वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या पुस्तकांचा अनुवाद केल्या गेला आहे का? प्रॉजेक्ट म्हणुन काही लोक करु शकतील का?

डॅनिअल डेनेटचे 'ब्रेकींग द स्पेल' सुद्धा भेट द्यायला आणि वाचायला उत्कृष्ट आहे.

अरेरे, या फलकावर सर्व जणांचा विरोधी सूर पाहून वाईट वाटले.
मान्य आहे की आपण म्हणता त्याप्रमाणे बहुतेक चालीरीतींचा अन्वयार्थ आजकाल माहित नाहीये.
पण केवळ यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेल्या गोष्टींना अजिबातच अर्थ नाही,
असे म्हणून त्या बंद करणे पटत नाही.
पुर्वी अगदी खुप पुर्वी प्रत्येक रूढीमागे काही ना काही तार्किक कारण नक्की असणार.
त्याबद्दल संशोधन होणे आवश्यक आहे.
निदान तसा प्रयत्न करून मग त्या रूढींमधे कालानुरूप बदल केला जावा.

सोयर हे घरात जन्म (कोणाचं बाळंतपण) झालेलं असताना लागतं तर सुतक हे घरात मृत्यू होतो तेव्हा. >>> स्वाती माहीतीबद्दल धन्यवाद , सोयरीक वरून मी सोयरं म्हणजे नातं समजत होतो .

<<पुर्वी अगदी खुप पुर्वी प्रत्येक रूढीमागे काही ना काही तार्किक कारण नक्की असणार.
त्याबद्दल संशोधन होणे आवश्यक आहे.
निदान तसा प्रयत्न करून मग त्या रूढींमधे कालानुरूप बदल केला जावा.>>

तेव्हढे कष्ट घेण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा,

<<झक्की, अनेक गोष्टि त्यांच्यावर विचार करुन त्या खर्या की खोट्या, अर्थपुर्ण की निरर्थक हे ठरविता येते. ते शास्त्रांवर किंवा पुर्वजांवर सोडल्यास त्यातुन सुटका नाही. >>

असे मानून, मनःपूतं समाचरेत्! काही डोक्याला त्रास नाही. कारण,
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः

तेंव्हा, त्यानंतर मुक्ति मिळेल का? नरकात जावे लागेल का? वगैरे विचार काय कामाचे?

कुणि मेले, तर ऑफिसला जाता जाता, प्रेत जाळण्याच्या ड्राईव्ह इन मधे जाऊन बॉडी टाकून यावी!! किंवा कुणि घरी येऊन घेऊन जाणार असतील तर उत्तमच!

हिंदू धर्मात म्हंट्ले आहे की तुम्ही काही केले नाही, तरी जेंव्हा केंव्हा देवाला वाटेल तेंव्हा तो हे जग 'रिसेट' करेल, मग सगळ्यांना मुक्ति! नवीन जगात नवीन नियम.

Happy Light 1

> कुणि मेले, तर ऑफिसला जाता जाता, प्रेत जाळण्याच्या ड्राईव्ह इन मधे जाऊन बॉडी टाकून यावी!! किंवा कुणि घरी येऊन घेऊन जाणार असतील तर उत्तमच!

त्यापेक्षा जी अंग शाबुत आहेत ती दान करावीत. घरच्यांना सांगुन ठेवावे की मेल्यानंतर कुणालातरी यनिमित्याने उपयोग होईल. स्वर्गात गाठोडे नेता येत नाही असे म्हणतात तर मग जाताजाता अवयव दान न करण्याची कजुषी का? झक्की, दिव्यामागे अंधार असतो असे म्हणतात ते काही खोटे नाही Light 1

हिंदू धर्मात म्हंट्ले आहे की तुम्ही काही केले नाही, तरी जेंव्हा केंव्हा देवाला वाटेल तेंव्हा तो हे जग 'रिसेट' करेल, मग सगळ्यांना मुक्ति! नवीन जगात नवीन नियम.

हे नेमके कुठल्या पुस्तकात आहे? हिंदु धर्माला काय ढीगभर पुस्तके आहेत..... ऋग्वेदापासून सत्त्यसाईचरित्रापर्य्न्त आणि श्रावणातल्या व्रतकथापासून संत नरेन्द्र महाराज जीवनदर्शन पर्यन्त सगळे हिंदु धर्माचे अधिकृत धर्मग्रंथच आहेत.... Proud

मरण, तिरडी, तेरावा, पंचक.... एवढ्याचभोवती हा बीबी का फिरवताय? अजुन किमान ८४ लक्ष किंवा कमीजास्त बाकीच्याही श्रद्धा/अंधश्रद्धा असतीलच की! Proud चला नवा विषय घ्या.... बारश्याला घुगर्‍या वाटणे, लग्नात अक्षता उधळणे, बोरन्हाण... असल्या उचापतींमधून अन्नधान्याची नासाडी होते का? ( कृपया हिंदु धर्मातील अंधश्रद्धा घ्याव्यात.. इतर धर्मियांच्या अंधश्रद्धाना हात लावु नये.)

कुणि मेले, तर ऑफिसला जाता जाता, प्रेत जाळण्याच्या ड्राईव्ह इन मधे जाऊन बॉडी टाकून यावी!! किंवा कुणि घरी येऊन घेऊन जाणार असतील तर उत्तमच!>> क्कित्ती क्कित्त्ती छान लिहीतात ना ते. अगदी २००% अम्मेरिकन.

चला नवा विषय घ्या.... बारश्याला घुगर्‍या वाटणे, लग्नात अक्षता उधळणे, बोरन्हाण... असल्या उचापतींमधून अन्नधान्याची नासाडी होते का?>> माझी काही मते इथे लिहीत आहे. अतिरेकी वाट्तीलच.

