खेळ: शब्दांचा झब्बू -२ : गावांची नावे

Submitted by संयोजक on 13 September, 2021 - 01:45

गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंपरवडी
समाधान नसण्याचं काय लॉजिक कळलं नाहीये. असाच अंदाज.

या गावातली लोक फक्त हेच एक काम करतात ज्याचं सोल्युशन कधीच निघत नाही. त्यामुळे गावाचे नाव तसे पडले.
स्वरूप - किरकिटवाडी नावाचे गाव आहे. तुम्ही जवळ आहात मात्र.

भुदरगड का (कुठे आहे माहीती नाही, पटकन हेच आठवलं)

दुसरं आटपाडी आठवलं. तिसरं वीटा आठवलं.

मी एडीट करेन हे असं लिहीणं बरोबर नसेल तर.

Pages