भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सूनबाई नाहीत तर जावईबापू आहेत >> Lol हा सही किस्सा आहे!
उपद्व्यापी माउई ने काल बॅकयार्डात कुणाशी पंगा घेतला काय माहित पण घरात आल्यानंतर थोड्या वेळाने दोन्ही डोळे सुजले. नाकाच्या आजू बाजू लाही सूज दिसत होती ! विनोदी अवतार होता (असा आता वाटतोय) . मग काय करता, गेलो व्हेट कडे. ती म्हणे बहुतेक मधमाशी चावली, त्याची अशी अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन येते. तिने आता बकरा आलाच आहे तर कापा खिसा म्हणून अँटिहिस्टेमाइन चा शॉट देऊन च पाठवणी केली. मग उतरली सूज लगेच.
नंतर इतर पेट पेरेन्ट्स नी असे झाले तर आम्ही घरीच बेनॅड्रिल देतो असे सांगितले.

सिंडरेला अगं माझ्या मैत्रिणीच्या बॅकयार्डमधे पण अगदी एवढीच पिटकी पिटकी पिल्लं सापडली सशाची. तिच्याकडे कुत्रं पण आहे. आय होप की तो ती जागा उकरून काढणार नाही माऊईसारखा. Proud

आमचेही सेम, ओडीन लहान असताना बागेत मधमाशी किंवा गांधीलमाशी चावून घेतली होती, फुल हुप्प्या झाला होता. पण वेट कडे नाही नेले, कैलास जीवन लावले आणि नंतर भूभूचे एक क्रीम येते ते लावले. अर्थात तेवढ्या काळात भरपूर लाड करून घेतले, अगदी गरीब चेहरा करून बसायचा त्यामुळे सगळ्यांनी पार अगदी त्याला मांडीत घेऊन वारा घाला, त्याला आवडीचा खाऊ द्या, कशाला नाही म्हणू नका असले प्रकार केलेले.

धन्यवाद maitreyee..इतकी क्यूट आणि सॉफ्ट आहे ही बाळ की मला सुद्धा दिवसभर त्यांच्यासोबत खेळत राहू वाटतं पण शक्य नसत.

स्नो चे कान पण अगदी नाजूक अन ट्रान्स्परन्ट आहेत! शिरा दिसतयात मस्तानीसारख्या Happy स्नो कोथिंबीर खाताना दिसत नाहीये. जॉन स्नो सारखा "आय डोन्ट वुन्ट इट" म्हटला का ? Lol ( हे गॉट बघितलेल्यांसाठी )

सामो..लुना सगळ्यात जास्त खादाड आहे. तो सगळ एकटा खाऊन टाकतो. त्याच्या भावंडाना काही ठेवत नाही.

maitreyee मस्तानी Lol स्नो joey सारखा आहे. Joey doesn't share food. म्हणून त्याला आधीच वेगळं खाऊ घालते मग हे दोघे खातात.

सगळ्यात गरीब आणि शांत Oreo आहे. एकदम छोटस पिल्लू. त्याच्या वाट्याला जास्त दूध पण येऊ देत नाही त्याची भावंडं. म्हणून तो बारीक राहिलाय थोडा. एकदम लहान होता तेव्हा oreo जास्त मस्ती करायचा. बाकी दोघे भरपेट दूध प्यायचे आणि सुस्तावून झोपून राहायचे.

सगळे किस्से एकदम भारी!
सिन्डरेलाचा किस्सा वाचुन किरण खेरच "मा का लाडला बिघड गया" गाण आठवल.

भुभुज चे इमानदारी, स्वामिनिष्ठा गुण अनेकदा गौरवले जातात पण त्यांच्या बाकी काही गोष्टी सुद्धा अनुकरणीय आहेत असे माझं निरीक्षण
1. एकाग्रतेने जेवण - आपण जेव्हा टीव्ही बघत, टंगळमंगळ करत जेवण करत असतो तेव्हा भुभु आपल्या बाउल मध्ये दिल्यावर अजिबात इकडे तिकडे बघत नाहीत
दिलेलं पूर्ण संपवून मगच ते मान वर घेतात
अर्थात ही जरी त्यांची नैसर्गिकरित्या लागलेली सवय असली तरी किमान त्यांच्या काही टक्के तरी एकाग्रतेने जेवता आलं तर अंगी लागेल असे वाटते
2 वेळ पाळणे - सहसा भुभु त्यांच्या वेळा चुकवत नाहीत आणि आपल्यालाही चुकवू देत नाहीत. ऊन वारा पाऊस थंडी रविवार सोमवार दिवाळी दसरा काहीही असू दे त्यांचं फिरणे, जेवण आणि झोप अगदी वक्तशीर
हेही अगदि एक्स्त्रीम असलं तरी वक्तशीरपणा आणि त्याचे काटेकोरपणे पालन हे काही अंशी घेता आला पाहिजे
3 पॉवर नॅप - एकसलग न झोपता भुभिज मस्त अधे मध्ये पॉवर नॅप घेतात आणि पुन्हा फ्रेश होऊन खेळायला फिरायला सज्ज होतात
ती झोप त्यांची एकदम आवश्यक आणि बेस्ट असते
आशा वेळी त्यांचा हेवा वाटतो, कोणत्याही वेळी कुठेही ते मस्त ताणून देऊन झोपू शकतात आणि ती अर्धा तास तासभराची झोप त्यांना पुरेशी होते. कामाचा डोंगर असताना अशी पॉवर नॅप मिळाली तर काय मजा येईल, पण मी झोपलो की थेट दोन तीन तासाची निशिंचीती

अजूनही आहेत
सुचेल तसे लिहीत जाईन
बाकीच्यांनीही लिहा

कोणत्याही वेळी कुठेही ते मस्त ताणून देऊन झोपू शकतात >> हे जेव्हा त्यांना सेफ आणि सवयीचे वाटत असेल तिथेच. नेहमीचे ठिकाण नसेल तर माउई झोपत नाही पटकन, अ‍ॅलर्ट रहातो सारखा! बेसिकली अनिश्चितता असेल तर त्यांना ही होतो स्ट्रेस.
मला सगळ्यात भुभूंचे काय अडोरेबल वाटत असेल तर कसलाही आडपडदा न ठेवता ( त्यांच्या पद्धतीने) भावना व्यक्त करणे. प्युअर सोल्स असतात अगदी ! माणसे भावना लपवतात शक्यतो. खूप आनंद , खूप दु:ख , राग सहसा उघड दाखवत नाहीत.

Pages