१) उपास व्रते वगैरे फक्त मध्यमवर्ग व श्रीमन्त लोक करतात. गरीबाकडे उपासाचे फ्याड दिसत नाही. त्यात ही सव्वा किलोचा शिरा करायचा/ नैवेद्य दाखवायचे सोवळ्याने पूजेचा स्वयंपाक करायचा हे घरात राहणार्‍या व बाहेरचे एक्स्पोजर कमी असलेल्या स्त्रीयांना करता येतील व त्याना त्याने समाधान मिळेल असेच सगळे धार्मिक रिच्युअल्स बांधलेले असतात. २४ तास एखाद्या बाइला घरात स्वतःसाठी उपलब्ध ठेवायचेआपल्या घरच्यांची. मुलान्ची सेवा करून घ्यायची, आपल्या मनासारखे वागायचे तर तिला अश्या
अर्थहीन रिच्युअल्स मध्ये गुन्तवलेच पाहिजे. तीबिचारी सकाळी लवकर उठून सोवळ्याने स्वयंपाक वगैरे करते निरजळी उपास करते. करवा चौथ झाडाला दोरे बान्धणे वगैरे करते हे घरातील लेबर ट्र्बल मॅनेजेबल
स्वरुपात ठेवायचे पुरुषी म्यानेज मेन्ट चे उपाय आहेत. त्यात ती एकटी ग्रुहस्वामिनी असूनही पुजेला बसू शकते का? तर नाही. स्वामी हवेतच. निर्णय स्वातंत्र्य न देता खुष ठेवण्या साठी हे उपचार असतात.
बोड्ण भरून नक्की काय होते हे मला अजुनही पट्त नाही. ज्या देशात माण्से उपाशी मरतातेत रोज.
बैल पोळा हा एक सण फक्त आवड्तो.

फारच विनोदी बुवा दाभोलकरांचे नार्वेकर गुरुजी!

१. कावळ्याप्रमाणे फक्त घाणीतच चोच मारायची असा संकल्प केलेल्या तथाकथित पुरोगाम्यांना हिंदू धर्मातील दम (संयम), दया, दान चा अंगिकार करावासा वाटत नाही काय? हिंदू धर्माचा विचार केला तर धर्माची व्याख्या काय तर जे आचरण आपल्याला पशूत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि पुढे देवत्वाकढे घेऊन जाते ते म्हणजे धर्म! देवाधर्माचे संस्कार "घाणेरडे" हे वाक्य गुरुजींनी एखाद्या मशिदीत (चांगला परिणाम साधायचा असेल तर जामा वा गेला बाजार भेंडिबाजारात) उच्चारण्याचा "ट्राय" मारलाय काय? कारण धार्मिक उन्मादामुळे जगाचे सर्वाधिक नुकसान ज्या धर्मांनी केले त्यांना उपदेश करण्याने काही हाशिल होईल. नाहीतर आपल सहिष्णु हिंदूंच्यात राहायच आणि आर. एस. एस., पतित पावन वर तोंडसुख घेऊन पुरोगामी म्हणवायच हा प्रकार म्हणजे "साप साप" करत भुई धोपटणे होईल.
२. पत्नी (लक्ष्मी) चा उल्लेख "सौ." कशाला? सौभाग्यवती शब्दाची पार्श्वभूमी अशी आहे कि नवरा जिवंत असणारी "भाग्यवान" - ही वेडगळ श्रद्धा नव्हे काय?
३. गुरुजी वर म्हणतात पाप पुण्य हे थोतांड आहे आणि खाली आपणच म्हणतात जगात पापाचाच बोलबाला आहे - काय समजावे आम्ही पूजा-अर्चा करणार्या अंधश्रद्ध हिंदूंनी?
४. उपासाने धर्मगुरुंना कसा फायदा होतो बुवा? आजच्या "साबुदाणा" उपासाच सोडा पण "उपवास" म्हणजे भौतिक जगाशी काही काळ तरी फारकत (परमेश्वराच सान्निध्य) आणि लंघन! गुरुजींच सोडा पण ह्याचे फायदे जगजाहीर आहेत.

चिरफाडच करायची तर अनेक वाक्यांची (आणि त्या मागच्या सडक्या विचारांची) करता येईल. वेळेअभावी लेखनसीमा!

फारच इनोदी बुवा हिंदुत्ववादी मंडळी.
१ नार्वेकर दाभोळकर वगैरे हिंदु आहेत. उगाच मुसलमनांच्या उचापती करण्यापेक्षा हिंदु धर्मात सुधारणा कराव्यात असा त्यांचा प्रयत्न आहे. मुसलमानांत अन्धश्रद्धा आहे, मग आमच्यात ही असूदेत हा कुठला युक्तीवाद ? या न्यायाने हिंदु धर्मात सुधारणा करणारे सर्व सुधारक विनोदी होते का? कारण त्यांनी हिंदु धर्माचाच विचार केला. हे म्हणजे एखाद्या माणसाने आपले घर साफ करायचे ठरविले तर त्याला आधी दुसर्‍याचे घर बघ किती घाण आहे असे सांगण्यासारखे आहे.
३ पाप पुण्य हे थोतांड आहे याचा अर्थ पाप ( जे काही असेल ते ) केल्याने नर्क मिळतो आणी पुण्य केल्याने स्वर्ग ही संकल्पना थोतांड आहे असे सूचीत केले आहे.
४ पत्नीचा उल्लेख सौ असा करणे हा एक संकेत आहे. उगाच शब्दच्छल करण्यात अर्थ नाही.

.

>> नार्वेकर दाभोळकर वगैरे हिंदु आहेत ...
काय सांगता? पण ते तर धर्म मानत नाहीत मग ते हिंदू कसे? तुमच्या स्वप्नात येऊन सांगितले काय गुरुजींनी?

>> हिंदु धर्मात सुधारणा करणारे सर्व सुधारक विनोदी होते का?
मुळिच नाही. कारण त्यांना धर्मात सुधारणा हवी होती - धर्माचा उच्च्छेद नाही जो गुरुजींना अभिप्रेत आहे.

>> पत्नीचा उल्लेख सौ असा करणे हा एक संकेत आहे ...
जर दुय्यम स्थान सूचित करणारी संबोधने संकेत म्हणून चालतात तर मग प्रेताला आंघोळ घालणे, बोंब मारणे ह्या गोष्टीही संकेत म्हणून पाळायला काय हरकत आहे?

