भारतातून अमेरिकेत सध्या ट्रॅव्हल

Submitted by च्रप्स on 30 June, 2021 - 21:43

सध्या भारतातून अमेरिकेत व्हीसीटर व्हिसा stamped असल्यास ट्रॅव्हल allow आहे का?
कोणी इतक्यात प्रवास केला आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐकीव बातमीनुसार असं पॅकेज विकतायत. भारतातून मेक्सिको सिटीत प्रवास, २ आठवडे हॉटेल, भारतीय जेवणासहित आणि नंतर अमेरिका.
>>> काही कॉन्टॅक्ट आहे का? इंटरेस्टिंग आहे हे...

मेक्सिको सिटीत हॅाटेलचा खर्च, जेवण, उबर (डबा उबरन् पाठवलाजातो) ह्या सगळ्याचा खर्च ८५-९० डॅालर्स येणार असेल तर कॅनकुनला छान all inclusive हॅाटेलमधे राहायचा पर्याय जास्त चांगला आहे.. तसेच कॅनकुनला इंग्रजीचा वापर जास्त त्यामुळे पालकांसाठी तो ॲाप्शन जास्त सोईस्कर ठरेल

सध्या दुबईत जाण्यासाठी पण २ आठवडे कुठे तरी अझर बैजान की अजून कुठल्या देशात काढावे लागतात. मग त्यानंतर दुबई २ आठवडे व मग अमेरिका! अरे बाप रे!!

शांत आणि धीरानं घ्या सर्वच. इंटरनॅशनल ट्रॅव्हल चे नियम वरचेवर बदलत / शिथिल / जाचक करत आहेत परिस्थिती बघून. त्यामुळे भारतातील परिस्थिती जशी सुधारत जाईल तसे अमेरिकेत जाणे सुकर होईल. सध्या just count your blessings.

https://www.facebook.com/India.usembassy/ इथे वरचेवर अपडेट्स असतात.

दुबई, मेक्सिको मधे राहणे हा भारतीय जुगाड दिसतो. अमेरिका असे काही सांगणार नाही >>> करेक्ट आहे फा , चेक इन करण्यापुर्वी मागील १४ दिवसात कुठे वास्तव्यास होतात डिक्लेअर कराव लागतं त्यात भारत , चीन , ब्राझील , अजुन २ देश आहेत. त्यात मेक्सिको नाही Proud
डोकं भारी आहे लोकांचं. Proud

आशू, मी 4 जून ला भारतात आले. भारताचे नागरिक असाल तर कोणतेही प्रश्न येत नाहीत.

अमेरिकेतून निघताना टेस्ट mandetory आहे. मुंबई विमानतळावर ते रिपोर्ट्स दाखवावे लागतात. 2-3 फॉर्म भरून घेतात.

मला विमान सुद्धा संपूर्ण रिकामं मिळालं म्हणजे मोजून 25 लोकं असतील विमानात.. आता पर्यंतचा सर्वात सुंदर प्रवास होता हा माझा.

रागीमुद्दे - तुमचे पती आणि मुलगा अमेरिकेत असल्यामुळे तुम्ही ट्रॅव्हल करू शकाल असे वाटतेय. डिरेक्ट फ्लाइट्स चालू आहेत, तुम्हाला NIE अ‍ॅप्रूव्हल लागेल. विसा स्टॅम्प्ड असेल तर फक्त NIE च लागेल.

अजून माहिती हवी असेल तर, मला विपु करा. नवरा आणि मुलगा भारतात अडकले होते गेले ३ महिने आणि नवर्‍याचा विसा नव्हता सो मी खूप रिसर्च केलाय ऑप्शन्सचा..

अमेरिकेत व्हीसीटर व्हिसा stamped असल्यास ट्रॅव्हल allow आहे का>>
नाही. फक्त ग्रीन कार्ड होल्डर आणि सिटिझन ना परवानगी आहे आत यायला आणि वेव्हर असलेल्याना.

खालील माहिती ग्रीन कार्ड/सिटिझन साठी:
इथून भारतात जाण वॅक्सिनेशन असेल तर खुप कॉम्प्लिकेटेड नाही. जाताना कोव्हिड टेस्ट चे डॉक्युमेंट(३ दिवसाच्या आतले) आणि व्हॅक्सिनेशन चे डॉक्युमेंट घेवून जावे लागते. युनायटेडची फ्लाईट असेल तर बरं. कारण ले ओव्हर नाही. तिथे गेल्यावर एअर पोर्ट वर टेस्ट परत करायची.
नुकतेच हा सगळा प्रकार करावा लागला आहे. एमीरेट्स न पण जाता येत. पण क्वारंटाईनचा स्टँप मिळतो. येताना परत टेस्ट करावी लागते. पण एमीरेट्स कधी पण अचानक फ्लाईट कॅन्सल करत आहेत. किंवा बॅन वाढवत आहेत. त्यामुळ ते लक्षात घेवून ट्रॅव्हल प्लॅन करावा. युनाईटेड चा तसा इशु नाही.

