प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर bracelet..बाकीचे ही दागिने खूप सुंदर आहेत
हा दागिने झब्बू दसऱ्यापर्यन्त ठेवावा अस मला वाटतं.>> अनुमोदन

स्वस्ति Happy अगं पण तेवढे दागिने हवेत ना. मेंबर्स फायनाईट (सान्त), त्यांचे दागिने सान्त Happy
पण आयडिया चांगलीच आहे. नि:संशय.

कार्ल्याला डोंगरपायथ्याशी घेतलेले मंगळसूत्र.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLUkuUJsYp7ymMxaCLQsQoAmRjF1heW731libe58NCAINtqvsFvzwhqmj8FXudbihESwuis7rAFPxwdOdPlElID7VzyHX0KRzJtfwr9-8wkgOTsVWI7rqywFuRVK9tGaShKBiMeKqjZOlXmS-fZgm4V4QA=w662-h882-no?authuser=0

वाह सुरेख. कारल्याला एकवीरा देवी असते ना.

एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यावरी गाणं आठवलं त्या मासोळ्या बघून.

ते कानातले सुरेख आहेत.

किती प्रकारचे दागिने आहेत सगळींकडे.. वाॅव. सामो आणि धनुडीचं कलेक्शन बघून तर अहाहा झालं एकदम. कॅरी पण मस्त करतात तुम्ही सगळ्या.:-)

मस्त मंगळसूत्र सामो..
Mazeman किती मस्त हार आहे...
अमृताक्षर मस्त collection .. माझ्या कडे पण एक शिंपलया चे ब्रेसलेट आहे.. पण त्यात शिंपले कट करुन त्याला गोल आकार दिला आहे.20211004_201341.jpg

छान आहे अमुपरी.

त्या लांब गुलाबी (माणिक रंग) मण्यांमुळे शोभा वाढली आहे.

छान ब्रेसलेट अमुपरी.
007 वाट बघतेय, टाकणार होतात ना बायको चे दागिने? कि नवे खरेदी करून मग टाकणार सहीच :दिवे घ्या: टाका हो

007 वाट बघतेय, टाकणार होतात ना बायको चे दागिने? कि नवे खरेदी करून मग टाकणार सहीच :दिवे घ्या: टाका हो
हो हो उद्या नक्की. थोडा कामात अडकलो होतो.

ज्जेब्बात 007, पण नविन दागिने घेणार का ह्या प्रश्नाचं उत्तर सोयिस्कर रित्या टाळलेलं आहे :धागातुमच्यामिसेसनादाखवावाका विचारात पडलेली भावली:

Pages