>> पाप पुण्य हे थोतांड आहे याचा अर्थ ...
स्वर्ग-नरक नाही तर व्यासांनी सांगितलेली "परोपकार पुण्याय, पापाय परपीडनम" ही उदात्त कल्पना घ्या. पण घाणीतच चोच मारायची ठरवली की भव्य, उदात्त दिसेलच कसे? काय?

पावलो पावली मुस्लिम अनुनय करणार्या कॉग्रेजचा उल्लेख गुरुजींच्या पत्रात नाही, धर्माच्या नावावर फाळणी करणार्या मुस्लिम लीग चा नाही, विलिनीकरणाच्या प्रस्ताव धुडकावणार्या आणि रझाकारांद्वारे अनन्वित अत्याचार करणार्या नबाबाचा नाही - "घाणेरडे" विशेषण फक्त हिंदू धर्म, देवता आणि संघटनांनाच काय?

अवयव दान करण्याची कंजुषी...

भारतातल्या खेड्यात एखाद्या जिवंत माणसाला इ सी जी काढायचा असेल, तरी तालुका लेवलचे गाव गाठावे लागते..त्यात अर्धा दिवस मोडतो लोकांचा. मग मेलेलं मढं ऑर्गन डोनेशनसाठी एका विशिष्ट हॉस्पिटलमध्ये नेणे , तेही एका विशिष्ट वेळेत, हे शक्य तरी आहे का?

ऑर्गन डोनेशनचे स्वप्न सत्यात येण्यासाठी टेलिफोन, रस्ते, अ‍ॅम्बुलन्स्,हॉस्पिटल, नातेवाइकांची मेंटॅलिटी, लीगल गोष्टी अशा सतराशेसाठ गोष्टी आधी जमवाव्या लागतील.... मोठ्या शहरात जिथे असे हॉस्पिटल आहे, त्याच्या आसपासच्या लोकानी तरी आधी हे करुन दाखवावे.... बाकीच्याना हळूहळू जमेल..

मेडिकल कॉलेजला दान देणे, हा एक ऑप्शन असू शकतो.... पण मुळात जिवंत लोकांपैकीच ( आमच्यासारख्या) फार थोड्या काही भाग्यवान ( Sad ) लोकाना तिथे अ‍ॅडमिशन मिळते, मेलेल्यांची वेटींग लिस्ट तर फारच मोठी होईल... Proud शा. वै म. असेल तर सहा लोकाना मिळून एक मढे मिळते... तीन जणानी उजवी बाजू, तीन जणानी डावी..... पहिले सहा महिने हात्-पाय, नंतरचे सहा महिने छाती पोट, आणि शेवटी मुंडकं.. असा क्रम असतो... डिसेक्शन झालेला पार्ट काढून टाकला जातो... प्रायवेट कॉलेज असेल तर १० लोकाना मिळून एक मढे मिळते असे ऐकीवात आहे! त्यात हल्ली थ्री डी सॉफ्टवेअर्स आलेली आहेत म्हणे... त्यामुळे प्रत्यक्ष डिसेक्शन ऐवजी पहिल्या वर्षाला फक्त विजुअल मधून शिकवणार, असेही ऐकीवात आले होते! खरे खोटे माहीत नाही... थोडक्यात, हा मार्ग घाऊक प्रमाणात काम करणारा नाही.. दर १०० पोरांमागे २० मढ्याना एका वर्षात अ‍ॅडमिशन मिळू शकते. Proud त्यातही रिजर्वेशनचा मुद्दा आला तर.... ?? Proud

त्यामुळे हे ऑप्शन्स भारतातले/हिंदु लोक स्वीकारत नाहीत म्हणून ओरडण्यात फारसा अर्थ नाही... बहुतांशी हिंदुना 'सरणं गच्छामि' शिवाय पर्याय नाही..

आधी दुष्काळ आणि मग एकदम पूर असा प्रकार इथे झाल्यासारखा दिसतोय.

जागो, ते वक्तव्य शहरी लोकांसाठीच होते. खेड्यापाड्यांमधुन देखिल जर पुढेमागे अवयव दान होऊ लागले तर उत्तमच.

कृपया इतर धर्मांना व राजकीय पार्ट्यांना मधे आणु नये. त्याकरता इतरत्र जावे. ­पहिल्या पोस्ट मध्ये म्हंटल्याप्रमाणे ज्योतिष्य व तत्सम गोष्टींवर विश्वास असेल त्यांनी देखील इथे लिहु नये.

उपासांवर चर्चा विषयाला धरुन ठरेल. कधिकाळी घरचे सगळे करतात म्हणुन संकष्ट्या केल्या आहेत. उपासांचे साईड-फायदे म्हणुन नियमीतता, बदल असे कधी-कधी संगितल्या जाते. पण उपासांचा खरच धर्माशी काही संबंध आहे का? कसा? या प्रथा नेमक्या कशी सुरु झाल्या? नवीन देवांचे नवीन उपास जेंव्हा सुरु होतात तेंव्हा ते नेमके कसे ठरवले जातात?

>> कृपया इतर धर्मांना व राजकीय पार्ट्यांना मधे आणु नये.
बर बर. म्हणजे फक्त हिंदू धर्माचीच नालस्ती असा एकूण विषय आहे तर. वर दिलेला विषय आणि विवरण ह्यात काही ते स्पष्ट होत नव्हते - बाकी गुरुजींचे पत्र "बेस" आहे म्हणून पार्ट्या आल्या.

>> ज्योतिष्य व तत्सम गोष्टींवर विश्वास असेल त्यांनी ...
म्हणजे दुसरी बाजू ऐकुनच घ्यायची नाहीये. मग चर्चा काय करणार?
तेव्हा चालु द्या.

पण उपासांचा खरच धर्माशी काही संबंध आहे का? कसा? या प्रथा नेमक्या कशी सुरु झाल्या? नवीन देवांचे नवीन उपास जेंव्हा सुरु होतात तेंव्हा ते नेमके कसे ठरवले जातात>> उपास सर्वच धर्मात आहेत. पण इथे इतर धर्मावर चर्चा केली जाणार नाहिये. तसेच ज्याचा "ज्योतिष भविष्यावरती विश्वास आहे" त्यानी इथे लिहायचे नाही..

