वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> पण कुठेतरी मनात काहीतरी खुपते. मग चर्चा करायची नि आपला मुद्दा इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न करायचा. किंवा चार्वाकाचा संदर्भ द्यायचा!

वा झक्की वा! एकदम बरोब्बर!

ज्या लोकांना आपण बदलावे अशी इच्छा नाही, त्यांनी कृपया येथे लिहु नये. वाचु तर मुळीच नये. नुसता मनस्ताप होईल. केवळ मनोरंजन होईल म्हणुन वाचायचे असेल तर तुमची मर्जी.

... मागील भागावरुन पुढे:

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

मला हा बा.फ. चालू करणार्‍यांन्ना एक प्रामाणिक प्रश्ण विचारायचा आहे: तुम्ही तुमच्या choice शिवाय हिंदू धर्मात जन्माला आला असाल तर धर्मांतर करून, विशेषतः ईस्लाम धर्म स्विकारून त्या धर्मातील सो कॉल्ड अंधश्रधांबद्दल असेच चर्चासत्र का नाही सुरू करत? हिम्मत आहे का? अमेरीकेत न राहता ईस्लामिक देशात राहून हे करून दाखवलेत तर "अजी मी ब्रह्म पाहीले" म्हणत अनेक हिंदू बेहोष होवून नाचतील.

अनुमोदन.... मामीनादेखील अनुमोदन.... कर्मकांडं महत्वाची नाहीत. मर्मकांड समजले/आचरले की नाही हे महत्वाचे...

>>मला हा बा.फ. चालू करणार्‍यांन्ना एक प्रामाणिक प्रश्ण विचारायचा आहे: तुम्ही तुमच्या choice शिवाय हिंदू धर्मात जन्माला आला असाल तर ..

हिंदु धर्मातल्या नव्वद चांगल्या गोष्टीबद्दल मला अभिमानच आहे. पण थोडी अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना थेट धर्म सोडून जायचे आवाहन करणे अयोग्य आहे. मुळात इस्लाम हा आपला आदर्श आहे का? मग उठसुट त्याचेच उदाहरण का? हिंदु धर्माचे व्यापक सर्वसमावेशक रूप सोडूनकट्टर इस्लामचे अनुकरण करायचा अट्टाहास का? राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंद केली. त्या ऐवजी त्यांनी हिंदु धर्म सोडायला हवा होता का? पुरोगामी मण्डळींनी देवदासी प्रथा जवळ जवळ बंद पाडली. ते खरे हिंदु नव्हेत?

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.>>>

२) आणी ४) कसे ठरवणार? काही लोकाना केवळ काहि दुसरे लोक एका प्रकारे विचार करतात ह्याचाच त्रास होतो. एखाद्या वेळेस जगाला त्रास देणारि गोष्ट जरि असलि तरी ती आवश्यक असु शकते ( अंधश्रद्धा निर्मुलन). पुन्हा संपुर्ण अनावश्यक असे काय हे कसे ठरवणार. त्यापुढे कदाचीत माझे आवश्यक तुझे अनावश्यक असु शकते. ह्यातुन जर रिसोर्सेस कमी असतील आणि माझ्या आवश्यकला ते लागत असतील तर तु ते अनावश्यक पणे वापरले जातात असे म्हणशील ते रोखायला तू काय करशील वा ते मिळवायला मी काय करेन? हे प्रश्ण अंधश्रद्धेच्या पल्याड जातात. हे मतभेद कसे सोडवायचे? केवळ ह्या मत्भेदांचा समाजावर विपरीत (चांगलाही) परिणाम होउ शकतो / होतो.

सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेने समाजाचे नुकसानच होते हा तुझा प्रस्ताव (तसा असेल तर) मला पटत नाही. काही अंधश्रद्धा नक्कीच उखडल्या पाहिजेत हे मात्र मी मान्य करेन. वैयक्तीक मी श्रद्धाना (अंध सुधा) एक प्रकारचे मायावी (virtual) सांगाडे ( constructs) मानतो ज्याचा उपयोगही होउ शकतो आणि अपायही आणि हे वापरणार्यावर अवलंबुन आहे. जगातून सगळा राग, द्वेश मत्सर घालवून लावला पाहिजे तरच जग एक नंदन्वन होइल असा काहीस तुला म्हणायच आहे का अंधश्रद्धांबाब्त?

जेंव्हा मी विमानातून प्रवास करतो तेंव्हा ते विमान कोसळणार नाही हा जो विश्वास असतो त्याला काय म्हणायचे श्रद्धा की अंधश्रद्धा ? काहीही म्हटले तरी त्याचा मला उपयोग होतोच ना Happy शांत पणे झोपु शकतो विमानात ! मे बी हि तु सुचवलेल्या वर्गवारीतील (१) आवश्यक ह्या विभागात मोडणारी (अंध) श्रद्धा असावी.

