
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
हो ना
हो ना
जरा मस्त आपापल्या हँडसम्स चे फोटो टाका.
खूप ताण आलाय सगळीकडॅ करोना विषयांनी.
मागे मी इथे आमचा बोकोबा स्नोई
मागे मी इथे आमचा बोकोबा स्नोई खूप खूप मळून येतो अशी तक्रार केली होती. . ( मी "दाग अच्छे है" वाली माॅम नाही ) इथे खूप जणांनी उपाय सुचवले. त्याप्रमाणे एक हर्बल पावडर आणून स्नोई ला लावून विंचरून काढले. 2-3 वेळा हा प्रयोग केला. खूप छान फरक पडतोय. त्याचे मातीत लोळणे खूप कमी झाले आहे आणि तो खूप स्वच्छ झालाय. उपायाबद्दल धन्यवाद. ..
(No subject)
कसला गोडू दिसतोय
कसला गोडू दिसतोय
कापसाचा बोळा. जवळून फोटो पण हवा.
(No subject)
पुण्यात पारा उतरला हे वाचून
पुण्यात पारा उतरला हे वाचून स्नोई ची प्रतिक्रिया
आता हा 'अगं, आल्याचा चहा आण
आता हा 'अगं, आल्याचा चहा आण मस्त गरमागरम' म्हणेल असं वाटतंय पांघरुणात गुरफटून.
मस्त फोटो!
गोंडस बाळ!
गोंडस बाळ!
सो क्यूट
सो क्यूट
मस्त फोटो धनवन्ती, मीदीप.
मस्त फोटो धनवन्ती, मीदीप.
धन्यवाद सगळ्यांना. .
धन्यवाद सगळ्यांना. .
बाकीचे भुभू माऊ मंडळींचे काय
बाकीचे भुभू माऊ मंडळींचे काय चाललंय? माउई स्प्रिंग वेदर एन्जॉय करतो आहे. सारखं बाहेर जाऊन गवतात लोळायचं असतं. ही पहा त्याच्या गूफी चाळ्यांची एक क्लिप:
https://youtu.be/fU0t279SUXs
आता टिक्स आणि इतर किड्यांचाही सीझन असल्याने तो आत आला की बघावं लागतं काय प्रसाद घेऊन आला तर नाही ना. त्यामुळे ग्रूमर ला यावेळी जरा बारीकच केस करायला सांगितले होते
मै, टिक्ससाठी औषध नाही दिलं
मै, टिक्ससाठी औषध नाही दिलं का व्हेटनं? फ्ली आणि टिक दोन्हींसाठी महिन्यातनं एकदा मानेत टाकायचे ड्रॉप्स आहेत. त्यांना चुरचुरतं जरा, बिचारे स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतात
विचारायला हवं व्हेट ला. मी
विचारायला हवं व्हेट ला. मी स्प्रे आणलाय एक. पण ते औषध जास्त बरं पडेल.
फ्ली आणि टिक दोन्हींसाठी
फ्ली आणि टिक दोन्हींसाठी महिन्यातनं एकदा मानेत टाकायचे ड्रॉप्स आहेत.>>>> स्पॉट ऑन ट्रीटमेंट. टिक्स आणि फ्लिज साठी फार गरजेची असते. हल्ली एक इंजेक्शन पण देतात. थोडं महाग आहे, पण तीनेक महिने इफेक्ट रहातो.
इथे डॉग होस्टेलला ठेवायचं तर स्पॉट ऑन ट्रीटमेंट करून पाठवणं mandatory आहे.
एक परिणामकारक उपाय सांगतो
एक परिणामकारक उपाय सांगतो टिक्स साठी
ओडीनवर वापरला आम्ही, एकदम बेस्ट रिझल्ट
एक लीटर पाण्यात, साधारणपणे २००मीली एप्पल सायडर व्हिनेगर, दोन तीन चमचे बेकींग सोडा, थोडं मीठ, आणि एक लिंबू पिळून घालायचा. आणि हे मिश्रण एक दोन दिवसातून एकदा अंगभर चोळायचे. स्कीनला लागेल इतपर्यंत. आणि बस.
टिक्स आपोआप बाहेर येऊन मरून पडतात. आणि साधरणपणे दोन आठवडे केलं तर नंतर होण्याचे प्रमाण पण नाही.
आम्ही केल्यापासून अद्याप ओडीनला टिक्स चा त्रास झाला नाही. आधी भरपूर असायचे अंगावर
(No subject)
(No subject)
लोल! एकदमच सहमत
लोल! एकदमच सहमत
माउई स्प्रिंग वेदर एन्जॉय
माउई स्प्रिंग वेदर एन्जॉय करतो आहे.>> कॅमेरा अॅटेशन भरपुर आवडतय अस दिसतय व्हिडीयो बघुन..