मग चर्चा म्हणताच कशाला याला??

तुमची वैयक्तिक अंधश्रद्धा हा तुमचाच लढा आहे, त्यामधे चर्चा होणारच कशी? (मी कुठल्याही पदारथामधे तीनदा मीठ घातले (चमच्याने) की तो पदार्थ बिघडतो ही माझी अंधश्रद्धा.. ती तुम्ही कशी दूर करणार???

कृपया, या चर्चेमधे कुठलाच धर्म (हिंदू व इतर आणू नका) आणि मग चर्चा करा!!!!!!

>>> ज्योतिष्य व तत्सम गोष्टींवर विश्वास असेल त्यांनी ...
म्हणजे दुसरी बाजू ऐकुनच घ्यायची नाहीये. मग चर्चा काय करणार?
तेव्हा चालु द्या.

>>मग चर्चा म्हणताच कशाला याला??
तुमची वैयक्तिक अंधश्रद्धा हा तुमचाच लढा आहे, त्यामधे चर्चा होणारच कशी? (मी कुठल्याही पदारथामधे तीनदा मीठ घातले (चमच्याने) की तो पदार्थ बिघडतो ही माझी अंधश्रद्धा.. ती तुम्ही कशी दूर करणार???

समुवै, नंदिनी, अनेक अनुमोदक...

समुवै, कसं आहे की या बा.फ. ची सुरुवातच एका प्रचंड टोकाच्या भूमिकेने केलेली आहे:
>हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चुक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहे याची जाणीव आहे
त्यामूळे अशा बा.फ. चा निव्वळ अनुल्लेख करायचे (माझ्यापुरते) असे ठरवून आजवर ईथे काहिही मत दिलेले नाही. पण त्यामूळे अशी टोकाची भूमिका ज्यांन्ना सूट होते त्यांचे फावते अन मग जाम है, शाम है म्हणत या भूमिकेच्या मार्गाने हिंदू धर्माला ठोकत रहायचे. अशाच मानसिकतेला पुरक अशा एखाद्या मृत्त्यूपत्राचा संदर्भ द्यायचा आणि चर्चा(?) छे छे हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणे चालू ठेवायचे.
नार्वेकर गुरूजींचे मृत्त्यूपत्र म्हणजे तमाम आधुनिक मानसिकतेच्या हिंदूंचे प्रतिनिधीत्व करते असा हास्यास्पद निश्कर्ष आहे की काय लेखकाचा?
तेव्हा आधी हे विधान वस्तुनिष्ट कसोटीवर सिध्ध करा: "भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चुक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहे"
आणि मगच ईथे कुणी काय लिहायचे काय नाही त्याची सक्ती करा.

मला राहून राहून आश्चर्य वाटतं ते याचं की लिंब्याने थोतांडाचा बा.फ. उघाडला तिथेच ही चर्चा कींवा जो काही हेतू आहे तो का नाही मांडला? विषय तोच आहे, अन लिंब्याने तरी त्या बा.फ वर लिहायला कुणालाही प्रतिबंध केला नव्हता? पण ते कसे जमणार त्यासाठी अभ्यास, अनुभव, अन आपल्याच संकल्पना पुन्हा पुन्हा तपासून पहायची "सहिष्णू अन सर्वसमावेशक"(अरे अरे हे तर हिंदू तत्वज्ञान झाले) वृत्ती लागते ना भाऊ, नुसती तार्कीक वटवट करून भागत नाही.
एव्हडच आहे तर वैयक्तीक रंगीबेरंगी वा caltech च्या सर्वर स्पेस वर एक विशेष गृप उघडा ना? मा.बो. ची स्पेस वापरायची अन वरती ईथे लिहू नका हा कुठला न्याय?

मला हा बा.फ. चालू करणार्‍यांन्ना एक प्रामाणिक प्रश्ण विचारायचा आहे: तुम्ही तुमच्या choice शिवाय हिंदू धर्मात जन्माला आला असाल तर धर्मांतर करून, विशेषतः ईस्लाम धर्म स्विकारून त्या धर्मातील सो कॉल्ड अंधश्रधांबद्दल असेच चर्चासत्र का नाही सुरू करत? हिम्मत आहे का? अमेरीकेत न राहता ईस्लामिक देशात राहून हे करून दाखवलेत तर "अजी मी ब्रह्म पाहीले" म्हणत अनेक हिंदू बेहोष होवून नाचतील.

असो. खरं तर ईतकही लिहून इथला trp वाढवायची लायकी या बा.फ. ची नाही.
ज्या बा.फ. ची सुरुवातच मृत्त्यूपासून होते, ("आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतील" ) त्याला अजून काय मारणार? Happy
ईती अनुल्लेखसीमा
(आता येतील नेहेमीचे रक्षणकर्ते!)
*****************************************************

अस्चिग, टण्या, गॉड डिल्यूजन, ब्रेकिंग द स्पेल इ.ची नोंद करून घेतली आहे. धन्यवाद.
अस्चिग, भाषांतर करायला जरूर आवडेल. जेव्हा सलग वेळ देणं शक्य असेल तेव्हा नक्की कळवेन.

इतर सर्वांसाठी -
इथे कोणी कुठल्याच धर्माचा उच्छेद वगैरे करून राहिलंय असं मला वाटत नाहीये. (नावसुद्धा 'वैयक्तिक' असंच आहे बाफचं.) आणि त्या वळणाने चर्चा जाऊ नये इतकाच अस्चिगच्या म्हणण्याचा अर्थ असावा असं वाटतं.

