माझ्या तरी माहितीत नाहीत. पण राजापुरला धोपेश्वराजवळ एखादी खोली बघितल्याचे आठवतेय. अगदी रात्रीपर्यंत प्रवास न करता, जर संध्याकाळच्या आधी गावात पोहोचलात तर चौकशी करुन राहण्याची सोय बघता येईल. ज्यांच्याकडे जेवायला उतराल, त्यांच्याकडेच चौकशी करता येईल.

मायबोलीकरांशी संपर्क झाला तर सर्वात उत्तम.

गोव्यातही असे तंबू टाकून रहायला मिळेल का याबद्दल मी साशंक आहे. जास्त मोठं कारण म्हणजे किनार्‍यांवर चालणारा ड्रग्जचा व्यापार.आणि गुन्हेगार लोकांची गाठ पडण्याची शक्यता. तुम्हाला स्वस्तात रहाण्याचे सोय हवी असेल तर गोवा टुरिझमच्या डॉर्मिटरीज आहेत. ऑनलाईन बुकिंग होतं. मोटारसायकली रत्नागिरी किंवा कोल्हापूर्/बेळगावकडून सध्या आणणं शहाणपणाचं नाही, कारण रस्ते भयानक झाले आहेत. सावंतवाडीच्या आसपास, पत्रादेवीपर्यंत १५ किमि अंतरात रस्ता जवळजवळ नाहीच. तोच प्रकार अनमोडच्या घाटातून कर्नाटकात प्रवेश केल्यावर. त्यापेक्षा रेल्वेने मोटारसायकली नेऊ शकता. खूप स्वस्त पडतं.

आशू, गोव्यात बाईक्स भाड्यानेदेखील मिळतात. आम्ही अशी बाईक घेऊन भरपूर प्रवास केला आहे.
आणि त्या गोवा राज्याबाहेरही नेल्या होत्या.

हो. हा जास्त चांगला ऑप्शन आहे. सुटसुटीत फिरता येइल. पण रस्ते माहिती नसतील तर एखादी मोठी गाडी भाड्याने घेऊन दिवसभर फिरणं जास्त चांगलं

आशु.... दिनेशदा म्हणाल्याप्रमाणे रेल्वेतुन बाईक नेता येते.. मी रत्नागिरीहुन रेल्वेने मुंबईला बाईक आणली आहे त्यामुळे तुम्ही ती शक्यता विचार करु शकता.

सिंधुदुर्गा जिल्ह्यातील विशेष माहीत नाही पण चिपळूण ते राजापुर पर्यंत कुठे भक्तनिवास किंवा घरगुती स्वरूपाच्या राहण्याची व्यवस्थेची चौकशी करु शकतो.

सर्वांना खूप खूप धन्यवाद

नीधप - डिचोलकरांचा नंबर मिळाला तर बेस्ट होईल...

वाडी, वेंगुर्ला, मालवण आणि तत्सम ठिकाणी टूरिझम भरपूर असल्याने तिथे स्वस्त सोय मिळणं अवघड आहे

हीच मुख्य अडचण आहे....

रहाण्याच्या स्वस्त सोयी या किनार्‍यालगतच/ लगतच्या गावांमधे हव्या आहेत की कसे?

आमच्याकडे बाईक असल्याने ५-१० किमी इकडे तिकडे झाले तरी चालणार आहे. आम्हाला फक्त रात्री पाठ टेकण्यापुरती जागा हवी आहे. कुठल्याही सोयी-सुविधा नसल्यातरी चालणार आहे. आम्हाला मुक्कामाला देवळाची ओसरी, पडवी काय वाट्टेल ते चालते. फक्त पाऊस, कुत्री आणि चोरट्यांपासुन सुरक्षित राहता येईल असे काहीही.

नेरूर बाजारातल्या शाळेसमोर एक अन्नपूर्णा म्हणून रूम्स आणि खानावळ असे आहे.

हा, हे मस्त राहील..हे नाव लक्षात ठेवतो.
खूप खूप धन्यवाद

तुम्हाला स्वस्तात रहाण्याचे सोय हवी असेल तर गोवा टुरिझमच्या डॉर्मिटरीज आहेत. ऑनलाईन बुकिंग होतं.

