भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भटके कुत्रे भयानक चेहरा करून धावोन आल्या सारखे करतात हा अनेक वेळा त्यांचा सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम असू शकतो. शेपट्या हालत आहेत का ते बघा. बेस्ट वे ते असतात तो रस्ता बदलून जाणे. तुम्ही व तुमचा कुत्रा त्यांच्या साठी थ्रेट आहात. दुसरा मार्ग म्हणजे त्यांची भीती कमी करणे पन ह्या साठी प्रयत्न आवश्यक आहेत. बरोबर थोडे अन्न व पाणी हवे. व कुत्र्यांचे काळे पाव्डर औषध. प्र थम थोड्या दुरूनच अन्न ( पेडिग्री/ बिस्किटग/ घरातील उरलेले चिकन म टाण फिश हाडे/ उरलेले दूध) ठेव्णे एखा द्या प्लास्टिक बोल मध्ये पाणी ओतून तिथून निघून जाणे.

हळू हळू त्यांना तुमच्या बद्दल विश्वास निर्माण होईल व ते भुंकायचे बंद होतील. विश्वास झाल्याव्र कधी मधी त्यांना हात लावणे बेली रब्स इअर रब्ज करणे त्यांच्या दुखापतींवर औषध लावणे केले तर दूध पित्या पपीज च्या आईला नीट खाणे भरवले तर हा बाँड वाढे ल कधी तरी तुम्हालच साक्षात्कार होईल की ऑल डॉग्ज आर द सेम लव्हिंग क्रीचर्स. तेव्हा घरी पेट पा ळायची गरज उरणाराच नाही दे आर ऑल स्पेशल.

जे कुत्रे आपण हून अ‍ॅटॅकर किंवा रोगी आहेत त्यांपासून मात्र दूर राहा व प्राणी मित्र संघटने ला फोन करा. मी यादी जमवलेली आहे एक बाफ वर.
जे मरायला टेकलेले व अशक्त आहेत त्यांबद्द्ल बीएम सी/ मनपाला फोन केला तर ते घेउन जातात बॉडी.

आमच्या इथे एकांनी रॉटवाइलर कुत्रे फार प्रेमाने पाळले आहे. सोसायटीत इतके डेंजरस ब्रीड अलाउ कसे केले कोण जाणे. ह्याची बाइट सर्वात स्ट्रॉन्ग आहे. कोनी वाचवू शकत नाही. लीश सोडून पळाला तर भीति दायकच. परवा आमचे स्ट्रे भुतावळ तो आला म्हणून आनंदात जवळ गेले तर मलाच भीती वाट्त होती. तो सुटला तर ह्यांना नक्की फाडून खाईल.

आमच्या इथे तर रॉटवायलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, हस्की, डॉबरमन आणि लॅब या खेरीज दोन क्रॉस ब्रीड, दोन शिट्झु, गोल्डन रित्रीव्हर, फ्रेंच मस्टीफ आणि एक फिमेल बुलडॉग आहे
पण यात सगलयात डेडली आहे मित्राचा डोगो अर्जेंटिनो
त्यापुढे हे सगळे अगदी चिल्लेपिले वाटतात
तो इतका दांडगा आहे की बघूनच हदरायला होतं
ओडीन ला नेलं भेटवायला तर झुपकन शेपूट आत घेतली पायात
पण तो डोगो एक नंबर ट्रेन केलेला आहे
ओडीन ला पोहायला त्यानेच शिकवले
दोघांना एका दोरीला बांधून सोडले कॅनाल ला
त्यामुळे आता ओडीन ची भीती चेपली आहे पण तरी तो एकदम उठला किंवा काही हालचाल केली तर हा दचकतो (मी सुद्धा)

मास्टिफ, डोगो अर्जेन्टिनो, बुलडॉग, हस्की इ. अ‍ॅक्टिव ब्रीड्स हाताळणारे ओनर्स तेवढे ट्रेन्ड असतील तर ठीक आहे, नाहीतर त्यांना योग्य ट्रेनिंग दिले नाही, एक्सरसाइज दिला नाही तर हे डॉगोज फार डेन्जरस आणि अ‍ॅग्रेसिव्ह होऊ शकतात. पण कसले मॅजेस्टिक दिसतात! ओडिन चे हे सगळे फ्रेन्ड्स एकत्र भेटत असतील तेव्हा तिथे येऊन त्यांना (दुरून) बघायला फार आवडेल मला Happy
शिझुका आता केस बांधून घ्यायला लागली आहे >>> किती क्यूट! फोटो टाका की एखादा.
लांब केस मेन्टेन करणे अवघड जात असेल. माउईचे आता उन्हाळा येणार म्हणून केस जरासे बारीकच करून घेतले आहेत ग्रूमर कडुन.

