भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही याच कारणाने श्वानप्रेमी असूनही अजून तरी डॉग घेतलेला नाही. नंतर उगाच झेपत नाही असं वाटायला नको.

शिवाय ते प्रोफेशनल ब्रीडिंगबद्दल जे वाचलं ते फार त्रासदायक होतं. त्यामुळे भविष्यात कधी डॉग घेतला तरी तो प्रोफेशनल ब्रीडरकडून घ्यावासा वाटणार नाही.

जेंडर सिलेक्शनबद्दल पण मला नैतिक इश्यू वाटतो. फीमेल डॉगची जबाबदारी जास्त म्हणून मेल डॉग घेणं हे सॉर्ट ऑफ मुलगी नको, मुलगाच हवा टाईप टिपिकल भारतीय सनातनी वाटतं. त्यापेक्षा मग डॉगच सध्या नको, लोकांच्या कुत्र्यांचे लाड करू, त्यांना गिफ्ट्स देऊ असं ठरवलं आहे!

हा धागा वाचून आणि आधी भुभूंचे व्हिडिओ पाहून खरंच घ्यावासा वाटला होता.पण शारीरिक ताकद आणि प्रेम करायची ताकद दोन्ही, इच्छेच्या व्यस्त प्रमाणात आहेत.त्यामुळे इथे आणि तिथे पाहून आनंद मानून घेणे जास्त बरे वाटले.

अमा यांनी त्यांच्या धाग्यावर लिहिलं होतं ते कोट करतो
भुभु आणणे म्हणजे मूल होऊ देण्याच्या इतका महत्वाचा निर्णय आहे
त्यामुळे सर्वांगीण विचार करूनच घ्यावा
त्यामानाने कदाचित मनी माऊंचे कमी करावे लागत असावं बहुदा
त्यांचा फारसा अनुभव नाही
पण भुभु हे आयुष्यभर बाळ च राहतात असं दिसतंय
आणि ते आपल्याशी प्रचंड इमोशनली अटॅच असतात
घरातल्या वातावरणाचा पण त्यांच्यावर परिणाम होतो

घरातल्या वातावरणाचा पण त्यांच्यावर परिणाम होतो>> हो नक्कीच. माझ्या घराच्या शेजारी पूर्वी एक डान्स बार होता व पडीक अश्या थेटरात अनेक बेकार अ‍ॅक्टिविटीज चालत व गुंड माण से राहात. तर त्यांच्यात एक रॉट वाइलर पाळलेला होता. ह्याचे नावच त्यांनी हरामी असे ठेवलेले होते. आम्ही वॉकला जाताना हा आम्हाला बाहेरच्या बाजूस बांधलेला दिसे व त्याला साध्या प्रेमाची नितांत आवश्यकता होती पण ते मिळत नव्हते. कायम हिडीस फिडिस व विचित्र वागनूक बघितलेला.. मी त्याला बिस्किट देउन दोन मिनिटे प्रेमाने बोलत असे. पन पुढे हे सर्व्च नाहिसे झाले.

लॉक डाउ नच्या सुरौवाती स एक भला मोठा प्युअर ब्रीड कुत्रा कोणीतरी सोडून दिला होता. पाळीव कुत्रे व स्ट्रे कुत्र्यांच्या सवयी पण वेग वेगळ्या असतात. पाळीव ना बाहेर शिकार करता येत नाही. कच रा उपसून अन्न शोधता येत नाही. इन अ वे दे आर डिपेंडंट ऑन द ओनर.
तर हा ब्राउनी पुढे शेजारी सुपरमार्केट होते तिथे दिसाय चा मी पेडिग्री चारली तर खायचा. आता कॅफे उघडले आहेत तर तिथे खुर्ची खाली झोपलेला असतो कोणातरी ग्राहकाच्य खाली. तिथे रेगुलर ये णारे पब्लिक आहे. त्यांच्या बरो बर रिलेशन शिप साधून आहे. हे नॅचरली सोशल प्राणी आहेत.

स्ट्रे डॉग बिन्धास्त असतात त्या मानाने. आता माझी पपस मोठे झालेली ग्यांग आहे ती टोळधाडी सारखी वाग ते. ह्यात आता नव्याने अ‍ॅड झालेले व इथपर्यंत वाचलेले असे दोन पप्स आहेत( नातू माझे) चार पाचात ले दोन वाचले इथपरेन्त. तर एक त्यातले कायम माझ्या कुत्र्या च्या बेल्ट शी खेळायला बघते. तीच उत्सुकता खेळकर पणा असतो डोळ्यात मग पुढे माणसांचे अनुभव येउन दूर राहायला शिकतात.

