खेळ: शब्दांचा झब्बू -२ : गावांची नावे

Submitted by संयोजक on 13 September, 2021 - 01:45

गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकोला जिल्हा
? ? ? ? र

मायबोलीवरील एक सदस्य नाव गावात जोडा

xxxर
पहिल्या दोन शब्दावर बरंच पुराण झालंय इथे.
आमच्या मुंबईतलं गाव

नो.
पहिले दोन अक्षरांनी एक खाण्याचा पदार्थ. ज्यावरुन बराच काथ्याकुट केला आपण.

Pages