आपली एखादी (वैयक्तिक) सवय / विचार ही अंधश्रद्धेतून आली आहे का - असा विचार आपण करतो का, आणि तसं लक्षात आलं तर ती मोडण्यासाठी वैयक्तिक पातळीवर आपण काय करतो - असा एकूण चर्चा सुरू करतानाचा उद्देश असावा असं माझं मत. (यात भाजीत 'तीन वेळा मीठ टाकणं'ही आलं, आणि 'आई करत होती म्हणून मीही मार्गशीर्षातले गुरुवार करते'ही आलं.) वैयक्तिक अनुभव लिहायचे असं म्हटल्यावर 'दिवसातून पाच वेळा नमाज पढण्याबद्दल' कसं लिहिणार? याचा वैयक्तिक अनुभव मला नाही. पण तसा नियम/संकेत का बनला असेल, आणि तो आता कालबाह्य तर झालेला नाही ना, किंवा व्यक्तिशः मला त्याची गरज आहे का - याचा जरूर विचार व्हावा.

स्वाती, धन्यवाद. हिन्दू धर्म व तत्त्वज्ञान याबद्दल मला अतिशय आदर आहे. इतर धर्मांचा आता मी अभ्यास सुरु केला आहे. पण मला अर्थहीन कर्मकांडाचा राग आहे इतकेच. मला जर कामात अमुक यश हवे असेल तर मी वैभवलक्ष्मीचे व्रत नाही करणार पण जे समोर दिसते आहे ते गरजेचे काम करीन. मी नेहमी देवाला हीच विनंती करत आले आहे की मला योग्य मार्ग दाखव. पुढची वाट्चाल मी करेन. फुले अगरबत्ती यावर पैसे घालविण्या ऐवजी तेच पैसे मी गरजु मुलीला एक वेळचे जेवण देण्यासाठी वापरते. आता देवावर विश्वास आहे हीच अंधश्रद्धा आहे असे काही म्हणू शकतात पण सध्या तरी तो तरी मानसिक आधार असावा अशी गरज आहे. तितके मन स्ट्रॉन्ग नाही की पुर्णपणे नास्तिक बनु शकेन. एक अनुभव सान्गत आहे. आमच्या कामाच्या भौगोलिक ठिकाणी अतिशय चान्गली, जुनी व मान्यवर देवस्थाने आहेत. इतक्या वर्षात घरातील पुरुषांचा विश्वास नसल्याने ते कोणत्याही मंदीरात गेले नाहीत. आता सासरे व पती दोघे ही नाहीत. व मी कामासाठी सर्व प्रदेश पालथा घातला आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गावी वेळ काढून मन्दिरात जावुन फक्त दर्शन घेतले आहे. त्यामुळे मनाला एक चान्गली बैठ्क मिळते, दुक्खी नकारात्म्क विचार जावून पुढे जायची प्रेरणा मिळत आहे. गंमत म्हण्जे लग्न असताना कुंकू वगैरेबाबत मी परटिक्युलर नसे पण
आता मंदिरात गेले की आवर्जुन हळद कुन्कु लावुन घेते. स्वतःतील बदल असे जाणवले की कळते
आपण नक्की कुठे आहोत ते.

मी व सौ. दोघांनीहि मेल्यावर शरीरे नि कुठलेहि अवयव , इंद्रिये कुणालाहि मोफत द्या असे मृत्युपत्रात लिहीले आहे. पण तो आमचा वैयक्तिक निर्णय आहे. घरात देवपूजा, सत्यनारायण चालतात, पण तेहि वैयक्तिक निर्णय म्हणून. मुलांवर लादलेले नाहीत, इतर लोक कितपत धर्म करतात त्याबद्दल उगाच लेख प्रसिद्ध करून स्वतः किती शहाणे हे दाखवण्याचा अट्टाहास नाही.

अमुक एक मार्गानेच देव, स्वर्ग, मोक्ष प्राप्त होईल असे नसून अनेक मार्गांनी ते साध्य होईल. अगदी कधीहि कुठलाहि धार्मिक नियम न पाळता सुद्धा. फरक फक्त जीवनाची क्वालिटि काय, नि मोक्ष प्राप्तीला वेळ किती लागेल याचा. म्हणूनच धर्मपालनाची नेहेमी 'इहलोकी कल्याण व परलोकी गति' अशी जाहिरात केली जाते.

काही लोकांना अगदी आवडतेच पूजा करायला! वेळ घालवून पूजा करतात. त्यांना आनंद होतो.
इतरांना त्या ऐवजी सोफ्यावर बसून 'गर्ल्स गॉन वाईल्ड' बघत नि चिप्स खात, बीअर पीत वेळ घालवला की एकदम बरे वाटते. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोण बरोबर कोण चूक याचा इथे काहीहि संबंध नाही. त्यांच्या त्यांच्या मते त्याचे बरोबर.

क्रोध व गर्व या दोन गोष्टी यावर संयम ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर इतरहि दुर्गुणांना संयमित करणे आवश्यक आहे. नंतर देवाच्या मागे लागा, अथवा संगित शिका, अथवा अंतराळशास्त्र शिका, त्याचा उपयोगच होईल.

ते संयमित कसे करायचे यासाठी धर्मात काही गोष्टी सांगितल्या आहेत. वाटले तर ते करा नाहीतर दुसरे काही. वजन कमी करायचे असेल तर व्यायाम, अमुक डायेट, तमुक डायेट काहीहि करा, पण करा.

> मी व सौ. दोघांनीहि मेल्यावर शरीरे नि कुठलेहि अवयव , इंद्रिये कुणालाहि मोफत द्या असे मृत्युपत्रात लिहीले आहे.
उत्तम. तुमच्याकडुन तीच अपेक्षा होती.

असे असुन तुम्ही जेंव्हा लिहिता:
> कुणि मेले, तर ऑफिसला जाता जाता, प्रेत जाळण्याच्या ड्राईव्ह इन मधे जाऊन बॉडी टाकून यावी!! किंवा कुणि घरी येऊन घेऊन जाणार असतील तर उत्तमच!
तुम्ही जेष्ठ आहात, तुमचा इथे आदर होतो. तुमचे लिखाण वाचनीय असते. मायबोलीला तुमच्या सारख्यांमुळे एक शान येते. तुम्ही हेटाळणी करता जरी काही लिहिले तरी त्यामुळे विषय भरकटण्याचे ते एक कारण ठरते.