मला त्याची लिंक देणार का...

मोटारसायकली रत्नागिरी किंवा कोल्हापूर्/बेळगावकडून सध्या आणणं शहाणपणाचं नाही, कारण रस्ते भयानक झाले आहेत. सावंतवाडीच्या आसपास, पत्रादेवीपर्यंत १५ किमि अंतरात रस्ता जवळजवळ नाहीच. तोच प्रकार अनमोडच्या घाटातून कर्नाटकात प्रवेश केल्यावर. त्यापेक्षा रेल्वेने मोटारसायकली नेऊ शकता. खूप स्वस्त पडतं.

अरे बापरे...पण आम्हाला बाईक न्यायच्याच आहेत. त्याला दुसरा पर्याय काय असू शकतो का....

आशू, गोव्यात बाईक्स भाड्यानेदेखील मिळतात. आम्ही अशी बाईक घेऊन भरपूर प्रवास केला आहे.
आणि त्या गोवा राज्याबाहेरही नेल्या होत्या.

दिनेशदा...बाईक्स आमच्या कडे आहेत. मी माझी युनिकॉर्न घेऊन जाणार आहे. त्यामुळे ती अडचण नाहीये...प्रश्न आहे फक्त मुक्कामाचा.

सिंधुदुर्गा जिल्ह्यातील विशेष माहीत नाही पण चिपळूण ते राजापुर पर्यंत कुठे भक्तनिवास किंवा घरगुती स्वरूपाच्या राहण्याची व्यवस्थेची चौकशी करु शकतो.

मनोज अगदी अगदी चालेल...पाहिजेच म्हणा ना..:)

बाकी ट्रान्सपोर्टने पुण्याला नेण्यापेक्षा रेल्वेने मुंबईला नेऊन तिथून चालवत पुण्याला आणणे सोयीचे पडेल असे वाटू लागले आहे. स्वस्त आणि कमी कटकटीचे होईल असा अंदाज आहे.

सिंधुदुर्गात वालावल येथे प्रभुसृष्टी म्हणून जेवणया-राहाण्याची चांगली सोय आहे. तसेच नेरूर्-मालवण रस्त्यावर (व्हाया कर्ली पूल) धामापूर्-काळसे येथे निसर्गछाया इथेही बर्‍यापैकी राहाण्याजेवण्याची सोय आहे. पण ही दोन्ही ठिकाणे हायवे ला लागून नाहीत.दहापंधरा किलोमीटर आत आहेत. धामापूर येथे सुंदर तलाव,त्यात नौकाविहाराची सोय आहे.

नीधप - नाही नाही, सावकाश...आम्ही सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबर पहिला आठवड्यात जाणार आहोत. पण मुद्दामच एक महिनाभर आधीच टाकून ठेवले. कारण अनेक जण नुसतेच सांगतात की अरे आधी सांगायचे ना तिकडे जाणार होता ते मस्त सोय करून दिली असती...
तर या मस्त सोय वाल्यांसाठी ही पोस्ट....:)

हीरा - धन्यवाद..
(ही सगळी नावे कागदावर लिहून ठेवली पाहिजेत.)

मनोज अगदी अगदी चालेल...पाहिजेच म्हणा ना.. >>>> आशु.... नक्की माहीती काढून सांगतो...

बाकी ट्रान्सपोर्टने पुण्याला नेण्यापेक्षा रेल्वेने मुंबईला नेऊन तिथून चालवत पुण्याला आणणे सोयीचे पडेल असे वाटू लागले आहे. स्वस्त आणि कमी कटकटीचे होईल असा अंदाज आहे >>>>> तुम्ही सर्वजण जर पुण्यावरूनच जाणार असाल तर पुण्यावरुन रत्नागिरी-सावंतवाडी मार्गे गोव्याला जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन आहे (पुणे-एर्नाकुलम - ट्रेन नं - १२५२०). ह्या ट्रेनने तुम्ही तुमच्या बाईकची ने-आण करू शकता. पण ही ट्रेन फक्त आठवड्याचे ठरावीक दिवस असते आणी मडगाव-सावंतवाडी-पनवेल-पुणे अशीच थांबते.

