भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड आहे
बिचारा शांत बसला आहे.
पाय काय विशेष खराब दिसत नाहीयेत.

आई गं किती गोड वाट पहातोय ओडिन! शहाणे बाळ!
ट्रीट्स- हे कुत्र्यांना देण्यासाठी लहान आकाराचे स्नॅक्स मिळतात. त्यांना ट्रेन करायला उपयोगी पडतात. चांगले वागले की बारीकशी ट्रीट द्यायची.

अय्यो सो क्युट फोटो आणि गळ्यातला नेकलेस छान आहे. बाळ गोडच. आमच्या कडॅ पण कधी कधी अगदीच कामच्या ओझ्याने व थकले असल्यास संध्याकाळचा वॉक होत नाही. एके दिवस असेच झाले मग आमच्या बाई शांत पणे बाथरुमात जाउन सूसू करून आल्या. परवा एकदा
असेच वॉ क न जमल्याने मी बाथरूमचे दार उघडे ठेवले होते व टिशू पेपर हाताशी ठेवला होता पण तिने कळ काढली. मलाच गिल्टि वाटले

म्हातारी हाडे असल्याने आम्हाला दोघींना आपापल्या पांघरुणात गुरफटुन बसायला फार आवडते. तर हिचे पांघरूण समोर असले की मी ते वर उचलायची वाट बघते उचलले की आत शिरून ब्रेकफास्ट बरिटो बनून झोप काढते.

कसलं शहाणं लेकरू ते....>>>>

कसली क्युट कॉमेंट आहे, खूपच मस्त Happy

गळ्यातला नेकलेस छान आहे>>>>>

नेकलेस नाहीये, बायकोने गळ्यात बांधायला काळा धागा आणलाय. म्हणे लोकं किती क्युट आहे हा म्हणतात, उगाच नजर लागते, पोरगं आपलं लगेच जेवत नाही, आजारी पडतं

पाय काय विशेष खराब दिसत नाहीयेत.>>>>

नव्हतेच, तरी येडूला वाटलं की आता आपण ओरडा खातोय म्हणून गुपचूप जाऊन बसलेला

ट्रीट देता म्हणजे नक्की काय खायला देता?>>
डॉग बिस्किट, च्युस्टीक, कधी गाजर, सफरचंद
त्याला तर गवार पण जाम आवडते
बायको दिसली गवार निवडताना की येतोच आणि मागून मागून घेतो, दिली तर बसल्या जागी पाव किलो संपवू शकतो मस्त कुडुम कुडुम करून खातो, आणि तेवढी एकमेव भाजी, बाकी कशाला तोंड पण लावत नाही

गोड आहे ओडीन!
बाकी ज्योई,माउई,सिलु इतर भुभु आणी मॅवचे काय नविन किस्से?

ओड्याला गवार आवडते? मजेशीरच आहे Happy
बाकी गळ्यात काळा धागा वगैरे वाचून एवढे समजले की तुमची बायकोही माझ्यासारखीच गॉन केस झालेली दिसते आहे Wink - म्हणजे ते नेट वर मीम्स असतात ना डॅड हू नेवर वॉन्टेड अ डॉग - तसे आधी कुत्र्यांना घाबरणे, नको असणे अन मग तो घरी आल्यावर ह्यूमन बेबी च्या वरताण लाड!! Happy

अगदी अगदी सेम
आधी ही तो आला की घाबरून किंचाळून घर डोक्यावर घ्यायची
आता म्हणजे पार हाताने भरवते

ओडीन सोबतचे कम्युनिकेशन हाही एक भन्नाट प्रकार आहे
त्याला काही ठराविक शब्द समजतात जसे की चिकन, मांजर, चुई (त्याचा रबरी बॉल Happy ) फिरायला आणि गाडी

पण बाकी बरेच गोष्टी तो आवाजाच्या पट्टीवर अंदाजे ठरवतो
म्हणजे त्याला ओरडून म्हणलं ना तू खूप गुड बॉय आहेस मला खूप आवडतोस वगैरे तर लगेच कान पाडून ऐकत बसतो
आणि उलट छान गोडी गुलाबीत तू हे केलेलं अजिबात आवडलेलं नाहीये, फटके देऊ का अस म्हणलं की लगेच शेपटी हलेल, चाटायला येईल असलं येडाबांबू

आणि त्याला माहिती आहे आमचं कम्युनिकेशन किती कमी आहे त्यामुळे तो जे काही सांगतो ते मला अजिबात कळत नाही
आवाजच्या वेगवेगळ्या पट्टयामध्ये तो जे सांगतो ते काहीही कळत नाही
त्यामुळे त्याच्या गरजेच्या गोष्टी तो चक्क दाखवून मग मागतो
म्हणजे पॉटी अली की दारात उभा राहून कुईकुई
भूक लागली की त्याच्या बाउल पाशी
खेळायचं असेल तर बॉल आणून टाकतो समोर

म्हणजे मला कधी कधी वाटत तो दाखवून देतो की संवाद साधायचा असेल तर मेसेज इतका स्पष्टपणे जायला हवा Happy