> काही लोकांना अगदी आवडतेच पूजा करायला! वेळ घालवून पूजा करतात. त्यांना आनंद होतो.
इतरांना त्या ऐवजी सोफ्यावर बसून 'गर्ल्स गॉन वाईल्ड' बघत नि चिप्स खात, बीअर पीत ... हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे,

जोपर्यंत ते 'गर्ल्स गॉन वाईल्ड' आवडणारे रस्त्यावर मुलिंच्या मागे लागत नाहीत तोपर्यंत, आणि पूजा करणारे दुसर्या धर्मियांना मारायला निघत नाहीत तोपर्यंत.

'चॅरीटी बिगिन्स अ‍ॅट होम'. सर्व काही घरीच सुरु होतं. संस्कार, पूजा, बिअर, ....
मोठ्यांचे ऐका, पुस्तकांमध्ये लिहिलेले ग्राह्य माना ई. विचार करा हे मात्र शिकवल्या जात नाही. अश्विनिमामी म्हणतात तसे करणारे फारसे दिसत नाहीत. दिवसभर संगणकांवर काम करा, ईंजिनिअरींग करा, घरी आल्यावर तो भाग काम म्हणुन करत असल्यामुळे विज्ञानाला गुंडाळुन ठेवा. धर्माप्रमाणेच (मग तो कोणताही असो) विज्ञानही एक "वे ऑफ लाईफ" असतो हे बहुतांश लोक विसरतात (किंवा त्यावर विचारच कधि करत नाहीत). आणि विज्ञान हे धर्माच्या विरुद्ध असते असेही नाही.

आपण एक करु या का? एक "थॉट एक्सपेरिमेंट". असे समजा (वाटले तर नुसते समजा) की तुम्ही सोडुन उर्वरीत जग म्हणजे माया आहे. त्यात वडिलधारे लोक आले, सर्व धार्मिक शिकवणी आल्या, सर्व वैज्ञानीक शिकवणी आल्या. आता विचार करा की काय खरे आहे आणि काय नाही. निदान दहा पंधरा मिनिटे त्यावर विचार करा. सगळेच खोटे आहे, पण काय-काय खोटे आहे याची यादी करुन पहा (सर्वसमावेशक).

... उर्वरीत पोस्ट नंतर. ...

""विज्ञान हे धर्माच्या विरुद्ध असते असेही नाही."" म्हनजे आमचे अमेरिकन बन्धु म्हणतात तसे "Don't pray in my school and I won't think in your church" तसे काहिसे Proud
माझि एक वैयक्तिक श्रध्दा पुस्तक-वहिला पाय लागला कि नमस्कार करणे. लहानपणापासुन शिकवले कि ति विद्या, सरस्वति असल्याने तिला पाय लागला तर नमस्कार कर. ल्हानपणापासुनच तशि सवय मला हे. हि अन्धश्रध्दा म्हणायचि का ? असल्यास तसे करणे मि थाम्बवले तर काय फरक पडेल किन्वा तसेच करणे चालु ठेवले तरि काय फरक पडणार हे ?

जोपर्यंत ते 'गर्ल्स गॉन वाईल्ड' आवडणारे रस्त्यावर मुलिंच्या मागे लागत नाहीत तोपर्यंत, आणि पूजा करणारे दुसर्या धर्मियांना मारायला निघत नाहीत तोपर्यंत >>

हे विज्ञानाला पण लागु होते असे नाही वाटत? आणि विज्ञानात असे कुठे सांगितले आहे की दुसर्याला मारणे अवैज्ञानिक आहे... किंवा मुलींच्या चेडा काढने अवैज्ञानिक आहे? तो मोरॅलिटीचा भाग झाला... कुठलीही मोरॅलीती ही अंधश्रद्धा असते असे नाही वाटत? विज्ञाने ती सिद्ध करता येते? असल्यअ अशा किती सिद्ध केल्या गेल्या आहेत?

विज्ञान हा देखील एक धर्मच आहे. समोर दिसणार्या दगडाला हात जोडणारी मुर्ख आहे असे समजल तरी जैविक उत्क्रांतीवर त्याचा काडीचा फरक पडत असेल असे वाटत नाही. तिच्या वैयक्तीक सुख दुखःत दगडाचे विश्लेशण करून त्यात रासायनीक द्रव्ये किती प्रमाणत आहेत ह्यानेही काही फरक पडेल असे वाटत नाही. अनुभव हाच सापेक्ष असल्याने. श्रद्धेचे अंध वा डोळस वर्गिकरण करताच येउ शकत नाही असे मला वाटते.

समाजावर वाइट परिणाम होतो हे जेंव्हा तू म्हणतोस तेंव्हा काय चांगले काय वाइट ह्याचा आराखडा तुझ्या मनात आहे असतो तो काय आहे स्पष्ट केल्यास त्यावर चर्चा होउ शकते.

जाता जाता. असे वाचनात आले (संदर्भ सापडला की टाकतोच) की जेंव्हा उंदरना कळ दाबली की अन्न मिळते हे शिकवले जाते तेंव्हा उंदराने कळ ठराविक वेळा दाबली की अन्न दिले जाते (पोसिटीव् रि-एनफोर्समेंट). उंदीर ह्या मागचे शास्त्र न जाणता भुक लागली की ठराविक वेळा कळ दाबतो आणि अन्न मिळते. जर किती वेळा कळ दाबायची हे रॅडमाइझ केले तर उंदराला कळत नाही व तो कळ दाबत बसतो अन्न मिळेल ह्या आशेने. मला
वाटते श्रद्धेचे असेच आहे.

अर्थात जर बु. प्र. वादी उंदिर असता तर त्याने ह्या मागचे शास्त्र कळे पर्यंत अन्न खल्ले नसते. Happy

<<तुमची वैयक्तिक अंधश्रद्धा हा तुमचाच लढा आहे, त्यामधे चर्चा होणारच कशी? (मी कुठल्याही पदारथामधे तीनदा मीठ घातले (चमच्याने) की तो पदार्थ बिघडतो ही माझी अंधश्रद्धा.. ती तुम्ही कशी दूर करणार???>>
अगदी बरोबर. वैयक्तिक. त्याची चर्चा करण्यात अर्थ नाही. फक्त चर्चा अश्यासाठी की माझे विचार जर बरोबर नसतील, किंवा मी विचारच करत नसेन, तर कदाचित चर्चा वाचून मला इतरहि बाजू कळतील व माझा विचार योग्य दिशेला (म्हणजे मला उपयोगी होईल) वळतील.

