खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी

Submitted by संयोजक on 5 September, 2021 - 19:02

मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !

१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.

प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)

उदा: श्री गणेशाय नमः


(रात्र काळी घागर काळी या चालीवर Happy )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !

कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल. Happy

हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगीच बाई माबोवरती घालविला मी वेळ
आली पोस्टगणेशोत्सव डिप्रेशनची वेळ
सर्व खेळले उत्साहाने केली किती मजा
शूर आय्ड्यांनो सज्ज व्हा पहा घ्याया सजा

ने मजसी ने परत मायबोलीला
इंटरनेटा, प्राण तळमळला, इंटरनेटा..

ती 'अंताक्षरी', 'विरंगुळा'। रे
गगो, कट्टा, कॉहॉ वाद सुलता । रे
ते विपू हॉपिंग आता । रे Wink
कविता विभाग मला हाय पारखा झाला ।
...इंटरनेटा , प्राण तळमळला

हे चालेल का? नाहीतर डिलीट करते Happy

लाडूत घाल माझ्या तू तूप चितळेंचे
काजुविना बेदाणे बेसन साखरेचे

चाल डोळ्यात वाच माझ्या

चाल :चल चल जाऊ शिणुमाला Happy

चल ग सजणे गणपतीला
अग अग माबोच्या गणपतीला
जत्रा तिथे भरली जणू
शशक, प्रचि , हस्तकला
बकेट लिस्टां, आठवणींचा तर पूर आला
आपणही खाऊ थोड्या गटांगळ्या
चल ग सजणे ..

जवा नवीन covid हा
लागला lockdown वाढवायला

नावड मला मास्कची मी आर्सेनिक आणलं..
वूहान च्या व्हायरस ला आस मी हाणल
शेजारची ती अमेरिका लागली बोलायला ...जवा लागली बोलायला...
जवा नवीन covid हा
लागला spread spread करायला

Lol

लांबून वाचणे अन् रिप्लाय ना लिहीणे
मी ओळखून आहे रोमातले रहाणे

बोटांस टाईपण्याच का सांग भार व्हावा?
प्रतिसाद एकही अन् का सांग रे नसावा?
हे प्रश्न जीवघेणे उरते जरी पहाणे
मी ओळखून आहे रोमातले रहाणे

छान Happy

आभाळमाया title song

हसती ते लोक
सुटते ते पोट
जळते ती कैलरी
वाया जाते नोट

टाईट होते पँट
चीन होते डबल
वाढते ते फॅट
फुटतो तो बबल

गळतो तो घाम
मोजतो ते वजन
मध लिंबू पाणी
पाहिल मी पिऊन

तेल मीठ वर्ज्य
पोटी फक्त भाज्या
कृश हो रे राज्या

>या जन्मावर<
या माबोवर या धाग्यावर
शतदः प्रेम करावे
शतदः प्रेम करावे
शतदः प्रेम करावे
या माबोवर या धाग्यावर
शतदः प्रेम करावे ||
तुमची ही अफलातून गाणी
आमची अक्षर जुळवाजुळवी
शब्दांचे हे पुल बांधुनी
शब्दांचे हे पुल बांधुनी
स्वप्नरंजनी चंबूही!!!
या माबोवर या धाग्यावर
शतदः प्रेम करावे

वाट पाहुनी धागा थंडावला
प्रतिसादा मागून प्रतिसाद येईना
आयड्या आल्या डोकावून गेल्या
नवा प्रतिसाद दिसंना
मैतरनी सखे मैतरनी
(वाट पाहुनी जीव शीणला)

नवकवी प्रिये मी बावरतो
वाचतो, थोडं लिहितो थांबतो
नवकवी प्रिया मी बावरतो ||
वाटे तुला मी शिघ्रकवी जरी
घेई आधार भार्येमती मी जरी
वाचका वाचुन कला ही फुका जरी....
नवकवी प्रिये मी बावरतो
नवकवी प्रिये मी बावरतो

तो येतो आणिक जातो
येताना आधी धागे काढतो
अन् काढताना शंभरी गाठतो

Pages