भारतातून अमेरिकेत सध्या ट्रॅव्हल

Submitted by च्रप्स on 30 June, 2021 - 21:43

सध्या भारतातून अमेरिकेत व्हीसीटर व्हिसा stamped असल्यास ट्रॅव्हल allow आहे का?
कोणी इतक्यात प्रवास केला आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत बऱ्याच परसेंटेज चे, लहान मुलांचेही डोस होत आले असतील तर तिथे आयुष्य पूर्वपदावर येणे नैसर्गिक आहे.
भारतात मात्र खूप जनता, सगळी लहान मुलं अजून रिस्क मध्ये आहेत.कोव्हीड गेला नाही असं अजून समजून वावरणं बरं(हे स्वतःलाच सांगतेय)

दोन डोस घेतल्याच्या ३ आठवड्या नंतर माझ्या मित्राला कोव्हीड झाला. इस्पितळात दाखल करावे लागले, १० दिवस. स्टेरॉइड्स वगैरे द्यावे लागले. चांगलाच कोव्हीड झाला होता, आता दोन आठवडे झाले घरी येऊन अजून बराच विकनेस आहे, १ मजला जिना चढले की धाप लागते.

अशा केसेसचे प्रमाण बरेच कमी असावे, पण आपण काळजी घेतलेली बरी.

अमेरिकेत लसीकरण झालेल्या जनतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तिथे निर्बंध शिथील केले आहेत. पण भारतात तसं नाही.

विमानतळांवर, विमानात बंद जागेत तुम्ही अनेक लोकांच्या संपर्कात येता तेव्हा संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरी पोचल्यावर एकांतवासात राहिलेले उत्तम. मार्गदर्शक सूचना सरकारसाठी नाहीत, लोकांच्या भल्यासाठी आहेत.

घरात विलागीकरण सांगितलं आहे म्हणजे घरच्यांपासून वेगळं राहणं पण अपेक्षित आहे. बघायला कोणी येत नाही हे खरं आहे.

मी आले त्याच्या 2 महिने आधी घरात सगळ्याना कोविड होऊन गेला होता आणि घरातले कोणी बाहेर जात नव्हतं, कोणी बाहेरून आत येत नव्हतं त्यामुळे आम्ही घरातल्यांसोबत मिसळलो होतोय.

घरातल्या लोकांच्यात अँटिबॉडीज नसत्या तर मात्र व्यवस्थीत विलागीकरणात राहिलो असतो. तसं पण आजी आजोबांना नातवापासून 15 दिवस (समोर दिसत असताना) लांब ठेवणं अवघडच झालं असतं.

मी यायच्या आधी मुंबई एअरपोर्ट वर फोन करून काय काय करणे आवश्यक आहे ते विचारून घेतलेलं. तुम्ही पण तेच करा म्हणजे नवीन नियम काय आहेत तर कळेल.

भारतात गेल्यावर नॉन स्टॉप फ्लाईटने गेल्यास क्वारंटाईऩ करावे लागत नाही जर वॅसिनेशन झाले असेल आणि RT test document असेल तर. तिथे गेल्यावर लगेच विमान्तळावर टेस्ट करुन , test negative आल्याच कळल्यावर मगच घरी मिक्स असे केले.

वॅसिनेशन झाले तरीही अजुनही रिस्क आहे. शक्यतो भारताची Trip गरज नसेल तर करु नये अस वाटत. लहान मुल असेल तर नकोच शक्यतो .
आई वडिल आणनेही रिस्की आहे.

परदेशातून येणार्‍या प्रवाशांसाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली प्रोसिजर्स
https://www.mohfw.gov.in/pdf/Guidelinesforinternationalarrivals17022021.pdf
https://www.mohfw.gov.in/pdf/Algorithmforinternationalarrivals.pdf

ही १७ फेब्रुवारी रोजी जाहीर केली आहेत. यानंतर काही घोषणा त्यांच्या संकेतस्थळावर दिसत नाही.
हे वाचून मला कळलं त्यानुसार अमेरि केतून येणार्‍यांना ७२ तासांतला निगेटिव्ह रिपोर्ट आणि आल्यावर सेल्फ हेल्थ मॉनिटरिग एवढंच आहे.

