खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी

Submitted by संयोजक on 5 September, 2021 - 19:02

मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !

१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.

प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)

उदा: श्री गणेशाय नमः


(रात्र काळी घागर काळी या चालीवर Happy )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !

कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल. Happy

हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी भेळ मजला पाहिजे तुजला ही ती पाहिजे का?
माझ्या मनी ची ही इच्छा कोणी तुला सांगेल का?

मी घालतो कांदा थोडा मी घालतो कोथिंबीर
जे मी मुकेपणी ढवळतो एकत्र तू करशील का?

हा खेळ चटण्यांचा सारा फरसाण पण मी घातले
जे लिंबू वरून मी पिळले भेळेत ते मिसळेल का?

कसं काय पाटिल बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?
अहो काय राव तुमी, अहो चष्मे वालं तुमी अहो सिक्स प्याक वालं तुमी
नाय नाय नाय नाय वेण्यावालं तुमी अहो गाऊनवालं तुमी
काल म्हनं तुमी माबोवर गेला
आपल्याच धाग्यावर वाहवाह केला
अन आयडी बदलायचं इसरून गेला
येळेत संपादन जमनार का? अहो जमनार का?

Happy
** पाटिल हे गाण्यात आहे म्हणून तसंच घेतलंय, आयडी चे नाव नव्हे Happy

का ग माझी तुला येत नाही दया
भांड्यांचा पसारा वाढविशी
कपडे धुवूनि कंबर ती गेली
धोबीघाट रोज वाळविशी
हळूच ढकलतो कोचाखाली केर
काढाया बाहेर वाकविशी
मॉप मी मारता नाचते मधुन
पुन्हा करवितेस पुसापुसी

लॉकडाउन हटो, मेड येवो घरी
हीच आता मागणी देवापाशी

##लॉकडाउन अभंग

शांतीरसाने ठेविला माथ्यावर पाय शॄंगाराच्या*,
म्हणतात ज्ञानेश्वरी जिला.
गणेशे ठेवला वरदहस्त ज्यांचे मस्तकावरी,
सारस्वत माबोचे म्हणती त्यांना

लोल!!! याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार Wink

* शृंगार रस हा नवरसांचा राजा मानला जातो परंतु असे म्हटले जाते की ज्ञानेश्वरीत शांतीरसाने, शृंगारच्याही माथ्यावर पाय रोवला. बाकी शृंगार रसाचा आणि ज्ञानेश्वरीचा काहीही संबंध नाही.

बाई गं , 'ठ' आलं की आता, हिंदी अंताक्षरीत ठंडे ठंडे पाणी से किंवा ठाडे रहियो ओ बाकेलाल म्हणायचे. आता ??? Lol

(रात्री लोकांच्या स्वप्नात रातकली येते म्हणे. आमच्या नशिबात रात्र कशी जाते पहा:

चाल - रातकली एक ख्वाब में आयी)

रातकिडा एक घरामध्ये आला
आणि तो किरकिर करू लागला
अपरात्री जेव्हा चिडून उठलो,
दिवा लावला तेव्हा गायब झाला

Proud
('बदन पे सितारे' या गाण्याच्या पहिल्या ओळीची चालच रिपीट करा, अजिबात बदलू नका. )

लेवून ही नवारी मी चालते जरी
पायात येणार, ही भीती असते खरी
थोबाडावर पडून तोंड फुटल्यावरी
जॉगर आणि लेगिंग मग वाटते बरी
Proud

सगळेच Lol
(मला कै जमेच ना बै मराठीतून)

(भरजरी गं पितांबर...)

रातोराती गं धागे चार दिले काढून
कोतबोवरी, गुलमोहोरी ललितलेखन

नको रे आयड्या धागे काढू
बोअर किती होते
मध्यरात्री वा दुपारी
सवड कशि मिळते?

चाल : नको रे कृष्णा रंग खेळू

Pages