Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ विक्रम मध्यंतरी स्वाईन फ्यु
@ विक्रम
मध्यंतरी स्वाईन फ्यु ची साथ होती तेव्हा माझ्या बहिणीने हळदीच्या वड्या केल्या होत्या.
हळदीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त्त असते..
मी तिला कॄती विचारुन ईथे टाकते..
माझ्याकडे मी दिवाळीला
माझ्याकडे मी दिवाळीला पुजेसाठी हळकुंड आणले होते. त्याचा काही उपयोग करता येईल का? अगदी घमघम वास येतो घरात हळदीचा.
धन्यवाद मंजु
धन्यवाद मंजु
माझा अगदीच बेसिक प्रश्न आहे
माझा अगदीच बेसिक प्रश्न आहे खरं तर , पण मी चिकन आणि मटण गेल्या ४- ५ वर्षांतच खायला सुरुवात केल्याने त्याबद्दलचे ज्ञान कमी आहे .
चिकन आणि मटण खिमा घरी कसा करायचा ? खिम्याचे अनेक पदार्थ मी वाचते , पण खिमा कसा करायचा हेच माहित नसल्याने ते पदार्थ बनवताच येत नाहीत .
आमच्याकडे ( जर्मनीत ) चिकन आणि मटण कापून मिळते , त्या पासून खिमा कसा करू हे प्लीज सांगा . मुलांसाठी त्यातील फॅट देणे चांगले का ? कारण पूर्वी मी माझ्या एका मुस्लिम मैत्रीणीला खिमा त्यातील फॅटसकट तिच्या मुलीला देताना पाहिले आहे .
मल प्लिज घावण्यांचि क्रुती
मल प्लिज घावण्यांचि क्रुती सांगा कोणितरी.
केतकी, हितगूज दिवाळी अंक
केतकी, हितगूज दिवाळी अंक २००९मध्ये अनुभूती विभागात 'मधुवली' हा व्हिडीयो पहा
पूनम, भरअपूर दिवसात लिहाय्चहे
पूनम, भरअपूर दिवसात लिहाय्चहे होते. तू मधुवअली ची कृती इथे पण लिहिशील का? व्हिडिओची प्रिंट ऑट काढऊन किचनम्धे नेता येत नाही
जुन्या मायबोलीवर आहे बघ,
जुन्या मायबोलीवर आहे बघ, search करुन पहा.
ब्रेडक्रम्स घरी कसे करता
ब्रेडक्रम्स घरी कसे करता येतील?
शिल्पा ब्रेड मिक्सर मधून
शिल्पा ब्रेड मिक्सर मधून काढायचा. ड्राय ग्राइंडर ची अटेचमेंट लावून. भान्डे ओले असेल तर प्रोब्लेम होइल. पहिले ब्रेड च्या स्लाइसचे ४ तुकडे हाताने कर. मग मिक्षर मधे घाल.
चिकन व मट्न मिन्स म्हणून
चिकन व मट्न मिन्स म्हणून सुपरमार्केट मध्ये फ्रीजर सेक्षन मध्ये मिळेल. नाहीतर खाट्काकडून कापून घ्यायचे. पार भुर्ता बनवितात. नाहीतर बोन्स काढून घरी मिक्षर मध्ये पण ते रिस्की आहे. बोन चे बारीक तुकडे राहू शकतील.
लहान मुलाना खिम्याचे सूप देतात. हल्के मीठ घालून. त्यात गाजर व मटार पण घालता येतील.
मामी , आमच्याकडे चिकन आणि
मामी , आमच्याकडे चिकन आणि मटणाचे मिन्स मिळत नाही ना , म्हणूनच तर प्रश्न पडलाय .
ब्रेडक्रम्स कुरकुरीत असतात
ब्रेडक्रम्स कुरकुरीत असतात ना? नुसता ब्रेड मीक्सरमध्ये लावला तर पिठ नाही का होणार?
शिळा ब्रेड हवा मला वाट्ट
शिळा ब्रेड हवा मला वाट्ट त्यासाठी. किंवा ओव्हन मधे थोडा टोस्ट करुन घ्यावा.
ब्रेड रात्रभर उघडा ठेवला की
ब्रेड रात्रभर उघडा ठेवला की कोरडा होतो, मग मिक्सरमधुन काढायचा.
ब्रेडचं पिठ होत नाही. इंचरवर
ब्रेडचं पिठ होत नाही. इंचरवर फक्त दोन तीनदा ब्रेडचे तुकडे फिरवायचे.
कुरकुरीत हवे असतील तर टोस्ट किंवा जिरा बटर घ्यायचे.
माझ्या ओट्स दोशांचा फार पचका
माझ्या ओट्स दोशांचा फार पचका झाला. स्टील कट ओट्स गरम पाण्यात भिजत घातले. मिक्सरमधे फिरवले तर कुरडयांसाठी चिक करताना गहु मिक्सरमधे काढतात ना तसे काही तरी दिसायला लागले. वास पण आला तसा बहुतेक. सगळं फेकुन दिलं. आता उपमा नाहीतर खीर करुन बघते. दोशांसाठी रोल्स ओट्स आणते.
