भारतातून अमेरिकेत सध्या ट्रॅव्हल

Submitted by च्रप्स on 30 June, 2021 - 21:43

सध्या भारतातून अमेरिकेत व्हीसीटर व्हिसा stamped असल्यास ट्रॅव्हल allow आहे का?
कोणी इतक्यात प्रवास केला आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आग्रीनकार्ड होल्डर्स आणि अमेरिकन सिटीझन्स येऊ शकतात. बाकी नॉन-इमिग्रंट व्हिसा होल्डर्स वर बॅन आहे.

मला वाटतंय 5 मे पासून ट्रॅव्हल बॅन आहे का ? ट्रॅव्हल बॅन आहे वाटलं म्हणून आई बाबांना घेऊन गेले नाही अमेरिकेत.

नसेल बॅन तर घेऊन जा , तेच बरंय सध्या.

सध्या भारतातून अमेरिकेत व्हीसीटर व्हिसा stamped असल्यास ट्रॅव्हल allow आहे का? -> नाही.
विझिटरला मेक्सिको/ दुबई अशा ठिकाणी १५ दिवस वास्तव्य करून मग येता येइल.

इथे माहिती मिळू शकेल-
https://travel.state.gov/content/travel/en/us-visas/visa-information-res...

दुबई, मेक्सिको वाल्यांना येऊ देत असतील, पण लोक कुठूनही व्हाया दुबई/मेक्सिको एक दिवस मुक्काम करून येतील म्हणुन तिथे किमान १५ दिवस वास्तव्य असावे असा नियम असेल.

त्याचा वापर करून दुबई/मेक्सिकोत १५ दिवस राहून या असे सांगत असतील.

तिथून अमेरिकेत आल्यावर परत अमेरिकेतले क्वारंटाईन नियम - होम क्वारंटाईन वगैरेही असेल.

भारतात व्हिसा असलेल्याना नोटिफिकेशन आहे की विद्यार्थी आणि H-1 फक्त व्हिसा घेऊ शकतात.
बाकी लोकाना B-1, Tourist वगैरे जायची परवानगी नाही.

मानव - साधारण तसेच दिसते. दुबई, मेक्सिको मधे राहणे हा भारतीय जुगाड दिसतो. अमेरिका असे काही सांगणार नाही (मेक्सिकोत राहा वगैरे)

मागचे १५ दिवस भारतात (किंवा जेथून सध्या येउ देत नाहीत अशा देशात) राहायचे नाही, म्हणून हे करत असावेत.

बरेच लोक करत असावेत. फेबुवर कोणीतरी "मेक्सिको सिटी मधे भारतीय घरगुती जेवण" शोधत असल्याची पोस्ट पाहिली होती Happy

मी ही सध्या भारतात अडकले आहे. जून १५ ला सासरे गेले हार्ट अटॅक ने १९ जून ला भारतात पोहचले. मुले अमेरीकेत. मुलगा खूपच लहान आहे. कधी जाण होईल मुलांजवळ माहीत नाही. एक प्रकारची भीती वाटते, रडु येत. कधी बॅन उठतो माहीत नाही. माझ्या सारखे अजुन असतील अशी मनाची समजूत घालते काही क्षणांसाठी आणि परत मन बेचैन होत. काहीच सुचत नाही.

रागीमुद्दे, धीर सोडू नका. तुम्हाला भारतात येऊन अजून १०-१२च दिवस झाले आहेत. तुम्ही येताना २-३ आठवड्याच्या तयारीने आला असाल. घरात दु:ख असताना अजून निराशा मनात येते खरं पण ही बंदी लवकर उठेल.

वरील अथेनाने दिलेली लिंक नीट वाचलीत तर यू.एस सिटीझनच्या पालकांना परवानगी आहे. आपले अपत्य यू.एस सिटीझन असेल तर ते लहान (मायनर) आहे म्हणून तुम्ही येऊ शकाल असे वाटते. अर्थात नीट चौकशी करून प्रवासाचा निर्णय घ्या.

रागीमुद्दे,मायबोली आयडी रिया शी संपर्क साधा.
तिने मागच्या लॉकडाऊन मध्ये अश्याच काहीश्या परिस्थितीत ट्रॅव्हल केले आहे भारतातून.

रागीमुद्दे धीराने घ्या. लवकरच बॅन उठेल, तोवर भारतातील प्रियजनांच्या सहवासाचा आनंद लुटा. आपल्याला लवकर घरी परतता यावे याकरता, शुभेच्छा.

रागीमुद्दे, धीर सोडू नका, this shall pass, लवकर उठेल बॅन आणि काहीतरी मार्ग निघेल. तुम्हाला लवकर परत जाता येवो हि शुभेच्छा.

अनु, माझी केस वेगळी होती गं. एकतर माझा मुलगा अमेरिकन नागरिक आहे, त्याचा विजा संपत आलेला. शिवाय माझा नवरा तेंव्हा अमेरिकेत होता. माझ्याकडे H4 विजाच नव्हता म्हणून मी इकडे अडकून पडले होते. त्यामुळे फॅमिली सेपरेशन चं कारण देऊन आम्हाला विजा अपॉइंटमेंट मिळवून जाता आलं. तेंव्हा ट्रॅव्हल बॅन नव्हता.

