खेळ: शब्दांचा झब्बू -२ : गावांची नावे

Submitted by संयोजक on 13 September, 2021 - 01:45

गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रपूर जिल्हा

? ? ? ? व
( गावाचा उच्चार गुगल नकाशानुसार देवनागरीत दिलेला).

एक मुळाक्षर आणि एक जुने वजन माप घेऊन गाव तयार करा बरं.
पर्यायी उत्तर आल्यास शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे

धा मण गाव आहे.
पण पहिले अक्षर मुळाक्षर नाही.

न + वार + गाव >> पर्यायी बरोबर उत्तर.
छान.
अपेक्षित उत्तर
अ वाल गाव होते
( वाल = ३ गुंज)

मूळाक्षर कशाला म्हणतात ? Uhoh

बरं.
लोखंडाचा एक प्रकार तुम्हाला माहीत असेल तर तिथल्या एका गावात एका चेंडूवर आठ धावा निघतात ते कसे हे कोडे राहणार नाही.

जिल्हा आणि गाव दोन्ही फेमस आहेत. क्ल्यु दिल्यास मजा जाईल. दोन्ही ओळखा.

जिल्हा बीड हे बरोबर ओळखले आहे. आता बीड जिल्ह्यातले गाव दुसरा क्ल्यु वापरून ओळखायचे आहे.
चांदोबाची जोडनावे स्पर्धा समजा.

इकडची स्वारी तिकडे गेली काय नि तिकडची स्वारी इकडे आली काय..
या गावांची नावे मात्र बदलत नाहीत. ( एकापेक्षा जास्त उत्तरे अपेक्षित )

गाडगा
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात

गदग

Pages