दिनेशदा...बाईक्स आमच्या कडे आहेत. मी माझी युनिकॉर्न घेऊन जाणार आहे. त्यामुळे ती अडचण नाहीये...प्रश्न आहे फक्त मुक्कामाचा.>>>>> माझ्या अनुभवानुसार तुम्हाला कुठल्याही गावात रात्री देवळात किंवा शाळेत राहायची व्यवस्था होण्यास अडचण येऊ नये.

तुम्ही सर्वजण जर पुण्यावरूनच जाणार असाल तर

आम्ही दोघेच आहोत...मी पुण्यावरून आणि माझा मामेभाऊ मुंबईवरून...

पुण्यावरुन रत्नागिरी-सावंतवाडी मार्गे गोव्याला जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन आहे (पुणे-एर्नाकुलम - ट्रेन नं - १२५२०).

हे बेस्ट आहे. अतिशय उपयुक्त माहीती...फार म्हणजे फारच धन्यवाद...

माझ्या अनुभवानुसार तुम्हाला कुठल्याही गावात रात्री देवळात किंवा शाळेत राहायची व्यवस्था होण्यास अडचण येऊ नये.

नाही ना, आजकाल कोकणात फार वैताग प्रकार झालाय..कुणालाही कुठेही राहू देत नाहीत. आणि असे संशयास्पद रित्या कुणी आढळले तर सरळ उचलून चौकीत नेतात..माझा एक ट्रेकर मित्र आहे त्यांना असा अनुभव आला होता.

http://www.goa-tourism.com/residency.php?id=13 ही गोवा टुरिझमची लिंक.

पुण्याहून गोव्याला डायरेक्ट येणारी ट्रेन रोज आहे. पूर्णा एक्सप्रेस आणि हजरत निजामुद्दिन. यातली एक कुठलीही रोज असतेच. पण रिझर्व्हेशन्स ३ महिने आधी फुल्ल होतात. पण तुम्हाला थोडा पेशन्स असेल तर किनार्‍यानेच बाईकने थांबत थांबत येऊ शकाल. गणपतीपुळ्यात पुजार्‍यांच्या घरी रहायची सोय करतात.

सावंतवाडीजवळ रस्ता १५ किमिचा पट्टा खूप खराब आहे पण तिथपर्यंत आणि गोव्यात आल्यानंतर रस्ता चांगलाच आहे. खरं तर तो टप्पा टाळून सागरी महामार्गाने पण येऊ शकता तुम्ही. फार रहदारी नसते त्या रस्त्यावर. आणि मालवण देवबाग किंवा शिरोडा आणि गोव्यात पेडणे इथे बरीच स्वस्तात रहायची सोय होऊ शकेल.

गोव्यात अनेक देवळात स्वस्तात खोल्या आहेत रहाण्यासाठी, पण त्या देवळांच्या महाजन लोकांसाठीच त्या देण्यात येतात. तेव्हा गोवा टुरिझम हाच योग्य पर्याय. त्यांच्याकडे सर्व हॉटेलांची यादी असते. त्यामुळे ते जास्त व्यवस्थितपणे तुम्हाला रूम अ‍ॅरेंज करून देतील.

गोवा टुरीझम च्या २ डॉर्मीटरीज आहेत , त्यापैकी १ कलंगूट बिचवर आहे.
आम्ही २-३ वर्षांपुर्वी राहीलो आहे. गुगलाव लागेल.

रत्नागिरी जवळ पावस येथे स्वामि स्वरुपानन्द यांच्या भक्तनिवासात उत्तम सोय आहे. तेथुन तुम्ही पुर्णगड मार्गे राजापुरला जाऊ शकता

जर गोव्यात बाईक्स भाड्याने घेतल्या तर रत्नागिरीपर्यंत जाण्याचा, बाईक गाडिने परत आणण्याचा त्रास आणि खर्च वाचेल. पाठ टेकण्यापुरतेच हवे असेल तर कणकवलीला स्टँडसमोरच आहे एक हॉटेल. मी राहिलोय तिथे. गगनबावड्याला पण स्टँडसमोर आहे एक. ४ वर्षांपुर्वी केवळ १०० रुपये दर होता.
सावंतवाडीत पण आहेत अशी हॉटेल्स.