गोडी गुलाबीत तू हे केलेलं अजिबात आवडलेलं नाहीये, फटके देऊ का अस म्हणलं की लगेच शेपटी हलेल, चाटायला येईल असलं येडाबांबू >>> Lol
कुत्र्यांना टोन समजतो तसाच आपला किंवा घरातला मूड पण समजतो. फार हुषार असतात. आणि पॅटर्न्स ओळखून हे झाले म्हणजे आता पुढे काय होणार हे अँटीसिपेट करतात मस्त.
माउई ला बरेच शब्द समजतात. काही इंग्रजी काही मराठी. आम्ही गमतीने म्हणतो बायलिन्ग्युअल डॉग आहे तो Happy आता तुम्ही म्हटल्यावर लक्षात आले की ते शब्द आम्ही नेहमी ठराविक प्रकारेच उच्चारतो Happy एक विनोदी उदा. म्हणजे उगीच सस्पिशियस आवाजात "कोण आलं?" असं म्हटले की काही विचार न करता भुंकत आधी दाराकडे धावतो, मग सोफ्यावर, खुर्च्यांवर चढून जमतील तितक्या खिडक्यांबहेर बघत भुंका मारून मग विजयी चेहर्‍याने आपल्याकडे परत येतो. जसं काही सांगत असतो, " आय टूक केअर ऑफ इट. डोन्ट वरी!" Lol
सवयीने आपल्याही त्यांच्या भुंकण्याचे टोन समजत जातात. हाउल केल्यासारखे भुंकणे म्हणाजे बाहेर अनोळखी गाडी किंवा कुत्रा दिसला तर किंवा घरात मुलाचे दांडगे मित्र आले तर. खेळायला ये, पकडायला ये असे प्लेफुल भुंकणे वेगळे. बाहेरून त्याच्या गर्लफ्रेन्ड्स पैकी एखादी जाताना दिसली तर अगदी विव्हळल्यासारखे ओरडणे Lol

बाहेरून त्याच्या गर्लफ्रेन्ड्स पैकी एखादी जाताना दिसली तर अगदी विव्हळल्यासारखे ओरडणे Lol Biggrin

आय टूक केअर ऑफ इट. डोन्ट वरी!" >>> कसलं भारी आहे हे Lol

त्याला तर गवार पण जाम आवडते >>> हे भन्नाट. माझ्या बहिणीकडे माऊ आहे. तिला कढीपत्ता आवडतो खायला. फ्रिज उघडला की आधी ही धावत धावत जाते त्यातून कढीपत्ता काढायला Proud आणि नवरात्रात घटी बसतात तेव्हा उगवून आलेल्या धान्याच्या पाती खायच्या असतात. त्या खाऊ दिल्या नाहीत की ऑफेंड झाल्यासारखी बघत राहते. Happy

खरंच काय निरागसपणे बसलाय ओडू गोडू .....

माऊई क्युटी पाय!

कढीपत्ता खाणारी मांजर Lol

गोड धागाय खरंच.

सॅमी मंकीला टीव्हीवर पक्ष्यांचे किंवा खारूताईंचे विडीओ लावलेले फार आवडतात. ते स्पेशली कॅट्स साठीच असतात. खूप वेळ बघत बसतात टक लावून. आमची येड बंबू सॅमी परवा टीवीवरच्या झाडाच्या ढोलीत हात घालत होती कारण तिकडे खारूताई त्याच्या आत जाताना दिसली Lol खाली विडीओ टाकलाय तिचा.

https://youtube.com/shorts/0Z0pr8Iw-H4?feature=share

गवार मंकीला फार आवडते खेळायला. त्याच्या पंजांनी इकडे तिकडे ढकलत चांगला खेळत असतो. छोटे किडे, गांडूळ पण त्यांना पंजानी ढकलत बसायला फार आवडते.

आमची येड बंबू सॅमी परवा टीवीवरच्या झाडाच्या ढोलीत हात घालत होती >>> Lol हे फारच क्यूट आहे! व्हिडीओ मस्त.

सॅमी फनी अ‍ॅनिमल व्हिडिओज मधे व्हायरल होईल >>>> Lol हो ना .... ती खरंच फारच फनी पणा करते. मंकी सॅमीचे अजून करेन विडीओ अपलोड Happy

अरे कसलं गोंडस आहे ते माऊ
मलाही आता एक मनी घ्यावी वाटायला लागली आहे हे बघून

माऊइ चे गर्लफ्रेंड गेल्यानंतर चा आवाज Happy Happy Happy

वश्या* बन गया सिम्बा !

Cimba.jpeg

ह्या विकेंडला ज्योईचा लाँगेस्ट हाईक झाला. सुमारे १४ किलोमिटर चालणं झालं. त्याने मस्त मजा केली. येताना त्याला ऑफ लिश सोडलं होतं. व्यवस्थित चालला आणि हाक मारली की आमच्याकडे येत होता. आधी बराच वेळ त्याला लिश काढलीये हे समजलच नाही. त्यामुळे नेहमी चालतो तसा आमच्या पायापाशीच चालत होता. Happy

* - तो कधी कधी खूप वसवस करतो तेव्हा आम्ही त्याला "वश्या" म्हणतो.. Proud

वॉव! कसला भारी फोटो आहे! जोई एकदम बिग बॉय दिसतो आहे आता.
वश्या Lol
शहाणा आहे की. माझी अजूनही हिंमत झालेली नाही ऑफ लीश बाहेर न्यायची. आमच्या जवळपासच्या लहान ट्रेल्स वर लीश लावावी लागते, म्हणजे तसे रिक्वायर्ड आहे. . आणि माव्याला एखादा ससा, बदक वगैरे दिसले तर तो त्यांच्या मागे धावणारच नाही अशी खात्री वाटत नाही.

जोई चा फुल फेस दिसेल असा फोटो नाही पाहिलेला. नेहमी खेळतानाचे किंवा साइड ने असे पाहिलेत.
एकदा व्यवस्थित समोरुन पोज करायला लाव की त्याला आणि फोटो टाक Happy

Pages