खेळ: शब्दांचा झब्बू -२ : गावांची नावे

Submitted by संयोजक on 13 September, 2021 - 01:45

गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४अक्षरी ह्या गावाच्या
पहिल्या दोन अक्षरी
होईल तुमचा आदर
तर पहिल्या ४ थ्या अक्षरी कराल पराभव
२ ऱ्या, ४थ्या अक्षरी मग होई नम्र.

काही दशकांपूर्वी गाजलेले एका हत्याकांडात

बरोबर आहे असं समजते
4 अक्षरी. तालुका गाव. सोलापुर.
एका चित्रपटाने खुपच फेमस केलं ह्या गावाला.

भारतातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले सोलापुर जिल्ह्यातील गाव.
त्याच चित्रपटाने ह्या गावाला पण फेमस केले. सोपे उत्तर आहे....

? ? ? ल
एका उपयुक्त अश्या झाडाचे नाव अन्तर्भुत असलेले हे गाव. जि. जळगाव! थोडा पौराणिक सन्दर्भ आहे.

शांत माणूस
एकूण किती नावे अपेक्षित आहेत? >> असं काही नाही. एक नाव दिले तरी चालेल. पण एकापेक्षा जास्त उत्तरे आहेत या प्रश्नाची असे म्हणायचे होते.
आत्ता आलेली सर्व उत्तरे बरोबर आहेत. अजून दीड उत्तर येऊ शकते.
( अक्षराचा वेगळा उच्चार किंवा -हस्व दीर्घाचा फरक दुर्लक्षित असे नाव चालेल. ते अर्धे नाव समजले जाईल).

कालका (हिमाचल)
वाळवा
गाडगा - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात
- कुमार सरांनी दिलेली उत्तरे

राजुरा (चंद्रपूर जिल्हा) - झिलमिल यांचे उत्तर

गदग - मानव पृथ्वीकर यांचे उत्तर

या सर्व प्रतिसादकांचे अभिनंदन

Pages