<<तुम्ही हेटाळणी करता>>

यात हेटाळणी नव्हे. जर अंत्यसंस्कारांना महत्व नाही असे मानले तर समाजात अश्या सोयी व्हाव्यात. खुद्द भगवंतांनी म्हंटले आहे जन्म मृत्यू म्हणजे कपडे बदलण्याइतके साधे आहे. मृत्यू सारख्या गंभीर भीतिदायक गोष्टीचा भगवंतांनी असा हेटाळणी दायक उल्लेख करावा?असा नगण्य महत्वाच्या गोष्टीशी तुलना करावी?!

<<समाजावर वाइट परिणाम होतो हे जेंव्हा तू म्हणतोस तेंव्हा काय चांगले काय वाइट >>
इथे समाजापेक्षा वैयक्तिक यावर भर आहे. जर मला असे आढळले की मी आजकाल पूजा वगैरे मधे फार लक्ष घालतो, त्यामुळे माझ्या मुख्य व्यवसायात अडचण येत आहे, तर मी वैयक्तिक रीत्या विचार करून ठरवीन की हे पूजा वगैरे काही महत्वाचे नाही, तेंव्हा त्याच्यात वेळ घालवणे बरोबर नाही. किंवा जर माझी त्यावर इतकी जास्त श्रद्धा असेल की धंद्यापेक्षा ते मला जास्त महत्वाचे वाटते, त्याच्याशिवाय माझा धंदा योग्य प्रकारे करण्यास मला मानसिक बळ कमी पडते, तर मी पूजा करतच राहीन.. असे हे वैयक्तिक आहे. दुसर्‍या कुणि सांगितले म्हणून नाही.

>> तर मी वैयक्तिक रीत्या विचार करून ठरवीन की हे पूजा वगैरे काही महत्वाचे नाही, तेंव्हा त्याच्यात वेळ घालवणे बरोबर नाही. किंवा जर माझी त्यावर इतकी जास्त श्रद्धा असेल की धंद्यापेक्षा ते मला जास्त महत्वाचे, त्याच्याशिवाय माझा धंदा योग्य प्रकारे करण्यास मला मानसिक बळ कमी पडते, तर मी पूजा करतच राहीन.. असे हे वैयक्तिक आहे.

पण बरेचदा ते तितके सोपे वाटत नाही लोकांना, तेव्हा प्रॉब्लेम्स होतात. 'आमच्या घराण्यात दहा दिवस गणपती असायचा, मला वेळेअभावी शक्य नाही' या कल्पनेने 'अपराधी' वाटून मानसिक संतुलन बिघडणारे लोक असतात त्यांचं काय?

मुळात गणपती (किंवा कुठलीही पूजा) का करायचा हे समजूनच घेतलं नाही तर असे 'वैयक्तिक' प्रश्न पडणारच.

सामाजिक म्हणाल तर निर्माल्य, मूर्ती, (इतकंच काय मेलेली गुरंढोरंसुद्धा) 'पवित्र' जलाशयांत 'विसर्जित' करणं, दसर्‍याला रस्त्यावर आपट्याच्या पानांचा आणि वटपौर्णिमेला वडाच्या डहाळ्यांचा 'रबरबाट' घालणं (पटत नसेल तर या दिवशी दादर(प) स्थानकाबाहेर जाऊन बघा.) हे समाजाला आणि/किंवा पर्यावरणाला हानिकारक नाही का? त्यावेळी मूळ कल्पना 'ही झाडं लावावीत / जगवावीत' ही असते हे माहीतच नसतं किंवा विसरलं जातंच की नाही?

एकूण 'शास्त्राद् रूढिर्बलीयसी' हेच खरं होताना दिसतं की नाही?

परकीय, विशेषतः पाश्चिमात्यांच्या आक्रमणांमुळे आपली जीवन पद्धतीच नव्हे तर विचारसरणीच बदलली. आपल्याला आता शारीरिक सुख, तात्काळ मोबदला, पैसा इ. ची गोडी वाढू लागली. तेच जास्त महत्वाचे वाटू लागले. एखाद्याला ठार मारून आपला फायदा होत असेल, मग तो आपला सख्खा भाऊ का असेना, जोपर्यंत पोलीस पकडत नाहीत तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. अश्या प्रकारची वृत्ति झाली. धार्मिक ग्रंथात काय सांगितले ते पटेनासे झाले. आपल्या परकीय मालकांनी तसेच म्हंटले आहे. त्यांच्या धर्मात तर चक्क केन नि एबल ला की एबलनी केनला ठार मारले!! काय नुकसान झाले त्यांचे? उलट तेच मालक होऊन बसले.

मग मेल्यानंतर मिळणार्‍या मोक्षाकडे कोण पहातो? उपास? छे, मला चारी ठाव भरपूर जेवायला आवडते. संध्याकाळी संध्या? छे, छे, संध्याकाळी दुकानात बसून पैसे मिळवण्याची वेळ. आपल्या पाश्चिमात्य मालकांनी तसेच ठरवले आहे.

बाबा म्हणतात, तू ब्राह्मण आहेस, दारू पिऊ नकोस, चिकन खाऊ नकोस. पण तो दुसरा मुलगा सांगतो, तसे काही नाही. मग आता मी बुप्रा वादी बनतो. वैयक्तिक अंधश्रद्धा दूर करतो. भरपूर बीअर पिऊन मस्त चिकन खातो. काय पण मज्जा आली. नेहेमी असेच करावे!
पण कुठेतरी मनात काहीतरी खुपते. मग चर्चा करायची नि आपला मुद्दा इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न करायचा. किंवा चार्वाकाचा संदर्भ द्यायचा!

