Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काळे तिखट म्हणजे काळा मसाला
काळे तिखट म्हणजे काळा मसाला का ?
कोल्हापूरी तिखट (चटणी) ची कृति लालूने लिहिली होती.
कॉस्टको(अमेरिका) मधे
कॉस्टको(अमेरिका) मधे मिळणार्या 'rotiland' च्या रोटि/पोळ्या ट्राय केल्यात का कुणी? कशा आहेत.
इथे पहा कोल्हापुरी चटणीची
इथे पहा कोल्हापुरी चटणीची रेसीपी.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93126.html?1169674338
प्राजक्ता मी चपात्यांबद्दल चांगलेच रिपोर्टस ऐकलेत आतापर्यंत. पण अजुन मी try केल्या नाहीत.(मागच्यावेळी गेलेले पण लवकर सापडल्या नाहीत.) उद्या जाईन तेव्हा आणेन बहुदा.
कॉस्कोतील रोटीला वास येतो .
कॉस्कोतील रोटीला वास येतो . यिस्ट टाकले असते बहुधा. आणि एकदम एखादा जाड कागद खातोय असे वाटतेय. हजार पिठ टाकलीय्,ह्याने एनरिच्ड त्याने एनरिच्ड वगैरे लिहिले असते पण छ्या!
कॉस्टको बघितल्या आणी विचार
कॉस्टको बघितल्या आणी विचार केलेला अडिअड्चणीला कामास येतिल पण, एवढा मोठा pack आणी नाही आवडल्या तर लोळत पडणार.. मागे एकदा कुठलेसे mango नेक्टर आणलेले..कायच्या काहिच गोड होते.
मी उदयपुरला गेले होते तिथे
मी उदयपुरला गेले होते तिथे एकलिंगजी देवळाकडे मिरचीवडे खाल्ले. लांब हिरवी जाड सालीची नतिखट ढब्बू मिरचीला आडवी चिर देऊन कसलेतरी सारण भरले होते. मला त्यात बटाट्याला तुकडा आढळाला त्यावरुन आपण बटाटावड्यासाठी भाजी करतो तसली असावी बहुतेक असे वाटले. आमचुर पावडरही होती. (मिरची आत आंबट लागत होती ). सारण भरुन मग बेसनमध्ये बुडवुन तळल्या होत्या. चवीला अतीशय सुंदर. कोणाला कृती माहित असेल तर सांगा.
प्राची, पॅशनफ्रुट नाही गं. लिंबुच आहे. दिनेश, ही लिंबे मी उदयपुरहुन आणलीत. काल लोणचे केले शेवटी.
साधना इथे
साधना इथे बघ..
http://www.maayboli.com/node/11662
पण बटाटा नाही यात....
लसणाच्या पातीची चटणी कशी
लसणाच्या पातीची चटणी कशी करतात? आज भाजीवाल्याकडे थोडी ताजी लसणीची पात मिळालिये.
साधना हे बघ तुझ्यासाठी मिर्ची
साधना हे बघ तुझ्यासाठी मिर्ची वडे बनवले आहेत.
लसणाची पात स्वच्छ धुवुन त्यात
लसणाची पात स्वच्छ धुवुन त्यात हिरव्या मिरच्या, खडे मीठ घालुन पाट्यावर वाटायचे. पाटा नसेल तर मिक्सर आहेच. खाताना हवे असल्यास कच्चे तेल आणि तिखट न आवडणार्यांनी दाण्याचा कूट घालुन खावे. भाकरीबरोबर इतकी अप्रतीम लागते चटणी. आई हिवाळ्यात नेहेमी करते.
कुणी सेल्फ रेसिन्ग फ्लोअर ने
कुणी सेल्फ रेसिन्ग फ्लोअर ने भटुरे केलेत का?मागे मीच हा प्रश्न माय्बोलीत विचारला होता ,पण त्यावेळी माझे भटुरे थोडे कडक झाले होते.
त्यापेक्षा भटूर्यासाठी मैदा
त्यापेक्षा भटूर्यासाठी मैदा भिजविताना त्यात आंबट दही किन्वा यीस्ट/ बेकिन्ग पावडर. घातले तर अपेक्षित परिणाम साधता येइल.
तिनी पैकी एकच.
कॉस्टको च्या पोळ्या तशा
कॉस्टको च्या पोळ्या तशा बर्या लागतात. पण मनू म्हणते तसा थोडा आंबुस वास येतो. पण कधीतरी खायला बर्या आहेत. देसी दुकानात १२ रोट्यांचा पॅक मिळतो. त्या आणून खाऊन बघ. त्या रोट्यांच्या पुर्या मस्त होतात पण. (हे बर्या कसं लिहायचं?)