तुम्हि सुचवल्याप्रमाणे माझि पुस्तकास पाय लागताच नमस्कार करणेचि वैयक्तिक "अन्धश्रध्दा" दिलेल्या क्याटेगरिन्मधे बसवण्याचा प्रयत्न केला. मला नम्बर एकचि वाटलि पण आपण एक्स्पर्ट ओपिनिअन घ्यावे म्हणुन माझ्या एका बुप्रावादि कलिगला विचारले तर तो नम्बर ४ चि म्हणला. धर्माचे काहि सन्केत ज्यान्च्यामुळे इतरान्ना काहि त्रास होत नाहि ते जपावेत असे आपले माझे मत हे. काहि परम्परा, रुढि, चालिरिति, रिवाज जपायच्या म्हनुन जपल्या पाहिजेत. त्रास्दायक, अन्यायकारक गोश्टि फेकुन द्या अगदि तातडिने फेकुन द्या. पण आपल्या सन्स्क्रुतिचा एक ठेवा म्हणुन काहि गोश्टि जतन करायला पाहिजेत. सन्स्क्रुति म्हणजे माणुसकि वैगैरे सर्व मान्यय हो पण या जगात भिन्नभिन्न सन्स्क्रुति हेत आनि त्यान्च्या भिन्नभिन्न पध्दति, चालिरिति हेत. शेकडो वेगळ्या सन्स्क्रुति हे सार्या मानवजातिचे वैशिश्ट्य हे. आपल्या सन्स्क्रुतित दगडात देव मानला जातो, पुस्तकान्ना पाय लागला तर नमस्कार करतात, सुर्याला देव मानतात आनि त्याचे आभार मानतात, वडिलधार्यान्ना पाय लागला तर नमस्कार करतात अशा शेकडो छोट्याछोट्या गोश्टिन्मुळे सन्स्क्रुति घडते. हे पाळाच असा आग्रह नाहि पन ते अ‍ॅबॉलिशच करा हा आग्रह कशासाठि ? उद्या समजा विज्ञानाने सिध्द केले कि चराचरात देव नाहि, चैतन्य नाहि , काहि नाहि तेव्हासुध्दा मि म्हणेन कि ते मान्य करा आनी तरि या काहि प्रथा पाळत जाउ. अहो, सगळे जग फक्त 'सॉरि' म्हणायला लागले तर अशा एकसुरि जगात राहान्यात मला तरि इन्टरेस्ट नाहि बोवा Happy हिटरोजिन्नसपना का काय म्हणतात तो बरा, सगळे होमोजिन्नस झाले तो उसमें कुछ मजा नहि भइ Happy

<<मला नम्बर एकचि वाटलि पण आपण एक्स्पर्ट ओपिनिअन घ्यावे म्हणुन माझ्या एका बुप्रावादि कलिगला विचारले तर तो नम्बर ४ चि म्हणला.>>
माझ्या मते नं २ सर्वात जास्त महत्वाचे आहे. बुप्रा वाद्याला न. ४ वाटत असेल, नि तुम्हाला १. पण नं २ च्या कसोटीवर तुम्हाला "वैयक्तिक" काय वाटते?

व्वा झक्की, गाडी एकदम सुसाट!

>>>१)अमुक एक मार्गानेच देव, स्वर्ग, मोक्ष प्राप्त होईल असे नसून अनेक मार्गांनी ते साध्य होईल. अगदी कधीहि कुठलाहि धार्मिक नियम न पाळता सुद्धा. फरक फक्त जीवनाची क्वालिटि काय, नि मोक्ष प्राप्तीला वेळ किती लागेल याचा. म्हणूनच धर्मपालनाची नेहेमी 'इहलोकी कल्याण व परलोकी गति' अशी जाहिरात केली जाते.

>>>२)क्रोध व गर्व या दोन गोष्टी यावर संयम ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर इतरहि दुर्गुणांना संयमित करणे आवश्यक आहे. नंतर देवाच्या मागे लागा, अथवा संगित शिका, अथवा अंतराळशास्त्र शिका, त्याचा उपयोगच होईल.

>>>३)मी तसे केले, आता मी जे करतो ते जाणून बुजून, शक्यतो श्रद्धापूर्वक करतो. पण देवांच्या मूर्ति घेऊन जागोजाग भटकत नाही. घराबाहेर असलो तर मनातलया मनात देवाचे स्मरण करून माझे समाधान होते. शेवटी सर्व माझ्या समाधानासाठी. मृत्यूनंतर मला मोक्ष मिळावा म्हणून नाही, कारण भगवंतांनी सांगितले आहे निष्काम कर्मयोग! खुद्द तुकारामबुवा सुद्धा म्हणाले, भक्ति करण्यातच आम्हाला आनंद आहे, मोक्ष नको, खुशाल पुनः पुनः जन्माला घाला, आम्ही भक्तीच करत बसू!

झक्की, हे वाचून लिहण्याचा मोह टाळू शकलो नाही..

