
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
त्याच्या अक्षरश डोक्याच्या
त्याच्या अक्षरश डोक्याच्या वरती मांजर. पण येड्याला कळलच नाही.>>>>> अशावेळी कुत्रे काय येडे दिसतात.
भारी किस्सा!
अमृताक्षर,पिल्ले किती गोड!
कसली क्यूट बाळ आहेत!
कसली क्यूट बाळ आहेत! अमृताक्षर , मज्जा आहे तुमची .
पेट्स ची नावं इंग्लिश असली
पेट्स ची नावं इंग्लिश असली पाहिजेत असा काही नियम आहे का? एकाच्याही पेटचे नाव भारतीय नाही.
माझ्या इमॅजिनरी मांजराचे नाव डब्बुलाल आहे. त्याच्या गमतीजमती ल्याह्यच्या आहेत केव्हातरी.
खूपच गोडू आहेत तिन्ही सश्याची
खूपच गोडू आहेत तिन्ही सश्याची पिल्लं.
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
खरचं की प्राण्यांसाठी मराठी नाव सुचत कशी नाही पटकन काय माहीत.
स्नो ला पाहिल्या बरोबर मला तो स्नो चा गोळा वाटला म्हणून स्नो.
ओरिओ ला पाहिलं आणि ओरिओ बिस्कीट आठवलं म्हणून ओरीओ.
लुना म्हणजे चंद्र. लुना चंद्रा सारखा आहे milky white with gray spot. म्हणून तो लुना.
या तिघांना शोभेल अशी मराठी
या तिघांना शोभेल अशी मराठी नाव सुचवा. मी त्यांचं परत नामकरण करेल .
खुप गोड आहेत तिघेही लुना
खुप गोड आहेत तिघेही लुना ,ओरियो ,स्नो
ओडिन चा किस्स्सा त्याचे
ओडिन चा किस्स्सा
त्याचे कुठे बघायचे हे न कळून हाताकडेच बघणे हे अगदी डोळ्यापुढे आले
पार येडबंबू दिसतात अशा वेळी अगदी!
त्यांना न्यूटर करता येत असेल ना?
अमृताक्षर - कसली क्यूट आहेत सशाची पिल्लं! पण आता असे मल्टिप्लाय होत राहणार की काय तुमच्याकडचे ससे? ३ -३ करत संख्या वाढत गेली तर पंचाईत तुमची
हो करता येते. मी टॉम ला
हो करता येते. मी टॉम ला separate केज मधे ठेवतेय सद्या तरी.
जेरी आणि तिची बाळ वेगळी ठेवली आहे.
न्युटर करायचा विचार चालू आहे
न्युटर करायचा विचार चालू आहे . पण त्याबद्दल जास्त माहिती नाही.
वेट कडून सगळी माहिती घेते आणि मग करून घेते.
हे तिघे इतके गोड आहेत की अजून खूप सारे पिल्लू असावेत असं वाटतं पण त्यांना सांभाळणं इतकं सोपं होणार नाही शिवाय इथे जास्त गवत मिळत नाही. मी जमेल तेवढं शेतातून आणते आणि बाकी मग vegetables देते.
सशांची पिल्लं केवढी गोड आहेत!
सशांची पिल्लं केवढी गोड आहेत! खूप आवडली.
भारी आहेत पिल्लं
भारी आहेत पिल्लं
इवलीशी आहेत पिल्लं. तळहातावर
इवलीशी आहेत पिल्लं. तळहातावर मावतील इतकी बिट्टी
क्युट आहेत पिल्लं.
क्युट आहेत पिल्लं.
अगं कसली गोड पिल्लं आहेत
अगं कसली गोड पिल्लं आहेत ससुले. अगदी लहान मुलांच्या गोष्टीतलयासारखे.
ओडू गोडू
कसलं गोड बाळ.
मांजरांचे अॅटीट्यूड काय विचारता?
अशी चिड्चिड केली तिने म्हटलं अग ते काय कुत्रयाचं पिल्लू आहे का..
माझी मैत्रीण एक दिवस फिरून येताना माझ्याकडे बसली होती ५ मिनिटे तेव्हा मंकी आला बाहेर. ती बोलवायला लागली त्याला प्रेमाने ये इकडे मांडीवर ये. तो तिच्याकडे ढूंकूनही न बघता पुढे चालत गेला
माझ्या या मैत्रिणीकडेच लॅब पपी आहे आणि गेलं की अगदी बाळासारखंच वागतं. जवळ काय घ्यायचं, चाटू द्यायचं त्याला भरपूर, मान खाजवायची, त्याच्यामागे धावायचं .लाडच लाड करायचे.
बादवे, मंकी सॅमी १ वर्षाचे झाले म्हणजे आम्ही त्यांना घरी जेव्हा आणलं त्या दिवशी केला बर्थडे.
सामो पहिल्या दिवशी तर खूपच
सामो पहिल्या दिवशी तर खूपच लहान असतात. फर पण नसते. नंतर येते फर.

हा चार दिवसाचा इवलुसा लुना.
आणि हा पाच दिवसाचा निवांत
आणि हा पाच दिवसाचा निवांत झोपलेला स्नो.

आपल्या लाडक्या प्राण्यांचा
आपल्या लाडक्या प्राण्यांचा बडे करायला भारी मजा येत असेल.
कसली गोड असतात ही सगळीच भुभु माऊ आणि इतर बाळ.
मी पण आमच्या ससुकल्यांचा बडे करणार पुढच्या वर्षी 10 जुन ला.
मंकी आणि सॅमीला बिलेटेड हॅपी
मंकी आणि सॅमीला बिलेटेड हॅपी बड्डे!!