मालक आजा री पडला तर किम्वा पैसे संपले डिवोर्स झाला, मूव्ह करायचे आहे अश्या अनेक कारणाने लोक पेट ला सोडून देतात.
इथे मुंबईत तर चांगले महागाचे पेटस मुद्दम अमिताभ बच्चन च्या जलसा समोर सोडून देतात म्हणजे ते लोक बघून पेट ला रि होम / रिहॅब करतील.
पेट ला ट्रॉमा नक्की होतो. पिकासोकडे एक डॅशुंड होता तो वारल्यानं तर दहा दिवसा त पिकासू पण वारला. कदाचित डॉगो ला समजले असेल
व मालकानंतर राहायला नको म्हणून आधीच जीव त्यागला असेल. ह्याचे फोटो जालावर दिसतील. पिकासोने ह्याचे एक चित्र काढलेले आहे. रेखाचितर ते खूप लोक गोंदून घेतात.

अति पेट प्रेम व अति निगलेक्ट अब्युज ह्यचा एक स्पेक्ट्र म आहे. अगदी ह्युमेन वागणूक द्यायला जमले तरी खूप झाले. पण दो ष कुत्र्याचा नसतो कधी. सर्व स्पेशीजच मानवाशी चांगले वागायला व रिलेशन शिप जो डायला उत्सुक असते. आपण कसे वागवू त्यावर आहे. नो जजमेंट.

डो डो नावाच्या साइटवर अब्युज केलेले कुत्रे रिहॅब केलेले दाखवतात. बरे वाटते बघायला. पण असे किती असतील जे खितपत पडून व एकाकी उपाशी मरू न जातात.

हो करते अपलोड. Thank u जाई. क्यूट आहे पण तितकाच मस्तीखोर.

Bruno towel.jpg
त्याचा टोवेल त्याचा जीव की प्राण

bruno tshirt.jpg
लेकाचा टी-शर्ट हट्टाने हवा‌ होता. मग पेंगुळला

अमा यांचा प्रतिसाद खूप आवडला. खरच की हे प्राणी सामाजिक = सोशल असतात. हा मुद्दा असा लक्षात आलेला नव्हता. जरी नीरीक्षण होते पण असा मांडता आला नसता.

अरे वा! ब्रुनो चे स्वागत! टीशर्ट मधला पेंगणारा फोटो किती क्यूट, निरागस अगदी.
अमा तुमचे पोस्ट छान आहे.

माऊई...क्युटी.. बिछडे हुए भाई बहेन मिले ते पण बर्थ्डेच्या दिवशी.
काय मस्त योगायोग. वेलकम ब्रुनो. गोड आहे.

आम्ही ३ दिवस बाहेर गेलो होतो. घरी आमच्या माऊंसाठी कॅमेरा लावून गेलो होतो. ३-४ प्लेट्समधे खाणं ठेवून, पाण्याचं कारंज ठेवलं होतं, ३-४ लिटर बॉक्सेस भरून ठेवले होते. कॅमेर्‍यातून दिसायचे मंकी सॅमी आम्हाला. फक्त आम्ही बोललो नाही कारण आवाज आला तर शोधायला लागतील आणि दिसलो नाही तर माहित नाही कसे रिअ‍ॅक्ट करतील म्हणून पोचायच्या दिवशी १ तास आधी बोललो, नावाने हाका मारल्या. क्यूट बाळं दोघे पळत आले कॅमेर्‍याकडे जिथून आवाज येत होता, त्याला नाक लावून लावून वास घेत होते. मंकी कॅमेर्‍यावर उडी मारून चढला, पलिकडे बघून आला. इतकं क्युट वाटलं. येताना दोघांचं आवडतं सूप, खेळणी घेऊन आलो. मस्त खेळत होते दोघं.

बापरे तीन दिवस
ओड्या मला एक दिवस सोडून राहील जास्तीत जास्त
तेही घरचे मेंम्बर असतील तर
मला त्याचीच खूप काळजी वाटते की सवय करायला पाहिजे त्याला काही दिवस कुठेतरी ठेऊन
मध्ये आम्ही डॉग हॉस्टेल ची चौकशी केली पण दर किमान 750 रु रोज असले आहेत
फारच महाग वाटले

