आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"पण लोकांना २००७ चा वर्ल्डकपच लक्षात राहतो त्याचे काय करायचे?" - सगळ्यांनाच गुळाची चव कशी असणार रे? तान् प्रति नैषयत्नः म्हणून सोडून द्यायचं झालं.

"एकमेव का ? श्रीसंथ पण होता की" - केरळ चा इंडियन टीम मधला प्लेयर श्रीसंथ च्या आधी टीनू योहानन होता. Happy

रॉयल्स फारच weak टीम आहे. अगदीच बटलर/मिलर/मॉरिस वर अवलंबून आहेत ते.

धोनी आज पुढे आलेला बघून फार आश्चर्य वाटले. सॅम करनच्या आधी येणे त्याने अपेक्षित नव्हते. तसे म्हटले तर त्याला येताना बघून मन सुखावलेही. पण तो जुना धोनी आता उरला नाही हे पहिल्या मॅचला शून्यावर जसा फटका खेळून बाद झालेला तेव्हाच जाणवलेले. मला तर दुसर्‍या सामन्याला जेव्हा चेस निव्वळ औपचारीकता होते तेव्हा तो पुढे येईल तेव्हा थोडी बॅटींग प्रॅक्टीस करेल असे वाटलेले. जेणेकरून स्पर्धेत पुढे मागे गरज पडलीच तर त्याला काहीतरी खेळता येईल. पण तेव्हा तो आला नव्हता याचे आश्चर्य वाटले.

असो, धोनी क्या सोचे धोनी ही जाणे
पण कदाचित आपली शेवटची असलेली हि आयपीएल तो आपल्या किपिंग आणि कप्तानीने चेन्नईला जिंकवून द्यायचा निर्धार करून आलाय हे नक्की.

चेन्नईतील सामना पहिली फलंदाजीवाले जिंकणे आणि मुंबईतील सामना चेस करणारे जिंकणे हा पॅटर्न होऊ घातलेला
तो त्याने आज मोडला Happy

उद्या मात्र आपला बोरीवल्ली का छोरा रोहीत शर्मा आणि चुम्मा फलंदाज ऋषभ पंत यांच्यात आमना सामना
उद्या कोण जिंकेल कोण हरेल याचा लोड न घेता या दोघांच्या फलंदाजीचा आनंद लुटायचा.
पृथ्वी शॉ ने जर ट्रेंट बोल्ट टेस्ट पास केली आणि मग मनसोक्त फटकेबाजी केली तर तो बोनस समजायचा...

दिल्ली साठी आज खुप मोठं चॅलेंज हे असेल की मुंबई ला चेंडू बॅटवर येतो आणि बाउन्स पण चांगला असतो त्या उलट चेन्नई ची परिस्थिती आहे. एकतर रविवारी सामना झाला नी लगेचच मंगळवारी सामना तो पण अशा पिच वर. दिल्ली ने परिस्थिती ला जुळवून घेतलं तर आजही रंगतदार सामना पहायला मिळेल...

धोनी आज पुढे आलेला बघून फार आश्चर्य वाटले.>>> खरं तर धोनी ही आयपीएल खेळतोय हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे.

*..श्रीसंथ च्या आधी टीनू योहानन होता. *- हो, आठवलं. ( इथे जराही ' लूज बाॅल ' पडला कीं मलाच काय भारी गोलंदाजांनाही मार पडतोच ! Wink )
*पृथ्वी शॉ ने जर ट्रेंट बोल्ट टेस्ट पास केली आणि मग मनसोक्त फटकेबाजी केली तर तो बोनस समजायचा...* खरंय. त्याला लय सांपडलयाचं दिसतं पण अजूनही त्याचा बचावात्मक खेळाचा पवित्रा पूर्णपणे आश्वासक वाटतं नाहीं . पण तो वरच्या श्रेणीतील फलंदाज आहे, हें निर्विवाद. त्याला शुभेच्छा.

खरं तर धोनी ही आयपीएल खेळतोय हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे. >>> मला नाही वाटत. पैश्याचा खेळ आहे आयपीएल. पैसे मोजायला तयार आहेत फ्रँचायझी ते सुद्धा सर्वाधिक तर का खेळू नये? यात राष्ट्रीय नुकसान काहीच नाहीये. माझा कोणी वशिला लावला मी तर एक करोडमध्ये सुद्धा खेळायला तयार आहे Happy
आता त्या अर्जुन तेंडुलकरला मुंबईने २० लाखात घेतले. काही लोकं त्यालाही वशिलेबाजी म्हणत आहेत. असेना. अंबानीचा पैसा आहे. तो बघेल कसा खर्च करायचा. आयपीएल हे फ्रँचायझी लीग आहे हेच मुळात लोकं भावनेच्या भरात विसरून जातात. जसे व्यावसायिक सिनेमांमध्ये एखादा निर्माता आपल्या मुलाला घेऊ शकतो तसेच ईथेही लागू.

