भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांढऱ्या नाकाची लिली
चोकलेटी नाकाचा लिओ

थंक्स सगळ्यांना.
सगळे किस्से वाचून मजा येत आहे.
खूप गोड भू भू आणि मनीमाऊ आहेत सगळी

<< आमच्या इथे एकांनी रॉटवाइलर कुत्रे फार प्रेमाने पाळले आहे. सोसायटीत इतके डेंजरस ब्रीड अलाउ कसे केले कोण जाणे. >>
एका श्वानप्रेमीकडून अशी प्रतिक्रिया वाचून आश्चर्य वाटले. You made my day. Lol

सर्वजण प्राणीप्रेमी नसतात, हे सर्व प्राणीपालकांनी लक्षात ठेवले आणि सार्वजनिक ठिकाणी जाताना कुत्रा लीशला बांधून पट्टा कायम हातात ठेवला आणि भटक्या कुत्र्याचे कौतुक करत त्यांना अजून प्रोत्साहन दिले नाही, तर इतरांवर अनंत उपकार होतील. त्यासाठी सर्व प्राणीपालकांप्रति ऍडव्हान्समध्ये आभारी आहे.

सॅमीच्या झोपेच्या तर्‍हा...

sammie sleep.jpgsamiie.jpg

दोघांना असं चादरखाली जाऊन बसायला खूप आवडतं जेव्हा आम्ही चादर बदलत असतो. Happy तासन्तास बसू शकतात असे चादरीखाली.

monkey sammie.jpg

ओडीन ने काल माझी चप्पल घालवली
कॅनाल ला पोहायला नेलं तर आत डुंबत बसला त्याला बाहेर काढायला म्हणून गेलो तर चप्पल पडली पाण्यात
ओडीन मस्त बाटली टाकली की उडी मारून पोहत जाऊन आणून देतो
मग मी परत टाकतो, असा आमचा तासभर खेळ चालतो आणि त्याचा व्यायाम पण होतो
मला वाटलं चप्पल आणेल तर नाहीच नुसताच बघत बसला
म्हणलं अरे वाहून चाललीय घे लवकर तरीही काही नाही
शेवटी पाणी सोडावे लागले मला आणि अनवाणी आलो घरी

मजेशीर आहे किस्सा. ओडिन ला तुम्ही चप्पल फेकताना दिसला असतात तर दिली असती आणून Happy
एखाद्या वस्तू कडे पॉइन्ट केले की ती आणून देणे हे सेपरेटली ट्रेन करावे लागत असेल. लॅब मुळात रिट्रिवर चाच जॉब करत असल्याने जमेल ओडिन ला. तुम्हाला नविन चॅलेन्ज Happy

मलाही तेच वाटतय, फेकली असती तर कदाचित आणली असती त्याने, पण नुसतीच वाहत चाललेली पाण्यात त्यामुळे त्याला किती वेळा म्हणलं अरे ती चप्पल घे, आण तर येडबंबूसारखा बघत बसला माझ्याकडे. त्याला ती कमांडच कळत नव्हती

एखाद्या वस्तू कडे पॉइन्ट केले की ती आणून देणे हे सेपरेटली ट्रेन करावे लागत असेल>>>>
तो बॉल आणून देतो फक्त. त्याला पेपर आणून द्याला शिकवायचा खूप प्रयत्न करतो पण त्याला ते आवडत नाही, तो तावडीत सापडलं की चिंध्या करतो
याउलट आमच्याइथे जवळ एकजण आहेत २ गोल्डन रिट्रीवर, त्यांना पेपर आणून द्यायला शिकवले आहे पण आता ते पेपर काय, गेटजवळ सापडलेला प्रत्येक कागद आणून देतात, आणि नको म्हणलं तरी ऐकत नाहीत मग खराब असला तरी ते आणून ठेवतात मांडीवर Happy

जुन्या फार बोअर दिसायला लागल्यात>>> Happy Happy Happy
होय डबघाईला आलेल्या होत्या अशाही

<<<आता ते पेपर काय, गेटजवळ सापडलेला प्रत्येक कागद आणून देतात, आणि नको म्हणलं तरी ऐकत नाहीत मग खराब असला तरी ते आणून ठेवतात मांडीवर Happy >>>
हे भारीच.... small wonders सिरियल आठवली.

