पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉस्टको(अमेरिका) मधे मिळणार्‍या 'rotiland' च्या रोटि/पोळ्या ट्राय केल्यात का कुणी? कशा आहेत.

इथे पहा कोल्हापुरी चटणीची रेसीपी.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93126.html?1169674338

प्राजक्ता मी चपात्यांबद्दल चांगलेच रिपोर्टस ऐकलेत आतापर्यंत. पण अजुन मी try केल्या नाहीत.(मागच्यावेळी गेलेले पण लवकर सापडल्या नाहीत.) उद्या जाईन तेव्हा आणेन बहुदा.

कॉस्कोतील रोटीला वास येतो . यिस्ट टाकले असते बहुधा. आणि एकदम एखादा जाड कागद खातोय असे वाटतेय. हजार पिठ टाकलीय्,ह्याने एनरिच्ड त्याने एनरिच्ड वगैरे लिहिले असते पण छ्या! Happy

कॉस्टको बघितल्या आणी विचार केलेला अडिअड्चणीला कामास येतिल पण, एवढा मोठा pack आणी नाही आवडल्या तर लोळत पडणार.. मागे एकदा कुठलेसे mango नेक्टर आणलेले..कायच्या काहिच गोड होते.

मी उदयपुरला गेले होते तिथे एकलिंगजी देवळाकडे मिरचीवडे खाल्ले. लांब हिरवी जाड सालीची नतिखट ढब्बू मिरचीला आडवी चिर देऊन कसलेतरी सारण भरले होते. मला त्यात बटाट्याला तुकडा आढळाला त्यावरुन आपण बटाटावड्यासाठी भाजी करतो तसली असावी बहुतेक असे वाटले. आमचुर पावडरही होती. (मिरची आत आंबट लागत होती ). सारण भरुन मग बेसनमध्ये बुडवुन तळल्या होत्या. चवीला अतीशय सुंदर. कोणाला कृती माहित असेल तर सांगा.

प्राची, पॅशनफ्रुट नाही गं. लिंबुच आहे. दिनेश, ही लिंबे मी उदयपुरहुन आणलीत. काल लोणचे केले शेवटी.

लसणाच्या पातीची चटणी कशी करतात? आज भाजीवाल्याकडे थोडी ताजी लसणीची पात मिळालिये.

लसणाची पात स्वच्छ धुवुन त्यात हिरव्या मिरच्या, खडे मीठ घालुन पाट्यावर वाटायचे. पाटा नसेल तर मिक्सर आहेच. खाताना हवे असल्यास कच्चे तेल आणि तिखट न आवडणार्‍यांनी दाण्याचा कूट घालुन खावे. भाकरीबरोबर इतकी अप्रतीम लागते चटणी. आई हिवाळ्यात नेहेमी करते.

कुणी सेल्फ रेसिन्ग फ्लोअर ने भटुरे केलेत का?मागे मीच हा प्रश्न माय्बोलीत विचारला होता ,पण त्यावेळी माझे भटुरे थोडे कडक झाले होते. Sad

त्यापेक्षा भटूर्‍यासाठी मैदा भिजविताना त्यात आंबट दही किन्वा यीस्ट/ बेकिन्ग पावडर. घातले तर अपेक्षित परिणाम साधता येइल.

तिनी पैकी एकच.

कॉस्टको च्या पोळ्या तशा बर्या लागतात. पण मनू म्हणते तसा थोडा आंबुस वास येतो. पण कधीतरी खायला बर्या आहेत. देसी दुकानात १२ रोट्यांचा पॅक मिळतो. त्या आणून खाऊन बघ. त्या रोट्यांच्या पुर्या मस्त होतात पण. (हे बर्या कसं लिहायचं?)

मी नेहमी सेल्फ रायझींग फ्लोरचे भटुरे करते.मऊ होतात्.मी थोडे दही घालते भिजवताना.
१.५ तासात पीठ फुगुन येते.

गौरी.

श्रावणी, बाजरीचा खिचडा ही मी लिहिलेली अगदी पहिली पहिली कृति होती. कालनिर्णय मधे ती शांता शेळकेनी लिहिलि होती. अजून इथे असेल. पण क्विक रेफरन्स साठी इथेच लिहितो. बाजरी पाण्याचा हात लावून, जरा मिक्सरमधे फिरवायची. पाखडून भिजत घालायची. बरोबर चण्याची डाळ, तांदूळ, शेंगदाणे पण भिजत घालायचे. तेलाची फोडणी करुन त्यात कांदा परतायचा. लाल मिरच्या काळा मसाला वगैरे घालून, भिजवलेली घान्य घालायची. मीठ घालून कूकरमधे शिजवायचा. वरून तूप व कोथिंबीर घालून खायचे. याचाच दुध व गुळ घालून गोड प्रकार करता येतो.

कृपया कोणी सोया मिल्क च्या recipe ची लिंक देईल का ? (मायबोली वर लिहिलेली )
मी शोधा शोध केली पण सापडले नाही.

मला मायपत्री, कबाबचिनी, रामपत्री ह्या मसाल्यांतील पदार्थांविषयी माहिती हवी आहे. हे घातल्याने खमंगपणा वाढतो का? हे पदार्थ टिपिकल कोकणातील मसाल्यात असत्तात का आणि पुण्यात कुठे मिळतील?

थँक्स सिंडे. मी हिरवी मिरची घालुन अन लाल तिखट घालुन अशी दोन्ही पद्धतीने केली लसणीची चटणी. नवर्‍याला वरुन दाण्याचं कुट द्यावं लागलं....:)

बगारा बैंगण मसाला .. कसा करतात...
नांदेडला आणि हैद्राबादला जोशींकडे मिळतो... तो घातला की भाजी असली काही मस्त होते काय सांगु Happy

या वेळी माझ्याक्डे दळण खुपच भरड आलं आहे , मला पोळ्याच जमेनात म्हणुन शेवटी मी कणिक चाळुन घेतली तर पुष्कळ कोंडा\चाळ निघालय. त्यात बरच सत्व असतं त्यामुळे टाकुनही देता येत नाहीये. त्याच काय काय करता येऊ शकेल?
थालिपिठ्जत वापरता येईल.
आणि कणकेचे लाडु करतात त्यात कणकेऐवजी हा चाळ घातला तर कसे लागतील.
प्लिज कोणीतरी मला उपाय सुचवा बर.

Pages