मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !
१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.
प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)
उदा: श्री गणेशाय नमः
ह
(रात्र काळी घागर काळी या चालीवर )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !
य
कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल.
हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
ती येते आणिक जाते
ती येते आणिक जाते
ती येताना अंडे आणीते
अन जाताना कोंबडी मागते
(हे मी फार फार पूर्वी म्हणायचो शेजारच्या छोट्या मुलीला खेळताना)
तुझ्या माझ्या संसाराला आणि
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
तुझ्या माझ्या घराला या मेडताई हवी
मेड घरी आल्यावर काय नवीन घडंल
घर समदं नव्यावानी चमचम करील
दिस जातील दिस येतील
मेड येईल घरकाम संपंल
>>>>> कृश हो रे राज्या
>>>>> कृश हो रे राज्या

हायला भयंकर स्फोटक धागा आहे.
हायला
भयंकर स्फोटक धागा आहे. हसून हसून पोटात दुखलं. काय काव्य प्रतिभेचा बहर! हसण्याचा कोटा पूर्ण झाला.
Pages