१)अमुक एक मार्गानेच देव, स्वर्ग, मोक्ष प्राप्त होईल असे नसून अनेक मार्गांनी ते साध्य होईल.

हे खर आहे मित्रा,पण सहजमार्गाने जाणाराच 'विवेकी' समजला जातो..उलट अर्थाने घेतल्यास.. ज्याचा 'सदविवेक-वैराग्य' जागृत असेल त्यालाच 'सहजमार्ग' मिळतो!

२)अगदी कधीहि कुठलाहि धार्मिक नियम न पाळता सुद्धा.
नाही! अंतःशुद्धी बरोबर बाह्यशुद्धि महत्वाची! याकरिता जातीधर्माच बंधन नाही असे म्हणता येईल!

३)क्रोध व गर्व या दोन गोष्टी यावर संयम ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर इतरहि दुर्गुणांना संयमित करणे आवश्यक आहे. नंतर देवाच्या मागे लागा.मृत्यूनंतर मला मोक्ष मिळावा म्हणून नाही, कारण भगवंतांनी सांगितले आहे निष्काम कर्मयोग!

नाही! क्रोध आणि गर्व, अस ठरवून संयमीत करता येत नाहीत. अस जर झाल असत तर सगळच सोप झाल असत. अंत:शुद्धी चा मार्ग मिळाल्यानंतर, तो क्रमीत असताना या गोष्टी आपोआप सुटतात आणि मगच 'भगवंतांचा-निष्कामकर्मयोग' साधतो, अन्यथा अन्य कोणत्याही गोष्टींनी हे शक्य नाही.

४) तुकारामबुवा सुद्धा म्हणाले, भक्ति करण्यातच आम्हाला आनंद आहे, मोक्ष नको, खुशाल पुनः पुनः जन्माला घाला, आम्ही भक्तीच करत बसू!

हे श्रीतुकाराममहाराजांचे विधान, आत्मज्ञानप्राप्तीनंतरचे आहे, हे लक्षात घ्यावयास हवे! यानंतर पुढची अवस्था म्हणजे , अद्वैतज्ञानानंतर येणारी, निखळ, सप्रेम-पराभक्तीची अवस्था!आणि ही अवस्था ठळकपणे दर्शविणार हे विधान! त्यांनी 'आम्ही भक्ती करू' अस सांगितलेल नाही, उलट 'भक्तीच दान' मागितल आहे, अर्थात अशी 'भक्ती दानात देणारा (संत-संग)' ही भेटला पाहीजे.म्हणजे 'भक्ती करणे' हेनाही तर, 'भक्ती होणे' हे अपेक्षित आहे.(एकात 'मी' कर्ता असा 'भाव' आहे,तर दुसर्‍यात 'मी' चा 'अभाव' आहे.)

संताची विधान अशी मधूनच अभ्यासू नयेत, असा संकेत आहे. नाहीतर 'पराचा कावळा होतो' आणि .....!

मित्रा, माझा हे लिहण्याचा उद्देश समजण्याइतका तू नक्की मोठा आहेस, हे मला माहीत आहे आणि योग्य गोष्टी करिता स्थळ आणि काळ याची पर्वा करू नये.

आता अस्चिग यांचे हे खालील विधानच घे,

>>>अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर अशीही त्यांनी केलेली सुरवातच चुकीची आहे. मायेचा कारभार स्वतःपासून सुरू होतो. 'मी' म्हणजे 'देह' म्हणायला लावणारीच दुसरी कोणी नसून 'माया' आहे. हे अगोदर 'स्वानुभवाने' पटायला हवे, नाहीतर सगळाच विचारांचा गोंधळ होतो!आणि मायेचा खेळ असाच सुरू रहातो..!

धन्यवाद!

सावट, 'बाकी सगळे माया' हा एक कल्पनाप्रयोग होता. (१) स्वतःसकट सगळे माया, (२) स्वतः सोडुन इतर माया, आणि (३) कुणीही माया नाही हे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. या पैकी कोणतेही सिद्ध करता येत नाही. एखाद्या मॉडेल वर जास्त लोकांचा विश्वास आहे, किंवा जास्त काळपर्यंत टिकुन आहे म्हणु फारसा फरक पडत नाही. असो. तो या बाफ चा विषय नाही.

ढबु यांचा प्रश्न. मी ते क्रमांक २ मध्ये ठेवीन जोपर्यंत असा नमस्कार नको असणार्यावर तुम्ही जबरदस्ती करत नाही (किंवा त्यामुळे कुणाला reasonable त्रास होत नाही)

या गोष्टी इथे सापेक्ष होऊ लागतात (उदा. reasonable म्हनजे काय?) त्यामुळे पेशवा म्हणतो त्याप्रमाणे या गोष्टि सारासार विचारांनी ठरवायला हव्या. कोणते प्रश्न किती महत्वाचे वाटतात यावरुन हे ठरते. आप्तांचे मन जपावे, पण त्यामुळे देशाचे किंवा पृथ्वीचे भवितव्य धोक्यात येणार असेल तर नक्कीच नाही. तसे कशाकशाने होऊ शकते याचाही विचार करणे आलेच. बदलत्या कालाप्रमाणे परिस्थिती बदलते. त्याप्रमाणे आपण आणि आपल्या प्रथाही बदलायला हव्या. यातील बहुतांश प्रथांची एकएककरुन गेल्या दोनहजार वर्षात भर पडली आहे.