>> पण कुठेतरी मनात काहीतरी खुपते. मग चर्चा करायची नि आपला मुद्दा इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न करायचा. किंवा चार्वाकाचा संदर्भ द्यायचा!

Strong objection!

<<एकूण 'शास्त्राद् रूढिर्बलीयसी' हेच खरं होताना दिसतं की नाही?>>

पण म्हणूनच अशी चर्चा. म्हणजे मग रूढी, की ज्यामुळे कदाचित् काही वैयक्तिक, सामाजिक नुकसान होत असेल तर, त्यापेक्षा शास्त्र श्रेष्ठ मानावे. उदा. रूढी म्हणून पैसे नसले तरी घर गहाण टाकून पैसे घ्यायचे नि ते लग्नात हुंडा म्हणून किंवा गावजेवण घालून खर्चून टाकायचे, अश्या रूढीने तुमचे नुकसान होते आहे, तेंव्हा वैयक्तिक विचार करा असे म्हणावे लागते. किंवा
<<सामाजिक म्हणाल तर निर्माल्य, मूर्ती, (इतकंच काय मेलेली गुरंढोरंसुद्धा) 'पवित्र' जलाशयांत 'विसर्जित' करणं, दसर्‍याला रस्त्यावर आपट्याच्या पानांचा आणि वटपौर्णिमेला वडाच्या डहाळ्यांचा 'रबरबाट' घालणं >>
अश्या रूढींविरुद्धच म्हणणे आहे की वैयक्तिक रीत्या विचार केलात तर तुम्ही असे करणार नाही.

एक गंमत सांगतो, हा 'रबरबाट' फक्त भारतातच. इथेहि यांकीजना नुकतीच टिकरटेप परेड दिली, दुसर्‍यादिवशी रस्ता साफ. स्नो ने रस्ते खराब होतात, खड्डे पडतात, मग इथे रस्ते कसे साफ होतात लगेच? खड्डे कसे बुजवले जातात? मग भारतात काय माणसे कमी आहेत तो रबरबाट साफ करायला? का पैसे नाहीत? मराठी नाही तर बिहारी, बंगलादेशी आहेत त्यांना करायला लावा, ते करतील. मागे गणपति विसर्जनाने चौपाटीची खराबी होते म्हणे. मग एक बोट भाड्याने घेऊन भारतीय समुद्राच्या हद्दीतच पण दूरवर का विसर्जन करत नाही?

एकदम श्रद्धा वाईट म्हणून सगळे सोडून कशाला द्यायचे? शहाणपणाने रूढी नि शास्त्र यांचा सहयोग साधा की! एव्हढे हुषार म्हणवता स्वता:ला, तुमच्यामुळे अमेरिका चालते म्हणे! अंधश्रद्धेपायी नुकसान होत आहे, म्हणून बरेच लोक ओरडतात, नि श्रद्धा मोडली की इतरांना मानसिक त्रास होतो! पण शहाणपणा नाहीये का? अक्कल आहे की नाही? विचार का करत नाही?

या बाफ चा विषय वैयक्तिक अंधश्रद्धा असा असला तरी जिथे श्रद्धेपायी नुकसान होते, वैयक्तिक किंवा सामाजिक तिथे जरा विचार करा, असे सांगणे आहे.

<<माझि एक वैयक्तिक श्रध्दा पुस्तक-वहिला पाय लागला कि नमस्कार करणे. लहानपणापासुन शिकवले कि ति विद्या, सरस्वति असल्याने तिला पाय लागला तर नमस्कार कर. ल्हानपणापासुनच तशि सवय मला हे. हि अन्धश्रध्दा म्हणायचि का ? असल्यास तसे करणे मि थाम्बवले तर काय फरक पडेल किन्वा तसेच करणे चालु ठेवले तरि काय फरक पडणार हे ?>>

माझ्या मते काहीच नाही. भाजीत तीनदा मीठ टाकले नि ती भाजी इतर कुणाला खायला लावली नि त्यांना ती खारट लागली, तर मात्र तुमची वैयक्तिक श्रद्धा तपासून बघा म्हणण्याची वेळ येते. पुस्तकाला पाय नि नमस्कार याने तसे काही होत नाही.

<<या कल्पनेने 'अपराधी' वाटून मानसिक संतुलन बिघडणारे लोक असतात त्यांचं काय?>> जर भारतातून कुणि ज्ञानी गृहस्थ आणले नि त्यांनी सांगितले की स्थलकाल मर्यादे मुळे दहा दिवस गणपति न करता दीडच दिवस केला तरी चालेल, तर अपराधी भावना कमी होईल का? मुळात केवळ 'करायला पाहिजे म्हणून करतो आहे' की त्यातून खरेच काही मानसिक समाधान मिळते, आनंद होतो म्हणून? मग तर आपल्या शास्त्रात नि संतमहात्म्यांनी कित्येकदा ओरडून सांगितले आहे की बाबान्नो, श्रद्धा ठेवून धर्मकार्य करा, नाहीतर सगळे फुकट! तेंव्हा असा वैयक्तिक विचार करा. नि ठरवा.

मी तसे केले, आता मी जे करतो ते जाणून बुजून, शक्यतो श्रद्धापूर्वक करतो. पण देवांच्या मूर्ति घेऊन जागोजाग भटकत नाही. घराबाहेर असलो तर मनातलया मनात देवाचे स्मरण करून माझे समाधान होते. शेवटी सर्व माझ्या समाधानासाठी. मृत्यूनंतर मला मोक्ष मिळावा म्हणून नाही, कारण भगवंतांनी सांगितले आहे निष्काम कर्मयोग! खुद्द तुकारामबुवा सुद्धा म्हणाले, भक्ति करण्यातच आम्हाला आनंद आहे, मोक्ष नको, खुशाल पुनः पुनः जन्माला घाला, आम्ही भक्तीच करत बसू!

हे सगळे आपल्या धर्मात का लिहीले की, रूढी, अंधश्रद्धा इ. काही नको. वैयक्तिक विचार करा नि आपले आपण ठरवा. फक्त त्यासाठी कामक्रोधादि दुर्गुणांवर संयम ठेवा, नि मग विचार करा.

Pages