ती बोलवायला लागली त्याला प्रेमाने ये इकडे मांडीवर ये. तो तिच्याकडे ढूंकूनही न बघता पुढे चालत गेला >>
मंकी आणि सॅमीला बिलेटेड हॅपी
मंकी आणि सॅमीला बिलेटेड हॅपी बड्डे!!
अरे वा मस्त फोटो. अमृताक्षर
अरे वा मस्त फोटो. अमृताक्षर ससाज्जी झाल्याचे हार्दिक अभिनंदन. मराठी नावे काय पपुल्या सोनुल्या मनुली. फोटो फारच गोड आहेत. हे बाळंतपण बघणे अनुभवणे हा मेजर अनुभव असतो आप्ल्या साठी पण. ओडिनचे किस्से लै भारी. आमच्याकडे पण बघ शब्द समजतो पण मग एकदम वर आकाशात.
आमच्या इथे नवी मांजरे आली आहेत ग्राउंड फ्लोअर ला. बेसमेंटातली गायब आहेत सध्या.
मंकी आणि सॅमीला बिलेटेड हॅपी
मंकी आणि सॅमीला बिलेटेड हॅपी बड्डे!
ससुले गोड आहेत.
ससुले गोड आहेत.
माऊ बहिणींना पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
गोड आहेत ससूली अमृताक्षर.
गोड आहेत ससूली अमृताक्षर.
ओडीनचे किस्से पण भारीच असतात.
मंकी आणि सॅमी ला बिलेटेड बर्थडे विशेष.
थँक्यू थँक्यू मंडळी.
थँक्यू थँक्यू मंडळी.
बादवे काल इथे मराठी नावावरून चर्चा झाली तर आठवलं कि इथे माझ्या एका फॅमिली फ्रेंडच्या बोक्याचे नाव सयाजी आहे.
बादवे काल इथे मराठी नावावरून
बादवे काल इथे मराठी नावावरून चर्चा झाली तर आठवलं कि इथे माझ्या एका फॅमिली फ्रेंडच्या बोक्याचे नाव सयाजी आहे. >>> आणि माझ्या कलीगच्या वडिलांचा साताऱ्याजवळच्या गावात मोठा डेअरी फार्म आहे, तिथल्या रेड्याचं नाव सत्यजित. तो फक्त ब्रिडिंगसाठी वापरतात आणि मोजुन दणकुन पैसे घेतात म्हणुन कलीगचे मित्र त्याला चिडवतात की 'क्यो बेचारे को धंदे पे लगाया है'
(गम्मत म्हणुन सांगितलं, hope no one gets offended with this kinda humor)
सत्यजित नाव भारीच की!
सत्यजित नाव भारीच की!
आमच्या मांजरांची नावे होती: माऊ, काळू, सुकृंड्या,चमको,नामा आणि मनी.बाकीची नावे आठवत नाहीत.एकापाठोपाठ एक अशी 13 मांजरे घरी होती.चमको दोघात कॉमन होता.
ओहो हे ससुले कसले गोजिरवाणे
ओहो हे ससुले कसले गोजिरवाणे आहेत
खुपच क्युट
मंकी आणि सॅमीला वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा
ओड्याला मराठी नाव काय ठेवता येईल याचा विचार करतोय
असेही बऱ्याच लोकांना ओडीन म्हणजे काहीही कळत नाही, मुलांना रेफरन्स माहीती असतो पण मोठे लोकं दोन तीनदा विचारतात
एकाने विचारलं, असलं कसलं नाव ठेवलं, ओढीन म्हणून, खूप ओढतो म्हणून का
त्याहून मज्जा म्हणजे, तो लीशला बांधलेला असतानाही खूप पळापळ करत असतो, त्यामुळे त्याला कमांड शिकवली आहे स्टेडी म्हणून
स्टेडी असे करड्या आवाजात सांगितले की तो निमूटपणे सभ्यपणे चालायाला लागतो
पण अधून मधून परत त्याला बजावत रहावे लागते
एक पोराने मला कमांड देताना ऐकलं म्हणे ओडीनला तुम्ही टेडी का म्हणता सारखं
आणि आता आजचा किस्सा
आणि आता आजचा किस्सा
पार लाज आणली पोराने
संध्याकाळी त्याला ग्राऊंडवर नेऊन मोकळा सोडतो बागडायला, तिथे काही भटकी कुत्री पण असतात, ती कधी खेळतात कधी दुर्लक्ष करतात
तर आज बघतोय तर अचानक हा गायब, कुठे गेला तर एक माणून भटक्या कुत्र्यांना बिस्कीटे टाकत होता
आणि बाकी भटक्या मधये हाही उभा
आणि वर आपण किती हुशार आहोत हे दाखवायला बसून दाखवत होता आणि ग्लुकोज बिस्कीटे हादडत होता, असला संताप झाला म्हणलं कीती तो अधाशीपणा, जसे काही घरी खायला मिळतच नाही
मी लांबून त्या माणसाला सांगितले त्याला देऊ नका, तर म्हणे खाऊ दे हो
म्हणलं घरी चांगल चिकन हादडून येतो तो, बिचाही ही भटकी कुत्री उपाशी असतात, त्यांना मिळू दे, हा काय अख्खा पुडा एकटा संपवेल दिला तर
या हावऱ्या मुलाला देऊ नका अजिबात
आणि याला घेऊन आलो ओढत तर अगदी अपार वाईट वगैरे वाटल्याचे दाखवत होता
आणि बाकी भटक्या मधये हाही उभा
आणि बाकी भटक्या मधये हाही उभा >>>
या हावऱ्या मुलाला देऊ नका अजिबात >>>
Pages