असे म्हणणारे अनेक बहाद्दर सापडतात की या प्रथांना वैज्ञानीक आधार आहे, त्याचा शोध व्हायला हवा. एकतर तसा आधार सांगणारे दिसत नाहीत, किंवा ते आधार वैज्ञानीक नसतात. गम्मत म्हणजे या प्रथांना वैज्ञानीक आधार आहे असे म्हणणारे त्याच श्वासात असेही म्हणतात की प्रत्येक गोष्ट विज्ञानाला तपासता येत नाही.

आपण (म्हणजे मी) पुन्हा भरकटतो आहे.

पर्यावरणाशी संबंधीत अनेक प्रथांचा वर उल्लेख झाला. त्यावर बोलुया का?

> सामाजिक म्हणाल तर निर्माल्य, मूर्ती, (इतकंच काय मेलेली गुरंढोरंसुद्धा) 'पवित्र' जलाशयांत 'विसर्जित' करणं, दसर्‍याला रस्त्यावर आपट्याच्या पानांचा आणि वटपौर्णिमेला वडाच्या डहाळ्यांचा 'रबरबाट' घालणं (पटत नसेल तर या दिवशी दादर(प) स्थानकाबाहेर जाऊन बघा.) हे समाजाला आणि/किंवा पर्यावरणाला हानिकारक नाही का? त्यावेळी मूळ कल्पना 'ही झाडं लावावीत / जगवावीत' ही असते हे माहीतच नसतं किंवा विसरलं जातंच की नाही?

यातील गोष्टि मी (४) अनावश्यक मध्ये टाकीन. हे सण साजरे करा (करायचे असल्यास) पण पर्यावरणाला साजेसे alternatives शोधा.

दानधर्म करा, पण सपात्र करा, गरजु विद्यार्थ्यांना करा. ....

समाजाला, देशाला, पृथ्विला हानिकारक असलेल्य गोष्टींची यादी बनवली तर त्यातुन मी काय करायला नको ते समजु शकेल. मला माझ्या 'अंध'श्रद्धा दिसु शकत नाहीत कारण माझ्याकरता त्या अंध नसतात. पण जर सकारण कुणी मला काही सांगीतले तर फायदा होऊ शकेल. कॅटॅगरी (४) अनावश्यक आणि समाजाला, देशाला, पृथ्विला हानिकारक.

सामाजिक म्हणाल तर निर्माल्य, मूर्ती, (इतकंच काय मेलेली गुरंढोरंसुद्धा) 'पवित्र' जलाशयांत 'विसर्जित' करणं, दसर्‍याला रस्त्यावर आपट्याच्या पानांचा आणि वटपौर्णिमेला वडाच्या डहाळ्यांचा 'रबरबाट' घालणं (पटत नसेल तर या दिवशी दादर(प) स्थानकाबाहेर जाऊन बघा.) हे समाजाला आणि/किंवा पर्यावरणाला हानिकारक नाही का? त्यावेळी मूळ कल्पना 'ही झाडं लावावीत / जगवावीत' ही असते हे माहीतच नसतं किंवा विसरलं जातंच की नाही?

अजिबात हानिकारक नाही....... लहान खेड्यात रहाणार्‍या लोकानी सगळ्या हिन्दु प्रथा त्यांच्या पद्धतीने लहान प्रमाणात सुरु ठेवल्या तरी पर्यावरणाचे काडीमात्र नुकसान होणार नाही... होणारा कचरा आणि तोडलेली चार पान फुले यांचा विचार करायला निसर्ग समर्थ आहे.

प्रश्न आहे, तो तालुका पातळीपेक्षा मोठ्या शहरांचा. तिथे लोकवस्ती जास्त असते, वेळ कमी, पैसा जास्त , सण साजरे करायला रस्ते अरुंद आणि प्रत्येक गोष्ट कृत्रिम करून ती विकत घेणे ही लाईफस्टाईलची गरज असते. तिथे रबरबाटच होणार आणि गणपतीचे तुकडे बीचवर सापडणार..... खेड्यात मर्यादित लोकसंख्या आणि अमर्याद निसर्ग असल्याने असले हास्यास्पद प्रकार तिथे होत नाहीत. गणपतीचा कचरा दसर्‍यापर्यंत तसाच पडलेला आणि दसर्‍याच्या पानानी दिवाळीतही गटारे तुंबलेली ... असले प्रकार खेड्यात होत नाहीत...... लोकस्म्ख्येच्या घनतेमुळे हे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी हिंदु प्रथाना नावे ठेवणे हास्यास्पद आहे.... अनिसवालेही हाच मूर्खपणा करत असतात.. कचरा निर्माण करा, रस्ते गटारे तुंबवा असे काही कोणताच धर्म साम्गत नसतो, पण तरीही या प्रश्नाना धर्म (हिंदु धर्म) जबाबदार मानून ते झोडपत असतात....