यात कुठेही लसीकरणाचा उल्लेख नाही

बापरे इथली चर्चा वाचून टेन्शनच आले आहे

मी आणि बायकोचा एकेक डोस झाला आहे आणि पोराचा एकही नाही (वय 13)
आता आजी आजोबा आल्यावर लगेच गळ्यात पडायचा नाही हे सांगितले आहे पण आता घरातल्या घरात विलगीकरण कितीपत पळतील याबद्दल शंका आहे
कारण त्यांचे दोन डोस झालेत म्हणून तेही मस्त हिंडत आहेत अमेरिकेत लास वेगास, न्यू जर्सी वगैरे

या परिस्थितीत काय करावे आता?
बायकोला ऑफिस ला जावेच लागते रोज
आणि मलाही ओडिनला घेऊन फिरायला जावे लागते
त्यामुळे पूर्णवेळ घरात काढणे अशक्य आहे

सोसायटीत किंवा ओळखीच्या कुणाचा रिकामा फ्लॅट जवळपास असेल तर पहा. आधी स्वच्छ करून घेऊन तिथे आईवडील काही दिवस राहू शकतील असा. जेवण-नाश्ता तुम्ही पोचवू शकाल. आमच्या सोसायटीत दोन कुटुंबांनी असं केलं होतं. घरातील एक-एक मेंबर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर घरात रहायला येण्यापूर्वी एका रिकाम्या फ्लॅटमधे राहिले.( वेगवेगळ्या वेळी अर्थात, म्हणजे एकाने फ्लॅट वापरल्यावर जवळजवळ महिन्याभराने दुसऱ्याने वापरला) त्यांच्या घरात बाकी सगळे मेंबर्स पॉझिटिव्ह होते आणि इतक्यात एकत्र मिसळू नका असं ( का ते माहिती नाही) डॉक्टरनी सांगितलं होतं.

दुबई, मेक्सिको मधे राहणे हा भारतीय जुगाड दिसतो. -> असंच काही नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा मार्ग गेल्या वर्षी युरोप बॅन झाल्यापासून तेथून येणारे प्रवासी वापरत होतेच. भारतीयांनी तोच उपाय वापरला असे म्हणता येईल.

तसं नाही, घरातल्या घरात आजीआजोबांचं विलगीकरण आणि घरातल्या मेंबरांना घरातच थांबणं जमणार नसेल आणि आवश्यक असेल तर म्हणतेय मी.

आशु, फार चिंता नको
आजी आजोबा 2 डोस आणि तुमचा पहिला यामुळे धोका कमी केलाच आहे.बाकी जुजबी नियम(पाणी तापवून ठेवून आजी आजोबांनी एअरपोर्ट वरून आल्या आल्या आंघोळ करणे, कपडे वॉशिंग मशीन ला लावून टाकणे,एखादा आठवडा 10 दिवस मिठ्या न मारणे) पाळले तरी धोका बराचसा कमी होतोय.
शेजारी रिकाम्या फ्लॅट मध्ये क्वांरंटाईन वगैरेची त्यांची तयारी असेल तर उत्तम.अन्यथा रोज डिलिव्हरी वाले, मेड्स, बाहेर जाऊन आल्यावर आपण जितकी स्वच्छता आणि अंतर पथ्ये पाळतो तितकी पुरेशी असावी.

बापरे इथली चर्चा वाचून टेन्शनच आले आहे>>> बिल्कुल टेन्शन घेउ नका.मीअनुने सांगितले तेवढे केले तरी बास आहे.कालच आमचे डॉक्टर नातलग,आईला म्हणाले की करोना अजून दीड-दोन वर्षे रहाणार.तेव्हा मास्क कंपल्सरी वापरच.तसेच आपण इतर काळजी घेतो ती घ्यावी.हात सॅनिटाईज करणे वगैरे.

डॉ.प्रेमानंद रामाणींच्या मुलाखतीत तर त्यांनी सांगितले होते की करोना जाणार नाही.त्याचे स्वरूप बदलेल.म्हणजे आता आपण ताप आल्यावार क्रोसीन घेतो आणि कामाला लागतो तशा स्वरुपाचा करोना राहील.सो चिल!

भरत, साईट वर काय लिहिलंय माहीत नाही. माझ्याकडे मुंबई एअरपोर्ट वर लसीचे प्रूफ मागितले नाहीत. फक्त टेस्ट result मागवले.

सीमा, तुमचा अनुभव नक्की कधीचा आहे ? आता कुठल्याही विमानात results शिवाय चढून देत नाहीयेत आणि मुंबई विमानतळावर सुद्धा कुठलीही टेस्ट करून घेत नाहीयेत. फक्त आपले टेस्ट result दाखवायचे की झालं.

