आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धावसंख्या आवाक्याबाहेर असली की पाठलाग करणाऱ्या संघाला अजिबात बॅटिंग देऊ नये. जा हॉटेलवर हारलात तुम्ही असं बोलून त्यांना गाडीत बसवावे.

वरुण ने एकाच ओवर मध्ये दोन विकेट घेऊनही त्याला नंतर साठी ठेवलं... का ते माॅर्गन लाच माहीत.
तसंही आज माॅर्गन गंडलेला वाटला ...

पंजाब ला मिळालेल्या आक्रमक सुरूवातीनंतर त्यांना मोमेंटम कॅरी नाही करता आलं. १२ ओव्हर्स मधे १२०/० असताना किमान २२५ होईल असं वाटलं होतं. DC ने खूप चांगली बॉलिंग केली.

#India’sMostSuccessfulCaptain_ViKo
+1
विराट >>>> धोनी + गांगुली

>>तसंही आज माॅर्गन गंडलेला वाटला ...
अगदीच!
१९ वी ओव्हर भज्जीला काय अरे!

>>#India’sMostSuccessfulCaptain_ViKo
आकडेवारीत असेलही पण एक उत्तम कर्णधार म्हणूनच्या क्रमवारीत धोनी, गांगुलीच काय तर द्रवीड आणि कुंबळेलाही मी कोहलीच्या आधी स्थान देईन Happy

दिल्ली अगदी सहज जिंकले. धवन मस्त खेळला. त्यांच्या बॉलर्स ने पहिल्या इनिंगच्या उत्तरार्धात निम्मा गड सर केला होता. बॅटर्सने मोहिम फत्ते केली. खरं सांगायचं तर मुंबई सोडून कुठलीच टीम परिपूर्ण वाटत नाही. २-३ चांगले बॅटर्स आणि १-२ चांगले बॉलर्स, बाकी त्या दिवशी जो चालून जाईल तो, अशीच अवस्था बाकी टीम्स ची आहे.

आकडेवारीत असेलही पण एक उत्तम कर्णधार म्हणूनच्या क्रमवारीत धोनी, गांगुलीच काय तर द्रवीड आणि कुंबळेलाही मी कोहलीच्या आधी स्थान देईन
>>>>

सहमत आहे. मी या यादीत शर्मालाही जोडेन.

टीम चांगली आहे. स्वताही प्लेअर वर्ल्डक्लास आहे. जिंकतोय. पण कर्णधार म्हणून त्याचे कौशल्य मोजकेच आहे. ते देखील आता शिकला आहे. ऊपजत असे नव्हते जे एखाद्या धोनीत सुरुवातीलाही सहज दिसायचे.

आकडेवारी फसवी असते हे जसे वैयक्तिक रेकॉर्डला लागू तसे कर्णधाराबाबतही लागू. तरीही कुठलीही आयसीसी ट्रॉफी वा गेला बाजार आयपीएलसुद्धा ईतक्या बर्षात जिंकू शकला नाही हे फॅक्ट नाकारता येणार नाही.

वर्गातल्या सर्वात खोडकर आणि दांडगट मुलाला मॉनिटर करावे त्या पठडीतील तो कर्णधार आहे Happy

आज त्या दिल्लीच्या नवीन बॉलरला पहिल्या ओवरला वीस रन्स पडले.
पण पंतने त्याला बॅक करत दुसरी ओवर दिली हे तेव्हाच फार आवडले मग पुढे काहीही होवो.
पण त्याने विश्वास सार्थच ठरवत त्या ओवरलाही चांगले कमबॅक केले आणि पुढच्या स्पेलला मयंक अग्रवालची विकेट काढून २२५ चे टारगेट २०० च्या आत रोखायला सर्वात मोठी मदत केली.

पंतचे फलंदाजीत मात्र मारावे की स्ट्राईक रोटेट करावे याबाबत ठाम काही ठरत नव्हते असे वाटले. शेवटी गरज नव्हती तेव्हा असाच मारायचे म्हणून मारून बाद झाला. समोरून स्टॉईनिस मारत असताना अखेरपर्यंत खालूनच खेळला असता आणि २० बॉल २० नाबाद गेला असता तरी त्याचे रेप्युटेशन काही खराब झाले नसते. आणि कोणी म्हटलेच काही तर अश्या़ंकडे दुर्लक्ष करता यायला हवे. हि अजून एक गोष्ट तो धोनीकडून शिकू शकतो Happy

धवनने गेल्या वा त्याच्याही गेल्या आयपीएलपासून खेळ फारच आक्रमक केलाय आणि त्यात सातत्यही दिसतेय, त्याचा आता २०-२० वर्ल्डकपला विचार व्हायला हवा.

