खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी

Submitted by संयोजक on 5 September, 2021 - 19:02

मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !

१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.

प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)

उदा: श्री गणेशाय नमः


(रात्र काळी घागर काळी या चालीवर Happy )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !

कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल. Happy

हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नसलोस जरी मी तेथे, कुकी क्लाउड मधुनी असतो
संभाषण टिपुनी घेतो, वेक वर्डा स्मरून येतो

करतोय सर्च क्रोमावर हिरमुसून डकडक गो वर
खिडकीशी थबकून साऱ्या सृष्टीला क्रॉल ही करतो.

(चाल: नसतेस घरी तू जेव्हा)

>इथेही (नेहमीच्या अंताक्षरीसारखा) शेवटी वारंवार 'ल' येतोय. तेंव्हा गरज भासल्यास 'ल' च्या आधीचे अक्षर घेण्याची मुभा संयोजक देतील का?
@गजानन, @सामो
हरकत नाही

तो उडुन गेला तेव्हा माबो गढूळली होती, चिखलात वराहाने कला दाविली होती||१||
कित्येकांना त्याने जेरीस आणले होते. भल्याभल्यांचे संयम पुरते चिरडले होते||२||
मोद नका रे मानू, तो गेला वाटे म्हणुनी, परतोनी येईल बेक्कार तो ड्यु आयडी||३||
निर्लज्ज असे तो आणि वेळही बहु त्यापाशी, 'दुर्लक्ष' ही एक मात्रा कळेल त्या डुकरासी||४||

अरे बाप रे! हे काय सकाळी सकाळी? Proud

सकाळी सकाळी नको शिवीगाळी
तुझी श्लोकस्तोत्रे कुठे लुप्त झाली?

(चालः पहाटे पहाटे मला जाग आली)

Proud

हाहाहा स्वाती Lol Lol

लिहीत होते माझ्या ड्यु आयडीने असे वाटलेले
म्हणुन बेक्कार लै मी शिव्यांचे रतिब घातले होते
अचानक पोस्टल्यावर दिसला मूळ माझा आय डी
आणि झाले मजला ऐसे की आई धरणी घे गे पोटी,

ह.पा. Happy

टांग दे याला नि टांग दे त्याला
टांग सगळ्यांनाच टुंग
उठणार नाही, सोफ्यावर पडून राहुदे मला!

एकच वीकेन्ड दोनच वार
हा काय न्याय झाला?!

चाल : टांगटिंगटिंगा

(अर्जुन उवाच - )

लटलट लटलट लटलट लटलट
अंग कापतं, मन ते भांबावतं
हातातुन गांडीव ही गळतं
कृष्णा रे, भावा रे, रे दादू रे

भीती नसे मृत्यूची, परी मारण्याची, समर-समयी
भावांची वये कवळी
दिसणार, हाणणार, मारित शस्त्र ती सगळी
जरी माझीच भाऊ-मंडळी
दिसणार, हाणणार, मारित शस्त्र ती सगळी
युद्धात जरी जिंकलो, वाहतील रक्तांचे पाट,
शंकुनी (शंका येऊन) मन ते भांबावतं,
हातातुन गांडीव ही गळतं
कृष्णा रे, भावा रे, रे दादू रे

चालः लटपट लटपट तुझं चालणं

राजसा, फरशी जरा पुसा, घ्या नवा वसा क्वारंटिनी बाई
एकटी मरू कुठेकुठे पाहा तरी काही

लई काम, वर्क फ्रॉम होम
तरि न आराम दोन मिनिटांचा
पोरं कंटाळली की घरी, रमवा जिव त्यांचा
राजसा…

चाल : राजसा, जवळी जरा बसा

सांग सांग भोलानाथ, कोविड संपेल काय?
तिसरी लाट येण्याआधी वॅक्सीन मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ....