.तर असा हा  बूनो, बून्या.चिबू.अशी खूप सारी नाव लाडाची ..पण याला बरोबर समजत, सगळी.. त्याचीच नाव.. कुठल्याही नावाने हाक मारा.. साहेब असतील तिथून पळत हजर.
2. अस हे बाळ सकाळी साडे सहा वाजले की सगळ्यांना उठवायला सुरुवात. उउउ. करत पांघरूनात शिरत झोपू देणार नाही कोणाला. मग जेवणाची डिमांड.. जरा उशीर झाला की पप्पांना जाऊन कम्प्लेंट करणार.. नवऱ्याला काम करू देणार नाही.. त्याच्या कीबोर्ड वर जाऊन डोकं ठेवेल, जोपर्यंत आम्च्यापैकी कुणी कोणी त्याचं जेवण देणार नाही तोवर नवऱ्याला काहीच करू देणार नाही. आणि त्याच्या भोभो भाषेत त्याला काही सांगायचा प्रयत्न  करेल.. जेवण मिळाले  की शांत.
3. कुणी बाहेर निघालं की हा एक्साईट होऊन दरवाजापर्यंत जाणार त्याला वाटेल आपल्याला घेऊन जाणार तसेच भाव.. पण आपण जर कामाला निघालो किंवा काही करून दारातून बाहेर बाहेर जाऊन दोन मिनिटात परत आलो तरीही जग जिंकल्याचा आनंद होतो त्याला आणि अगदी तोंडाला मानेला  कानाला चाटून kiss केल्याशिवाय घरातील कोणालाही सोडणार नाही.. मग तो कालावधी दोन मिनिटाचा का असेना.. घरातले कोणीही आल्याचा.. इतका मोठा आनंद कोणालाही झालेला मी तरी पाहिले नाही.. इतकं निर्व्याज प्रेम या बाळांन शिवाय  मला नाही वाटत दुसरे कोणी देऊ शकेल. 
सध्या आजारी आहे आमचं हे बाळ..अजून बरंच काही आहे  जे मला आमच्या या बाळाबद्दल सांगायचे आहे जसा वेळ मिळेल तसे लिहित जाते.

गो डच आहे बुन्नू. फोटो बघून स्वी टीने पण अप्रुव्ह केले. दुसृया फोटोत काळी टोपी व टेबलावर मागे पुस्तके आहेत ती डोक्यावर ठेवल्यासारखी दिसत आहेत. त्यामुळे तो ग्रॅजुएशन चा फोटो वाटतो आहे.

आमचे कुत्रे लांब व बुटके असल्याने आम्ही सोफ्यावर बसलो व तिला शेजारी यायचे असेल तर पुढ चे दोन पाय सोफ्यावर ठेवून शेपटी हलवत उभी राहते. मग तिच्या कमरेला कवेत घेउन तिचा सेकंड हाफ उचलून वर घ्यायचे. ह्यात आपल्या पाठीच्य कण्याचा भुगा होतो.

स्वीटी पण सकाळी अंधारात सव्वा पाच ते पाच अठ ठाविस दरम्यान जागी होते. मग मी उठे परेन्त कू. कू. मी घर आवरते. * रात्री थकव्याने वस्तू इथे ति थे पडलेल्या असतात) चहा बिस्किटे बनवे परेन्त ही बालकनीत उंदीर आहे का ते तपासणी करून येते. अनेकदा मी ते दार उघड ताच मामा पळून जाताना दिसतात. पण हे वासाने शोधत राहत. डर्प!!!

चहा पीताना परत आधी सोफा सन घ्यावे लागते. मग मी भांडी घासते तेव्हा तिला एका प्लेटीत पेडिग्री देते. ते ती बसून ह ळू हळू खाते माझे झाले आहे का ते लक्ष ठेवून बघत. मुंबईतले लहान किचन त्यामुळे लांबोडके पूर्ण किचन ची रुंदी व्यापते. व फ्रिज परेन्त जाताना बाहेर जाताना तिला ओलांडून जावे लाग ते असे शक्यतो करू नये आपण पडण्याची फार शक्यता असते.

मग वॉक कारण तोपरेन्त उजा डते. अंधा रात हे काळे दिसतच नाही मला म्हणून नेत नाही. पूर्वी तो ही उद्योग केला आहे. दोघींना ग्लो कॉलर आणल्या होत्या. ह्या मिळतात. कोणी रात्री वॉकला जात असल्यास सेफ्टीच्या दृ ष्टीने बर्‍या. मग घरी येउन एसी समोर आराम . तो मेड येइ परेन्त. मग तिच्या अंगावर उगीच धावून जायचे आणि बिस्किट पुडा नैतर चिकन लेग घेउन गप्प बसायचे.

आमच्या बुक केस मध्ये आठवड्याची रद्दी ठेवतो त्यावरही जाउन झोपते फड ताळात लपल्यासारखी. शेजारीच एका शू बॉक्स मध्ये तिची औषधे तेले आहेत. किती कमी लागते कुत्र्यांना. स्वतःच्या गरजा कमी करताना मला फार उपयोग झाला कुत्र्यांना बघितल्याचा.

Pages