बाकी हा पृथ्वी शॉ सुद्धा बॉल फोडायलाच खेळतो असे वाटते. गल्लीत खेळताना किती फोडले चेक करायला हवे. कसले खवडे देतो एकेक. याने सातत्य दाखवले तर अश्या ओपनरची गरजच आहे भारताला. शर्मा राहुल कोहली सारेच इनिंग बिल्ड करत बसणारे एका छापाचे प्लेअर कामाचे नाहीत. पंत शॉ पांड्या अश्यांचा तडका जास्त हवा सध्याच्या २०-२० क्रिकेटमध्ये.

*-पण पंतने त्याला बॅक करत दुसरी ओवर दिली हे तेव्हाच फार आवडले* - +1. तो मेरीवाला पण जिगरी फास्ट गोलंदाज वाटतोय. ( BTW, तो त्यागी कुठून खेळतोय या आयपीएल मधे ? )
*बाकी हा पृथ्वी शॉ सुद्धा बॉल फोडायलाच खेळतो असे वाटते. * - +1 . शैलीदार पण फक्त षटकार मारण्यात तो इतर नवोदित धडाकेबाज फलंदाजांपेक्षा कमी पडतो , असं कालही जाणवलं. कदाचित, त्याचा मुख्य कल पारंपारिक सलामी फलंदाजीकडे असावा - सरळ बॅट व ग्राउंड फटके . अर्थात, तसं नसेलही.

हर्शल पटेल, अर्शदीप, आवेश खान, मेरीवाला, सकारिया सगळ्यांनीच चांगले इंप्रेस केलेय यावर्षी.... त्याशिवाय दिपक चहर, प्रसिध कृष्णा, सिराज वगैरे लोक पण फॉर्म राखून आहेत Happy
एकूणात जलदगती गोलंदाजांची वानवा नाहिये भारताला सध्या!
स्पिनर्समध्ये मात्र राहुल चहर, चक्रवर्ती वगैरेंच्या पलीकडे फारसे नवीन आश्वासक पर्याय दिसत नाहियेत!

बाय द वे, त्यागी राजस्थान कडून खेळतोय.... पण यंदा सकारिया मस्त बॉलिंग करत असल्यामुळे आणि गेल्या मॅचमध्ये उनाडकटने ही विकेट्स काढल्यामुळे त्यागीला लगेच तरी संधी मिळणे अवघड दिसतेय!

हर्शल पटेल, अर्शदीप, आवेश खान, मेरीवाला, सकारिया सगळ्यांनीच चांगले इंप्रेस केलेय यावर्षी.... हो पण अजून भरपूर वेळ आहे अजुन स्पर्धा तर आता कुठे सुरू झाली आहे.

आकडेवारीत असेलही पण एक उत्तम कर्णधार म्हणूनच्या क्रमवारीत धोनी, गांगुलीच काय तर द्रवीड आणि कुंबळेलाही मी कोहलीच्या आधी स्थान देईन >> ह्यातले " काय तर" हे खटकले स्वरुप. टॅक्टिकली द्रविड , कुंबळे नि धोनी हे उरलेल्या दोघांपेक्षा कधीही उजवे होते.

गेल्या सीजनपासून धवन जबरदस्त खेळतोय. भारतातल्या पिचेस वर तरी त्याचे मिड विकेट स्लॉग्स जबरदस्त चालतायेत. इनिंग्स पण मोठ्या खेळतोय.

सकारिया मूळे नटराजन वर फिटनेस मेंटेन करायचे प्रेशर येणार Happy

आमच्या लहानपणी ज्याला बॅटिंग चांगली येत नसायची त्याला आम्ही खेळवायचो. आऊटच नाही करायचो. जेव्हढे जास्त चेंडू खेळेल तेव्हडा स्कोर कमी व्हायचा. धोनीची बॅटिंग बघून ते प्रसंग आठवले.

पाच विकेट गेल्यात त्यामुळे धोनीने टुकू टुकू खेळून संघ ऑल आऊट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नन्तर त्याने डाव सावरला, संघाल गरज असताना पडझड थांबवली, तो होता म्हणून समोरच्या खेळाडूंनी फोर सिक्स मारले असले मिम्स सोशल मीडियावर फिरवायला आम्ही लगेचच सुरू करू.