ह्या प्रवासाचा फोटोसकट "डिटेलवारी" वृत्तांत मायबोलीवर दिला पाहिजे ह्या अटीवरच आशुचॅम्प ह्यांना मदत करण्यात यावी Proud

देवगड ते गोवा पर्यन्त सागरी मार्गाने जाउ शकतो. तेरेखोल जवळच्या खाडितुन पलिकडे गोवा मधे जाता येते बाइक्सकट. Happy या पट्ट्यामधे मी फिरलो आहे. राहन्याचा खर्च ३००/४०० माणशी येतो. मोठी गाव सोडुन छोट्या गावात राहन्याची सोय चान्गली होते.

नकाशा साठी 'साद सागराची' हे पुस्तक refer करा. माझ्याकडे आहेत, पाहिजे तर त्यातील नकाशे scan करुन पाठवुन देतो. कृपया आपण आपला mail id द्यावा.

सर्वांना लईच धन्यवाद....

ज्योती, शर्मिला, विप्रा - धन्स...लींक खरच उपयुक्त आहे...

लामणदिवा- माहीतीबद्दल धन्यवाद...रत्नागिरीला एकांच्या ओळखीने राहयची सोय झाली आहे. पण काही कारणाने ते शक्य झाले नाही तर हा पर्याय नक्कीच चांगला आहे.

दिनेशदा - तुम्हा म्हणता त्यात तथ्य आहे पण दोन अडचणी समोर आहेत. एक म्हणजे पुण्याहून थेट गोवा गाठून तिथे बाईक भाड्याने घेतल्या आणि रत्नागिरीपर्यंत गेलो तर त्या बाईक परत देण्यासाठी परत गोव्याला जावे लागेल ना....म्हणजे दुप्पट फेरा होणार ना...
आणि दुसरे माझे वैयक्तिक मत असे की मला स्वताची बाईक जेवढी कंफर्टेबल वाटते तेवढी बाकी कुठलीही नाही. गाडी जरी निर्जिव असली तर आपल्याला तिची सवय झालेली असते आणि तिला आपली. किंचितशी वाढलेली घरघर, किंवा किचकिच लगेचच लक्षात येते. तसे भाड्यांच्या बाईकबाबत कितपत होईल याबाबत शंका आहे...
आणि माझी बाईक तर माझी अतिप्रचंड लाडकी आहे...

स्वप्ना - अगदी अगदी....नक्कीच देणार...आणि आता तर नविन कॅमेरा सुद्धा घेतलाय...त्यामुळे मीच फोटो काढायला प्रचंड उत्सुक आहे.

सुतार - पुस्तकाबद्दल माहीती देणार का...इथे पुण्यात कुठे मिळेल ते पाहतो..स्कॅन करून पाठवलेत तर काय आनंदी आनंद...
माझा इमेल आयडी ashuchamp@gmail.com

डेविला - मित्रा अरे आहेस कुठे तु...मला तुझा नंबर कळव संपर्कातून...मी फोनच करतो तुला

आणि हा नकाशा आहे माझ्याकडे...आधीची कोकणट्रीप यावरूनच केली...बेस्ट आहे एकदम...पण यात सावंतवाडीच्या पुढची ठिकाणे नाहीयेत. ही मोठ्ठी अडचण आहे...

आशु, गोव्यात किनारे बघण्यापेक्षा काही वेगळ्या जागा बघा.
ज्योति सांगेलच, पण मी सुचवीन ते सांकलेम चे प्रति पंढरपूर, तिथल्या नदीचा घाट (शक्य असेल तर त्रिपुरारी पोर्णिमेला जा तिथे ), महालसेचे देऊळ, प्णजीजवळच टेकडीवर असणारे हनुमानाचे देऊळ, ओड्यार, हि जागा वेर्ण्याजवळ आहे पण स्थानिक लोक(च) सांगू शकतील. तामडी सुर्ला, नेत्रावतीचे तळे, काणकोण बीच (या किनार्‍यावरच एक छोटासा धबधबा आहे ) कणकवलीजवळचा ओझर तलाव (नावाबद्दल खात्री नाही पण रस्त्यालगतच आहे. शर्मिला हॉटेलच्या जवळ.) हणजूणे धरण, तिलारी परिसर, चोर्ला घाट...