भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅलिको आहे ना? >>> हो ..
टीव्हीवर कॅट फूड किंवा उंदीर दिसला तर खायचा प्रयत्न करेल का?>>>>>>> उंदीर दाखवला नाहीये अजून. Lol दाखवायला पाहिजे.

विडीओमधले पक्षी जेव्हा ऊडतात तेव्हा सॅमी टिव्हीमागे जाऊन बघते तिकडे गेलाय का Lol मंकी थोडा स्मार्ट आहे तो फक्त टीवीवर बघतो पण अ‍ॅक्चुली पाखरं पकडायला बाहेरच जातो Proud सॅमीताई अजून जमिनीवरचे छोटे किडे पकडण्यातच मग्न असतात.

सॅमी टिव्हीमागे जाऊन बघते तिकडे गेलाय का >>> Lol फारच फनी आहे सॅमी ! फुल एन्टरटेनमेन्ट आहे तुम्हाला. दोघं बहिण भाऊ अन दोघांची किती वेगवेगळी पर्सनॅलिटी!
लेझर पॉईंटर >>> हा आहे आमच्याकडे, माउई खूप खेळतो त्या ठिपक्यासोबत Happy

फार हसू येत असेल ना बघून?>>>> हो फुल्ल एंटरटेनमेंट असते. कधी झुमीज (हायपर होणे) असेल तर सुसाट घरभर पळतात, कधी उगीच पंजाने काही एवढंस दिसलं तर खेळतात, दोघांची मस्ती, सॅमी देते फटके मंकीला ते पण इतकं मजेशीर असतं. सारखा कॅमेराच घेऊन बसावंसं वाटतं. Proud
अंजली, लेझर पॉईंटर आणला आहे का?>>>>>>>> नाही गं

सॅमीची पोज अगेन Lol

unnamed (3)_1.jpg

इथे या लिंक्स देतेय सॅमी मंकीच्या! एंजॉय Happy सॅमीचा किक विडीओ एकदम फनी आहे लहान मुलं जशी मुद्दाम किडे करतात ना तसा Lol

https://youtube.com/shorts/7Zg4Qejj6MQ?feature=share

https://youtu.be/KKWPHVjj6aQ

https://youtube.com/shorts/zsSBgX8tOqY?feature=share

https://youtube.com/shorts/GRpXOOOQAdU?feature=share

https://youtube.com/shorts/lT1wR85uEnY?feature=share

हे वाचून अती प्रचंड चिडचिड झाली.
https://www.loksatta.com/trending-news/delhi-youtuber-gaurav-john-makes-...

जमेल त्यांनी याच्या व्हिडीओ वर अब्युस रिपोर्ट करुन या. (जर त्याने फरक पडत असेल तर, नाहीतर उलट या माणसाला जास्त पैसे मिळतील.)

मीही पाहिला तो व्हिडिओ.त्यांनी काळजी घेतली होती.तरीही ते पिल्लू घाबरले होते.अशी मस्करी करता नये.

मी एक लहान कुत्रा असते तर मला अश्या मला न समजणार्‍या फुगा सफरीची खूप भिती वाटली असती.
शिवाय हवा बदल किंवा विजेच्या तारेत फुग अडकणे वगैरे धोके आहेतच.
या प्रसंगा नंतर तो कुत्रा या लोकांशी कसे वागतो हे बघायला हवे.

बिचारा तो छोटू कुत्रा!! करमणूक म्हणुन त्याच्या जिवाशी खेळ? वाचून फार वाईट वाटले आणि चीड आली, व्हिडिओ बघण्याची हिंमत होणार नाही.

आज ओडीन आणि बुलेट यांनी सॉलीड टिमवर्क दाखवले. आम्ही त्या दोघांना खेळायला म्हणून समोरच्या बंगल्यात घेऊन जातो. अंतर जास्त नाहीये त्यामुळे ओडीनला बिना लीश चे नेता येते. कधी मी नेतो कधी माझा मित्र आणि बुलेटचा बाबा नेतो.
तर आज तो येत असताना वाकून गेटची कडी उघडत होता. बुलेट त्याच्याकडे बघत असल्याने त्याची रस्त्याकडे पाठ होती आणि ती संधी साधून रस्त्यावरची तीन भटकी कुत्री चालून आली. एका कारच्या मागून येत असल्याने त्यालाही नाही दिसली आणि मित्रालाही. पण ओडीन अलर्ट होता आणि त्याने तातडीने धावा बोल केला. ती कुत्री दांडगी असल्याने गुरगुरत पुढे यायला लागली आणि हे कळताच बुलेट ओडीनच्या बाजूला जोऊन ठाकला. मित्र म्हणाला दोघे खांद्याला खांदा लावून उभे ठाकले आणि ते बघताच त्या कुत्र्यांच्या टीमने सुमडीत माघार घेतली.