आशू, टेन्शन घेण्यासारखे काही नाही. घरातुन बाहेर गेलेले लोकं घरात आले की हात पाय साबणाने धुवायचे आणि मगच इकडे तिकडे हात लावायचा. शक्य झाल्यास अंघोळ केलेली चांगली.

मी म्हणेन आजी आजोबा आले की फक्त 3 दिवस त्यांना व्यवस्थीत विलागीकरणात राहु देत कुठलीही लक्षणे दिसली नाहीत तर आपलं आपलं नॉर्मल चालू द्यायचं.

कोणाला घाबरवायचा हेतू नाही पण एक मैत्रीण (pfizer fully vaccinated) अमेरिकेतून भारतात आली (दिल्ली ला ) आणि तिला आणि तिच्या नवऱ्याला कोरोना झाला. तिला 6 महिन्याचं बाळ आहे. एक एक करत घरातल्या सगळ्याना (1 ला डोस झालेला असून देखील) कोरोना झाला. कॉम्प्लिकेशन नाही झाले कोणालाच पण बाळाला कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न होता महिना 2 महिने. त्यामुळे उगाच रिस्क नकोच कुठली. त्यांच्याकडे कुठून आला कोरोना ते कोणाला कळालं नाही.

आमच्याकडे ईश्वर कृपेने कोणाला काहीही झालं नाही. आम्ही येऊन आजच 1 महिना झाला. झालाच असता कोरोना मला तर काय यासाठी मी आधीच तयारी करून ठेवली होती. मुलाची सोय लावून ठेवली होती.

अनेक जण सांगतात की कोणीही भारतात येऊ नका, अमेरिकेतच राहा वगैरर वगैरे पण ते अनेकदा शक्य नसतं त्यामुळे यावं लागलं भारतात तर व्यवस्थित काळजी घेतली तर सगळे सेफच असतात.

धन्यवाद अनु
हो हे सगळे तर करणार आहोतच
असेही आम्ही दारातच सॅनित्यझर चा स्प्रे ठेवलेला असतो
बाहेरून आल्यावर प्रत्येकजण तो मारून, कपडे, बूट चपला, मग च घरात येतो
प्रत्येक गोष्ट सॅनित्यझर करून आणि दुधाची पिशवी धुवून मगच घरात येते
तेच फॉलो करीन आई बाबांना असे वाटते
चिंता मुलाचीच आहे, त्याला आजी आजोबापासून काही दिवस लांब ठेवावं लागेल, तेच अवघड जाणारे

रिया हो ना
आई बाबा तर मे मधेच येणार होते पण तेव्हा इथे कोरोना अगदीच भरात होता म्हणून त्यांना म्हणलं येऊ नका, पोस्ट पोन करा
मग इकडून त्यांची बीपी ची औषधे कुरियर केली कारण अजून दोन महिने वाढले आणि तिथे केमिस्ट कडे जाऊन औषध आणले असला प्रकार नसतो
ढकलत ढकलत आता जुलै वर आले कारण ऑगस्टमध्ये त्यांचा व्हिसा संपतोय

आमचे घर म्हणजे बंगला आहे, वरती खालती atch बाथरूम टॉयलेट
पण किचन एकच
म्हणजे त्यांना आल्या आल्या वरच्या खोल्यात रवानगी करावी लागेल
पण आता ते कितपत ऐकतील याबाबत शंका आहे
आम्हाला काहीच झालेलं नाही अमेरीकेत सगळीकडे फिरलोय वगैरे युक्तिवाद झालेत ऑलरेडी विषय काढल्यावर

सीमा, तुमचा अनुभव नक्की कधीचा आहे ? आता कुठल्याही विमानात results शिवाय चढून देत नाहीयेत आणि मुंबई विमानतळावर सुद्धा कुठलीही टेस्ट करून घेत नाहीयेत. फक्त आपले टेस्ट result दाखवायचे की झालं.///
माझा अनुभव ९ दिवसापुर्वीचा आहे. मी लिहिलय तस RT PCR test compulsory आहे. त्याला रिझल्ट म्हणता आहात का ? आता म्हणजे कधी ?
मुबई विमान तळावर टेस्ट करण , safety protocol आहे. विमानात संसर्ग झाला असल्यास ? ती खातरजमा करुनच घरी मिक्स व्हायचे असे करणे महत्वाचे वाटले . You can have test done in home as well by staying separate.
अजुन काही माहिती हवी असल्यास मेल करा आशुचँप.