मी सॅमसंग च्या जागी असतो तर सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्या असत्या की धोनीला अजिबात आऊट करू नका. कॅच, रन आऊट, बोल्ड , lbw या कशानेच आऊट नाही झाला पाहिजे, टीमच्या भल्यासाठी त्याने स्वतःहून हिट विकेट फेकली तर गोष्ट वेगळी.

थँक्स टू सकारिया - त्याने धोनी ला आऊट केल्यामुळे सीएसके ची टोटल २०+ ने वाढली. नाहीतर रॉयल्स ला जेमतेम १५० चेस करायला लागले असते.

>>ह्यातले " काय तर" हे खटकले स्वरुप. टॅक्टिकली द्रविड , कुंबळे नि धोनी हे उरलेल्या दोघांपेक्षा कधीही उजवे होते.

नि:संशय! पण कप्तानीचा जो ऑरा असतो तो दुर्दैवाने त्या दोघांभोवती तितकासा निर्माण झाला नाही.... तसेच त्या दोघांची कप्तान म्हणून कारकिर्दही इतर तिघांपेक्षा तुलनेने कमी लांबीची होती.
आणि त्यामुळे टॅक्टिकली वाले तुझे जे स्टेटमेंट होते ते लोकांना पचायला जरा जड जाते या अनुभवातुन ते "काय तर" आले असावे!

बाकी सकारियाने आज एक नंबर बॉलिंग केली Happy

>>आमच्या लहानपणी ज्याला बॅटिंग चांगली येत नसायची त्याला आम्ही खेळवायचो. आऊटच नाही करायचो.

Lol
अगदी अगदी.... आम्हीपण असेच करायचो Wink
मग त्याचेच टीमवाले त्याला रिटायर व्हायला लावायचे!!
सकारियाला काय कळतच नाही Lol

आमच्या लहानपणी ज्याला बॅटिंग चांगली येत नसायची त्याला आम्ही खेळवायचो. आऊटच नाही करायचो. जेव्हढे जास्त चेंडू खेळेल तेव्हडा स्कोर कमी व्हायचा. धोनीची बॅटिंग बघून ते प्रसंग आठवले..... आम्ही तर अजूनही असं करतो... त्या खेळाडू ला चिडवायला ही मजा येते.

आणि त्यामुळे टॅक्टिकली वाले तुझे जे स्टेटमेंट होते ते लोकांना पचायला जरा जड जाते या अनुभवातुन ते "काय तर" आले असावे! >> खड्ड्यात गेले रे असे लोक ज्यांना कुंबळे नि द्रविड च्या टॅक्टिकल अ‍ॅक्युमेन बद्दल प्रश्न असतील. अशा लोकांना ' आपण पुणे म्युनसिपाल्टीमधे उंदिर मारायच्या विभागात असून ...' मधे दुर्लक्ष करावे Wink

"आमच्या लहानपणी ज्याला बॅटिंग चांगली येत नसायची त्याला आम्ही खेळवायचो. आऊटच नाही करायचो." >> खरय ! धोनीला पेस नसताना बघवत नाही आता. मॉरिस चा पेस असल्यामूळे तिथे शॉट्स नीट बसले. स्लो झालेले रीफ्लेक्झालेलेमॅच प्रॅक्टीस नसणे उठून दिसतेय.

वोहरा कसला फ्रस्ट्रेटींग आहे बघायला. सगळे शॉट्स आहेत पण अजिबात मॅच्युरिटी नाही इतक्या वर्षांनंतर ही. शॉट्स बसतात तेंव्हा शॉ नि राहुल सारखे वाहवा येते नि नंतर अतिशय भुक्कड बॉल ला तितकाच भुक्कड शॉट्स खेळून बाद होतात.

सॅमसन सागा कंटीन्यूज ....... भाऊ, आज समोर बटलर सोन्यासारखा खेळत असताना स्ट्राईक रोटेट करायचे सोडून जे काही केले ते बघितलेत का ? ह्याच कारणासाठी तो भारतासाठी खेळत नाही. कोहलीची जागा घेण्याच्या अपेक्षा नाही फक्त श्रेयस अय्यरची मॅच्युरिटी दाखवावी एव्हढीच अपेक्षा आहे. नाहि तर पांडे सारख्या केसेस भरपूर आहेत.

"सॅमसन सागा कंटीन्यूज" - येस! वन फॉर द सीझन इनिंग पैह्ल्याच मॅच ला खेळून झालीय त्याची. आता अजून एखादी हाफ सेंच्यूरी करेल. संजू, शॉ, वोहरा सारखे गुणी खेळाडू टेंपरामेंट / मॅच्युरीटी च्या अभावी आपलं टॅलेंट वाया घालवतात हे पाहून वाईट वाटतं.