>>>>>>>समाजाला, देशाला, पृथ्विला हानिकारक असलेल्य गोष्टींची यादी बनवली तर त्यातुन मी काय करायला नको ते समजु शकेल. मला माझ्या 'अंध'श्रद्धा दिसु शकत नाहीत कारण माझ्याकरता त्या अंध नसतात. पण जर सकारण कुणी मला काही सांगीतले तर फायदा होऊ शकेल. कॅटॅगरी (४) अनावश्यक आणि समाजाला, देशाला, पृथ्विला हानिकारक.

संघटित अंधश्रद्धा या ४ क्रमांकाच्या कॅटेगरीत येऊ शकतील काय ? उदाहरणार्थ,

येशू हा देवाचा पुत्र एका कुमारी मातेच्या पोटी जन्माला आला. (मॅथ्यू १:१८) येशूची प्रमुख शिकवण ही की जो कोणी त्याचा व त्याच्या बापाचा स्वीकार करेल त्याचे सारे पाप माफ होऊन तो स्वर्गात जाईल व बाकी सारे जे त्याचा स्वीकार करणार नाहीत वा त्याच्यासह इतर देवांचाही स्वीकार करतील ते नरकाच्या आगीत होरपळतील. (मार्क १६:१६) येशूला क्रूसावर लटकावून ठार केल्यावरही तीन दिवसांनी तो पुन्हा थडग्यातून उठून जिवंत झाला, आणि खास शिष्यांना गुप्तपणे भेटून त्याने आज्ञा दिली की आकाशात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहेत यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना अंकित करा, बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे त्यांना बाप्तिस्मा द्या ( मॅथ्यू २८:१८,१९)

(१) आज जगात सुमारे एकशे नव्वद कोटी लोक या अंधश्रद्धेला बळी पडले आहेत. आणि अ‍ॅमवेच्या चेनप्रमाणेच अजून सावजे शोधत जगभर पसरले आहेत.
(२) युद्ध, रोगराई, निसर्गाचा प्रकोप अशा कुठल्याही कारणापेक्षा या अंधश्रद्धेपोटी जगात सर्वात जास्त बळी पडले आहेत.
(३) या समूहाच्या साधारण अशाच प्रकारची पण अधिक जहाल संघटित अंधश्रद्धा असलेल्या दुसर्‍या एकशे तीस कोटी लोकांच्या समूहाबरोबरच्या संघर्षात सारे जग आता भरडून निघत आहे आणि त्यात सर्वात जास्त नुकसान ज्यांचा या द्वेषमूलक अंधश्रद्धांशी संबंध नाही अशा शेकडो कोटी हिंदू, बौद्ध, निधर्मी, जुने पारंपारिक धर्मीय यांचे होत आहे.

तुमची समाजाला, देशाला, पृथ्विला हानिकारक असलेल्य गोष्टींची यादी बनवली तर त्यात निर्मुलनासाठी अग्रस्थानी हीच अंधश्रद्धा येईल असे वाटते.

मी भारतातला थोडाफार आदिवासी भाग हिंडून पाहिला आहे, त्या साध्याभोळ्या लोकांच्या त्यांच्यापुरत्या, त्यांनाच थोडाफार त्रास होणार्‍या अशा अंधश्रद्धाही पाहिल्या आहेत, पण त्यांचे निर्मूलन करून तिथे ही रिमोट कंट्रोलने चालणारी संघटित अंधश्रद्धा प्रस्थापित करण्याचे व समाजचे विघटन करण्याचे लाखोंच्या संख्येने मनुष्यबळ व डॉलर्स ओतून चाललेले उद्योगही जवळून पाहिले आहेत, त्याचा मुकाबला कसा करता येईल, करायला हवा की नको याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर मी आपला आभारी असेन.

अहो, काय करताय हे..? ख्रिश्चन, इस्लामवर बोललात तर घटनेच्या निधर्मी / सर्वधर्मसमभावी तत्वांचा भंग होईल ! अंधश्रद्धा ही फक्त हिंदु धर्माची मक्तेदारी आहे, हे माहीत नाही का तुम्हाला? Proud

तुमची समाजाला, देशाला, पृथ्विला हानिकारक असलेल्य गोष्टींची यादी बनवली तर त्यात निर्मुलनासाठी अग्रस्थानी हीच अंधश्रद्धा येईल असे वाटते.