आता ट्रॅव्हल बॅन आहे तर ज्यांची मुलं अमेरिकन नागरिक आहेत अशा पालकांना मुलांसोबत प्रवास करता येतोय फक्त तुम्ही vaccinated असायला हवे आहात.

रागीमुद्दे... तुमचा व्हीझा स्टॅम्प आहे का?
तुम्ही इमेरजन्सी कारण देऊन ट्रवेल करू शकता का ते बघा...

फेबुवर कोणीतरी "मेक्सिको सिटी मधे भारतीय घरगुती जेवण" शोधत असल्याची पोस्ट पाहिली होती>> माझी मैत्रिण आहे मेक्सिको सिटीत..तीचा केटरिंग व्यवसाय अगदी जोरात चाललाय.. म्हणे दिवसाला १५० डबे जातात Lol

असो, टेलिग्रामवर एक ग्रूप तयार आहे. तीथे सध्या लोकं Travel companion साठी मेसेजेस टाकतात आणि coordinate करून ट्रॅव्हल करतात.

रागीमुद्दे, तुमचा h-4 visa असल्यास
https://www.path2usa.com/blog/h4-dependent-visa-holders-granted-waiver-f...

https://travel.state.gov/content/travel/en/News/visas-news/presidential-...
या दुव्यातही ट्रॅवल बॅनला अपवाद दिले आहेत त्यात शेवटचा मुद्दा नॉन-सिटिझनचे Derivative family members हा आहे.

माझे आई वडील अमेरिकेत आहेत
भावाकडे गेले होते
कोरोना मुळे पोस्टपोन केलं पण आता 11 जुलै चे तिकीट आहे
त्यांना भारतात यायला काय अडचण येईल का
त्यांनी दोघांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत व्हाक्सींन चे
असे कळलं की मुंबईत आल्यावर पुन्हा टेस्ट करायला लावतात आणि अनेकदा ती पॉझिटिव्ह असल्याचे सांगतात आणि हॉटेल मध्ये 14 दिवस राहायला लावतात
कोणाला काही अनुभव आहे का

अश्विन, भारतीय नागरिक आणि ओसीआय कार्ड होल्डर्स ना भारतात जायला काही अडचण नाहीये (तसंच अमेरिकन नागरिकांना, ग्रीनकार्ड होल्डर्स ना, मायनर नागरिकांच्या पालकांना अमेरिकेत यायला काही अडचण नाहीये).

फा, तुझं बरोबर आहे. हा देसी जुगाडच आहे. ऐकीव बातमीनुसार असं पॅकेज विकतायत. भारतातून मेक्सिको सिटीत प्रवास, २ आठवडे हॉटेल, भारतीय जेवणासहित आणि नंतर अमेरिका.

दोन्ही मुल भारतीय आहेत. माझा H4 visa आहे. मुलगा extremely premature baby आहे म्हणून अजून काळजी वाटते. मला येताना माहीत होत की मी अडकणार पण इथे साबा ही एकट्याच झाल्या होत्या त्यानां या परिस्थिती एकट ठेवन मनाला नाही पटल. साबानांही आता आमची साथ हवी होती. म्हणून येण्याच
decision घ्यावं लागल. सध्या वाट पाहण्या शिवाय काही करता नाही येणार. सर्वांना धन्यवाद. स्वाती२ लिंक पाहते.

वाचतेयं.रागीमुद्दे .... लवकरच बाळाकडे परत येता येईल सदिच्छा.
मलाही जायचेयं पण कधी जावे कळत नाही. तिथे अडकून पडायचे नाही , पटकन जाऊन यायचेयं. जातानाही हीच प्रक्रिया आहे का ? जायचंच तीनचार आठवड्यांसाठी त्यात असं वाटेत पंधरा-पंधरा दिवस रहाणे अशक्य आहे. बोटीत बसून गेल्यावर इतकेच दिवस लागतील. Happy
दोन्ही लशी झालेल्यांना सुद्धा हेच नियम आहेत का ? ह्याचे कारण कोरोना आहे तर विजा स्टेटसशी का संबंध आहे. आमचे एक कनेडियन मित्र भारतातून निघणार होते त्यांना दोहाला पंधरा आणि Dallas ला दोन दिवस रहावे लागेल सांगण्यात आल्याने त्यांनी रहीत केलं.

लवकर भेट घडो ही सदिच्छा. बाकी जिकडे आहात तिकडे लस घ्या.
२१ जुलै नंतर कदाचित डायरेक्ट प्रवासाचे अमेरिका कॅनडाचे नियम बदलतील.
नाहीतर युरोप/ मेक्सिको काय असेल ती सहल घडली म्हणा. काळजी दुःख करून परिस्थितीत फरक पडणार नसेल तर आहे त्यात आनंदात रहा. नंतर या आठवणी पार्टीत, पोराबाळाना, मित्रमैत्रिणींना सांगायला मजा येईल असा विचार करा. सुरक्षित रहा.

Pages