"खड्ड्यात गेले रे असे लोक ज्यांना कुंबळे नि द्रविड च्या टॅक्टिकल अ‍ॅक्युमेन बद्दल प्रश्न असतील." - couldn't agree more. सहज विषय निघाला म्हणून - द्रविड च्या कॅप्टन्सीखाली आपण टॉस जिंकून चेस करायला - एक स्ट्रॅटेजी म्हणून - सुरूवात केली. सलग १६ यशस्वी चेस चा विक्रम होता आपल्या टीम चा. त्याच काळात युवराज-धोनी जोडगोळी ला फिनीशर म्हणून रोल दिला गेला. अजित वाडेकर नंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंड अशा लागोपाठ सिरीज आपण जिंकलो होतो. कुंबळे च्या कॅप्टन्सीखाली भारतीय संघानं टेस्टमधे नंबर-१ व्हायची व्हिजन आणि प्लॅन तयार करून वाटचाल सुरू केली होती. त्याच्या रिटायरमेंटनंतर एखाद्या वर्षातच आपण नंबर-१ झालो होतो.

नाही नाही पण ते लोक बोलर्सना बॉल कुठे टाकायचा वगैरे काही सांगत नव्हते. त्याशिवाय बोलर्सना कळणारच कसं बॉलिंग कशी करायची ते??

"नाही नाही पण ते लोक बोलर्सना बॉल कुठे टाकायचा वगैरे काही सांगत नव्हते. त्याशिवाय बोलर्सना कळणारच कसं बॉलिंग कशी करायची ते??" - Proud आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेपर्यंत ते काही शिकतच नाहीत. अचानक त्या पातळीवर आल्यानंतर त्यांना गुरोपदेश होतो. Happy

>>सलग १६ यशस्वी चेस चा विक्रम होता
पण लोकांना २००७ चा वर्ल्डकपच लक्षात राहतो त्याचे काय करायचे?
म्हणजे खड्ड्यात गेले म्हणायचे का पुणे म्युनिसिपालटी मध्ये वगैरे वगैरे म्हणायचे ? Wink

*भाऊ, ....ह्याच कारणासाठी तो भारतासाठी खेळत नाही. * -- त्याला खेळवाच नाहीं म्हटलं/म्हणत मीं. फक्त, ' केरलचा एकमेव खेळाडू संघात यावा , अर्थात गुणवत्तेवरच, असं खूप वाटतं !' इतकंच ! Wink
सीएसके ने सामन्यावर पकड पक्की केलीय !

पण लोकांना २००७ चा वर्ल्डकपच लक्षात राहतो त्याचे काय करायचे? >>>> अगदी अगदी. द्रविडची कॅप्टन्सी म्हंटली की प्रत्येक वेळी फक्त २००७ च्या वर्ल्डकपचीच चर्चा होते!

पण द्रविडची कॅप्टन्सी जरा जास्त "कडक" होती का? की थोडा काळ चॅपेलच्या नादी लागल्याने तसं झालं होतं ? तो चांगला "पिपल मॅनेजर" नव्हता असं वाटायचं. लक्ष्मणच्या पुस्तकात एक दोन किस्से आहेत शिवाय तो गांगुलीच्या अनुपस्थितीत कॅप्टन असतानाचा मुलतान (?) कसोटीतला सचिन १९४ धावांवर असताना डाव डिक्लेअर करायचा किस्सा आहेच. अर्थात हे चॅपेलच्या आधी होतं.

म्हणजे खड्ड्यात गेले म्हणायचे का पुणे म्युनिसिपालटी मध्ये वगैरे वगैरे म्हणायचे >> 'जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारीमना तूच शोधूनी पाहे' म्हणून दाखवायचे. अगदी कप्तानीमधल्या दिग्गज लॉईड, वॉ ला ही चुकले नाहित असे प्रसंग.

पण द्रविडची कॅप्टन्सी जरा जास्त "कडक" होती का? >> कडक पेक्षा प्लेयर कडून १००% कमिटमेंटची अपेक्षा असायची नि तसे न केल्यास ती व्यक्त होत असे असे वाटले मला. धोनी ला फटके पडलेले असे सेहवाग ने सांगीतले आहे.

केरलचा एकमेव खेळाडू संघात यावा ?? एकमेव का ? श्रीसंथ पण होता की.

Pages