भरपूर ऊन येत असेल तर ब्रेड
भरपूर ऊन येत असेल तर ब्रेड दोन दिवस उन्हात कड्कडीत सुकवावा!
ब्रेडक्रम्स साठी ब्रेड
ब्रेडक्रम्स साठी ब्रेड वाळवायला कशाला पाहिजे?
सरळ ओवन मध्ये ठेवायचा दोन एक मिनीटे. मग पाहिजे ते ड्राय स्पायसेस घालून वाटायचे कोरडे.
मी माशासाठी साधा रोजचा ताजा ब्रॉउन ब्रेडच्या दोन स्लाईस ओवन मध्ये तसेच कोरडे कुरकुरीत करते मग त्यात ड्राय रोसमेरी, थाईम, बेसील,जिरा पॉवडर घालून वाटते. मस्त २ महिने राहते फ्रीज मध्ये.
नाहीतर टोस्टर मध्ये घालून कुरकुरीत बनवायची स्लाईस, थंड करून घालायची मिक्सीत.
ज्यास्त वेळ ओटस भिजले की असे होते. त्यात मिक्सीत पण वाटले. त्यापेक्षा भिजल्यावर ब्लेंडरने नुसते फिरवले असते ज्यास्त भिजले म्हणून तरी छान झाले असते ओटस डोसा पीठ.
ब्रेडक्रम्स साठी ब्रेड
ब्रेडक्रम्स साठी ब्रेड वाळवायला कशाला पाहिजे?>> प्रत्येकाकडे ओव्हन नसतो आणि एनर्जी पण सेव्ह होते
हो पण ब्रेड झाकुन ठेवला तरी
हो पण ब्रेड झाकुन ठेवला तरी चालतो
मी कॉर्न स्टार्च आणला होता
मी कॉर्न स्टार्च आणला होता गोभी मन्चुरीअन करण्या साठी. मोठा पैक आहे. अजून कशा कशात याचा उपयोग होउ शकतो? कॉर्न स्टार्च म्हणजेच कॉर्न फ्लोअर का?
ब्रेड क्रम्स करायला, ऊन,
ब्रेड क्रम्स करायला, ऊन, ओव्हन, टोस्टर यातलं काहिच नसेल तर मंद आचेवर तव्यावर बीना तेल्/बटर लावता, कडकडीत भाजुन घ्यायचा. आणि मिक्सर देखिल नसेल तर खलबत्त्यात कुटुन घ्यायचा.
हाकानाका
लाजो, अगदी हेच लिहिणार होते
लाजो,
अगदी हेच लिहिणार होते लास्ट रिसॉर्ट म्हणून. तवा (तरी) सगळ्यांकडे असेलच.
माझ्या आजोळी गेली ६० वर्षे
माझ्या आजोळी गेली ६० वर्षे बेकरी चालवली जाते. पाव बटर हाताळताना, थोडाफार चूरा निघतोच. त्याला पण मार्केट आहे, हे आजोबाना कळलं असतं तर त्याना खुपच आनंद झाला असता ( ते हा चूरा कोंबड्याना किंवा लमाणी लोकाना देत असत. )
मला काही करायला सोपे, पण
मला काही करायला सोपे, पण तरीही पौश्टीक असे मेनू सांगू शकाल का?जसे मिश्र पिठाची चपाती, साग चना, दही कोशिंबीर अशा मेनूमधे जवळपास सगळे हवे ते आहारघटक मिळतात्...असे अजून काय करता येइल?
मी कॉर्न स्टार्च आणला होता
मी कॉर्न स्टार्च आणला होता गोभी मन्चुरीअन करण्या साठी. मोठा पैक आहे. अजून कशा कशात याचा उपयोग होउ शकतो? कॉर्न स्टार्च म्हणजेच कॉर्न फ्लोअर का?
कॉर्नस्टार्च म्हणजे मका
कॉर्नस्टार्च म्हणजे मका सत्त्व. आणि कॉर्न फ्लोअर म्हणजे पीठ.
http://www.dishbase.com/recipes/cornstarch/ इथे बर्याच कृती दिसल्या कॉर्नस्टार्च वापरून. पुडींग पण करतात.
संपदा, बोनलेस चिकन ब्रेस्ट
संपदा,
बोनलेस चिकन ब्रेस्ट किंवा मटन लेग फूड प्रोसेसर मधून काढा. मी नेहमी करते. मटणाची फॅट मात्र मुलांसाठीही वाईटच. त्या पेक्षा पायाचे सूप द्या.
मसाला ईडलीची पाकक्रुती कोठे
मसाला ईडलीची पाकक्रुती कोठे मिळेल????
Pages