भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मज्जाय की माऊईची
दोन दोन गर्लफ्रेंड
तो लाईट वाला फोटो इन्टावरचा तिथलाच आहे का

तो इन्स्टावरचा फोटो आमच्या बॅकयारडातला आहे. हो माउई ची मज्जा आहे. शिवाय समोर रहाते ती लुना अजून एक खास मैत्रिण आहेच Happy
.
हा एक कालच्या बड्डे पार्टीतला फोटो मिष्टीच्या आई ने पाठवला. मी आधीच्या पोस्टीत जे काय म्हटलेय त्याची समरी आहे हा फोटो म्हणजे Lol
माउई चीनी च्या मागे, मिष्टी माउई च्या मागे आणि मागे तो मधेच बसलाय तो लॉस्ट बड्डे बॉय एस !! Happy bday_1.jpg

ओडीनचे अपडेट्स गेल्या महिन्यातले

माझ्या मित्राचा डॉबरमॅन आणि ओडीन यांची ऑलमोस्ट रोज हाणामारी चालते. न भुंकता ते तासन तास एकमेकांशी कुस्ती करत असतात. कधी कधी त्यांचा आवेश बघून भिती वाटते की आता काय करतात पण नाहीच. डॉबरमन तर ओडीनचा गळा मान धरतो, पहिल्याने घाबरलो आणि फटके मारून बाजूला केले दोघांना. पण आता कळतयं की तो अगदी परफेक्ट दाब देतो, इतक्या मारामारी नंतरही ओडीन किंवा त्याला दात ही लागलेला नसतो. आपटा आपटी आणि चावा चावी करून इतके दमतात की नंतर अर्धा तास लहालहा करत जीभ बाहेर काढून बसतात.

त्यात आता भर पडलीय मेयो ची, दोन महिन्यांचे गोल्डन रिट्रीव्हर, मित्राकडे एक महिन्यासाठी सांभाळायला आले आहे. इतकं बारकं आहे, पण फुल्ल डाकू आहे. दार उघडे दिसताच घरात शिरतो आणि जे काय दिसेल ते चावायला सुरुवात करतो. तो डॉबरमॅन आणि ओडीन त्याच्या तिप्पट आकाराचे आहेत पण याला काही नाही, बिनधास्त त्यांच्या अंगावर धावून जातो, उडी मारून त्यांचे कान चावतो, त्यांच्या बाऊलमधले फुड खातो, त्याला कंट्रोल करणे म्हणजे दमछाक करणारा प्रकार आहे. पण इतका गोंडस दिसतो आणि हसतो की रागावूच शकत नाही. आम्ही म्हणजे नुसते त्याचा धुमाकूळ बघून हसत बसतो.

या उलट भटक्या कुत्र्यांची परिस्थिती

गेल्या महिन्यात ओडीन वर दोन वेळा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्याचा त्याने इतका धसका घेतलाय की तो आता त्या बाजूला येतच नाही.
ओढत नेतो उलट्या बाजूला. आणि एक तर घराजवळचीच सोसायटी आहे. तिच्या पार्कींगमध्ये तीन भटकी कुत्री रहायला आली आहेत आणि ती येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या भूभूवर धावून येतात. अत्यंत भितीदायक आहेत ती. ओडीन एकदा थोडक्यात वाचलाय. ती कुत्री अंगावर येतोच तो उलट्या दिशेने पळाला आणि बाईकला धडकला. लीश होता बांधलेला तरी.

त्याला आता तिकडे जायचं म्हणजे थरकापच उडतो. नुसते फिरवणेही अवघड झाले आहे आता घरासमोर सुद्धा. गल्लीत इतकी भटकी कुत्री झाली आहेत ना, किमान २०-२५. आता भटके कुत्रे दिसले लांब जरी तो जागीच थांबतो आणि उलट्या दिशेने पळून जायचा प्रयत्न करतो.

कधी कधी त्यांचा आवेश बघून भिती वाटते की आता काय करतात पण नाहीच >>>> सेम ! कधी कधी भिती वाटते तशी मारामारी बघून.