बेस्ट बडीज झालेत ते

अंजली, तुझी सॅमी जास्त आवडती दिसतेय >>>> Proud नाही गं दोघं सारखेच. पण विडीओ मधे समहाऊ सॅमीच जास्त येते.

टीव्हीवर कॅट फूड किंवा उंदीर दिसला तर खायचा प्रयत्न करेल का?>>>> अनु तुझ्या म्हणण्याप्रमाणे उंदीर असलेला विडीओ लावला आणि मंकीने एकदम उडीच मारली. हे बघ Happy

https://youtube.com/shorts/-1WG51RfjiY?feature=share

मी पण प्रतिसाद वाचून व्हीडिओ पहिलाच नाही>>>>>>>>> ++++११११११
काय लोकं अशी चमत्कारीक वागतात प्राण्यांसोबत!

इन्स्टावर आहेत का हे सगळे?>>>> नाहि गं टाकायचे आहेत. मी फार आळस करते त्या बाबतीत.

पाहिला
भयंकर धमाल आहे.सुरुवातीला उंच उडी, मग अचानक 'जाऊदे समोर दूध ठेवलंय ते पिऊ' साक्षात्कार, मग नंतर आपण त्या गावचेच नाही दाखवत जवळ आल्यावर परत परत पकडायचा प्रयत्न. Happy

भयंकर धमाल आहे.सुरुवातीला उंच उडी, मग अचानक 'जाऊदे समोर दूध ठेवलंय ते पिऊ' साक्षात्कार, मग नंतर आपण त्या गावचेच नाही दाखवत जवळ आल्यावर परत परत पकडायचा प्रयत्न. >>> अगदी अगदी! धमाल आहे व्हिडीयो

उन्हाळ्यात आम्ही बेडरूममध्ये एसी लावतो रात्रीचा
आणि त्या गारव्यात ओडीन ला झोपायला खूप आवडतं
पण त्याला हे कळत नाही ही गार हवा कधी येते
एसी फक्त रात्री अगदी झोपताना लावत असलयाने त्याला रात्रीझोप आली की तो आत जाऊन बघून येतो गार हवा यायला लागली का
त्यावेळी आमचा टीव्ही सुरू असेल तर त्याला कळतं अजून गार हवेची वेळ नाही झाली
किंबहुना त्याला अजून नीट कळलं नाहीय त्यामुळे तो रात्री अधून मधून चक्कर मारून बघत असतो कधी सुरू होतंय
हे पोराचे ऑब्झर्वेशन
म्हणे त्याला बेडरूममध्ये काहीही काम नसते तो फक्त एसी लागलाय का बघायला जातो
नसेल तर परत बाहेर येतो
आपण एकदा लावला की मग तो अजिबात बाहेर पडत नाही, तिकडेच मस्त लोळत पडतो
Happy

Happy ओडीन हुश्शार आहे.
माउई पण बरोब्बर एसी चे वेण्ट शोधून त्याच्याजवळ बसतो बाहेरून आला की. इकडे काही वेन्ट जमिनीवर असतात (खालून हवा ब्लो होते) तर मस्त त्याच्या वरच पाय पसरऊन पालथा बसतो. बघण्यासारखी पोज असते Happy

आम्च्याकडे पण मी ऑफिसला जायच्या आधी स्वीटी पांघरुणात गुडुप होउन ड्रॉइन्ग रूम मध्ये एसी असते तिथे बसते व हळू हळू लोळण व डीप स्लीप.

ओडु गोडूच आहे एकदम . किती ते लहान मुलासारखं निरागस वागणं.

मैत्रेयी असं मंकी हिटर सुरू झाला की करतो. त्या वेंट मधे हात पायच घालून बसतो. सॅमी पेक्षा त्याला फर कमीये म्हणून थंडी वाजते बहुतेक.

Pages