धोनी स्वताच्याच हाताने "द ग्रेट फिनिशर" या बिरुदावलीची वाट लावतोय!
>>>
सचिनने शंभरावे शतक स्लो केले आणि त्यामुळे आपण बांग्लादेशशी हरलो त्याने त्याच्या आधीच्या ९९ शतकांचे मोल कमी होत नाही. किंवा मी कपिलला पाहिले तेच मरत मरत विक्रमासाठी बॉलिंग टाकताना. पण म्हणून मी त्याला तसाच गोलंदाज समजलो नाही. त्याचे आधीचे पराक्रम मी वाचले, विडिओ पाहिले, आणि त्यावरून कपिल हा भारताचा आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू आणि लिजंड आहे हे जाणले.

एकदिवसीय सामन्यात चेस करताना विजयी सामन्यात १००+ सरासरी आणि ती अचिव्ह करताना जिंकून दिलेले कैक सामने ज्यात एक २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना या त्याच्या पराक्रमांना या आयपीएलमुळे कोणी भारतीय क्रिकेटप्रेमी विसरत असतील तर अश्या वृत्तीचे काही करू शकत नाही Happy

२००७ ला विश्वचषक हरल्यावर काही लोकांनी ईथे क्रिकेटपटूंच्या घरावर दगडफेक निदर्शने केली. अश्या उगवत्या सुर्याला नमस्कार करणार्‍या चाहत्यांनी दिलेला मानसन्मानही टाळावाच Happy

राष्ट्रीय नुकसान काहीच नाहीये.>>> राष्ट्रीय नुकसान त्याने केलं हे काल सिद्ध झालं. काल जी डाईव्ह मारली तशी त्याला सेमी फायनलला का मारावीशी वाटली नाही? इथे पैसे जास्त मिळताहेत म्हणून ?

"पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यात अर्थ नाही..... जाउद्या!" - बड़ी देर कर दी मेहेरबाँ आ़ते आ़ते| Happy - वेलकल टू द क्लब! Happy

"काल जी डाईव्ह मारली तशी त्याला सेमी फायनलला का मारावीशी वाटली नाही? इथे पैसे जास्त मिळताहेत म्हणून ?" - ज्जेब्बात!!

" खरं तर धोनी ही आयपीएल खेळतोय हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे.", "धोनी स्वताच्याच हाताने "द ग्रेट फिनिशर" या बिरुदावलीची वाट लावतोय!" - और यह लगा सिक्सर! नटराज फिर चँपियन!!

मुंबई ने टॉस जिंकून बॅटींग घेतलीय. is it half the battle? दोन्ही टीम्स ने केलेले चेंजेस पण चांगले आहेत. दिल्ली ला खूप चांगलं खेळायला लागणार आहे मुंबईला चेन्नईत हारवायला. धवन, स्मिथ वर जास्त विश्वास वाटतोय आज - कारण ही टिपीकल टी-२० विकेट नाहीय. इथे प्रॉपर क्रिकेटींग शॉट्स ला जास्त यश मिळेल असं वाटतं. मुंबई ची पहिली बॅटींग आहे, त्यांच्या टॉप ऑर्डर (रोहित, सुर्यकुमार यादव, डि-कॉक) कडून जास्त अपेक्षा आहेत.

Absolutely cruel game on bowlers!!! अश्विन च्या किमान दोन आणि रबाडा आणि स्टॉयनिस च्या किमान एका चांगल्या बॉलवर मिस-हिट्स / एजेस च्या बाऊंड्रीज गेल्या आहेत पहिल्या ५ ओव्हर्समधे.

आता तरी मुंबईने अर्जुन तेंडुलकरला खेळवलं पाहिजे. तो आल्यावर मिडल ऑर्डर स्ट्रॉंग होईल.