भोलानाथ कोविन वर स्लॉट मिळेल काय?
१८+ वाल्यांनाही वॅक्सीन मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
हॅलो आधी ॲड अजून ऐकायची कितीदा?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ उद्यातरी काही ठरेल का?
रेल्वेप्रवास केव्हा कधी? हे कळेल का?
सांग सांग भोलानाथ...

(जरा जुनीच रचना आहे. पहिल्या डोससाठी जूनमध्ये स्लॉट मिळतच नव्हते तेव्हा वैताग मोड ऑन होऊन भोलानाथालाच कामाला लावले होते. भोलानाथही "स्लॉट देतो पण विडंबन आवर" मोडात जाऊन कामाला लागला असावा बहुतेक कारण एका रात्रीत जादू होऊन स्लॉट मिळाला होता. कविन मांगे एक स्लॉट भोलानाथ देई दोन स्लॉट अस काहीसं होऊन माझ्यासोबत लेकीलाही स्लॉट मिळून गेला होता Lol )

थांब ना रे वेमा
अंतरी वाजती भीतीचे नगारे
आणि घाबरती गुन्हेगार सारे
वाटते उडतो आयडी आता
नको उडवू ना रे वेमा
थांब ना रे वेमा

(चाल: सांग ना रे मना )

- माझे राणी माझे मोगा

माझे लेख माझेच लेख , वरती आणा ग बाSSSई!
नको अन्य कोणाला संधी,माझ्या लेखांचीच चांदी
माझे लेख माझेच लेख , वरती आणा ग बाSSSई!
प्रत्येकाला थँक्यु म्हणेन, प्रत्येकाचे आभार मानेन
तेव्हा माझ्याच लेखांची मोनोपोली खेळा ग बाSSSई!

इथेच आणि या मायबोलीवर
आय डी चा जातो वेळ
सख्या रे किती रंगला शीघ्र अंताक्षरी चा खेळ

चाल..इथेच आणि या बांधावर

अमितव तुम्ही कमी कविता टाकलेल्या आहेत पण मेहनत घेउन, मीटरमध्ये बसवुन टाकलेल्या आहेत. छान.

लटपट लटपट तुझं टाईपणं गं अशुद्ध लेखनाचं
बोलणं गं वेगळ्याच ष्टाईल चं
डू आयडी गं
डू आयडी गं
(ळ साठी ल घेतला आहे )

गोमू माबोवर जाते हो नाखवा, तिला ग्रूपातले बाफ हो दाखवा

गुल्मोहोराचे हिरवे हिरवे मळे
खेळाबीळांचे बाफ सगळे
राजकारणापासुन तेवढं वाचवा

दिसतात आयडी साधेभोळे
तरीबी उघडे ठेवा डोळे
इन्टरनेटावर जपून फिरवा

वाढ इथे वजनाची संपली जणू
निथळतो घामानी सावळा गणू

आजूबाजूच्या मेदाने वेढली ही गोलाई
चिंतनात बसली ग गणुची ती माई
फुगूनिया आली आहे मोटापा जणू

चाल .. वाट इथे स्वप्नातील

जन्मला, जगला, एरंडासारखा वाढला शेवटी मेला
दिव्यता न भव्यता न खोली त्याच्या क्षुद्र जीवनाला
करोडो जंतु जगात येती जाती काय त्यांची गणती
मार्तंड होता न आले तरी व्हावे लहानशीच पणती
हीच खंत असे की फार फार शेवटी होते ही उपरती

सगळे प्रयत्न मस्तच!
चाल - मी ओळखून आहे ..
( देवाला उद्देशून :))
तू जाणोनि आहेस
करोना काय चीज आहे
कोण ना लसवंत,
कोण लसवंत येथे आहे

मज पामरा कश्या कळाव्या
अनंत लीला तयाच्या ( करोनाच्या )
कोणी न जाणे आदि अन कधी अंत याचा
दिनरात येथे, मी चिंताग्रस्त आहे !

Pages