ओडू गोडू ला वाटले असेल की बाबाला ती चप्पल नकोय म्हणून त्यांनी ती पाण्यात टाकून दिली तर कशाला परत काढायची ?????

आता ते पेपर काय, गेटजवळ सापडलेला प्रत्येक कागद आणून देतात, आणि नको म्हणलं तरी ऐकत नाहीत मग खराब असला तरी ते आणून ठेवतात मांडीवर >> Lol हे मस्त आहे!

नको म्हणलं तरी ऐकत नाहीत मग खराब असला तरी ते आणून ठेवतात मांडीवर >>> Biggrin

आमच्या शेजार्‍यांच्या मुलीनं जोइसारखं पपी आणलं आहे. ती मुलगी आणि पपी वीकेन्डला आई-वडिलांकडे आले होते. त्या एवढ्याश्या जिवाचं अलेक्झान्डर असं भरभक्कम नाव ठेवलं आहे. तर या राजेसाहेबांना मी बागेत काम करत होते ते अजिबातच खपलं नाही. त्यांनी सगळं यार्ड यथाशक्ती डोक्यावर घेतलं. शेजारबुवांची पपीण मिनी पण आली लगबगीनं. तिनं 'जरा कुठं बाहेर यावं तर ही म्हातारी असतेच खुरपणी घेऊन बागेत' असं सांगितलं असणार अलेझान्डरला Biggrin

धन्यवाद सगळ्यांना सॅमीतर्फे Happy

रच्याकने सॅमी, नॉर्वेजियन कॅट आहे का?>>>>>>> कॅलिको आहे.

ओडीन Lol चप्पल, कागद!

फारच गोड असतात हे लोक्स. माझ्या मैत्रिणीचा गोल्डन रिट्रिव्हर असाच गोग्गोड आहे. ती फिरायला नेते तिकडून ५-६ बंगले पुढे तिची अजून एक मैत्रीण राहते. तर ३-४ वेळा ती त्याला घेऊन तिथे गप्पा मारत उभी राहिली असेल तर पुढच्या सगळ्या वेळी त्या दुसर्‍या मैत्रीणीचं घर आलं की हा तिला ओढायला लागतो तिकडे चल म्हणून. Proud

od1.jpg

ओडीनने आज आम्हाला लईच सुखद धक्का दिला. एरवी त्याला आम्ही फिरवून आणले की बाथरूम मध्ये नेतो आणि चिखलाचे पाय धुवून मग च बाहेर सोडतो
इकडं तिकडे फिरला की ओरडतो मी त्याला चिखल करू नको घर भर म्हणून
तर आज कधीतरी तो दरवाजा उघडा आहे पाहून बाहेर पळाला असणार आणि मी नंतर बघतोय तर गुपचूप येऊन बाथरूम मध्ये बसलेला, कोणीतरी येऊन पाय धुवायची वाट बघत. मला तो बाहेर गेलेला पण कळला नव्हता. पण दरवाजापासून बाथरूमपर्यंत पायाचे ठसे बघून कळलं महाराज बाहेर हिंडून आलेत.
आणि चेहऱ्यावर फुल्ल इनोसंट आणि गिल्टी पणाचे मिश्रण
इतकं हसू आलं मला, बिचारा
त्याला मग पाय धुतल्यावर बक्षीस म्हणून एक ट्रीट दिली. लगेच मग चाटून वगैरे आनंद व्यक्त केला. भूभू सारखं प्रेमळ आणि निरागस कोण नसेल.

Pages