सचिनने शंभरावे शतक स्लो केले आणि त्यामुळे आपण बांग्लादेशशी हरलो >> ऐकावे ते नवलच. २९० वगैरे केले होते आपण तेंव्हा नि तो स्कोअर तेंव्हाच्या रेट प्रमाणे अ‍ॅट पार होता. परफेक्ट इनिंग होती भारताची एकून, कोहली नि तेंडूलकर नी पस्तीस ओव्हर्स पर्यंत १८० पर्यंत आणले होते नि मग शेवटच्या सात आठच्या रन रेट ने वाढवले होते जो तेंव्हाचा नॉर्म होता. बॉलिंग बेकार केल्यामूळे हरलो होतो. कृपया आपल्या धोनी ऑबसेशनच्या नादात इतरांवर शिंतोडे उडवायची सूतमात्रही गरज नाही.

is it half the battle? >> जरुरी नाही. मूम्बई तीन्ही मॅचेस काठावर आणून जिंकली किंवा हरली आहे. कधी तरी समोरचा संघ अन फोर्स्ड एरर्स टाळणारच.

मिश्राचे चेंडू खूपच वळताहेत असं नाहीं वाटलं ? ही मॅच ' लो स्कोअरींग ' व अटीतटीची होण्याचीच शक्यता दिसतेय.

चेन्नई पिच च्या 4 पैकी एकाही मॅच मध्ये मुंबईची बॅटिंग चांगली झालीय असे वाटले नाही

मिश्राचे चेंडू खूपच वळताहेत असं नाहीं वाटलं ? >> हो पण तो तसेही चांगले वळवतोच. त्याचा प्रॉब्लेम कंट्रोल आहे. ज्या दिवशी तो गवसतो त्या दिवशी तो शेन वॉर्न बनतो अन्यथा हिरवाणी.

>>बड़ी देर कर दी मेहेरबाँ आ़ते आ़ते| Happy - वेलकल टू द क्लब! Happy

आता तुम्ही लोकांनी इमानदारीत ओतलेले इतके पाणी वाहून जाताना बघितले म्हणून वेळीच आवरते घेतले Wink

आज एकदम दिल्लीचे हॉर्सेस फॉर कॉर्सेस Happy
मिश्राजी अश्विनला बाहेर बसवणार का पुढच्या मॅचला?

आता तुम्ही लोकांनी इमानदारीत ओतलेले इतके पाणी वाहून जाताना बघितले >>
देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने हात घ्यावे,
घेणार्‍याचे देणार्‍याचे एके दिवशी हात घ्यावे Wink

"देणार्‍याने देत जावे" - हे तूच करू जाणॅ. Happy

"म्हणून वेळीच आवरते घेतले" - हे बरं केलंस. Happy

आज दिल्लीची मद्दर ह्या (धवन-स्मिथ) जोडीवरच आहे. ही लवकर फुटली तर मुंबई काढेल मॅच. पण आत्तापर्यंत तरी दोघं सेन्सिबल खेळतायत.

A..M..A..Z..I..N..G!!! मस्त झाली मॅच. अगदी अटीतटीची! पोलार्ड चा बोल्ट ला संपवण्याचा (१८ व्या ओव्हर ला) निर्णय अंगाशी येईल असं वाटत होतं आणि तसं झालं. दिल्ली ला कल्पना होती की शेवटच्या ओव्हर ला कॅच-अप करता येईल. बुमराह चे ते दोन नो-बॉल्स पण महागात पडले मुंबईला. (बुमराह परत जुन्या सवयींकडे वळतोय का?) सहसा बुमराह च्या ओव्हर ला ४-५ रन्स निघतात ते त्या दोन नो-बॉल्स + फ्री हिट्स मुळे ९ रन्स निघाले. आजची मॅच प्रॉपर क्रिकेट शॉट्स खेळणार्यांची होती - उदा. धवन, स्मिथ, ललित यादव - आणि तिघंही मस्त खेळले.

असामी म्हणाला तसा कुणीतरी अन-फोर्स्ड एरर्स टाळून मुंबईला हारवणार होतं आणि तसंच झालं. वेल डन दिल्ली!

शर्मा सुर्या जबरी खेळत होते तेव्हा सामना दिल्लीपासून दूर जाताना दिसत होता. कारण १५० + मिळेल तो बोनस स्कोअर ईथे भारी होता. पहिल्या दहा ओवरमध्येच जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्लानही योग्यच होता. डिकॉक बाद होऊनही सुर्या शर्मा मस्त तुटून पडलेले. सुर्या गेल्यावर मात्र शर्माने मारूनच खेळावे की शेवटपर्यंत उभे राहावे हा प्रश्न होता. तो त्याने आपल्या इन्स्टिक्टनुसार सोडवत मारूनच खेळू लागला. एकदोन मारून त्यात बाद झाला. पण त्यानंतर इनिंग बिल्ड करत १५०-१६० च्या टारगेटकडे सावचिपतणे जायचे होते जे पांड्या बंधू पोलार्ड वगैरेना जमले नाही. मागच्या सामन्यातही शेवटच्या दोन बॉलना पोलार्डचे दोन सिक्स बसत अचानक १२ बहुमूल्य धावांचे घबाड हाती लागलेले जे यावेळी झाले नाही. मुंबई निम्मि लढाई तिथेच हरली.