Proud Happy

जामोप्या, दुसर्‍या बाजूनं बघा..
कित्येक शतकं आपण समुद्र ओलांडणं निषिद्ध मानायचो (हिंदूधर्मात) - नुकसान कुणाचं झालं?
जेव्हा सुरुवातीच्या काळात मुसलमानानी आक्रमणं करून काश्मिर मधल्या हिंदूना बाटवलं - तेव्हा ते हिंदू काशीला आले - आम्हाला परत धर्मात घ्या म्हणून - त्यावेळच्या लोकांनी त्यांना नकार दिला. कारण? धर्मसंमत नाही म्हणून! (तेव्हाच त्यांनी योग्य पावलं उचलली असती - तर आज जी एस नं सांगितलेले धर्म इतके फोफावलेच नसते)

मला हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे. पण ते आजच्या त्याच्या रुपाबद्दल - सहिष्णू, मला माणूस म्हणून जगण्याची मुभा देणारा, धर्माच्या नावाखाली 'अमुक एक गोष्ट कराच' म्हणून जबरदस्ती न करणारा.
पण हेच शंभर वर्षामागे गेले तर? एक बाई म्हणून तेव्हाच्या बाईच्या जगण्याचा विचारही नाही करवत! मुलं जन्माला घालायचं आणि कामं करायचं मशिनच ती!
सती, बालविवाह, केशवपन, स्पृश्यास्पृश्यता - हे सगळे श्रद्धेच्या नावाखाली चाललेले प्रकार होते. आजही तेच चालू राहिले असते जर तेव्हाच्या सुधारकांनी (आपण त्यानाही अंधश्रद्धा निर्मुलन करणारी लोकंच म्हणू शकतो) हे सगळे बदल केले नसते.
मुसलमानी राजवटीच्या पुढच्या काळात काही लोक 'जातीपाती मुळे मिळणारी वागणूक' ह्या कारणाकरताही स्वखुशीनं धर्मांतरीत झाले.
आजही खेड्यांमध्ये आजारी व्यक्तीला भगताला दाखवणे, देवदासीला देवाला सोडणे असले प्रकार होतातच ना? त्यांच्या दृष्टीनं ही श्रद्धा असते , पण म्हणून ते बरोबर असतं असं नाही.
आपल्या देशातले अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे लोक अशा ठिकाणी काम करताहेत की जिथे हिंदू समाज बहुसंख्य आहे. मग ते हिंदू धर्मातल्या वाईट रुढींवरच टीका करणार ना? मी स्वतः नरेंद्र दाबोलकरांचे असेही लेख वाचलेत ज्यात त्यांनी बोहरी मुसलमान, ख्रिश्चन धर्मातली 'येशूच्या कफनाची' अंधश्रद्धा ह्यावरही भाष्य केलं आहे. त्यांची 'विचार तर कराल', 'तरुणांना आवाहन' असली पुस्तकं वाचून पहा.
पटलं नाही तर बोलूच शकता तसं - पण एकदा पहा तरी ते काय म्हणताहेत.
बरं त्यांनी ठेवलेले चॅलेंजेस आहेत - जर मांत्रिक म्हणवणार्‍यांच्यात काही शक्ती असेल तर ते चॅलेंज घ्यायला कुणीच कसं पुढे येत नाही? सेम गोज विथ अस्ट्रॉलॉजी!

आणखीन एक - जो समाज चांगल्या वाईटाचा विचार करायचा थांबवतो, जे पूर्वापार चालत आलं तेच योग्य असं म्हणतो, त्याचं अधःपतन होतं - हेच आपल्या हिंदूधर्माच्या बाबतीत झालेलं.
पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका कशाला करायच्या?

> ज्या लोकांना आपण बदलावे अशी इच्छा नाही, त्यांनी कृपया येथे लिहु नये. वाचु तर मुळीच नये. नुसता मनस्ताप होईल. केवळ मनोरंजन होईल म्हणुन वाचायचे असेल तर तुमची मर्जी.

म्हणजे तूम्ही हा बाफ लोकान्ना बदलण्यासाठी चालू केला आहे का? तस असेल तर विवेकानन्दानच्या नन्तर तुम्हीच.

> त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

समजा मी अब्जाधीश आहे आणि १००० endangered फुलान्चा हार घेण्याची माझी ऐपत आहे. आणि बोकडन्ना कापण्या ऐएवेजि मला exotioc फुल अवडतात. तरी देखील हे अनावश्यक आहे अस तुम्ही म्हणाल का?

> हिंदु धर्माचे व्यापक सर्वसमावेशक रूप सोडूनकट्टर इस्लामचे अनुकरण करायचा अट्टाहास का?

जर हिंदु धर्म व्यापक व सर्वसमावेशक आहे अस तुमच म्हणण आहे तर या धर्मात सान्गीतलेल्या रूढीन्वर तुमचा अक्शेप का? त्या रूढी सर्वसमावेशक या व्याख्येत बसत नाहीत का?