आशु , ते आल्यानंतर २-३ दिवसांनी त्यांची RT-PCR करुन घे . तुला आणि त्यांना पण टेंशन राहणार नाही.

https://www.mohfw.gov.in/pdf/Algorithmforinternationalarrivals.pdf

हे वाचणार आहे का कोणी? कुटुंबात मृत्यूसारखी आणीबाणीची परिस्थिरी सोडली तर इतरांना विमानात बसण्यापूर्वी निगेटिव्ह आर टी पी सी आर टेस्ट हातात असणं कंपल्सरी आहे.

यात सवलत हवी असेल तर एअर इंडियाच्या एअर सुविधा संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. अशांना भारतात उतरल्यावर विमानतळावरच टेस्ट साठी सँपल्स देऊन घरी सोडलं जाईल.

ईमरजंसीची परिस्थिती सोडली तर इतर कारणांसाठी सवलत देत नाहीत , डोक्याला व्याप करुन घेण्यापेक्षा RT-PCR करुन टेस्ट रिपोर्ट घेऊनच एअरपोर्ट जा.
JFK वर अर्धा तासात RT-PCR टेस्ट करुन टेस्ट रिपोर्ट मिळतो.

भारतातून व्हाया दुबई अमेरिकेत जाता येतंय का आता? कोणाला काही लेटेस्ट माहिती आहे का?

भारतातून इतका मोठा प्रश्न झालाय कल्पना न्हवती.
कॅनडातून विमाने चालू आहेत आणि अमेरिकेत जाताना व्हॅक्सिन असो किंवा नसो कसलही विलगीकरण न करता कायम वाईल्ड वेस्ट प्रकार आहे अशाच बातम्या वाचत होतो. त्यामुळे भारतातून काही वेगळं असेल असा डोक्यात विचारच आला न्हवता.

मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून त्यांचे आई बाबा जून मध्ये कधीतरी (तारीख विसरले मी) भारतातून अमेरिकेत गेले. त्यांनी 'covaccine' घेतलेलं ते अमेरिकेत accept झालं नाही आणि त्यांना q'tine सेंटर मध्ये 15 दिवस राहिला लागलं. त्यानंतर 15 दिवस घरात q'tine केलं त्यामुळे ते लग्नाला जाऊ शकलेच नाहीत आणि त्यांची 1 महिन्याची सुट्टी संपली यातच म्हणून संपूर्ण q'tine संपलं तेंव्हा दुसऱ्याच दिवशी भारतात निघून आले.

तिच्या भावाने कोविशिल्ड घेतलेलं तर त्याला फक्त 15 दिवस घरात q'tine केलं.

Just for record इकडे लिहून ठेवतेय.

मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून त्यांचे आई बाबा जून मध्ये कधीतरी (तारीख विसरले मी) भारतातून अमेरिकेत गेले. त्यांनी 'covaccine' घेतलेलं ते अमेरिकेत accept झालं नाही आणि त्यांना q'tine सेंटर मध्ये 15 दिवस राहिला लागलं. त्यानंतर 15 दिवस घरात q'tine केलं त्यामुळे ते लग्नाला जाऊ शकलेच नाहीत आणि त्यांची 1 महिन्याची सुट्टी संपली यातच म्हणून संपूर्ण q'tine संपलं तेंव्हा दुसऱ्याच दिवशी भारतात निघून आले.

तिच्या भावाने कोविशिल्ड घेतलेलं तर त्याला फक्त 15 दिवस घरात q'tine केलं.

Just for record इकडे लिहून ठेवतेय.

रीया, जून २०२१ का? आणि त्या वेळेस तर प्रवेश निषेध होता..... मग वेगळी परवानगी घेतली होती का?
कारण बी१/बी२ वर तर जाताच येत नाही. आणि बाकीच्या ज्या सवलती आहेत नियमात त्या फक्त अविवाहितअपत्यांसाट्ठी आहेत.
parents or legal guardians of a U.S. citizen or lawful permanent resident unmarried minor child;

त्यांनी 'covaccine' घेतलेलं ते अमेरिकेत accept झालं नाही आणि त्यांना q'tine सेंटर मध्ये 15 दिवस राहिला लागलं. >>>हे वाचून आश्चर्य वाटले. त्यांना व्हॅक्सिन बद्दल कुठे व कोणी विचारले ? कारण अजून तरी व्हॅक्सिन घेतले असेल नसेल तरी काही फरक पडत नाही. असेही अमेरिकेत आल्यावर QURANTINE करायला प्रत्यक्ष सांगत नाहीतच

Pages