खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी

Submitted by संयोजक on 5 September, 2021 - 19:02

मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !

१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.

प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)

उदा: श्री गणेशाय नमः


(रात्र काळी घागर काळी या चालीवर Happy )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !

कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल. Happy

हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है!
>>>>हिजवीण नको प्रतिसादांच्या राशी
इथलीच धुमाळी खाशी
Happy Happy

लावोनी एक एक धाग्याची दिवटी,
माबोवर पेटली प्रतिसादांची शेकोटी||१||

अन्यत्र वाजते हिंव तर्क-कर्कशी,
रसिका ये तेव्हा मायबोलीच्या कुशी ||२||

इथे नेहमीच होइल तुझे स्वागत,
परंतु खाल्ल्या मीठास तूही जाग ||३||

पेर इथे तू एक एक तव लेख,
मिळतील प्रोत्साहनपर अनेक प्रतिसाद ||४||

जाशील कुठेही येशील इथेच परतुनी
ही माझी एका रसिकाची भविष्यवाणी ||५||

कोणी पाया पडायच्या आत, बास करते हा आता हा अत्याचार. Wink

अत्याचार नाही, अजून येऊ द्या!

.
( नोकरीशोध मोहिम.. HR ला उद्देशून )
नेटवरच्या रेझ्युमी वरुनी फिरो तुझा हात
शेवटचा इंटरव्ह्यू माझा तुझ्या कंपनीत

सर्फिणे व्यर्थ हे आता रे, बहु जिवलग गमते चित्ता रे तुज सरित्पते जी सरिता रे
तद्विरहाची शपथ घालतो तुजला >> स्वाती Happy

मायबोलीला तुम्हांसी परत नेणार्‍याची बायको पण सरिता आहे का? (सरित्पते)

हाहा ह.पा., बरोब्बर चोरी पकडलीत! Happy
त्या ओळीपर्यंत येईतो माझ्याकडचा वेळ आणि धीर संपला होता. Proud
हे कसं आहे बघा:

जरि आंग्लभूमित निपजली रे, हृदयात मराठी जपली रे, जगभरात खूण उमटली रे
हपिसात, घरी, वाचत राहिन तिजला…
Happy

शांत माणूस यांचं अंत्याक्षर धरून:

तुज भातवरण हे करणं
तुजपाठि सतत आवरणं
तव हास्य पाहता हरणं पार ते हरणं
बाळ गोजिरे, बाळ तान्हुले!!

>>तान्हुले<<
(दे मला गे चंद्रिके )

लांब त्या वेणीत दिसली उ अशी
लांब त्या वेणीत दिसली उ अशी
घे फणी, अन केस टाक विंचरुनी
लांब त्या वेणीत दिसली उ अशी..!

लेकीस बोलली आई
अंघोळ करुन घे बाई
तिष्ठलेत तुझिया पाई
गणु बाप्पा अन् गौराई

शिंकले आधी कुणी, तू का मी?
तू का मी?

तू शिंकता मी रे तुला पाहिले
तू बघता मीही होते शिंकले
त्या शिंकण्याने त्रास वाढता
त्या त्रासाचा तू अर्थ सांगता

त्रासले आधी कुणी? तू का मी?
तू का मी?

(विथ ड्यू रिस्पेक्ट..
चालः माए नि माए मुंडेर पे तेरी)

माये गं माये ह्या ढेरपोटावर फाटून जाई धागा
लावित त्यावर ठिगळ कितीदा, संपून गेला तागा

टँ टँ टॅणॅणॅणॅ टॅणॅणॅणॅ टॅण
टॅटँ टँ टॅणॅणॅणॅ टॅणॅणॅणॅ टॅण

(इथे सनई वाजते)

चंद्राबाई या, इंद्राबाई या,
या या, कोट शिवूया

टँ टँ टॅणॅणॅणॅ टॅणॅणॅणॅ टॅण
टॅटँ टँ टॅणॅणॅणॅ टॅणॅणॅणॅ टॅण

चंद्रासारखी व्यापून होती
गोल स्पेस ही काया,
चौथे बटण लावण्या लागे
पोटही आकुंचाया

सैल टाकिता अंग जरासे ताण होतसे जागा
लावित त्यावर ठिगळ कितीदा, संपून गेला तागा

हपा Rofl

गोलगप्पा गोलगप्पा
खाऊ रे बाप्पा

गोलगप्पा गोलगप्पा
खाऊ रे बाप्पा

गपागपा गगपागपा
खाऊ रे बाप्पा

होSSSS चामट हे गोलगप्पे
होSSSS चामट हे गोलगप्पे
गोलगप्पा गोलगप्पा
नको रे बाप्पा
आता आपण चल जाऊ
खाऊ उत्तप्पा

(दादीअम्मा दादीअम्मा )
पापड्लाट्या पापड्लाट्या लाटुया (टून्ग टुन्ग)
पापड्लाट्या पापड्लाट्या लाटुया
एक लाटी लाटुया, एक लाटी खाऊया
पापड्लाट्या पापड्लाट्या लाटुया!!

पटपट सार्‍या मुलीच झाल्या , कोकलती काका !
काकुच्याही उरी श्रीहरी
जन्मा यावा एकदातरी
एक अचानक पुत्रच व्हावा
वाटे काकाला SSS
पटपट सार्‍या मुलीच झाल्या , कोकलती काका !
(चाल घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा )

येता जाता कुणी वदतसे आले आले पहा
श्रीहरी आले मथुरेला
अर्थ त्यांचा कसा कळावा कुरुप लंगडीला
कंसाच्या दासीला
जरी नकळे तिला काय लागले आज हे पिसे
घेउनी शीतल चंदन उटणे कुब्जा निघत असे

<पुढचे येत नाहीये>

(चाल - सांगा ह्या वेडीला, चित्रपट - सांगत्ये ऐका)

(ह्या प्रतिसादाच्या आधी कुणीतरी झटपट पैसे कमवा लिहिलेली जाहिरात टाकली होती. वेमांनी डिलीट केली हे बरेच झाले; पण आता खाली असं का लिहिलं आहे ते लक्षात येणार नाही म्हणून हे स्पष्टीकरण)

सांगा ह्या वेड्याला, ह्या आंग्ल तंत्रज्ञाला
इथे जाहिराती नकोश्या कुणाला

इथे वाटण्या मोद दोन्ही करांनी
आले सर्व माबोकरी काव्यपानी
ते ना कळता, विषयाला -
सोडून, दुसऱ्या गोष्टीला
नवा रंग येईल, चर्चा कशाला?
सांगा ह्या वेड्याला

Pages