>समाजाला, देशाला, पृथ्विला हानिकारक असलेल्य गोष्टींची यादी बनवली तर त्यातुन मी काय करायला नको ते समजु शकेल.

समाज आणि देश या सन्कल्पनाच मुळात अन्धश्रध्देवर आधारित आहेत. कागदावर मारलेल्या रेघोट्या या पलिकडे देशाला अस्तित्व नाही. आणि तुम्ही कितिही नाच्लात तरी देखील प्रुथ्वीला काहीही होणार नाही. जास्तीत जास्ती मनुश्य आणी इतर प्राणी नष्ट होतील, पण प्रुथ्वी आहे तशिच राहील.

> सामाजिक म्हणाल तर निर्माल्य, मूर्ती, (इतकंच काय मेलेली गुरंढोरंसुद्धा) 'पवित्र' जलाशयांत 'विसर्जित' करणं, दसर्‍याला रस्त्यावर आपट्याच्या पानांचा आणि वटपौर्णिमेला वडाच्या डहाळ्यांचा 'रबरबाट' घालणं (पटत नसेल तर या दिवशी दादर(प) स्थानकाबाहेर जाऊन बघा.) हे समाजाला आणि/किंवा पर्यावरणाला हानिकारक नाही का?

बर. मग तुम्ही पर्यावरणाला हानीकारक गोष्तीन्च्या विरुध्द आहात तर तुम्ही ज्या शहरात जाता तेथील महानगर पालिका साण्ड्पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोड्ते हे बघूनच मोरीमध्ये उत्सर्ग करत असाल. जिथे ही सुविधा नाही तिथे तुम्ही मोरिचा वापर करत नसालच. तुम्ही प्लास्टीक्च्या बाट्ल्यान्मधून एक थेम्ब देखील पाणी आज पर्यन्त प्यालेल नसेल. करमणूकी साठी विजेचा अपव्यय होउन पर्यावरणाची हानी होउ नये म्हणुन तुम्ही सन्गणक, दूरदर्शन इत्यादि पण वापरत नसालच.

एव्हाना हिंदु धर्म अंधश्रद्धामुक्त झाला असेल ही अपेक्षा

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चुक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहे याची जाणीव आहे (हे लोकच चुक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत).

मूळ विषय हा आहे का ?

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

यामुळे विषयांतर होतंय का ?

मी पूर्वी १००% नास्तिक होतो. आताही बराचसा आहे.

काही भाग वादविवादातून करप्ट झालोय.

भविष्य सांगणे ऐकणे हे कमकुवत मनाचे लक्षण आहे या विधानावर माझा अद्याप विश्वास आहे. पण याच विधानाचा दुसरा भाग म्हणून कमकुवत मनाच्या लोकांसाठी ते औषध असू शकतं असं वाटू लागलंय.

भविष्य सांगणे ऐकणे हे कमकुवत मनाचे लक्षण आहे या विधानावर माझा अद्याप विश्वास आहे.
--- भविष्य सांगणे हा आर्थिक स्त्रोत मिळवण्यासाठी व्यावसाय असु शकतो, येथे फार-फार तर फसवणुक म्हणु शकतो पण कमकुवत मनाचा संबंध येत नाही.

आशिष, हे आता विज्ञानच म्हणते आहे. मग भारतीय ज्योतिष चुकीचे आहे हे म्हणणे कितपत बरोबर आहे. मान्य आहे की तो दुवा काहि ठराविक बाबींकरताच जन्मकाळाचा संबंध लावतो. पण जन्मकाळ आणि पुढील आयुष्यात घडणार्‍या गोष्टी यांचा संबंध आहे हे विज्ञान आता मान्य करायला लागले आहे.

हे लिहायला बाफ चुकलाय का माझा ? मी अंधश्रध्देच्या बाजूने बिलकूल नाहिये. Happy

अनिसवाल्यांबाबत हल्ली फरसं काही ऐकू येत नाही.. बहुतेक सगळ्या अंधश्रद्धा संपल्या की काय असे वाटते

येशूची प्रमुख शिकवण ही की जो कोणी त्याचा व त्याच्या बापाचा स्वीकार करेल त्याचे सारे पाप माफ होऊन तो स्वर्गात जाईल व बाकी सारे जे त्याचा स्वीकार करणार नाहीत वा त्याच्यासह इतर देवांचाही स्वीकार करतील ते नरकाच्या आगीत होरपळतील.