हा बघा ज्योई आणि ओरियोचा रानटीपाण !

https://www.youtube.com/watch?v=YxnfTKbET54

बड्डे पार्ती फोटो भारी आहेत मै!

भन्नाट व्हिडीओ

ओडीन आणि मेयो ची सेम असला प्रकार चालतो. ओडीन त्याला अंगावर लोळून
खाली दाबतो तेव्हा धस्स होते, पण त्यांना बहुदा अंदाज असतो किती आणि कसे याचा.

अंजली , त्याला परत पांढरा कसा करता ?>>>>>> मोस्टली तो त्याला स्वतःला चाटून चाटून अगदी क्लिन करतो. उरलसुरलं सॅमी चाटून देते. ते एकमेकांना फार मस्त साफ करतात. Proud अगदी वाटलं तर स्प्रे शँपू टाईप प्रकार आहे तो हातावर चोळून लावतो. पण याची फारशी वेळ येत नाही.

मैत्रेयी अगं काय गोड प्रकार आहे हा बर्थडे. स्पेशल केक काय, ट्रीट काय, माव्याच्या मैत्रिणी काय सगळीच धमाल! लॉस्ट बर्थडे ब्व्यॉय Lol
तसे हुमन च्या टॉडलर एजग्रुप पार्टीमधे पण बर्थडे बॉय ऑर गर्ल लॉस्टच असतात. बाकीचेच मजा करतात. Proud

भारी क्यूट व्हिडिओ आहे पराग! जोई स्वतःच्या साइझ ची पर्वा न करता धडाधड मस्ती करतोय Happy कसला तुड तुड धावतोय !
आशूचँप - भटक्या कुत्र्यांचे खरंच स्केअरी अनुभव. भारतात असताना त्यांच्यामुळेच कुत्रे या प्राण्ञाचीच भयानक दहशत बसलेली होती. अर्थात तेही बिचारे जगण्यासाठीच्या धडपडीत असतील म्हणूनच जास्त अग्रेसिव्ह होत असतील.

च च!!! भटक्या कुत्र्यांचा उपद्रव ना. मी देखील अनुभवला आहे भारतात. काय आवेशात येतात विशेषतः भुकेली असतील व आपल्या हाता डबा दिसला तर Sad
हॉस्टेलवर एक चावलेलं मला .

हो ना, फार भीती वाटते, आणि आमच्या गल्लीत तर इतकी झाली आहेत की विचारू नका. आणि रात्री बेरात्री त्यांचे गँगवॉर सुरु होते. की इकडून ओडीन निषेध व्यक्त करतो. त्याला गप्प बस म्हणून ओरडावे लागते.

त्याची अजून एक गंमत म्हणजे - त्याला काही वेळा आम्ही बाहेरच्या ग्रीलला लीश ने बांधून ठेवतो. तो मग बाहेरची गंमत बघत टाईमपास करतो. आणि कंटाळा आला की कुईकुई आवाज करतो मग त्याला आत घेऊन येतो. पोरगा म्हणाला गंमत बघ आता, आणि त्याने लीश फक्त ग्रीलला बांधतोय असे दाखवले आणि प्रत्यक्षात सुटेच ठेवला लीश. तरीही बिचारा ओडीन बसून राहीला आणि कंटाळा आल्यावर आत घ्या म्हणून सुरु झाला. त्याला म्हणलं आत ये तरी येईना वर चेहऱ्यावर गोंधळलेले भाव की लीश बांधलाय तरी आत कसा ये म्हणतोय.

मग खोटे खोटे लीश सोडलाय असे दाखवल्यावर मग महाशय आत आले.

बड्डे पार्टी मस्त! ज्योई एकदम तुडतुड्या आहे की!
ओडीन एकदम निरागस बाळ आहे. त्याचा मित्र चांगलाच दणकट आहे, मस्ती बघून भीती वाटावी असा.

बाप रे तो बुलेट केवढा दांडगा आहे! ओडिन काही लहान नाही एरव्ही पण तोही त्याच्यापुढे पिल्लू वाटतोय! त्या छोटू मेयोचा पण फोटो टाका आता जमेल तेव्हा.
ओडिन ची लीश ची गंमत किती क्यूट!