काल मंकी सॅमीने पाठलाग
काल मंकी सॅमीने पाठलाग केल्यामुळे का पॅटीओ दार उघडं असल्याने माहित नाही छोटी खारू ताई घरी शिरली. सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं. मंक्या तर तिला सोडायला तयार च नव्हता. ती त्या हिटर वेंट मधे घुसुन बसली होती तिथे दोघं किती वेळ दबा धरून बसले. मुलीने शेवटी दोघांना एका रूम मधे बंद केलं आणि त्या खारूताईला बाहेर काढून सोडुन दिलं.
डांबरट आहेत मंकी आणि सॅमी !
(No subject)
आमचा सिम्बा भूभू . घरातील
आमचा सिम्बा भूभू . घरातील सर्वांचा लाडका. लाडाने पोर बिथरलंय जरा . काही काम करायला घेतलं कि हा येतोच काम वाढवायला. अगदी लादी पुसायला कापड घेतला कि हा येतो उड्या मारत. कधी हात (पुढचे पाय) मारणार. कधी तोंडाने कापड खेचणार आणि पळून जाणार , आणि ते दोन्ही नाही करू दिले तर माझ्या डोक्यावर हात मारणार आणि डोक्याला चावायला बघणार . दम दिल्यावर आमचा बाबू सोफ्यावर जाऊन बसतो.
कामावरून घरी आल्यावर तर विचारूच नका. घरात गेल्या गेल्या याला जवळ घेतलंच पाहिजे , नाहीतर फुल्ल धिंगाणा ...
आणि जेवण कमी पडलं कि मग डिश च काही खार नाही . असे एक ना अनेक किस्से आहेत मजेशीर .....
खार घरात शिरल्यावर नुस्ता
खार घरात शिरल्यावर नुस्ता धुमाकूळ झाला असेल>>>>>>> एकदम.
सॅमी तर कधी शिकार करेल असं वाटत नाही. एकदम रॉयल पोज मधे बसते , शांत आहे आणि घाबरट पण.
मंकी फुल टू गावरान आहे. बाहेर गेला की मातीत लोळून पांढर्याचा चॉकलेटीच होऊन येतो.
अंजली , त्याला परत पांढरा कसा
अंजली , त्याला परत पांढरा कसा करता ?
हाय कसे आहेत सग्ळे . ट्विटर
हाय कसे आहेत सग्ळे . ट्विटर वर मार्लिन द गुड बॉइ व पेनी लेन ह्यांचे डिस्ने वर्ल्ड मध्ये लग्न आहे. मला पत्रिका आली आहे. उद्याच आहे. जलुल जलुल आना.
लग्न! काय काय करतील हल्ली
लग्न! काय काय करतील हल्ली
हौसेला सीमा नाही!
अन इकडे ह्ञुमन्स ना कुठला वेळ पिझा खायला! सगळे आपापल्या पपीज च्या मागे होते!

आम्ही काल माउईच्या बेस्ट फ्रेन्ड एस च्या बड्डे ला जाऊन आलो. मस्त वेदर, हिरवळीवर सगळीकडे गोग्गोड कुत्रीच कुत्री. पॅरडाइज!
सगळीकडे भरपूर खेळणी पसरून ठेवलेली होती, खायला डॉग स्पेशल केकतर होताच आणि शिवाय वेगवेगळ्या ट्रीट्स चा बफे होता. सगळे प्रिविलेज्ड लाडावलेले डॉगोज ट्रीट्सना नो थॅन्क्स पण ह्ञुमन्स साठी पिझा सर्व केल्यावर तो आणा इकडे म्हणत होते
माउई ने भयंकरच एंजॉय केले. जरा मोठ्या कुत्र्यांवर भुंकत होता मात्र! बाकी नेहमी भेटणार्या त्याच्या गोड मैत्रिणी मिष्टी आणि चीनी म्हणून आहेत त्यांच्या आया सांगत होत्या की एरव्ही मिष्टी आणि चीनी घट्ट मैत्रिणी आहेत पण माउई भेटला की त्यांच्यात भांडण होते माउई च्या अटेन्शन साठी
इकडे माउईला काही फरक पडत नव्हता, तो दोघींनाही पाप्या देत होता
बड्डे बॉय बिचारा भांबावलेला होता. आपल्या यार्डात इतकी दुसरी कुत्री! आणि इतके ह्यूमन्स. तो लॉस्ट झाल्यासारखा नुस्ताच इकडे तिकडे फिरत होता. मज्जा एकूण!
@मैत्रेयी किती गोड!!
@मैत्रेयी
किती गोड!!
Pages