असं सगळ्याच धर्मात सगळ्या देवांबाबत लिहिलेले असते. उगाच त्या दोन धर्माना कशाला दोष द्यायचा? स्वतःच्या धर्मात फक्त श्रद्धाच आहेत आणि इतरांच्या धर्मात नुस्त्या अंधश्रद्धा आहेत, हीही एक अंधश्रद्धाच नाही का? हिला आपण हिंदुत्ववादी अंधश्रद्धा असे म्हणूया का? Proud

तू माझी भक्ती नाहीकेलीस तरी चालेल, तरीही मी तुझे कल्याणच करीन , एवढा प्रेमळ देव मी गेले काही महिने शोधत आहे. मला तरी असा कुणी मिळाला नाही. Proud

आदिवासींची धर्मांतरं... आता हा विचार करुन काय होणार? वर्षानुवर्षे हिंदु धर्माने आपल्याच धर्मातील काही लोकाना समानतेने वागवले नाही.. आता ते बाहेर पडले... कसेल त्याची जमीन आणि पोसेल त्याचा धर्म... हिंदु धर्माने सर्वाना सारखे पोसले अस्ते तर हा प्रश्न उद्भवला नसता नै का?

चालेल, तरीही मी तुझे कल्याणच करीन , एवढा प्रेमळ देव मी गेले काही महिने शोधत आहे. मला तरी असा कुणी मिळाला नाही.

मी असे ऐकले, हिंदू धर्माबद्दल, की 'तू माझी भक्ती नाहीकेलीस तरी ', शेवटी (म्हणजे जगबुडीच्या वेळी, जेंव्हा जगातले सर्व नष्ट होते तेंव्हा) देव तुमचे कल्याणच करीन. फक्त तितकी वर्षे वाट पहावी लागेल. तत्पूर्वी, जर स्वतःच्या आयुष्यात काही तरी चांगले व्हावे असे वाटत असेल तर वर लिहीलेले आन्तःशुद्धि का काय ते, वगैरे वाचा. मग त्यासाठी काहीतरी करा.

"कुणितरी" माझे कल्याण करील असे म्हणण्या ऐवजी स्वतःच स्वतःचे कल्याण करण्याची ज्यांना इच्छा असते, ते लोक अशी चर्चा वगैरे करतात!

माधव, मी आश्चिग सारखा शास्त्रज्ञ, संशोधक नव्हे, पण मला असे वाटते की वरील लेखाला फक्त संख्याशास्त्राचा आधार आहे. त्यावरून पुढील संशोधनाला दिशा मिळेल, पण शास्त्रीय दृष्ट्या त्यावर लगेच विश्वास ठेवता येत नाही.
आधी नुसत्या संख्याशास्त्रावरून कळले की सिगरेट पिणारे लवकर मरतात, पण संशोधन करून नक्की संबंध जोडणे याला बरीच वर्षे लागली! नि अजून तरी नक्की आहे का हे मला माहित नाही, पण माझ्यापुरते मी पाहिले की हे वाईट आहे, म्हणून मी सोडली, एव्हढेच.

अंधश्रद्धेबद्दल तसेच म्हणता येईल. हजारो लोक 'पूर्वी' म्हणाले असे करा म्हणजे तुमचे कल्याण होईल म्हणून काही विचार न करता तसे करायचे याला अंधःश्रद्धा म्हणायचे. मग सगळे हिंदू सकाळपासून रात्रीपर्यंत नुसते पूजा, होम नि जानवे उलट सुलट करत बसले असते. मग अमेरिकेत येऊन प्रोग्रॅमिंग कोण करेल? मी आता वृद्ध झालो हो, नाहीतर भरपूर प्रोग्रॅम मी लिहीले आहेत, भारतातल्या लोकांना ओ का ठो कळत नव्हते त्याबद्दल तेंव्हा.

Shradha mhanje manuski aani mukti mhanje samadhan. Shradha jar ka sodli tar mansala janawar banayla vel nahi lagnar karan mansan na konte hi vait kam kartana ishwara chi bhiti aste jar ka ti shradha ch nahi rahili tar kay hoil te sarvana mahiti aahe. Aani ho hindu dharma sarkha dharma nahi . "Jast lekhan karnya peksha vachan kara gyan vadhel"

स्वाती_आंबोळे
प्रतिसाद पटला .
मनात एकही विचार न येता, पाच मिनट स्तब्ध बसणच आपल्याला जमत नाही, मग मन स्थिर व्हायच कधी आणि मुक्ती तर जणू मृगजळच...>>
आपल्याला ५ मिनिटे स्वस्थ बसता येत नसेल तर तो आपलं दोष आहे . त्यासाठी मुक्तीला मृगजळ म्हणणं हे कितपत योग्य आहे ?
मुक्ती मिळवायची ती जन्म मृत्युच्या फेर्यातून. दुख , संकट , रोगराई , वृद्धत्व , मृत्यू ह्या सगळ्यांपासून मुक्ती मिळवायची . ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य स्वताच आपल्या कर्माने आमंत्रित करत असतो . अगदी जन्म आणि मृत्यू सुधा . त्यामुळे मुक्ती आपल्याच हातात असते हे बरोबर आहे .

नार्वेकर गुरुजींच्या मृत्युपत्राची लिंक चालत नाही ना आता. २००९ मधे चालत होती.

Pages