धन्यवाद सीमा!
fully vaccinated असेल तर भारतात गेल्यावर किवा परत आल्यावर क्वारन्टाइन करावे लागते का?

भारतात आल्यावर 15 दिवस q'tine आहे >>> हे युएस वरुन डायरेक्ट फ्लाईट्ने प्रवास केला तरी लागु आहे का ?
एअर ईंडियाच्या वेबसाईट वर हा Algorithm आहे त्यात International arrival from all other countries साठी सेल्फ Self monitor
health for 14days असं दिलयं . https://www.airindia.in/images/pdf/Algorithm-for-international-arrivals.pdf

थॅन्क्स रिया!
ट्युलिप आणी श्री ,लिन्क्स बघते.

हो श्री. मी नेवर्क मुंबई विमानाने आले united च्या.
मुंबई airport वर कोणतीही टेस्ट करावी लागली नाही. अमेरिकेतून आणलेले टेस्ट रिपोर्ट्स चेक केले त्यांनी फक्त.
आणि विलागीकरणाचा फॉर्म भरून घेतला. Q'tine म्हणजे घरीच व'tine . हॉटेल वर वगैरे नाही.

धन्यवाद रिया
पण क्वारटींन म्हणजे घरच्यापासून पण का
म्हणजे आई बाबा आले की त्यांना थेट वेगळ्या खोलीत रहावं लागेल असे काही का बाहेर फिरायचं नाही इतकंच

आई-बाबा नि घरचे इतर या दोन्ही पार्टीजचे व्हॅक्सिन झाले असेल तर संसर्गाची शक्यता कमी आहे. पण नसेल झाले तर घरातच विलगीकरण करणे बरे.

लसीकरण झाले तरी संसर्ग होऊ शकतो आणि तो आपण इतरांना देऊ शकतो. लसीकरण झाले तर संसर्ग झाल्याने होणाऱ्या आजाराचा त्रास कमी होईल.

परदेशांतून आलेल्यांना विलग केले नाही आणि त्यांच्या स़पर्कात येऊन घरची इतर माणसं बाहेर जात असतील तर ते विलिनीकरण ठरणार नाही.

{घरी कोण बघायला येतेय आशु... बिनदास राहा..}
मुंबैत अशानेच दुसऱ्या लाटेला जोर मिळाला.
लक्षणे नसलेल्या positive लोकांना home isolation ची सोय दिली गेली, पण ते isolate राहिले नाहीत आणि अख्खी कुटु़बे आजारी पडली.

विलिनीकरण. >>>> कोण कशात विलीन होणार आहे ? Happy

मुंबैत अशानेच दुसऱ्या लाटेला जोर मिळाला. >>>> अनुमोदन. तिकडे गेल्यावर तीन दिवसांनी टेस्ट करून घेणं बरं का ?

हो.
2 डोस नंतरही कोव्हीड होईल.फक्त होण्याची शक्यता कमी, झाला तर हॉस्पिटलमध्ये जायला लागण्याची, मृत्यूची शक्यता कमी.
पण तरीही आजूबाजूला लसीकरण न झालेले लोक, लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण धोकादायक आहेच.

गाईडलाईन काय आहे भारतात? अमेरिकेत सीडीसी ने लसीकरण पूर्ण झाले असल्यास आणि कुठली लक्षणे नसल्यास विलगीकरणाची आवश्यकता नाही असे स्पष्ट सांगितले आहे.

Anu हे मला माहित नव्हते.. आम्ही दोन डोस घेतल्यापासून बिनदास फिरतोय सगळीकडे.. मागचया आठवड्यात डिझनी गेलो होतो.. कोणीही मास्क घालत नाहीय...
आजच वॉटर पार्क जाऊन आलो...
अज्ञानात सुख ते हेच.. आता विचार करावा लागेल...

दोन डोसनंतरही कोविड होऊ शकतो. माझ्या मैत्रिणीच्या आईवडिलंना झाला होता आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये होते. फक्त फार सिरियस कंडिशन होणार नाही अशी आशा. आणि अर्थातच तुम्ही दुसर्यांनाही देऊ शकताच.

Pages