बर्या - baRyaa
बर्या - baRyaa
मी नेहमी सेल्फ रायझींग
मी नेहमी सेल्फ रायझींग फ्लोरचे भटुरे करते.मऊ होतात्.मी थोडे दही घालते भिजवताना.
१.५ तासात पीठ फुगुन येते.
गौरी.
बाजरीचा खिचडा कसा करतात ते
बाजरीचा खिचडा कसा करतात ते कोणी मला सान्गाल का?
धन्यवाद kop, मी यावेळेस दही
धन्यवाद kop,
मी यावेळेस दही घलुन बघते भिजवताना,त्यचे काही विषेश प्रमाण आहे का?
काळ्या मनुका म्हणजे Currants
काळ्या मनुका म्हणजे Currants की Black California Raisins?
श्रावणी, बाजरीचा खिचडा ही मी
श्रावणी, बाजरीचा खिचडा ही मी लिहिलेली अगदी पहिली पहिली कृति होती. कालनिर्णय मधे ती शांता शेळकेनी लिहिलि होती. अजून इथे असेल. पण क्विक रेफरन्स साठी इथेच लिहितो. बाजरी पाण्याचा हात लावून, जरा मिक्सरमधे फिरवायची. पाखडून भिजत घालायची. बरोबर चण्याची डाळ, तांदूळ, शेंगदाणे पण भिजत घालायचे. तेलाची फोडणी करुन त्यात कांदा परतायचा. लाल मिरच्या काळा मसाला वगैरे घालून, भिजवलेली घान्य घालायची. मीठ घालून कूकरमधे शिजवायचा. वरून तूप व कोथिंबीर घालून खायचे. याचाच दुध व गुळ घालून गोड प्रकार करता येतो.
पिन्कु, काळ्या मनुका म्हणजे
पिन्कु, काळ्या मनुका म्हणजे black currants.
Raisins म्हणजे बेदाणे.
कृपया कोणी सोया मिल्क च्या
कृपया कोणी सोया मिल्क च्या recipe ची लिंक देईल का ? (मायबोली वर लिहिलेली )
मी शोधा शोध केली पण सापडले नाही.
धन्यवाद दिनेशदा.आता करुन
धन्यवाद दिनेशदा.आता करुन बघीन.मिक्सरवर किती फिरवायची?
मला मायपत्री, कबाबचिनी,
मला मायपत्री, कबाबचिनी, रामपत्री ह्या मसाल्यांतील पदार्थांविषयी माहिती हवी आहे. हे घातल्याने खमंगपणा वाढतो का? हे पदार्थ टिपिकल कोकणातील मसाल्यात असत्तात का आणि पुण्यात कुठे मिळतील?
थँक्स सिंडे. मी हिरवी मिरची
थँक्स सिंडे. मी हिरवी मिरची घालुन अन लाल तिखट घालुन अशी दोन्ही पद्धतीने केली लसणीची चटणी. नवर्याला वरुन दाण्याचं कुट द्यावं लागलं....:)
बगारा बैंगण मसाला .. कसा
बगारा बैंगण मसाला .. कसा करतात...
नांदेडला आणि हैद्राबादला जोशींकडे मिळतो... तो घातला की भाजी असली काही मस्त होते काय सांगु
बाजरीतला कोंडा निघेपर्यंतच
बाजरीतला कोंडा निघेपर्यंतच फिरवायची ती. म्हणजे काहि सेकंदच.
धन्यवाद kop, तुझ्या क्रुती
धन्यवाद kop,
तुझ्या क्रुती प्रमाणे दही घालून भिजवल पीठ भटुर्या च!मस्त झाले .
अग, आणखी काही रेसिपी हव्या
अग, आणखी काही रेसिपी हव्या असतील तर नक्की विचार.
गौरी.
या वेळी माझ्याक्डे दळण खुपच
या वेळी माझ्याक्डे दळण खुपच भरड आलं आहे , मला पोळ्याच जमेनात म्हणुन शेवटी मी कणिक चाळुन घेतली तर पुष्कळ कोंडा\चाळ निघालय. त्यात बरच सत्व असतं त्यामुळे टाकुनही देता येत नाहीये. त्याच काय काय करता येऊ शकेल?
थालिपिठ्जत वापरता येईल.
आणि कणकेचे लाडु करतात त्यात कणकेऐवजी हा चाळ घातला तर कसे लागतील.
प्लिज कोणीतरी मला उपाय सुचवा बर.
kop मला कड्धान्य करायच्या
kop मला कड्धान्य करायच्या रेसिपि द्या ना? (मला कड्धान्य आवडत नाही)
Pages