माउइची आवडती ट्रेनर का मैत्रीयी ? Wink

शिझुका आता केस बांधून घ्यायला लागली आहे >>> किती क्यूट! फोटो टाका की एखादा.>>+ १००

Shizuoka.jpeg

हो आता तिचीच अपॉइन्टमेन्ट घ्यावी लागते Happy वाट पहायला लागली तरी>>>>> Lol वाट पाहीन पण तिच्याकडूनच ग्रुमिंग करून घेईन (वाट पाहीन पण एसटीनेच जाईन च्या चालीवर Wink

शिझुका, फार गोड दिसतेय

अमा , मांजर गुबगुबीत आहे.

एक गंमत झाली मागच्या आठवड्यात. माझ्या डॉक्टर कडून आम्ही खाली उतरलो आणि गल्लीच्या तोंडाशी कॅब ची वाट बघत उभे होतो. तर उतरत्या उन्हात सात आठ भटकी कुत्री रस्ता शिस्तीत क्रॉस करत होती. ही गल्ली भर धाव ट्रॅफिक अस्लेल्या एल बी एस रोड ला जोडून आहे.
म्हणून मनातल्या मनात कौतूक करत होते तर ती सर्व गँग माझ्या च साइड ला येउ लागली. हे साधारण ज्युरासिक पार्क मध्ये ती बारक्या शहामृग सारख्या डायनासोर ची स्टेंपेड असा सीन आहे तो नजरे समोर आणून बघा.

माझ्या पाशी हे सर्व थांबले काहींनी वास घेतला काही बसले काही घरंगळत पुढे गेले. मी एकाचे कौतूक करत होते. हा गळ्यात दागिन्या सारखा पटटा घातलेला राजबिंडा गोरा व्हाइट गोल्डन रिट्राइवर टाइप होता पण लांब केस नव्हेत. केस छोटेच. भरदार अंग. उत्साही डोळे असा छान होता.

मग मुंबई पोलीस चा मास्क घातलेला एक माणूस थांबला. माझा इंट्रेस्ट बघून ह्या कुत्र्याचे नाव राम आहे असे सांगितले. हा खरंच गोड व राजपुत्र दिसत होता. हे खरेच पोलिसातले कॉन्स्टेबल निघाले. त्यांचे नाव मारुती महादेव शिर्के( मह्राराष्ट्र पोलीस) व एम ए आहेत. कुर्ल्या परेन्त ५० भटक्या कुत्र्यांना खायला घालतात. मग मी पण माझे प्रयत्न सांगितले. तर ह्यांनी सांगितले की हे शिर्के गोशाळा चालवतात.

कल्याण नांदिव ली गाव हाजी मलंग रोड इथे व नरायण नगर घाटकोपर वेस्ट मुम्बई ४०००८६ इथे ही शिर्के गो शाळा आहे. गायी कुत्रे व इतर प्राणी आहेत. त्यांचे अन्न पाणी व मेडिकल केअर बघतात.

हा शिर्के गोशाळा चॅरिटेबल ट्रस्त आहे. रजि नंबर इ ३२५०४ स्टेट बँक ऑ फ इन्डिया ट्रस्ट अकाउंट नंबर ३६२६८३८६९०२ व आय एफ एस सी कोड एस बी आय झिरो००१६८७९ आहे

संपरक नंबर : ८८९८१४४२२२/९७६८३८३५५५ नेट वर शिर्के गोशाला. कॉम इथे आहे.

त्यांनी अगदी मॅ डम जरूर थोडे तरी डोनेशन द्या अशी विनंती केली व हे व त्यांच्या आजुबाजूचे कुत्रे मंडल तसेच आनंदात बागडत पुढे निघून गेले.
सर्व वेळ शिर्के ह्यांनी मुंबई पोलीस लिहिलेला मास्क घातलेला होता.

मला काही डोनेशन करायला अजून जमले नाही. पण जमेल ती मदत करणार आहे नक्की. व परिस्थिती सुधारली की घाटकोपर मध्ये गौ शाळेत सेवा करायला पण जाईन.

मला ह्यातून काहीही आर्थिक फायदा नाही. व डोनेशन करयची माबोकरांना विनंती नाही. एक माहिती म्हणून लिहिले आहे.

पण मुंबई पोलीस व शिर्के ह्यांचा अभिमान वाटला हे नक्की. जय महाराष्ट्र.

Thanks for sharing Ama. Have donated. I like donating to animal charities. You can share other similar organisations details in my Vipu.

IMG_8700.JPG

हे आमचे चुन्नू मुन्नू
खरी नावे आहेत लिली आणि लिओ

एक मजा सांगते त्यांची .....
माझी मुलगी मैथिली बाहेरून आली ना की दोघांचा आनंद अवर्णनीय असतो.

ते आधी कान टवकारून अंदाज घेतात आणि जेव्हा लक्षात येते की मैथिली च आहे तेव्हा लिली तुरुतुरु पण भरभर पळत जाते आणि लिओ सश्यासारखा पुढेच दोन पाय एकत्र, मागचे दोन पाय एकत्र अश्या टपाटप आणि लांब उडया मारत वाऱ्याच्या वेगाने धावत सुटतो.

लिली मैथिली जवळ जाऊन म्याऊ म्याव अश्या गप्पा मारायला लागते तर लिओ पार तिच्या डोक्यावर उड्या मारतो.

Pages