तो फक्त दिसतो निरागस सज्जन
अंगांत जाम खोड्या आहेत त्याच्या आणि त्याला बरोबर कोणाला कसे मनुप्युलेत करायचे तर करायचं ते बरोबर कळतं

हे आधी लिहिलं आहे का आठवत नाही पण रात्रीचे जेवण द्यायची जबाबदारी मुलाकडे दिली आहे, खायची वेळ झाली तो त्याच्या पुढे जाऊन बसतो
त्यावेळी त्याची सिरीयल, मुव्ही किंवा गेम सुरू असेल तर तो लक्ष देत नाही किंवा थांब थोडा वेळ सांगतो
थोडा वेळात जर तो हलला नाही तर मी काम करत बसलो असेन तिथे येतो आणि कुईकुई करून भूक लागली पण खायला मिळत नाहीये असलं रडगाणे गातो
साहजिकच मी पोराला ओरडतो, का रे त्याला खायला का देत नाहीये, तुझा गेम ठेव आणि त्याला खायला दे, भूक लागली आहे
त्यावर पोरगा चरफडतो म्हणतो लगेच तक्रार करयाची नाही बाबाकडे जाऊन, देतो म्हणलं होतं ना तुला
थोडा वेळ शांत बसता येत नाही का
ये आता परत खेळायला माझ्याशी मग बघतो
पण ओडीन ला काही नसतं त्याचे काम झालं आहे एवढं कळतं मग मला सोडून त्याच्या मागेमागे हिंडतो

ओडीनचा चेहरा बोलका आहे. बुलेट पोलीस कुत्रा वाटतो. मैत्रेयी वाढदिवसाची गोष्ट फार मजेशीर आहे. पराग, व्हिडिओ खूप मजेशीर आहे.

काल रे डिट वर कॅलि फोर्निया मध्यील एका सेम ब्रीड ओडिन नावाच्या कुत्र्याबद्दल वाचले. तिथे जेव्हा टब्स फायर झाला होता तेव्हा ओडिन आई बाबांबरोबर सुरक्षित जागी गेला नाही तर तिथेच थांबला आणि तेथील गोट्स व काही फायर चुकवून आलेली हरणे काळविटे ह्यांना एकत्र करून
थांबला. आई बाबा काही दिवसांनी परत आले तेव्हा हे सर्व प्राणी तिथे सापडले. हिरो ओडिन. मच लव्ह.

परवा शनिवारी आम्हाला फार आळस आला होता वॉकला जायचा. हाडेच दुखत होती. मग झोपताना आमची पपुली शाहण्या मुली सारखी बाथरूम मध्ये जाउन सू सू करून आली !!!!

माझे एक ठिप क्या मांजर आहे . पहाटे आम्ही फिरायला जातो तेव्हा आजकाल आडदांड कुत्री तिला आमच्या जवळ येउ च देत नाहीत व खाउ खाउन टाकतात. काल दुपारी माउ माझ्या जवळ आले व कट्ट्यावर बसून माझ्या हातावर कान घासून घासून प्रेम व्यक्त केले. कोण म्हणते मांजरे प्रेम करत नाहीत.

आजकाल उन्हाळा असल्या ने मी एक भली मोठी दोन लिटरची बाटली घेउन जाते खाली व एक थर्मा कोलचा ड्बा सापडला आहे. त्यात ते पाणी ओतून ठेवते. वरच दोन वुड मशरूम्स आहेत त्यांनाही चार थेंब टाकते. प्लस पेडिग्री व बिस्किटी. कावळे कुत्रे मांजरे वेळ होईल तसे खाउन जातात.

अमा, मला तुमच्या या गोष्टी वाचायला फार आवडतात.

कोण म्हणते मांजरे प्रेम करत नाहीत. >>> मांजरांमध्ये पण माणसांसारखे काळे-गोरे उडीद असतात की. त्यातही एखाद्या माऊला माणूस जातीचा वाईट अनुभव आला असेल तर ती तुसडेपणा करणारच. बाकी, मला मांजरांच्या शिष्ठपणाचा भरपूर अनुभव आहे पण तुसडेपणाचा नाही Happy

Pages