पण मला दिल्लीचा चेसही फार आवडला. कुठेही रनरेट डोईजड होऊ न देता खेळले ते. आपला चुम्मा फलंदाज पंत लवकर बाद झाला याचे वाईट वाटले पण त्यानेही अतिशहाणपणा करत सेट व्हायला बॉल फुकट घालवा असा प्रकार केला नाही. एक जण जरी कुंथला असता तरी सामना गेला असता. पण मनिष पांडे आणि रसेल यांनी शिकवण दिली होती कि ईथे कसे खेळायचे नाही. तेच केले वा टाळले दिल्लीने Happy

आज अचानक नेहमीपेक्षा जास्त दव पडलंय आणि मुंबई टॉस जिंकूनही सामना हारणार.
>>>>>
दव फक्त कॅमेर्‍यात दिसत होते. दोरी फिरवली की पुसले जात होते. थोडे लागलेच बॉलवर तर फडक्याने साफ होत होते.
बाकी बॉल छान टर्न होत होता, बोल्टचे यॉर्कर नेहमीप्रमाणे हलकेसे रिव्हर्स होत ठिकाणे पे पडत होते, स्लोअर बॉल ईफेक्टीव्ह ठरत होते.. बॉल खेळपट्टीवर स्किड होत नव्हता की ऑटफिल्डही काही सुसाट झाली नव्हती. . आयुष्यात आणखी काय पाहिजे बॉलरला.
मुंबई आपल्या कर्माने हरलीय Happy

ऐकावे ते नवलच. २९० वगैरे केले होते आपण तेंव्हा नि तो स्कोअर तेंव्हाच्या रेट प्रमाणे अ‍ॅट पार होता. परफेक्ट इनिंग होती भारताची एकून, कोहली नि तेंडूलकर नी पस्तीस ओव्हर्स पर्यंत १८० पर्यंत आणले होते नि मग शेवटच्या सात आठच्या रन रेट ने वाढवले होते जो तेंव्हाचा नॉर्म होता. बॉलिंग बेकार केल्यामूळे हरलो होतो. कृपया आपल्या धोनी ऑबसेशनच्या नादात इतरांवर शिंतोडे उडवायची सूतमात्रही गरज नाही.

>>>>>

धोनी सध्या जे वयोमानानुसार गचाळ खेळतोय ते मी कबूल करत आहे. चाहता आहे त्याचा. भक्त नाही.
हि आपली पोस्ट मात्र सचिन भक्तीतून आली आहे Happy

२९० तेव्हा स्कोअर खूप भारी होता हे लॉजिकच भारी आहे. २०१२ साल होते ते. १९९२ नाही. तोपर्यंत ३००+ चे किती स्कोअर झालेले आकडे आणू का? थोडे गूगल करावे लागेल, ते आणतो नंतर....

पण त्याच्याच पुढच्या सामन्यात त्याच मैदानावर पाकिस्तानने ३२९ मारलेले जे आपण ४७.५ ओवरमध्ये ६ गडी राखून पार केले होते पाकिस्तानी गोलंदाजांसमोर
ज्यात विराट कोहलीने १४८ चेंडूत १८३ मारले होते Happy

आणि आपण बांग्लादेशसमोर २९० मारू शकलो ते देखील रैनाच्या ३८ बॉल ५१ आणि धोनीच्या ११ बॉल २१ नाबाद या शेवटच्या थोडेफार फटकेबाजीने.
अन्यथा सचिनने पुर्ण १४७ चेंडू खर्च करून फक्त ११४ धावा मारल्या होता. असा स्ट्राईकरेट ७०-८० चेंडू खेळणार्‍याचा समजू शकतो पण दिडशे चेंडू म्हणजे निम्मे चेंडू बॅटींग पिचवर खेळून बाबा आदमच्या जमान्यातही कोणी अशी खेळी केली नसेल.

उगाच सचिन भक्तीच्या नादात गोलंदाजांवर शिंतोडे उडवू नका हे खरे तर मीच आपल्याला म्हणायला हवे Happy

दोन्ही स्कोअरबोर्ड ईथे

https://www.espncricinfo.com/series/asia-cup-2011-12-524504/bangladesh-v...

https://www.espncricinfo.com/series/asia-cup-2011-12-524504/india-vs-pak...

Happy

Pages