खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी

Submitted by संयोजक on 5 September, 2021 - 19:02

मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !

१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.

प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)

उदा: श्री गणेशाय नमः


(रात्र काळी घागर काळी या चालीवर Happy )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !

कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल. Happy

हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाढवून दे पगार आणि सुट्ट्या दोनचार
सायबा, अप्रेझलचा होउदे पुनर्विचार

त्या तिथे क्युबीकलात पेंगती कितीक माठ
काय लाडके तुझेच सर्व महाकामचुकार?!

(चाल : मालवून टाक दीप)

रे तुला कसे कळेल?
जे रोज हाफ डे पळती
सांग ना उघडतील का हे तुझे जड नयन

सायबा, अप्रेझलचा होउदे पुनर्विचार...
(मालवून टाक दीप...)

अवांतर: मला कितीतरी दिवस ते 'दूर दूर पारकात बैसली पहाट न्हात' असे ऐकायला येई आणि ती पहाट
भल्या पहाटे कोणत्याश्या पार्कात न्हात बैसली आहे असे चित्र बालमनात येई.

कामचुकार वशील्याची तट्टं, तट्ट फुगली कशी
चुगली करेन मी 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्टची '
मग करशील मुकाट्याने अप्रेझलचा पुनर्विचार
मुकाट्यानं दे कसा सुट्ट्या आणि वाढवुन पगार
अनएथिकल कंडक्ट तुझे मी चालवुन घेणार नाय
नाही पगार वाढवलास तर 'सामो' माझं नाव नाय
Lol Lol Lol

- आत्ताच 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्टचा' कोर्स केला Wink

>>> 'दूर दूर पारकात बैसली पहाट न्हात'
Lol

>>> तर 'सामो' माझं नाव नाय
ते तसंही नाहीच आहे ना? Proud

ये रे गण्या ये रे गण्या
माबोवर उंडारण्या

ट्रोल कर हळूहळू
वेमा येता नको पळू

टाकूनिया लाज वाज
ट्रोलणार ट्रोलणार
भडकवूनी म्होरच्याला
केला बघा वेमा प्यारा (वेमांना प्यारे होणे - आयडी उडणे)

नको नको म्हणताना
मीही बघा झालो प्यारा
घेऊनीया नवावतार
उंडारण्या आलो पहा

Rofl कहर जमलीय ही!

Biggrin

ह्या हो धाग्यावरनं बोलतंय दुसरा धागा कोण काढतो
त्याचे बाष्कळ हो बाष्कळ धागे ते फार
दुसऱ्या धाग्यावरसुद्धा याचीच पिपाणी ट्या ट्या
याचे आयडी हो, डु आयडी सतराशे साठ!

(या गो दांड्यावरनं..
हे एक कोडं पण आहे, ओळखा पाहू)

अरे रात्रभर फार वर्दळ का नाही इथे?
एवढं सगळं सध्या वाचायला असताना मी मुद्दाम कवितेचा धागा शोधेन असं कधी होईल वाटलं न्हवत. गेले काही दिवस इथे फार मजा केली लोकांनी. Happy

ठरणार पार्टी आता, ठरणार पार्टी आता

आला भरुन आता दंडावरील व्रण
उघडोनी शाप *देती जुळली मुहुर्त खूण
धारेत बोलण्याच्या बबलाची भिती नाता

*इंगजी शाप.. म्हणजे इंग्रजीतील अस्सल गावरान मराठी शाप. Happy

रिमझिम वणवा पडे सारखा
ताहो* लाही तो कवळे
आगीच आगी चहूकडेग बाई
जाईल कॅली कुणीकडे?

* लेक ताहो

वरील 'य' अक्षर घ्या. खालील कविता बाद आहे.
--------------
दहा दिशांतून आला आता विनवणीला पूर
थांबवा रे कवड्यांनो, तुमचा कविता प्रसव
जगू द्या सुखशांतीने सर्वांना
करा ना बास शीघ्र कविता
नम्र रसिक देती तुम्हा प्रतिसाद म्हणुनी का
अतिरेकाने आणता त्यांना तुम्ही काकुळीता
नका रे पाहू अमुचा अंत आता
तुमच्या करा पुरे शीघ्र कविता

येतेस ऑनलाइन जेव्हा
जीव हलका फुलका होतो
चैटिंगने विणती धागे
संवाद फाटका होतो
(कैच्या कै..करा ऐडजस्ट Wink )

-नसतेस घरी तु जेव्हा च्या चालीवर

तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या
घेऊ महिन्याच्या गोळ्या
थायरॉईड आणखी कोणाला
चला हो कोलेस्टेरॉल पहायला

तुझी बीपी ची माझी sugar ची
आणखी एक गुडघ्याची
रक्त पातळ होण्याला
गोळी लागते आम्हाला

लयी दिसाची शशक दिलीया
चल आता पुरी करू
चल माबोवर जाऊ..चल माबोवर जाऊ
एक आणा स्मार्टफोन भारी
त्यात नेट पैक पण भरा
तु शशक लिही मि पण लिहिते
जगाला कवतिक दावू
चल माबोवर जाऊ

(चला जेजुरीला जाऊ)

Pages